Monday, April 29, 2024

नदी सफाई अभियानाचे कार्य प्रगतीपथावर

नागपूर:-  नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात नागपूर शहरातून वाहणा-या नाग नदीपिवळी नदी आणि पोहरा नदी या तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे. १ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तिनही नद्यांची एकूण ३५ टक्के सफाई झालेली आहे. या सफाई अभियानामध्ये नदीच्या सखोल स्वच्छतेवर भर देउन जास्तीत जास्त गाळ काढला जात आहे. याशिवाय पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा व त्याला कुठलाही अडथळा निर्माण होउ नये यासाठी  सिंचन विभागाच्या 
सुचनेनुसार अंबाझरी ते क्रेझी केसल व अंबाझरी घाट दरम्यान नाग नदीचे पात्र १७ मीटर रुंद करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी प्रमुख तिनही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य पूर्ण होणे आवश्यक असून त्यादृष्टीने गती वाढविण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. नागपूर शहरातील नाग नदीपिवळी नदी आणि पोहरा नदी यांच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी सफाई अभियान राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील तीनही नद्यांसह नाल्यांची सफाई करण्यात येते. यावर्षी मनपा आयुक्तांच्या पुढाकाराने नदी स्वच्छता अभियानाला लवकर सुरूवात झाली. नाग नदीची लांबी १६.५८ किमीपिवळी नदीची लांबी १७.४२ आणि

पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहेनाग नदीची अंबाझरी तलाव ते पंचशील चौकपंचशील चौक ते अशोक चौक , अशोक चौक ते सेंट झेव्हिअर स्कूलसेंट झेव्हिअर स्कूल ते पारडी उड्डाण पूल आणि पारडी उड्डाण पूल ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम) अशा टप्प्यांमध्ये स्वच्छता केली जात आहे. पिवळी नदीची गोरेवाडा तलाव ते नारा घाटनारा घाट ते वांजरा एसटीपी आणि वांजरा एसटीपी ते नदी संगम पर्यंत अशा तीन टप्प्यांमध्ये स्वच्छता सुरू आहे. पोहरा नदीचे सहकार नगर ते बेलतरोडी पूल दरम्यानच्या स्वच्छतेचे कार्य सुरू आहे.‍ नदी स्वछता संदर्भात सोमवारी (ता. 29) मुख्य अभियंता श्री राजीव गायकवाड यांनी आढावा बैठक घेतली. नदी स्वच्छतेच्या कामाला गती देण्यासाठी व उर्वरित नदीच्या लांबीची सफाई करण्यासाठी अतिरिक्त 8 पोकलेन 1 मे पासुन लावण्याचा निर्णय



घेण्यात आला. 15 जुन 2024 पुर्वी शहरातील तीनही नदींची सफाई पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. नागपूर शहरातील नद्यांची सखोल स्वच्छता व्हावी यादृष्टीने मनपाद्वारे नदी स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली. नदी स्वच्छतेसाठी ६ चमू तयार करण्यात आलेल्या असूनप्रत्येक चमूमध्ये मशीनचा समावेश आहे. मनपाचे तसेच भाडेतत्वारील पोकलेनटिप्पर याद्वारे नदींची सफाई केली जात आहे. अतिरिक्त पाऊस आल्यासही पूर परिस्थिती उद्भवू नये याकरिता नद्यांची अधिकाधिक पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढावी यासाठी नद्यांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे. या सर्व कार्यावर देखरेखीसाठी संबंधित झोनमधील कार्यकारी अभियंत्यांकडे जबाबदारी निश्चित केलेली आहे. सध्या नाग नदीच्या स्वच्छतेसाठी एकूण ४ पोकलेनएक जेसीबी३ टिप्पर तर पिवळी नदी करिता ३ पोकलेन२ जेसीबी२ टिप्पर आणि
पोहरा नदीसाठी २ पोकलेन कार्यरत आहेत.नाग नदीपिवळी नदी आणि पोहरा नदीच्या आतापर्यंतच्या एकूण १७.४७ किमी अंतराच्या सफाई कार्यातून एकूण ६९१३५.५७ क्यूबीक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. यापैकी ३००२९.१० क्यूबीक मीटर गाळाची नदीपात्रातून इतरत्र वाहतूक करीत सुरक्षित ठिकाणी टाकण्यात आलेले आहे. नाग नदीच्या सफाई दरम्यान ३९९००.५ क्यूबीक मीटर गाळ काढण्यात आले तर यापैकी २०३०६.१ क्यूबीक मीटर गाळ इतरत्र हलविण्यात आले. पिवळी नदीच्या सफाई दरम्यान २४०८५ क्यूबीक मीटर गाळ काढण्यात आला. यापैकी ९७२३ क्यूबीक मीटर गाळ नदी पात्रातून दुस-या ठिकाणी नेण्यात आले. पोहरा नदीची स्वच्छते दरम्यान यातून ५१५०.०७ क्यूबीक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे.
 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 109 प्रकरणांची नोंद- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगर पालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक  ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर,  कचरा  फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेसोमवार (ता29रोजी उपद्रव शोध पथकाने 109 प्रकरणांची नोंद करून 55 हजार 300 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या 
नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या
परिसरात अस्वच्छता (रु४००/- दंड)  या  अंतर्गत 39 प्रकरणांची नोंद करून 15 हजार 600 रुपयांची वसुली करण्यात आलीव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांची वसुली करण्यात आलीदुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत  9  प्रकरणांची  नोंद  करून  3600  रुपयांची वसुली करण्यात आली.मॉलउपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांची वसुली करण्यात आलीवाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 10 हजार  रुपयांची वसुली करण्यात आली.

वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणाची नोंद करुन हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त  यादीत   आढळणारे  इतर उपद्रव (व्यक्तीअसल्यास 33 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 14 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोमवार (ता29रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत शाहु गिफ्ट कार्नर 01 प्रकरणांची नोंद करून 5 हजार रुपयाचा दंड वसूल केलायाशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत उपारकर आकांक्षा सोसायटी व गांधीबाग 




झोन सतीश चौधरी (बिल्डर्स) झेंडा चौक महाल कन्स्ट्रशन्स रस्त्यालगत बांधकाम साहीत्य पसरविणे या अंतर्गत दोन्ही कडुन एकुण  15 हजार  रुपये  दंड  वसूल केला हनुमाननगर झोन शेख इरफान अनंत कॉलोनी ताजबाग उमरेड रोड मोकळी जागेवर कचरा पसरविणे या  अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करुन हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन येथील म्युजीकल अकेडमी माता मंदीर रोड यांच्यावर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 05 प्रकरणाची नोंद करून 30 हजार दंड वसूल करण्यात आला

Friday, April 26, 2024

QR कोड स्कॅन करून मिळवा उद्यानाची माहिती अन् नोंदवा अभिप्राय

नागपूर:सर्वत्र वाढते शहरीकरण आणि गगनचुंबी इमारतींच्या मध्ये मानवाला थेट निसर्गाशी जोडण्याचे एक सुंदर माध्यम म्हणजे उद्यानसुदृढ आरोग्यशुद्ध हवा आणि निसर्गाचा स्पर्श अनुभवता येणाऱ्या उद्यानात विविध रंगीबेरंगी फुलेहिरवळ आणि पक्षांचा किलबिलाट मनाला आनंद देतोआपण ज्या उद्यानात बसून निसर्गाशी हितगुज साधत आहोतत्याच उद्यानाची माहिती आणि उद्यान विकासासंदर्भात अभिप्राय आता एक क्यू आर कोड स्कॅन करून थेट महानगरपालिकेच्या उद्यान विभागात नोंदविता येणार आहे.शहरातील उद्यानांची माहिती मिळावी  उद्यानासादर्भात तक्रार थेट मनपाच्या उद्यान विभागाकडे पोहोचविता यावीया उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहेमनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या प्रेरणेने मनपा क्षेत्रातील उद्यानांमध्ये “क्यू आर कोड बेस 
गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम” ही प्रणाली विकसित करण्यात आली आहेत्यानुसार मनपा क्षेत्रातील 26 उद्यानांमध्ये ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता.२६धंतोलीतील मेजर सुरेंद्र देव उद्यानात (धंतोली गार्डनप्रायोगिक तत्वावर लावण्यात आलेल्या “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीमचे निरीक्षण केलेयाप्रसंगी उद्यान अधीक्षक श्रीअमोल चौरपगारआयटी विभागाचे श्रीस्वप्निल लोखंडे यांच्यासह धंतोली नागरिक मंडळाचे श्रीप्रदीप कोकासमाजी नगरसेवक श्री.बबलू देवतळेश्रीलखन येरवार आदी सदस्य उपस्थित होते. आयटी  विभागाचेश्रीस्वप्निल लोखंडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांना संपूर्ण प्रणालीचे कार्य प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितलेया 



अभिनव उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या २६ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रवेश द्वारउद्यानातील बसण्याचे ठिकाणमुलांचे क्रीडांगणबाहेर जाण्याचा मार्ग अशा जवळपास चार ते पाच दर्शनीय जागेवर “क्यू आर कोड” लावण्यात येणार आहेतहा कोड मोबाईलवर स्कॅनकरून नागरिक उद्यानाची माहितीत्यासंदर्भाती तक्रारीविकासासाठीचे अभिप्राय थेट मनपाच्या उद्यान विभागआयटी विभागउद्यानातील संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यंत पोहोचवू शकतोनागरिकांकडून मिळणारा प्रतिसादसूचनाअभिप्राय लक्षात घेवून मनपा हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशाप्रकारे क्यू आर कोड लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.  मनपा  आयुक्त  तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी मार्गदर्शनात 





नपाची उद्याने अधिक नागरिक स्नेही करण्याचा प्यत्न उद्यान विभागाद्वारे केला जात असल्याचे उद्यान अधीक्षक श्रीअमोल चौरपगार यांनी सांगितले.  

क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम असे करेल काय..
मनापाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर मनपा क्षेत्रातील २६ उद्यानात लावण्यात येणार आहेयाद्वारे नागरिक मोबाईलवर क्यू आर कोड स्कॅन करून उद्यानाचे परिसरउद्यानात असणारे विविध वृक्षफूलउद्यानात दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधाप्रसाधनगृह आदी विषयी माहिती मिळवू शकताततसेच उद्यानासंदर्भातील तक्रार देखील करू शकतात.  नागरिकांनी केलेली तक्रार एसएमएसद्वारे तक्रारकर्ताउद्यान विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यत पोहोचेल  समस्याचे निराकरण त्वरित करता येईल

नदी सफाई अभियानाचे कार्य प्रगतीपथावर

नागपूर: -   नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत...