Friday, April 26, 2024

QR कोड स्कॅन करून मिळवा उद्यानाची माहिती अन् नोंदवा अभिप्राय

नागपूर:सर्वत्र वाढते शहरीकरण आणि गगनचुंबी इमारतींच्या मध्ये मानवाला थेट निसर्गाशी जोडण्याचे एक सुंदर माध्यम म्हणजे उद्यानसुदृढ आरोग्यशुद्ध हवा आणि निसर्गाचा स्पर्श अनुभवता येणाऱ्या उद्यानात विविध रंगीबेरंगी फुलेहिरवळ आणि पक्षांचा किलबिलाट मनाला आनंद देतोआपण ज्या उद्यानात बसून निसर्गाशी हितगुज साधत आहोतत्याच उद्यानाची माहिती आणि उद्यान विकासासंदर्भात अभिप्राय आता एक क्यू आर कोड स्कॅन करून थेट महानगरपालिकेच्या उद्यान विभागात नोंदविता येणार आहे.शहरातील उद्यानांची माहिती मिळावी  उद्यानासादर्भात तक्रार थेट मनपाच्या उद्यान विभागाकडे पोहोचविता यावीया उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहेमनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या प्रेरणेने मनपा क्षेत्रातील उद्यानांमध्ये “क्यू आर कोड बेस 
गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम” ही प्रणाली विकसित करण्यात आली आहेत्यानुसार मनपा क्षेत्रातील 26 उद्यानांमध्ये ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता.२६धंतोलीतील मेजर सुरेंद्र देव उद्यानात (धंतोली गार्डनप्रायोगिक तत्वावर लावण्यात आलेल्या “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीमचे निरीक्षण केलेयाप्रसंगी उद्यान अधीक्षक श्रीअमोल चौरपगारआयटी विभागाचे श्रीस्वप्निल लोखंडे यांच्यासह धंतोली नागरिक मंडळाचे श्रीप्रदीप कोकासमाजी नगरसेवक श्री.बबलू देवतळेश्रीलखन येरवार आदी सदस्य उपस्थित होते. आयटी  विभागाचेश्रीस्वप्निल लोखंडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांना संपूर्ण प्रणालीचे कार्य प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितलेया 



अभिनव उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या २६ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रवेश द्वारउद्यानातील बसण्याचे ठिकाणमुलांचे क्रीडांगणबाहेर जाण्याचा मार्ग अशा जवळपास चार ते पाच दर्शनीय जागेवर “क्यू आर कोड” लावण्यात येणार आहेतहा कोड मोबाईलवर स्कॅनकरून नागरिक उद्यानाची माहितीत्यासंदर्भाती तक्रारीविकासासाठीचे अभिप्राय थेट मनपाच्या उद्यान विभागआयटी विभागउद्यानातील संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यंत पोहोचवू शकतोनागरिकांकडून मिळणारा प्रतिसादसूचनाअभिप्राय लक्षात घेवून मनपा हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशाप्रकारे क्यू आर कोड लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.  मनपा  आयुक्त  तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी मार्गदर्शनात 





नपाची उद्याने अधिक नागरिक स्नेही करण्याचा प्यत्न उद्यान विभागाद्वारे केला जात असल्याचे उद्यान अधीक्षक श्रीअमोल चौरपगार यांनी सांगितले.  

क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम असे करेल काय..
मनापाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर मनपा क्षेत्रातील २६ उद्यानात लावण्यात येणार आहेयाद्वारे नागरिक मोबाईलवर क्यू आर कोड स्कॅन करून उद्यानाचे परिसरउद्यानात असणारे विविध वृक्षफूलउद्यानात दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधाप्रसाधनगृह आदी विषयी माहिती मिळवू शकताततसेच उद्यानासंदर्भातील तक्रार देखील करू शकतात.  नागरिकांनी केलेली तक्रार एसएमएसद्वारे तक्रारकर्ताउद्यान विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यत पोहोचेल  समस्याचे निराकरण त्वरित करता येईल

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...