Tuesday, April 29, 2025

अतिरिक्त आयुक्तांनी केली गोरेवाडा व जागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी,टेलिमेडिसिन सुविधेचा घेतला आढावा

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी मंगळवारी (ता. २९) गोरेवाडा व जागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली व पाहणी केली. त्यांनी दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये सुरु असलेल्या टेलिमेडिसिन सेवेचा आढावा घेतला.यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतिक खान, सतरंजीपुरा झोनच्या झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुलभा शेंडे, गोरेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. समीरा खान, जागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र कळमकर, डॉ. रुचिता चवरे, डिजिस्वास्थ्य फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. अशोक कुमार आणि प्रकल्प समन्वयक श्री. प्रांजल सुहागपुरे उपस्थित होते.नागपूर महानगरपालिकेच्या गोरेवाडा व जागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डब्ल्यूसीएल च्या सीएसआर 

निधीमधून प्रायोगिक तत्वावर 'टेलिमेडिसिन'ची सुरुवात करण्यात आलेली आहे. या 'टेलिमेडिसिन' सुविधेचे संचालन डिजिस्वास्थ्य फाउंडेशनद्वारे केले जात आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये सुरु असलेल्या 'टेलिमेडिसिन' सेवेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. या सेवेमार्फत रुग्णांचे समुपदेशन, तपासणी आणि उपचार या सर्व प्रक्रिबाबत देखील त्यांनी विस्तृत माहिती घेतली व आढावा घेतला. मनपाच्या दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही सुविधा सुरु करण्याचा मानस यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी व्यक्त केला. 
काय आहे टेलिमेडिसिन सुविधा?:- मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या ज्या रुग्णाला तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल त्यांना 'टेलिमेडिसिन'मार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तज्ज्ञांकडून मोफत सल्ला देण्यात येतो. रुग्णाला पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढील उपचार करण्यात येतात. शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना (पीएम-जेएवाय) यासारख्या केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचा देखील लाभ मिळवून देण्यात येतो. यासाठी देशातील विविध भागातील स्त्रीरोग तज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट,  ऑन्कोलॉजिस्ट,  ऑर्थोपेडिक्स,  डर्मेटोलॉजिस्ट,  इएनटी, डेंटिस्ट, ग्रॅस्ट्रोनेट्रोलॉजी, हृदयरोगतज्ज्ञ,  ऑप्थेंमोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट,  फिजिओथेरेपिस्ट,  डायटिशियन, जनरल मेडिसिन आणि बालरोगतज्ञांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते आठवड्यातील निर्धारित दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सेवा देतात. रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि उपचाराबाबत नियमित फॉलोअप देखील घेतले जाते.

नागपूर हेरीटेज संवर्धन समितीची मनपा मुख्यालयात बैठक

नागपूर:- शहरातील विविध भागातील वारसा स्थळांच्या संदर्भात नागपूर हेरीटेज संवर्धन समितीची बैठक समितीचे अध्यक्ष मा. श्री. अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.29)  मनपा मुख्यालयातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत  पार पडली. बैठकीत मुख्य अभियंता लीना उपाध्ये, नगररचना विभागाचे सहायक संचालक श्री.ऋतुराज जाधव, एमएसआयडीसीचे अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश पांग्रृत उपअभियंता श्री. राजीव गौतम, इनटॅक लोकल चॅप्टरच्या समन्वयक श्रीमती मधुरा राठोड, रातुम नागपूर विद्यापीठाच्या माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. शुभा जोहरी, पुरातत्व विभागाचे अधीक्षक श्री. अरुण मलिक, उपअभियंता श्री. विवेक तेलरांधे, आर्किटेक्चर वेद पुरनेन्दु प्रकाश उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास 
महामंडळाचे (एमएसआयडीसी) अधीक्षक अभियंत्यांनी नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयाच्या इमारतींचे एकत्रित प्रस्तावित बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्यापासून सवलत देण्याचा प्रस्ताव नागपूर हेरीटेज संवर्धन समितीला सादर केला. यावेळी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम  हेरिटेज इमारत (जुने कोषागार इमारत) पासून 108 मीटर दूर करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी हेरीटेज समितीला माहिती दिली. यावर समितीने समाधान व्यक्त केले. याचबरोबर जागनाथ बुधवारी येथील श्री. जागृतेश्वर देवस्थानाबाबत प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 50 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (29)  रोजी शोध पथकाने  50  प्रकरणांची नोंद करून  रु. 1,48,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, ‍पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत  16  प्रकरणांची नोंद करून  रु.6,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत  02 प्रकरणांची नोंद करून रु.800/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 03 
प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून रु.1,15,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. वैद्यकिय व्यवसायिकांना बायोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 10,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून रु.3,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. 
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 06 प्रकरणांची नोंद करून रु.6,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.‍तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी झोन अंतर्गत मे. ऐ-1 रेस्टोरेंट ॲण्ड बार यांनी अन्नपदार्थ टाकून चेंबरमध्ये अडथळा निर्माण झाला आणि ग्रीन ट्रिब्युनल कायद्याअंतर्गत रु.15,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. ईंजिनीयस हाईट्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल एकुण रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. विठ्ठल बाजिराव यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल एकुण रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत श्रीपाल खंजाची यांनी जुन्या इमारती पाडताना कोणतीही सुरक्षा खबरदारी न घेतल्याने आणि वायू आणि ध्वनी प्रदूषण पसरवल्याबद्दल रु.50,000/- चे दंड वसुल करण्यात आले.  मे. एम. आर.वि. कंन्संट्रक्शनस यांनी जुन्या इमारती पाडताना कोणतीही सुरक्षा खबरदारी न घेतल्याने आणि वायू आणि ध्वनी प्रदूषण पसरवल्याबद्दल रु.50,000/- चे दंड वसुल करण्यात आले. मे. अल-नुर  क्लिनीक सामान्य कचऱ्यासोबत जैव वैद्यकीय कचरा आढळला आणि नियम BMW-1998 अंतर्गत रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.‍ श्री द.बेकरी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत राधे डेरी यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 08  प्रकरणांची नोंद करून रू. 1,55,000/- दंड वसूल केला.

Monday, April 28, 2025

मनपा मानेवाडा आरोग्य केंद्राच्या राष्ट्रीय गुणवत्ता मूल्यांकनाला सुरुवात डॉ. सिद्धी घटवाल व डॉ. अमित शर्मा यांचेकडून दोन दिवस मूल्यांकन

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे राष्ट्रीय गुणवत्ता मूल्यांकन करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाकडून दोन सदस्यीय समिती नागपूरमध्ये दाखल झालेली आहे. राष्ट्रीय गुणवत्ता मूल्यांकन मानके (एनक्यूएएस) तपासण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन कर्ता गोवा येथील राज्य समन्वयक डॉ. सिद्धी घटवाल व हरियाणातील फरीदाबाद येथील जिल्हा समन्वयक डॉ. अमित शर्मा यांचे नागपूर शहरात आगमन झाले. सोमवारी (ता.२८) मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मनपाद्वारे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शहर गुणवत्ता समन्वयक डॉ. राजेश बुरे, मानेवाडा केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनल पटले, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाक डॉ. शुभांगी कुंभरे आदी उपस्थित होते.एनक्यूएएसचे राष्ट्रीय मूल्यांकनकर्तांकडून सोमवार आणि मंगळवार (२८ व २९ एप्रिल) दोन दिवस मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मूल्यांकन केले जाणार आहे. सामान्य दवाखाना, लसीकरण, आरोग्य सेवेची व्याप्ती, माता आरोग्य, बाल 
आरोग्य, औषधालय, प्रयोगशाळा अशा विविध १२ सेवांच्या कार्याचे मूल्यांकन होणार आहे. राष्ट्रीय चमूकडून होणाऱ्या मूल्यांकनामध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचारी यांनी पूर्ण सहकार्य करावे. समितीकडून विचारण्यात येणारी माहिती, प्रश्नांची व्यवस्थित व योग्य माहिती देण्यात यावी. मनपाच्या आरोग्य केंद्राचे कार्याला राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम मानांकन मिळावे, यादृष्टीने सर्वांनी कार्य करण्याचे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले.
एनक्यूएएसचे राष्ट्रीय मूल्यांकन कर्ता डॉ. सिद्धी घटवाल व डॉ. अमित शर्मा यांनीही यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी, परिचारीका व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दोन दिवस चमूकडून मूल्यांकनाचे कार्य होत असताना आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या शंकांचे देखील निरसरण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.  मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात दोन्ही राष्ट्रीय मूल्यांकनकर्तांचे मनपाद्वारे शाल, श्रीफळ आणि रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनल पटेल यांनी मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्याची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. संचालन शहर गुणवत्ता समन्वयक डॉ. राजेश बुरे यांनी केले.यानंतर एनक्यूएएसचे राष्ट्रीय मूल्यांकन कर्ता डॉ. सिद्धी घटवाल व डॉ. अमित शर्मा यांच्यातर्फे नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मूल्यांकन केले जाणार आहे. तसेच गुजरात येथील डॉ. मोईज मेघराजीया व राजस्थान येथील डॉ. कर्नल प्रमोद कुमार या समितीद्वारे कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मूल्यांकन केले जाणार आहे.

महापालिका आयुक्तांनी दिली लोकसेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ

 मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी जनमाहिती अधिकार कार्यशाळा संपन्न  जनमाहिती अधिकारी श्री. प्रशांत चौधरी यांनी केले मार्गदर्शन
नागपूर:- महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदा 2015 च्या दशकपूर्तीनिमित्ताने महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क दिनाच्या दशकपूर्ती निमित्त आज (ता. 28) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात शपथ दिली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायद्यामध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जनतेला त्वरित व पारदर्शक सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची शपथ महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. तसेच झोन स्तरावर सुध्दा लोकसेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.यावेळी उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचेटवार, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक श्री. ऋतुराज जाधव, सहाय्यक आयुक्त श्री. हरीश राऊत, सहाय्यक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, सहाय्यक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे, सहाय्यक आयुक्त श्रीमती स्नेहलता 
कुंभार, सहाय्यक आयुक्त श्री. शाम कापसे, सहाय्यक आयुक्त श्रीमती सोनम देशमुख, सामान्य प्रशासन अधीक्षक राजकुमार मेश्राम, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री. डॉ. नरेंद्र बहीरवार व महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोकसेवा दिनानिमित्त कार्यशाळा:- लोकसेवा हक्क दिनाच्या निमित्ताने महापालिकेतील जनमाहिती अधिकाऱ्यांची कार्यशाळा डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह येथे आयोजित केली होती. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून जनमाहिती अधिकारचे
राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. प्रशांत चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपायुक्त श्री.अशोक गराटे, उपायुक्त श्री.गणेश राठोड, कार्यकारी अभियंता अश्विनी येलचटवार सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, सहाय्यक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे, सहाय्यक आयुक्त श्री. विजय थूल, सहाय्यक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, पारितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त श्रीमती स्नेहलता कुंभार, सहायक आयुक्त श्रीमती सोनम देशमुख, श्री. सतीश चौधरी, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, उपअभियंता राजीव गौतम, सामान्य प्रशासन अधीक्षक श्री. राजकुमार मेश्राम, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, प्रामुख्याने उपस्थित होते.





राज्यात महाराष्ट्र राज्य लोक सेवा हक्क आयोगाची स्थापना 28 एप्रिल 2015 रोजी झाली असून  28 एप्रिल हा दिवस ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दशकपूर्तीचे औचित्य साधून विशेष उपक्रम राबविले गेले. येथे सोमवारी (ता.28) नागपूर महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जन माहिती अधिकार कायद्याची सखोल माहिती व्हावी तसेच जनमाहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी श्री. प्रशांत चौधरी अधिकारी- कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथे सर्वसामान्यसाठी कामे करणे गरजेचे आहे. त्याकरीता स्वत:हून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. 
ज्या ठिकाणी आपण काम करतो ते आपले कर्तव्य पार पाडण्याचे एक पवित्र स्थान आहे, असे मानले तर देशाची प्रगती होईल, असेही ते म्हणाले. माहिती अधिकार कायदा अंतर्गत आलेला अर्ज एकाच संस्थेच्या विविध विभागांशी संबंधित असेल तर त्याकरीता संवाद वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी माहितीचा अधिकारामधील विविध कलमे
, शासन निर्णंयाची माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले जनमाहिती अधिकार कायदा 2005, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदा 2015 हे दोन्ही कायदे जनतेच्या कल्याणाकरीता आहे. या कायदयामुळे जनता योग्य ती माहिती प्राप्त करुन घेवु शकते. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदयामुळे चांगले सकारात्मकता परिणाम दिसुन आले आहे. तसेच नागरीकांचा त्रास कमी झालेला आहे. नागरीकांना घरबसल्या अर्जांची स्थिती जाणून घेता येते. नागरीकांना संधी उपलब्ध करुन केल्याबद्दल श्री. प्रशांत चौधरी यांनी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. असेच कायदे राज्यात यावे अशी अपेक्षा केली. 

शहरातील १० शासकीय रुग्णालयांमध्ये कोल्ड वॉर्डची व्यवस्था उष्माघात प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

नागपूर:- भीषण उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढत आहेत. अशात शहरातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार नागपूर शहरातील १० शासकीय रुग्णालयांमध्ये कोल्ड वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांना देखील उष्माघातासाठी ‘अलर्ट’ राहण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.उष्माघात प्रतिबंधासाठी नागपूर शहरात विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याशिवाय शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालय, कामठी रोड, सेंट्रल रेल्वे रुग्णालय, इ.एस.आय.एस. रुग्णालय, सोमवारी पेठ, डागा रुग्णालय गांधीबाग, तसेच मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली स्त्री रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा या दहा रुग्णालयांमध्ये विशेष कोल्ड वार्ड तयार करण्यात आले आहेत. १०८ च्या 
रुग्णवाहिका तसेच मनपाच्या रुग्णवाहिका सज्ज आहेत. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उष्माघाताच्या रुग्णांवर त्वरीत उपचार व्हावेत यासाठी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना देखील पत्र देण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाल्यास त्याचा अहवाल मनपा आरोग्य विभागाला पाठविण्याचे देखील आदेश देण्यात आले आहे.विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयांमध्ये कोल्ड वार्ड उपलब्ध नसल्यास मनपाद्वारे सुविधेसाठी संपर्क करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. मनपाद्वारे विविध आजारांच्या संदर्भात तसेच उन्हाळ्यात उष्माघाताच्या संदर्भात रुग्णांचा नोंदणी अहवाल नियमितरित्या खासगी रुग्णालयांकडून मागविण्यात येत असतो, 
अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.उष्माघाताची लक्षणे:- शरीराचे तापमान वाढल्यास त्याला उष्माघात म्हणतात. मळमळ, उलटी, ताप, त्वचा कोरडी पडणे, थकवा, चक्कर, डोकेदुखी, मनाची स्थिती बिघडते, चिडचिड, जीभ जड होणे, जास्त घाम येणे, पायात गोळे येणे, पोटऱ्यात वेदना, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी, बेशुद्धावस्था.अशी घ्या काळजी:- नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघणे टाळावे.- उन्हात जाण्याची वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी.- उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे.- स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरावीत बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा.- ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करावा.हे टाळा:- उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे, उन्हात कष्टाची कामे करणे टाळा.- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका.- गडद, घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळावे, उन्हात स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.- मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावी, शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळावे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 43 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (28) रोजी शोध पथकाने 43 प्रकरणांची नोंद करून रु.61,000/- रुपयाचा दंड वसूल केला. हातगाडी, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 39 प्रकरणांची नोंद करून रु.15,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून रु.2,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोडींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/-रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा 
रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रु. 12,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन रू.2,000/- दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून रु.3,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतेर उपद्रव संस्था असल्यास 03 प्रकरणांची नोंद करून रु.3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत मे. मंगलुरु किचन यंनी अन्नपदार्थ टाकून चेंबरमध्ये अडथळा निर्माण झाला आणि ग्रीन ट्रिब्युनल कायद्याअंतर्गत रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला.
धरमपेठ झोन अंतर्गत मे. कैंसर क्लिनिक सामान्य कचऱ्यासोबत जैव वैद्यकीय कचरा आढळला आणि BMW-1998 अंतर्गत रु.20,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. नरसिंग येडे यांनी वैयक्तिक कामासाठी वाहन क्रमांक MH-CT-7773 द्वारे रस्ता अडवल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. मालगुडी कॅफे यांनी कॅफेचा कचरा जवळच्या रस्त्याच्या पसरल्याबद्दल 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. राजा बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल एकुण रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन मे. विजय किराणा शॉप यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. आसी नगर झोन अंतर्गत तुषार अनिल  इंदूरकर  यांनी जवळच्या फूटपाथ परिसरात केटरिंग साहित्य पसरवल्याबद्दल 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 07 प्रकरणांची नोंद करून रू. 65,000/- दंड वसूल केला.

शालार्थ आईडी घोटाला:प्रधानाचार्य तो केवल नाममात्र के हस्ताक्षरकर्ता हैं; असली साजिशकर्ता तो संस्था के निदेशक हैं? विदर्भ शिक्षक संघ का प्रश्न

[Demo Pick]  नागपुर: - विदर्भ शिक्षक संघ ने इस बात पर कड़ी नाराजगी जताई है कि राज्य में चल रहे शलार्थ आईडी घोटाले की जांच में केवल उन्हीं प्...