Tuesday, January 28, 2025

मराठी भाषेच्या समृद्धीसाठी व्यापक दृष्टीकोनाची गरज : डॉ. शैलेंद्र लेंडे

नागपूर:-  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही गौरवाची बाब आहे. मात्र या आधारे आपली वाचन संस्कृती समृद्ध करुन भाषेचा विकास करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचा अभिजातपणा मिरवताना भाषेच्या समृद्धीसाठी व्यापक वैश्विक दृष्टीकोन ठेवून पुढे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले.नागपूर महानगरपालिकेद्वारे १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात आला. मंगळवारी २८ जानेवारी रोजी या कार्यक्रमाच्या समारोपनिमित्ताने मनपा मुख्यालयात डॉ. शैलेंद्र लेंडे यांचे अभिजात मराठी भाषाविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर होते. याप्रसंगी उपायुक्त डॉ. विजया बनकर, सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, श्री. नरेंद्र 
बावनकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, सहायक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, संजय दिघारे, नागरी सुविधा केंद्रचे श्री. कमलेश झंझाड, जनसंपर्क विभागाचे श्री. अमोल तपासे आदी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी शाल, पुष्पगुच्छ, मनपाचा मानाचा दुपट्टा आणि सन्मानचिन्ह देऊन डॉ. शैलेंद्र लेंडे यांचा सत्कार केला.अभिजात मराठी भाषाविषयावर बोलताना डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी मराठी भाषेला लाभलेली संत परंपरा, नाथ पंथ, दास पंथाची परंपरा यांचा उहापोह केला. त्यांनी भाषेला अभिजातपणा लाभल्यामुळे मराठी भाषेला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाल्याचे प्रतिपादन केले. मराठी भाषा ही महाराष्ट्रातील चवथ्या आणि जगात सातव्या क्रमांकाची भाषा आहे. भाषेमुळे संस्कृतीचे वहन आणि जतन होत असते मराठीच्या अभिजात दर्जामुळे ही परंपरा आता पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हावी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भाषांतरातून इंग्रजी भाषा समृद्ध झाली. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करताना इतर भाषा आणि संस्कृती स्वीकारुन त्यातून आपल्या भाषेला समृद्ध करण्याची गरज देखील डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी व्यक्त केली. मुंबई, पुणे, नागपूर या महानगरपालिका मराठी विचारांच्या आधारे आधुनिक 
झालेल्या आहेत. १९व्या शतकात झालेल्या आधुनिकीकरणामध्ये महानगरपालिकांची परंपरा मोठी राहिलेली आहे. यात भाषीक परंपरेचे योगदान उल्लेखनीय आहे, असेही त्यांनी सांगितले. अभिजातवाद, स्वच्छंदवाद आणि वास्तववाद या तीन घटकांच्या आधारे जीवन समृद्ध होत असते. स्थानिक भाषा, आपली बोलीभाषा रोजगाद देऊ शकत नाही, असा समज समाजात दृढ होत चालला आहे. यासाठी मराठी भाषेला तेवढे समृद्ध आणि विकसीत करुन मराठी ही पुढे रोजगाराची भाषा व्हावी, यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचेही डॉ. लेंडे म्हणाले. १९व्या शतकात अनुवादातून पहिल्यांदा इंग्रजी ज्ञान मराठीमध्ये आणले गेले. त्याआधारे आपले ज्ञानभांडार समृद्ध झाले. अनुवादातूनच आता पुढे भाषेला पुढे न्यावे लागेल त्यासाठी वैश्विक दृष्टीकोन जोपासण्याची आवश्यक आहे. मराठीला घर मानताना त्यातील खिडक्या, झरोके इतर भाषांचे असावेत हा दृष्टीकोन भाषेला समृद्ध करेल, असा विश्वासही डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी व्यक्त केला. अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी आपल्या भाषणात अभिजात मराठी भाषेची संकल्पना विषद केली. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले व त्यांनी शेवटी आभारही मानले.

शिक्षणोत्सव’मुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत : आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी

नागपूर:-  शाळा ही केवळ शैक्षणिक ज्ञान देण्यासाठी नसते तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करत असते. ‘शिक्षणोत्सव मुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते. शिक्षणोत्सव सारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत मिळतेअसे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दोन दिवसीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन मंगळवार व बुधवार (ता २८ व २९ जानेवारी ) रोजी अध्यापक भवननागपूर येथे करण्यात आले 
आहे. मंगळवारी (ता.२८) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.या प्रसंगी शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामसहायक शिक्षण अधिकारी श्री. संजय दिघोरेशाळा निरीक्षक श्रीमती अश्विनी फेद्देवार , श्रीमती सीमा खोब्रागडेश्री. जयवंत पिस्तुलेश्री विजय वालदेशिक्षक संघाचे सचिव श्री. देवराव मांडवकरशाळा निरीक्षक श्री प्रशांत टेंभुर्णेमनपा शाळेतील सर्व शिक्षक गण उपस्थित होते. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात मनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी समूह गायनपथनाट्यनाटक अशा विविध  स्पर्धांमध्ये भाग घेत उत्साहाने सादरीकरण केले. शिक्षणोत्सव हा नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 
तसेच त्यांच्या बौद्धिकशारीरिकआणि सांस्कृतिक विकासासाठी आयोजित केला आहे. सांस्कृतिक स्पर्धेमध्ये मनपाच्या ११४ शाळांमधील ९०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. समूहगीतकव्वालीपथनाट्यलोकनृत्य आणि एककला प्रदर्शन अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपले उपजत कलागुण सादर करत उत्तम प्रदर्शन केले.उद्घाटन प्रसंगी मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मनपा शाळांद्वारे सतत प्रयत्न सुरु आहेत. यासाठी महानगरपालिका शाळांमध्ये क्रीडा व संगीत शिक्षकांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहेअसेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना ते म्हणालेस्पर्धेमध्ये जय-पराजय महत्त्वाचा नाहीतर विद्यार्थ्यांनी आपले १०० टक्के योगदान देणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळतो. तसेच त्यांनी शिक्षण विभागाच्या उपक्रमांचे नियमितपणे आयोजन करण्यावर भर देत या कार्यक्रमाला संस्थात्मक स्वरूप देण्याची गरज व्यक्त केलीज्यामुळे भविष्यातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ होईल. आयुक्त व प्रशासक मनपा नागपूर डॉ. अभिजीत चौधरी यांनी शिक्षणोत्सवाच्या यशस्वी 
आयोजनासाठी मा. अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांचे अभिनंदन केले. स्पर्धेत इयत्ता १ ते ५इयत्ता ६ ते ८इयत्ता ९ ते ११ असे वर्गाप्रमाणे तीन गट करण्यात आले होते. 'इन्साफ की डगर पे','हम हिंदुस्थानी','जयोस्तुते','वतन मेरे आझाद रहे तू', अशा विविध गाण्याचे विविध समूहाने गायन केले. झाडे लावा झाडे जगवापर्यावरण संवर्धनरस्ते अपघातजुन्या रूढी परंपरा निषेधशेतकरी बांधवांची व्यथा अशा अनेक विषयांवर संदेश देत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या सांस्कृतिक स्पर्धांचे परीक्षक स्नेहल संगीत विद्यालयसंगीत संयोजक श्री मनोहर ढोबळेसारस्वत संगीत विद्यालय संचालिका श्रीमती सोनाली बोहरपीसंगीत विशारद श्रीमती निलिमा शहाकार होते. यातील निवडक कार्यक्रम शिक्षणोत्सव कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी १० फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट्ट सभागृहामध्ये विध्यार्थी सादर करणार आहेत.
 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 67 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (28) रोजी शोध पथकाने 67 प्रकरणांची नोंद करून 42,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 5,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. 
मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून 19,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत श्री. अक्षय चौधरी यांनी खराब कचरा रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. राजेश किराणा शॉप यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला.
सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अंजली किराणा स्टोअर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. सोनी बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. सिनर्जी हॉस्पिटल तसेच मे. अजमेर टायर प्रा. एलटिडी यांनी मनपा विरूध्द विना परवानगी शिवाय  विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू. 35,000/- दंड वसूल केला.

सोनी समाज ने मनाया गणतंत्र दिन

नागपुर:- सोनी समाज मित्र मंडल की ओर से गणतंत्र दिवस पर नव नियुक्त अध्यक्ष श्री प्रकाश वर्मा ने ध्वज वंदन कियामनपा समाज भवन, गणेशपेठ में आयोजित कार्यक्रम में उपाध्यक्ष श्री संजय सोनी, महासचिव श्री मनीष सोनी, कोषाध्यक्ष श्री उदय सोनी, संगठन सचिव श्री संदीप सोनी, सर्वश्री कांतिलाल सोनी, अधि राधेश्याम वर्मा, अजय वर्मा, गोवर्धनदास वर्मा, रणजीत सोनी, श्री आशीष सोनी. श्री योगेश्वर सोनी. श्री लक्ष्मीनारायण सोनी. श्रीमती नंदिता सोनी. श्रीमती संगीता वर्मा. श्रीमती सपना सोनी. रणजीत सोनी जी की माता जी. पुत्र और श्री देशकरजी. श्री वाघाडे जी प्रमुख रूप से उपस्थित रहे।

Monday, January 27, 2025

ग्लोबल’ आणि ‘अफॉरडेबल’ नागपूर शहर विकसीत करण्याचा निर्धार : डॉ. अभिजीत चौधरी

नागपूर:- नागपूर शहरातील नागरिकांना सर्व प्राथमिक सुविधा प्रदान करतानाच शहरातील विविध विकास प्रकल्पांना वेळेत पूर्ण करण्यास नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. शहराचा चौफेर विकास होत असताना नागरिकांना सुलभता प्रदान करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न् सुरू आहेत. शहरातील नागरिकांच्या सहकार्याने नागपूर शहर हे ‘ग्लोबल’ आणि ‘अफॉरडेबल’ शहर म्हणून विकसीत करण्याचा निर्धार करुअसे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रजासत्ताक दिनी केले. रविवारी २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आलेयाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलअतिरिक्त आयुक्त श्रीअजय चारठाणकरमुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्येउपायुक्त श्रीमती विजया बनकरउपायुक्त सर्वश्री विजय देशमुखप्रकाश वराडेमिलींद मेश्रामगणेश राठोडअशोक गराटे, उपायुक्त डॉरंजना लाडेपरिवहन व्यवस्थापक श्रीविनोद जाधवअधीक्षक 
अभियंता श्रीमनोज तालेवारडॉश्वेता बॅनर्जीडॉ. अनुश्री चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मनपा आयुक्तांनी अग्निशमन विभागाच्या पथसंचलनाचे निरीक्षण केले व मानवंदना स्वीकारलीअग्निशमन विभागाच्या तीन प्लाटून ने आयुक्तांना मानवंदना दिली. पहिल्या प्लाटूनचे नेतृत्व कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रचे केंद्राधिकारी श्री. भगवान बी. वाघदुसऱ्या प्लाटूनचे नेतृत्व लकडगंज अग्निशमन केंद्राचे उप. अग्निशमन अधिकारी श्री. दिलीप पी. चव्हान आणि तिसऱ्या प्लाटूनचे नेतृत्व गंजीपेठ अग्निशमन केंद्रचे उप. अग्निशमन अधिकारी श्री. प्रकाश एन. कावडकर यांनी केले.  ध्वजवंदन कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच यावेळी क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ घेण्यात आलीपुढे बोलताना आयुक्त म्हणालेशहरातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांगमहिलाबालक यांच्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याकरिता अनेक योजना अंमलत आणण्यात आलेल्या आहेत. नागपूर शहराचे महापौर राहिलेल्या मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला  १०० दिवसीय सात कलमी कृती कार्यक्रम आखून दिलेला आहेया कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी मनपाद्वारे 
करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुलभतेसाठी अनेक महत्वाचे कार्य करण्यात येत आहेत. नागपूर शहराची स्वच्छसुंदर ही ओळख अधिक प्रभावीपणे जनमानसात जावी याकरिता स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शहराची कामगिरी उंचावण्याची प्राथमिकता असल्याचेही आयुक्त म्हणाले. नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे ‘शिक्षणोत्सव’ सुरु आहे. या महोत्सवामध्ये शिक्षकांकरिता शिक्षणोत्सवाचे लोगो तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये मनपाच्या संजय नगर माध्यमिक शाळेच्या शिक्षिका डॉ. मिनाक्षी भोयर यांच्या लोगोची निवड करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच डॉ. मिनाक्षी भोयर यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरउद्यान अधीक्षक श्री. अमोल 
चौरपगारघनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्लेसहायक आयुक्त श्री. श्याम कापसेसहायक आयुक्त श्री. घनश्याम पंधरेविजय थूलअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारकार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणेकार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड यांच्यासह मोठ्या संख्येत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मनपाचे संगीत शिक्षक श्री. प्रकाश कलसिया यांच्यासह श्री. उमेश पवार व कमलाकर मानमोडे यांनी पथसंचालनाला संगीत साथ दिली. श्री. कलसिया यांनी राष्ट्रगीत व राज्यगीत गायले. कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी व मुख्य शिक्षिका श्रीमती शुभांगी पोहरे यांनी केले.
 

प्रजासत्ताक सोहळ्यातील परेडमध्ये मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग

नागपूर:- २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाचा शासकीय सोहळा शहरातील कस्तुरचंद पार्क येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री महोदयांना मानवंदना देणाऱ्या परेडमध्ये यंदा नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविण्याचा बहुमान मिळाला.नागपूर महानगरपालिकेच्या परेडमध्ये संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा व विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी आनंद 
व्यक्त केला. त्यांनी परेडमध्ये सहभागी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधलाविद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे मनपाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करुन सन्मानित केले.याप्रसंगी मनपा शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामश्री. विनय बगलेशाळा निरीक्षक श्री. प्रशांत टेंभुर्णेसंजयनगर हिंदी माध्यम शाळेच्या श्रीमती दांडेकरश्रीमती भगतश्री. डोईफोडेवैभव कुंभरे उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 40 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (27) रोजी शोध पथकाने 40 प्रकरणांची नोंद करून 41,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून  3,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 20,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- 
रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून 800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून 13,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. जनरल क्लिीनीक यांनी मनपा विरूध्द विनापरवानगीशिवाय विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. तसेच मे. बऊफेज कॅफे यांनी अनधिकृत ठिकाणी गरम कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. ईम्याजीन सायन्स यांनी मनपा विरूध्द विनापरवानगीशिवाय विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. माहजन सोनपापडी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 4 प्रकरणांची नोंद करून रू. 20,000/- दंड वसूल केला.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...