Tuesday, May 7, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 58 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेमंगळवारी (ता07रोजी उपद्रव शोध पथकाने 58 प्रकरणांची नोंद करून 22 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता
 (रु४००/- दंडया अंतर्गत  19  प्रकरणांची  नोंद करून 7 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आलाव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा  अशा  ठिकाणी  कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांचा वसुल करण्यात आलादुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.वाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल  करण्यात आला.उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (व्यक्तीअसल्यास 25 प्रकरणांची नोंद करून 5 हजार  रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 03 प्रकरणांची नोंद करून 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवारी (ता07रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत शेंद्रे किराणा स्टोर्स टिमकी मोमीनपुरा आणि धंतोली झोन अंतर्गत हरे रामा 
किराणा स्टोर्स कॉटन मार्केट 02 प्रकराणांची नोंद करुन एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसूल केलानेहरुनगर झोन अंतर्गत निरमई हाईट्स वैभव नगर दिघोरी रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविणे 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत ऑर्चिड दि ईन्टरनेशनल स्कुल बोखरा कोराडी रोड आणि रोयल पब्लिक स्कुल राठोड लेआऊट जाफर नगर या दोन प्रतिष्ठान कडुन परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. सईद इल्यास सी.आय.डी आफीस चौक जाफर नगर अंतर्गत जवळपासच्या मोकळ्या जागेवर खुप कचरा टाकल्यास हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 06 प्रकरणाची नोंद करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला

Saturday, May 4, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 81 प्रकरणांची नोंद- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

 नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेशुक्रवार (ता03रोजी उपद्रव शोध पथकाने 81 प्रकरणांची नोंद करून 57 हजार 800 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु४००/- दंडया अंतर्गत 26 प्रकरणांची नोंद करून 10 हजार 400 रुपयांची वसुली करण्यात आलीव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आलीदुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत  2  प्रकरणांची  नोंद  करून  
800 रुपयांची वसुली करण्यात आली.वाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून 32 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणाची नोंद करुन हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त  यादीत  आढळणारे  इतर उपद्रव (व्यक्तीअसल्यास 22 प्रकरणांची नोंद करून 4 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शुक्रवार (ता03रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत बब्बु हॉटेल मोमीनपुरा व सतरंजीपरा झोन अंतर्गत गौरव किराणा शॉप नेहरु पुतळा ईतवारी 2 प्रकरणची नोंद करून एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसूल केलायाशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत वृन्दांवन कन्सट्रशन्स खरे टाऊन, नेहरुनगर झोन अंतर्गत एलीगन्स बिल्डर्स नवीन सुभेदार लेआऊट, मंगळवारी झोन अंतर्गत प्राईड इनविल्व ईतवारी रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविणे या अंतर्गत तीन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 30 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत एलिट एक्स जीम गोरेवाडा रोड परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. पंजाबराव साहारे बेझनबाग परवानगी न घेता सर्विस रोड खोदकाम केल्याबाबत हजार रुपायांचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 07 प्रकरणाची नोंद करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला

Monday, April 29, 2024

नदी सफाई अभियानाचे कार्य प्रगतीपथावर

नागपूर:-  नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात नागपूर शहरातून वाहणा-या नाग नदीपिवळी नदी आणि पोहरा नदी या तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे. १ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तिनही नद्यांची एकूण ३५ टक्के सफाई झालेली आहे. या सफाई अभियानामध्ये नदीच्या सखोल स्वच्छतेवर भर देउन जास्तीत जास्त गाळ काढला जात आहे. याशिवाय पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा व त्याला कुठलाही अडथळा निर्माण होउ नये यासाठी  सिंचन विभागाच्या 
सुचनेनुसार अंबाझरी ते क्रेझी केसल व अंबाझरी घाट दरम्यान नाग नदीचे पात्र १७ मीटर रुंद करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी प्रमुख तिनही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य पूर्ण होणे आवश्यक असून त्यादृष्टीने गती वाढविण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. नागपूर शहरातील नाग नदीपिवळी नदी आणि पोहरा नदी यांच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी सफाई अभियान राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील तीनही नद्यांसह नाल्यांची सफाई करण्यात येते. यावर्षी मनपा आयुक्तांच्या पुढाकाराने नदी स्वच्छता अभियानाला लवकर सुरूवात झाली. नाग नदीची लांबी १६.५८ किमीपिवळी नदीची लांबी १७.४२ आणि

पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहेनाग नदीची अंबाझरी तलाव ते पंचशील चौकपंचशील चौक ते अशोक चौक , अशोक चौक ते सेंट झेव्हिअर स्कूलसेंट झेव्हिअर स्कूल ते पारडी उड्डाण पूल आणि पारडी उड्डाण पूल ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम) अशा टप्प्यांमध्ये स्वच्छता केली जात आहे. पिवळी नदीची गोरेवाडा तलाव ते नारा घाटनारा घाट ते वांजरा एसटीपी आणि वांजरा एसटीपी ते नदी संगम पर्यंत अशा तीन टप्प्यांमध्ये स्वच्छता सुरू आहे. पोहरा नदीचे सहकार नगर ते बेलतरोडी पूल दरम्यानच्या स्वच्छतेचे कार्य सुरू आहे.‍ नदी स्वछता संदर्भात सोमवारी (ता. 29) मुख्य अभियंता श्री राजीव गायकवाड यांनी आढावा बैठक घेतली. नदी स्वच्छतेच्या कामाला गती देण्यासाठी व उर्वरित नदीच्या लांबीची सफाई करण्यासाठी अतिरिक्त 8 पोकलेन 1 मे पासुन लावण्याचा निर्णय



घेण्यात आला. 15 जुन 2024 पुर्वी शहरातील तीनही नदींची सफाई पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. नागपूर शहरातील नद्यांची सखोल स्वच्छता व्हावी यादृष्टीने मनपाद्वारे नदी स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली. नदी स्वच्छतेसाठी ६ चमू तयार करण्यात आलेल्या असूनप्रत्येक चमूमध्ये मशीनचा समावेश आहे. मनपाचे तसेच भाडेतत्वारील पोकलेनटिप्पर याद्वारे नदींची सफाई केली जात आहे. अतिरिक्त पाऊस आल्यासही पूर परिस्थिती उद्भवू नये याकरिता नद्यांची अधिकाधिक पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढावी यासाठी नद्यांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे. या सर्व कार्यावर देखरेखीसाठी संबंधित झोनमधील कार्यकारी अभियंत्यांकडे जबाबदारी निश्चित केलेली आहे. सध्या नाग नदीच्या स्वच्छतेसाठी एकूण ४ पोकलेनएक जेसीबी३ टिप्पर तर पिवळी नदी करिता ३ पोकलेन२ जेसीबी२ टिप्पर आणि
पोहरा नदीसाठी २ पोकलेन कार्यरत आहेत.नाग नदीपिवळी नदी आणि पोहरा नदीच्या आतापर्यंतच्या एकूण १७.४७ किमी अंतराच्या सफाई कार्यातून एकूण ६९१३५.५७ क्यूबीक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. यापैकी ३००२९.१० क्यूबीक मीटर गाळाची नदीपात्रातून इतरत्र वाहतूक करीत सुरक्षित ठिकाणी टाकण्यात आलेले आहे. नाग नदीच्या सफाई दरम्यान ३९९००.५ क्यूबीक मीटर गाळ काढण्यात आले तर यापैकी २०३०६.१ क्यूबीक मीटर गाळ इतरत्र हलविण्यात आले. पिवळी नदीच्या सफाई दरम्यान २४०८५ क्यूबीक मीटर गाळ काढण्यात आला. यापैकी ९७२३ क्यूबीक मीटर गाळ नदी पात्रातून दुस-या ठिकाणी नेण्यात आले. पोहरा नदीची स्वच्छते दरम्यान यातून ५१५०.०७ क्यूबीक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे.
 

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...