Monday, April 29, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 109 प्रकरणांची नोंद- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगर पालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक  ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर,  कचरा  फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. सोमवार (ता. 29) रोजी उपद्रव शोध पथकाने 109 प्रकरणांची नोंद करून 55 हजार 300 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या 
नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या
परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड)  या  अंतर्गत 39 प्रकरणांची नोंद करून 15 हजार 600 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत  9  प्रकरणांची  नोंद  करून  3600  रुपयांची वसुली करण्यात आली.मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 10 हजार  रुपयांची वसुली करण्यात आली.

वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणाची नोंद करुन 3 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त  यादीत न  आढळणारे  इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 33 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 14 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोमवार (ता. 29) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत शाहु गिफ्ट कार्नर 01 प्रकरणांची नोंद करून 5 हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत उपारकर आकांक्षा सोसायटी व गांधीबाग 




झोन सतीश चौधरी (बिल्डर्स) झेंडा चौक महाल कन्स्ट्रशन्स रस्त्यालगत बांधकाम साहीत्य पसरविणे या अंतर्गत दोन्ही कडुन एकुण  15 हजार  रुपये  दंड  वसूल केला.  हनुमाननगर झोन शेख इरफान अनंत कॉलोनी ताजबाग उमरेड रोड मोकळी जागेवर कचरा पसरविणे या  अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करुन 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन येथील म्युजीकल अकेडमी माता मंदीर रोड यांच्यावर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 05 प्रकरणाची नोंद करून 30 हजार दंड वसूल करण्यात आला. 

Friday, April 26, 2024

QR कोड स्कॅन करून मिळवा उद्यानाची माहिती अन् नोंदवा अभिप्राय

नागपूर:सर्वत्र वाढते शहरीकरण आणि गगनचुंबी इमारतींच्या मध्ये मानवाला थेट निसर्गाशी जोडण्याचे एक सुंदर माध्यम म्हणजे उद्यान, सुदृढ आरोग्य, शुद्ध हवा आणि निसर्गाचा स्पर्श अनुभवता येणाऱ्या उद्यानात विविध रंगीबेरंगी फुले, हिरवळ आणि पक्षांचा किलबिलाट मनाला आनंद देतो. आपण ज्या उद्यानात बसून निसर्गाशी हितगुज साधत आहोत, त्याच उद्यानाची माहिती आणि उद्यान विकासासंदर्भात अभिप्राय आता एक क्यू आर कोड स्कॅन करून थेट महानगरपालिकेच्या उद्यान विभागात नोंदविता येणार आहे.शहरातील उद्यानांची माहिती मिळावी व उद्यानासादर्भात तक्रार थेट मनपाच्या उद्यान विभागाकडे पोहोचविता यावी, या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या प्रेरणेने मनपा क्षेत्रातील उद्यानांमध्ये “क्यू आर कोड बेस 
गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम” ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार मनपा क्षेत्रातील 26 उद्यानांमध्ये ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता.२६) धंतोलीतील मेजर सुरेंद्र देव उद्यानात (धंतोली गार्डन) प्रायोगिक तत्वावर लावण्यात आलेल्या “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम”चे निरीक्षण केले. याप्रसंगी उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, आयटी विभागाचे श्री. स्वप्निल लोखंडे यांच्यासह धंतोली नागरिक मंडळाचे श्री. प्रदीप कोकास, माजी नगरसेवक श्री.बबलू देवतळे, श्री. लखन येरवार आदी सदस्य उपस्थित होते. आयटी  विभागाचेश्री. स्वप्निल लोखंडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना संपूर्ण प्रणालीचे कार्य प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. या 



अभिनव उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या २६ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रवेश द्वार, उद्यानातील बसण्याचे ठिकाण, मुलांचे क्रीडांगण, बाहेर जाण्याचा मार्ग अशा जवळपास चार ते पाच दर्शनीय जागेवर “क्यू आर कोड” लावण्यात येणार आहेत. हा कोड मोबाईलवर स्कॅनकरून नागरिक उद्यानाची माहिती, त्यासंदर्भाती तक्रारी, विकासासाठीचे अभिप्राय थेट मनपाच्या उद्यान विभाग, आयटी विभाग, उद्यानातील संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यंत पोहोचवू शकतो. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद, सूचना, अभिप्राय लक्षात घेवून मनपा हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशाप्रकारे क्यू आर कोड लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.  मनपा  आयुक्त  तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी मार्गदर्शनात 





मनपाची उद्याने अधिक नागरिक स्नेही करण्याचा प्यत्न उद्यान विभागाद्वारे केला जात असल्याचे उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार यांनी सांगितले.  
“
“क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम असे करेल काय..
मनापाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर मनपा क्षेत्रातील २६ उद्यानात लावण्यात येणार आहे. याद्वारे नागरिक मोबाईलवर क्यू आर कोड स्कॅन करून उद्यानाचे परिसर, उद्यानात असणारे विविध वृक्ष, फूल, उद्यानात दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा, प्रसाधनगृह आदी विषयी माहिती मिळवू शकतात, तसेच उद्यानासंदर्भातील तक्रार देखील करू शकतात.  नागरिकांनी केलेली तक्रार एसएमएसद्वारे तक्रारकर्ता, उद्यान विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यत पोहोचेल व समस्याचे निराकरण त्वरित करता येईल

शालार्थ आईडी घोटाला:प्रधानाचार्य तो केवल नाममात्र के हस्ताक्षरकर्ता हैं; असली साजिशकर्ता तो संस्था के निदेशक हैं? विदर्भ शिक्षक संघ का प्रश्न

[Demo Pick]  नागपुर: - विदर्भ शिक्षक संघ ने इस बात पर कड़ी नाराजगी जताई है कि राज्य में चल रहे शलार्थ आईडी घोटाले की जांच में केवल उन्हीं प्...