Thursday, September 19, 2024

वनामतीत रंगला मनपा अधिकारी व विद्यार्थ्यांमध्ये "स्वच्छता संवाद"

 
नागपूर:- स्वच्छतेची सुरुवात ही आपण स्वतःपासून करावी, घरी येणाऱ्या कचरा संकलन गाडीत घराचा कचरा ओला व सुका असा वर्गीकृत करून द्यावा, ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा, ओला कचऱ्यापासून खताची निर्मिती होते, कचरा फक्त कचराकुंडीत टाका आपल्या शालेय परिसरात भवती लोक कचरा टाकत असतील तर, त्यांचे योग्य मार्गदर्शन करावे, स्वच्छते विषयी नागरिकांच्या मानसिकतेत एका दिवसात बदल योणार नाही, पण तो एक दिवस नक्की होईल, ही उत्तरे आहेत जिज्ञासू विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची, गुरुवारी (ता:१९ ) वनामती सभागृहात मनपा अधिकारी व शालेय विद्यार्थ्यांमध्ये "स्वच्छता संवाद" रंगला, यादरम्यान विद्यार्थ्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांचे  मनपा अधिकाऱ्यांनी तत्परतेने निरसन केले.'स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता' या संकल्पनेस अनुसरून नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छता ही सेवा   अभियान उत्साहाने राबविण्यात येत आहे.  अभियानांतर्गत गुरुवारी (ता: १९) व्हीआयपी रोड स्थित वनामती सभागृहात मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेत शालेय विद्यार्थी आणि मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये स्वच्छता संवाद या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, संपूर्ण कार्यक्रम झिरो वेस्ट संकल्पनेवर आधारित होता.कार्यक्रमात उपस्थीतांनी स्वच्छता शपथ घेतली.कार्यक्रमात वनामतीच्या संचालिका वसुमना पंत, नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा-चांडक, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, धरमपेठ झोनचे उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांच्यासह सहायक आयुक्त, सर्व झोनल अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमात मार्गदर्शन करीत मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले की, नागपूर शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.  नागपूर शहरातून १२ लाख किलो कचरा भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड येथे नेला जातो, येथे कचऱ्याचे डोंगर निर्माण होत आहेत या कचऱ्याचे जर आपण आपल्या घरीच योग्य वर्गीकरण केले तर, भांडेवाडीत जमा होणारा कचऱ्याचे ढिगारे  कमी करण्यात मदत होईल, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी स्वच्छते कडे लक्ष दिले तर, पुढे चालून आपण नागपूरला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ शहर म्हणून नक्कीच नाव लौकिक मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त करीत श्रीमती आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांना घरच्या प्लास्टिक कचऱ्यापासून इकोबिक्सची निर्मिती करावी, स्वच्छता विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, आपण स्वच्छतेचे संदेश वाहन व्हावे असे आवाहन केले.याशिवाय श्रीमती आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांना झिरो वेस्ट कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली, तसेच आपणही कमीत कमी कचऱ्याची निर्मिती होईल याकरिता 
आपल्या घरी व शाळेत होणारे कार्यक्रम झिरो वेस्ट संकल्पनेद्वारे साजरे करावे असे आवाहन ही श्रीमती आंचल गोयल यांनी केले.*स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करा: श्रीमती सौम्य शर्मा चांडक*विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्य शर्मा चांडक यांनी स्वच्छतेची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वतःपासून करावी असे आवाहन केले, त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपल्याकडून कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी, घरी येणाऱ्या कचरा संकलन गाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा द्यावा, विद्युत कचरा (ई-वेस्ट)चे योग्य वर्गीकरण करावे, प्लास्टिक कचऱ्यापासून घरीच इकोब्रिक्सची निर्मिती करावी, आपल्या लहान प्रयत्नांचा पुढे चालून मोठा परिमाण नक्की दिसून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.*विद्यार्थी भविष्याचे सुजाण नागरिक:  वसुमना पंत*विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत वनामतीच्या संचालिका श्रीमती वसुमना पंत यांनी सांगितले की, विद्यार्थीचे मन, संस्कार व दिशा स्वच्छ असते, म्हणून त्यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांची उत्तम साद मिळते, सध्याचे विद्यार्थी भविष्यातील सुजाण नागरिक आहेत, विद्यार्थ्यांनी बदलाची सुरुवात स्वतःपासून करून इतरांना त्याबाबत जागृत करावे, आम्ही कचरा करणार नाही आणि इतर कचरा होऊ देणार नाही असा निश्चय विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन श्रीमती पंत यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी स्वच्छ भारत मिशनच्या प्रथम पाच वर्षात नागपूर शहराला हागणदारीमुक्त शहर (ओडीएफ++) प्रवर्गात आणि वॅाटर + प्रवर्गात नामांकन प्राप्त असल्याचे सांगितले, तरी यंदाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांच्या योगदानाने शहराला 
कचरा मुक्त शहर करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे असे सांगितले. यावेळी विद्यार्थिनी प्रियंका यादव, उमेदा झैनब आणि संस्कृती सुर्यवंशी यांनी स्वच्छता विषयी आपले विचार व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी यांनी केले.कार्यक्रमात स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर ही संकल्पना घराघरापर्यंत पोहोचावी या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शालेय विद्यार्थीना मनपाचे स्वच्छता योद्धा अर्थात स्वच्छता ब्रँड अँम्बेसेडर बनविण्यात आले. यात लालबहादूर शास्त्री मनपा शाळेचा विद्यार्थी प्रीतमकुमार राम, कपिल नगर हिंदी हायस्कूलची सबा अन्सारी, नेताजी मार्केट हिंदी हायस्कूलचे यमन साहू, जी एम बनतवाला हायस्कूलची उमेदा झैनब, गरीब नवाब उर्दू हायस्कूलचे अश्मीरा परवीन डॉ. राम मनोहर लोहिया शाळेची संस्कृती सुर्यवंशी वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळेची प्रियांका राजेंद्र यादव, संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेची कल्पना साहू विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेचा सचिन गंगा मुसराज, एम ए के आझाद उर्दू हायस्कूल अनम अफशीन, शिवणगाव हायस्कूलची परी इंगोले, दुर्गा नगर हिंदी माध्यमिक शाळेचा सोहम गायधने, जयताळा हायस्कूलची प्रिया रॉय, ताजाबाद उर्दू हायस्कूलची तबस्सुम हबीब खान, शहनाज फातिमा यांची 
स्वच्छता ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे विद्यार्थी आपल्या शाळेसह इतर परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगणार आहेत.*स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार*नागपूर शहराला स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ राखण्यासाठी दिवसरात्र कार्यरत सफाई कर्मचारी यांची प्रेरणादायी चित्रफित  कार्यक्रमात दाखविण्यात आली, तसेच सफाई कर्मचारी नथू पाटील आणि संदीप सोमकुवर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.*माय पॉकेट, माय बीन*आपल्या आसपास स्वच्छता ठेवणे म्हणजे आपल्या भोवती कचरा न करणे व साफ सफाई ठेवणे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आजूबाजूला कचरा टाकणे अत्यंत वाईट सवय असून त्याने परिसरात अस्वच्छता पसरते, त्यामुळे माय पॉकेट, माय बीन समजून आपण खालेले चॉकलेट, वेफरचे पाकीट स्वतःच्या पॉकेट मध्ये ठेवावे, आणि तो कचरा नंतर कचरा कुंडीत टाकावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी केले. 

Tuesday, September 10, 2024

वरिष्ठ स्वास्थ निरीक्षक व जमादारासह ३९ सफाई कर्मचारी निलंबितमनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार कठोर कारवाई

नागपूर: नागपूर शहरात स्वच्छतेच्या संदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने स्वच्छता कार्यात हयगय करणाऱ्या कामचुकार  कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. मंगळवारी (ता.१०) घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे करण्यात आलेल्या आकस्मिक पाहणीत विना परवानगी गैरहजर आढळलेल्या ३९ सफाई कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.शहरातील विविध भागात स्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.९) लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमध्ये भेट देउन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी कामात हलगर्जी करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत 
विभागाला सक्त निर्देश दिले होते. मंगळवारी (ता.१०) करण्यात आलेल्या आकस्मिक पाहणीमध्ये एका वरीष्ठ स्वास्थ निरीक्षकासह तीन मलवाहक जमादारएक प्रभारी जमादार व ३४ सफाई कामगार विना परवानगी गैरहजर असल्याचे आढळून आले. या सर्वांवर मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांचे विरुद्ध विभागीय चौकशी आदेश देण्यात आले आहेत. आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलघनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह दहाही झोनच्या सहायक आयुक्तांद्वारे आकस्मिक पाहणी करण्यात येत आहे.

वरिष्ठ स्वास्थ निरीक्षक - धर्मेश सिरसवान (लक्ष्मीनगर झोन)मलवाहक जमादार राहुल रामटेके (नेहरूनगर झोन), स्वच्छता जमादार - अतुल सिरकीया (गांधीबाग झोन)स्वप्नील मोटघरे (सतरंजीपुरा झोन), प्रभारी स्वच्छता जमादार- ओमप्रकाश हाथीपछेल (गांधीबाग झोन), स्थायी सफाई कामगार शरद गजभिये (लक्ष्मीनगर झोन)संदीप जुगेल (लक्ष्मीनगर झोन)विशाल बाबुलाल गवळीगवरीगौरी (धरमपेठ झोन)लखन नन्हेट (धरमपेठ झोन)नेहा महातो (धरमपेठ झोन)सुरज महातो (हनुमान नगर झोन)प्रकाश शिपाई (हनुमान नगर झोन)सोनू बक्सरे (हनुमान नगर झोन)मो. नवाज हनीफ जमाल (धंतोली झोन)वतन महातो (धंतोली झोन)कमल बछेले (धंतोली झोन)येल्लुमलाई शेट्टीया (नेहरूनगर झोन)सुनीता जुगेल (गांधीबाग झोन)राज अमरसिंग करिहार (गांधीबाग झोन)राज गौरे (गांधीबाग झोन)विनोद करिहार (सतरंजीपुरा झोन)धम्मज्योती भिमटे (लकडगंज झोन)गौरी पसेरकर (लकडगंज झोन)



कपिश शिव (आशीनगर झोन)साजन बक्सरे (मंगळवारी झोन)इंद्रसेन वैद्य (मंगळवारी झोन) अधिसंख्य सफाई कामगार - मनोज मरसकोल्हे (धरमपेठ झोन)श्रीमती रंजीता महाजन (धरमपेठ झोन)विनोद हुमणे (हनुमान नगर झोन)
राधा हजारे (नेहरूनगर झोन)अरुण साखरे (गांधीबाग झोन)सतीश शेवते (आशीनगर झोन)राजपाल लौंगबरसे (आशीनगर झोन)राजा बक्सरे (मंगळवारी झोन)सफाई कामगार  विक्की राजेंद्र खरे (गांधीबाग झोन)योगेश गौरे (गांधीबाग झोन)उमेश नक्के (लकडगंज झोन)विनोद तांबे (लकडगंज झोन)रिषभ बक्सरीया (मंगळवारी झोन).

मनपा आयुक्तांनी साधला क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद उडान खेल प्रोत्साहन योजने’चा जास्तीत जास्त खेळाडूंना लाभ पोहोचविण्याचे आवाहन

नागपूर:- नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावा या हेतूने नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता उडान खेल प्रोत्साहन योजना’ ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा व विविध खेळांच्या खेळाडूंना लाभ मिळावा या हेतूने मनपामध्ये शहरातील सर्व क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात आयोजित बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी उपायुक्त श्री. मिलींद मेश्रामक्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर उपस्थित होते.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या 'उडान खेल प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून मनपाद्वारे खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकप्राप्त खेळाडूंना ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेबाबत बैठकीत क्रीडा अधिकारी डॉ. 
पीयूष आंबुलकर यांनी सविस्तर माहिती सादर केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी योजनेबाबत क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींकडून सूचना देखील मागविल्या. क्रीडा संघटनांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या सूचना नोंदविल्या. आणखी सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात क्रीडा विभागाकडे जमा करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले.बैठकीत नागपूर जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र फडणवीसराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशीमाजी क्रीडा उपसंचालक व नागपूर जिल्हा जलतरण संघटनेचे डॉ. जयप्रकाश दुबळेनागपूर जिल्हा हॅंडबॉल असोसिएशनचे श्री. रुपकुमार नायडूपॅरा स्पोर्ट्स असोसिएशन नागपूरचे श्री. धनंजय उपासनी

डॉ. पद्माकर चारमोडेसचिन देशमुख यांनी क्रीडा संघटनेच्या पदाधिका-यांच्या वतीने सूचना मांडल्या. केंद्र आणि राज्य सरकारद्वारे ज्या खेळांकरिता पुरस्कार प्रदान करण्यात येतो त्या सर्व खेळांचा उडान खेल प्रोत्साहन योजनेमध्ये समावेश करणेदिव्यांग खेळाडूंना क्रीडा साहित्य उपलब्ध करणेशहरात खेळासाठी उत्तम सुविधा व साहित्य उपलब्ध करून देणेयोजनेच्या छाननी समितीमध्ये क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करणे अशा विविध सूचनांवर सकारात्मक कार्यवाही करण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संघटनांना आश्वस्त केले. उडान खेल प्रोत्साहन’ योजनेप्रमाणेच दिव्यांग खेळाडूंकरिता देखील मनपाने अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेचाही खेळाडूंना लाभ पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जसेराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धावर्ल्ड कप दर दोन वर्षांनी आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा / एशियन चॅम्पियनशिप या स्पर्धांमधील पदक विजेत्या खेळाडूंना २,००,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाआशियाई क्रीडा स्पर्धाराष्ट्रकुल स्पर्धा या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या खेळाडूंना १,००,००० रुपये तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना १,००,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या खेळाडूंना २१ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. याशिवाय वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा व कनिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धा तसेच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण विभागाद्वारे मान्यता प्राप्त क्रीडा प्रकार जसेऑलिम्पिक क्रीडा प्रकार/आशियाई क्रीडा प्रकार/राष्ट्रकुल क्रीडा प्रकार या स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना ५०,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल.ऑलिम्पिक स्पर्धाराष्ट्रकुल युवा स्पर्धाशालेय आशियाई/जागतिक स्पर्धाविश्व अजिंक्यपद स्पर्धाएशियन चॅम्पियनशिपपॅरा ऑलिम्पिक स्पर्धाएशियन गेम्सयुथ ऑलिम्पिकपॅरा एशियन स्पर्धाराष्ट्रकुल स्पर्धाज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धाज्युनिअर एशियन चॅम्पियनशिपएशियन कपवर्ल्ड कपराष्ट्रीय स्पर्धा (नॅशनल गेम्स)ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय वरिष्ठ व कनिष्ठ स्पर्धा उडान खेल प्रोत्साहन’ योजनेकरिता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीपैकी कोणत्याही माध्यमातून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दोन्ही अर्जाचे नमूने मनपाच्या www.nmcnagpur.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. संकेतस्थळावर उडान खेल प्रोत्साहन योजना 2024-25 यावर क्लिक करून ऑफलाईन अर्ज डाउनलोड करावा किंवा ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरता येईल. ऑनलाईन अर्जामध्ये अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटोजन्म प्रमाणपत्रआधार कार्डबँक खात्याचा रद्द केल्याची खूण असलेला धनादेशखेळाडूच्या गत तीन वर्षातील कामगिरीचा तपशीलखेळाडूचे हमीपत्र हे अपलोड करणे अनिवार्य आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 90 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  मंगळवार (10) रोजी शोध पथकाने 90 प्रकरणांची नोंद करून 63,400/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले,  फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून  10,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत प्रकरणांची नोंद करून 300/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत प्रकरणांची नोंद करून 1600/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे 
या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 40,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, इत्यादी  ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे,प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 26 प्रकरणांची नोंद करून 5,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास प्रकरणांची नोंद करून 3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ नगर झोन अंतर्गत मे. समाधान बार हॉटेलचा कचरा अनधिकृत जागेवर टाकल्याबाबत रू. 15,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. आठवले क्लासेस यांच्या विरूध्द विनापरवानगी जाहिरातीचे बॅनर/होर्डिंग झाडावर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. सतरंजीपुरा झोन अंतर्गत विनोद गुप्ता यांनी भंगार साहित्य फुटपाथवर ठेवल्याबाबत रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. 

गणपति मंडल में रक्तदान शिविर में अधिकारियों का रक्तदान सकारात्मक ऊर्जा के साथ बड़ी संख्या में रक्तदान की अपील

नागपुर:- गणेशोत्सव के अवसर पर नागपुर नगर निगम और जिला प्रशासन द्वारा अर्पण ब्लड बैंक के सहयोग से विदर्भ इन्फोटेक प्राइवेट लिमिटेड (वीआईपीएल) राजा आईटी पार्क, गायत्री नगर द्वारा एक रक्तदान शिविर का आयोजन किया गया। रक्त की कमी को पूरा करने के लिए सार्वजनिक गणपति मंडल द्वारा नागपुर शहर में विभिन्न स्थानों पर रक्तदान शिविर का आयोजन किया जा रहा है। उत्साह के इस माहौल में सकारात्मक ऊर्जा के साथ बड़ी संख्या में रक्तदान करें, मनपा आयुक्त एवं प्रशासक डाॅ. इस मौके पर अभिजीत चौधरी हो गया. इस मौके पर पुलिस कमिश्नर डाॅ. रवींद्र कुमार सिंघल, नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, कलेक्टर डाॅ. विपिन इटनकर, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल और श्रेयस उगेमुगे ने रक्तदान कर अभियान की शुरुआत की. इस अवसर पर 
विदर्भ इन्फोटेक प्राइवेट लिमिटेड के प्रमुख प्रशांत उगेमुगे, नगर पालिका के चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी डाॅ. डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी। डॉ. नरेंद्र बहिरवार, आंचलिक चिकित्सा अधिकारी। सुनील कांबले, मनपा जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, उपस्थित थे। इस समय रक्तदान करें ऐसा करने वालों को प्रमाणपत्र भी प्रदान किये गये। शहर में रक्त की कथित कमी को पूरा करने के लिए एक सकारात्मक कदम के रूप में, नागपुर नगर निगम और जिला प्रशासन द्वारा यह पहल शुरू की गई है। सभी गणेश मंडलों को भी अपने गणपति मंडप में रक्तदान शिविर का आयोजन करना चाहिए, मनपा आयुक्त एवं प्रशासक डाॅ. अभिजीत चौधरी ने किया. रक्तदान शिविरों के आयोजन को लेकर गणपति मंडलों को अच्छी प्रतिक्रिया मिल रही है।
वीआईपीएल के राजा आईटी पार्क, गायत्री नगर में लगभग 100 नागरिकों ने रक्तदान किया। रक्तदान शिविर के लिए आवश्यक सुविधाएं नागपुर नगर निगम द्वारा अन्य मंडलों को प्रदान की जाएंगी. एक सकारात्मक कदम के रूप में रक्तदान शिविर का आयोजन कर बड़ी मात्रा में रक्तदान करें, ऐसा मनपा आयुक्त डाॅ. अभिजीत चौधरी ने किया। नगर निगम, जिला प्रशासन और पुलिस विभाग द्वारा संयुक्त रूप से सार्वजनिक गणेश मंडल की बैठकें आयोजित की गईं। उस समय सभी गणपति मंडलों से रक्तदान शिविर आयोजित करने का अनुरोध किया गया था। वीआईपीएल के राजा आईटी पार्क, गायत्री नगर में आयोजित रक्तदान शिविर में उपस्थित सभी पदाधिकारियों द्वारा रक्तदान  नागरिकों को प्रोत्साहित किया गया। प्रत्येक गणेश मंडल को ऐसे कार्यक्रम आयोजित करने चाहिए जिससे समाज को मदद मिले।


गणेशोत्सव के अवसर पर लोगों के बीच एक अच्छा संदेश फैलाने के लिए सभी को बड़ी संख्या में रक्तदान शिविर में शामिल होना चाहिए
, जो लोग शारीरिक रूप से स्वस्थ हैं उन्हें रक्तदान अवश्य करना चाहिए, पुलिस आयुक्त डॉ. रवीन्द्र कुमार सिंघल द्वारा।  विदर्भ सहित नागपुर के कई स्थानों से मरीज इलाज कराने आते हैं। कई रोगियों को बड़ी मात्रा में रक्त की आवश्यकता होती है। कई बार खून की कमी हो जाती है. उसी के अनुरूप, हम पर्यावरण-अनुकूल गणोशोत्सव के साथ-साथ एक सामाजिक कार्य के रूप में रक्तदान शिविर आयोजित करने की गतिविधियाँ भी संचालित कर रहे हैं, कलेक्टर डॉ. ने कहा। विपिन इटनकर ने कहा. नागपुर शहर और ग्रामीण क्षेत्र को मिलाकर 4000 यूनिट रक्त का लक्ष्य रखा गया है. साथ ही सरकारी कार्यालयों में भी रक्तदान शिविर लगाया जायेगा. तो नागपुर में यह एक महत्वपूर्ण प्रयास है जिससे किसी भी गर्भवती महिला, दुर्घटनाग्रस्त मरीज, सिकल सेल या किसी भी मरीज को रक्त की कमी नहीं होगी। उन्होंने यह भी विश्वास व्यक्त किया कि यदि गणपति मंडल हमारा समर्थन करें तो हम 4000 यूनिट रक्त का लक्ष्य अवश्य प्राप्त कर लेंगे। इस अवसर पर डॉ. जयश्री बनैत,डॉ. त्रिलोक, दीपाली नासरे एवं अर्पण ब्लड बैंक के प्रतिनिधि उपस्थित थे।
 

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...