Friday, May 24, 2024

अंबाझरी तलाव आणि नाग नदीशी संबंधित आपत्ती निवारण कामाची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

 नागपूर:- नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग आणि महा मेट्रो या विभागांद्वारे अंबाझरी तलाव आणि नाग नदीसंदर्भात सुरू असलेल्या विविध आपत्ती निवारण कामांची पाहणी आज शुक्रवार दि. २४ मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली.या वेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता श्री. पवार, उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव श्री. संदीप जोशी, माजी नगरसेविका श्रीमती वर्षा ठाकरे यांच्यासह आपत्ती निवारणाशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश्य स्थितीमुळे शहरातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यानंतर उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मनपासह नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग आणि महा मेट्रो या विभागांची बैठक घेउन आपत्ती निवारण कामाची आखणी केली होती. त्यानुसार त्यांनी आज अंबाझरी तलाव, अंबाझरी ते क्रेझी केसल पूल, नाग नदीचे क्रेझी केसल, अंबाझरी दहन घाट, नासुप्र स्केटिंग रिंक, रामदासपेठ पूल येथील पात्राचे आपत्ती निवारणाच्या दृष्टीने रुंदीकरण व खोलीकरण कामाची पाहणी केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, सप्टेंबर महिन्यातील पुरानंतर विविध 
विभागांनी समन्वयाने काम केले. पुराची कारणे, अडथळे यावर विचार करून कामे सुरू करण्यात आली आहेत. आपत्ती निवारणाच्या दृष्टीने अंबाझरी तलाव आणि नाग नदीशी संबंधित दीर्घकालीन आणि तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यात येत आहेत. तात्पुरत्या उपाययोजनांमध्ये या पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण होउ नये, निवासी भागांमध्ये पाणी जाउ नये यादृष्टीने कार्य केले जात आहे. दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये तलावातील पाण्याची पातळी वाढू नये याकरिता तलावाच्या सांडव्यावरील भितींवर सिंचन विभागाद्वारे तीन दार लावले जाणार आहेत. अंबाझरी तलाव ते क्रेझी केसल यादरम्यानच्या पूलाचे काम सुरू असून एका बाजूचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. नासुप्र स्केटिंग रिंकवरील बांधकाम तोडून पात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरण देखील करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पाण्याला अडथळा निर्माण होतो तो देखील दूर करण्यात येत आहे. अंबाझरी दहन घाट परिसरातून नदीच्या पात्राची रुंदी वाढविण्यात येत आहे. एकूणच पावसाळ्यात नागरिकांना त्रास होउ नये यासाठी आवश्यक त्या सर्व आपत्ती निवारण उपाययोजनांवर काम सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मा. उपमुख्यमंत्री यांच्या पाहणी दौ-यामध्ये आपत्ती निवारणाशी संबंधित विभागांचे अधिकारी मनपाचे अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता श्री. विजय गुरूबक्षाणी, सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चोपडे, कार्यकारी अभियंता प्रांजली ठोंबसे आदी उपस्थित होते.

Thursday, May 16, 2024

अभिप्राय नोंदविण्यासाठी मनपाच्या २६ उद्यानात QR कोड आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली नव्या “क्यू आर कोड” प्रणालीची पाहणी

 नागपूर:- शहरातील उद्यानांची माहिती मिळावी व उद्यानासंदर्भात तक्रार थेट मनपाच्या उद्यान विभागाकडे पोहोचविता यावी, या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. नागपूर महानगरपालिका तर्फे शहरातील २६ मोठ्या उद्यानात “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम”लावण्यात आले आहे. मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (१६) रोजी पूर्व नागपुरातील भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे याची पाहणी केली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल सुद्धा उपस्थित होत्या. आता नागपूरकर उद्यानात बसून त्याच उद्यानाची माहिती आणि उद्यान विकास संदर्भात आपला अभिप्राय एक एक क्यू आर कोड स्कॅन करून थेट महानगरपालिकेच्या उद्यान विभागात नोंदवू शकतात. मनपा आयुक्त डॉ चौधरी यांचा मार्गदर्शनात उद्यान विभागातर्फे शहरातील मेजर सुरेंद्र देव पार्क (धंतोली), सुर्वेनगर उद्यान, राजीव गांधी उद्यान, त्रिमूर्तीनगर, सावरकर नगर, ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार ट्रॅफिकपार्क उद्यान, शिवाजीनगर उद्यान, दगडी पार्क, जागृत कॉलोनी खेळाचे मैदान, के टी नगर 
नक्षत्र नगर उद्यान, महात्मा गांधी उद्यान हनुमान नगर, बालभवन उद्यान, गांधीसागर तलाव, सुभाष रोड,महात्मा फुले उद्यान, सुयोग्य नगर, त्रिशताब्दी उद्यान, जुना नंदनवन, संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी उद्यान, दत्तात्रयनगर, संत तुकाराम उद्यान सक्करदरा, महावीर उद्यान अजामशाह लेआऊट, जुना बगडगंज उद्यान, गांधीबाग उद्यान, तुलसीनगर उद्यान
, भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान, लता मंगेशकर उद्यान, सूर्यनगर, स्वतंत्र स्वराज जयंती उद्यान देशपांडे लेआऊट, डॉ बाबासाहेब उद्यान वैशाली नगर, ॲड. सखारामपंत मेश्राम उद्यान (मंगळवारी) दयानंद पार्क जरीपटका येथे “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम” लावण्यात आली आहे.




आयुक्त श्री चौधरी यांनी नागरिकांना या सिस्टीमचा वापर करून आपले अभिप्राय नोंद करण्याचे आवाहन केले आहे.आयटी विभागाचे श्री. स्वप्निल लोखंडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना संपूर्ण प्रणालीचे कार्य प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. या अभिनव उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या २६ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रवेश द्वार, उद्यानातील बसण्याचे ठिकाण, मुलांचे क्रीडांगण, बाहेर जाण्याचा मार्ग अशा जवळपास चार ते पाच दर्शनीय 
जागेवर “क्यू आर कोड” लावण्यात येणार आहेत. हा कोड मोबाईलवर स्कॅनकरून नागरिक उद्यानाची माहिती, त्यासंदर्भाती तक्रारी, विकासासाठीचे अभिप्राय थेट मनपाच्या उद्यान विभाग, आयटी विभाग, उद्यानातील संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यंत पोहोचवू शकतो. 


मनपा आयुक्तांनी भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मनपा तर्फे
फार वर्षापूर्वी बांधण्यात आलेली वास्तूचे सुद्धा निरीक्षण केले. सध्याच्या या वस्तूचा उपयोग होत नाही. या वास्तूच्या दुरुस्ती आणि रंग रंगोटी करून त्याला नवीनरूप देण्याचा निर्देश आयुक्तांनी दिले. त्यांनी उद्यानाचे मेन्टेनन्स बद्दल प्रशंसा केली आणि नागरिकांसाठी कचरा पेटी लावणे
फार वर्षापूर्वी बांधण्यात आलेली वास्तूचे सुद्धा निरीक्षण केले. सध्याच्या या वस्तूचा उपयोग होत नाही. या वास्तूच्या दुरुस्ती आणि रंग रंगोटी करून त्याला नवीनरूप देण्याचा निर्देश आयुक्तांनी दिले. त्यांनी उद्यानाचे मेन्टेनन्स बद्दल प्रशंसा केली आणि नागरिकांसाठी कचरा पेटी लावणे, खेळण्याचे उपकरणची दुरुस्ती करणे इत्यादी निर्देश दिले. या प्रसंगी उपायुक्त डॉ रंजना लाडे, आई टी विभागाचे संचालक श्री महेश धामेचा, सहायक आयुक्त श्री गणेश राठोड, उद्यान अधीक्षक श्री अमोल चोरपगार, कार्यकारी अभियंता श्री संजय माटे, आणि माजी नगरसेवक श्री बाल्या बोरकर उपस्थित होते.मनापाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी “क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर मनपा क्षेत्रातील २६ उद्यानात लावण्यात आली आहे. याद्वारे नागरिक मोबाईलवर क्यू आर कोड स्कॅन करून उद्यानाचे परिसर, उद्यानात असणारे विविध वृक्ष, फूल, उ
द्यानात दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा, प्रसाधनगृह आदी विषयी माहिती मिळवू शकतात, तसेच उद्यानासंदर्भातील तक्रार देखील करू शकतात.  नागरिकांनी केलेली तक्रार एसएमएसद्वारे तक्रारकर्ता, उद्यान विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यत पोहोचेल व समस्याचे निराकरण त्वरित करता येईल.

उष्माघात संदर्भातील दीर्घकालीन उपाययोजना बाबत कार्यवाहीवर भर द्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांचे निर्देश

नागपूर:- उष्माघात प्रतिबंधासंदर्भात तात्पुरत्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन उपाययोजनांची देखील आवश्यकता आहे. वाढत्या तापमानाच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासंदर्भात कार्यवाहीवर भर द्या, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी दिले.मनपा मुख्यालयात गुरूवारी (ता.१६) अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारी समितीची बैठक पार पडली. आयुक्त सभाकक्षामध्ये झालेल्या बैठकीत मनपा उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम, उपायुक्त (समाज कल्याण) डॉ. रंजना लाडे, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) श्री. जयेश भांडारकर, सहायक पोलिस आयुक्त विशेष शाखा श्री. नितीन जगताप, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहायक प्राध्यापक डॉ. प्रगती भोळे, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. आशिष राणा, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, सहायक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, नरेंद्र बावनकर, घनश्याम पंधरे, गणेश राठोड, हरीश राउत, व्हीएनआयटीच्या प्रा. राजश्री कोठाळकर, अग्निशमन विभागाचे श्री. तुषार बाराहाते, डागा रुग्णालयाचे डॉ. प्रवीण नवखरे, ईएसआयएस हॉस्पिटलचे डॉ. एच.डी. कांबळे आदी उपस्थित होते. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात उष्माघात प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु आहे.बैठकीत साथरोग 
अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली. १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये नागपूर शहरात १६ दिवस तापमान ४० अंश किंवा त्यापेक्षा जास्त राहिले. नागपूर महानगरपालिकेद्वारे उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला. शहरातील मेडिकल, मेयो तसेच मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशल हॉस्पिटल आणि पाचपावली रुग्णालयासह ईएसआयएस रुणालय, आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये कोल्ड वार्ड तयार करण्यात आले. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला. याशिवाय शहरातील सिग्नलवर ग्रीन नेट लावण्यात आल्या. समाजविकास विभागाद्वारे बेघर व्यक्तींची निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली. मनपाचे १६३ उद्याने दुपारच्या वेळेत सुरू ठेवण्यात आलीत. ३५०च्या वर ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली. वाहतूक पोलिस विभागाद्वारे दुपारच्या वेळी सिग्नल बंद ठेवण्यात आले. १०८ क्रमांकाच्या  ११ आणि मनपाच्या ७ रुग्णवाहिका २४ तास तत्पर ठेवण्यात आलेल्या आहेत.  आदी सर्व माहिती डॉ. नवखरे यांनी सादर केली.वाढत्या उन्हापासून मनपाद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजना या तात्पुरत्या स्वरूपात प्रभावीपणे कार्य करीत आहेत. मनपाच्या या उपाययोजनांमुळे अनेक नागरिकांना दिलासा देखील मिळतो आहे. मात्र झपाट्याने होत असलेले वातावरणातील बदल आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम लक्षात घेता उष्माघाताच्या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याचे मत यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी व्यक्त केले. यासाठी आराखडा तयार करण्याबाबत कार्यवाही करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. तेलंगणाच्या धर्तीवर नागपूरमध्येही ‘कूल रूफ’चे धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही श्रीमती गोयल म्हणाल्या. व्हीएनआयटीच्या प्रा. राजश्री कोठाळकर यांनी दीर्घकालीन उपाययोजनांबाबत अनेक सूचना मांडल्या.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 84 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गुरुवारी (ता. 16) रोजी उपद्रव शोध पथकाने 84 प्रकरणांची नोंद करून 35 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या  अंतर्गत  28 प्रकरणांची नोंद करून 11 हजार 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात  आला. व्यक्तीने  रस्ता,  फुटपाथ,  मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांचा दंड वसुल  करण्यात  
आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 10  प्रकरणांची नोंद  करून 4 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग,सिनेमाहॉल, मंगल  कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान,  स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव  

(व्यक्ती) असल्यास 32  प्रकरणांची  नोंद करून 6 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 03 प्रकरणांची नोंद करून 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करुन 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. मनपाच्या  उपद्रव  शोध पथकाद्वारे गुरुवारी (ता. 16) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या धरमपेठ झोन अंतर्गत मेन्स क्लोथ मेन रोड सिताबर्डी, धंतोली झोन अंतर्गत सतीश ट्रेडिंग कंपनी कॉटन मार्केट व गांधीबाग झोन अंतर्गत राधीका स्वीट्स भाजीमंडी ईतावरी या तीन प्रतिष्ठानांकडुन एकुण  15 हजार  रुपयाचा दंड वसूल केला.  याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत एलायंस अकेडमी ऑफ साईंस वर्मा लेआऊट अंबाझरी व आशीनगर झोन अंतर्गत सनफ्लॉवर  परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास या दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10  हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 05 प्रकरणाची नोंद करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 
 

Tuesday, May 14, 2024

नदी, नाले सफाई, पूरबाधित रस्त्यांची कामे १५ जूनपूर्वी पूर्ण करा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांचे निर्देश

नागपूर:- शहरातील प्रमुख तिनही नद्या आणि नाले सफाई सोबतच पूरामुळे बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे येत्या १५ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.शहरात सुरू असलेल्या विविध कार्यांचा झोननिहाय आढावा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज मंगळवारी (ता.१४) घेतला. मनपा मुख्यालयातील सभाकक्षात आयोजित आढावा बैठकीत मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, श्री. मिलींद मेश्राम, श्री. प्रकाश वराडे उपस्थित होते. ‍बैठकीमध्ये मनपा आयुक्तांनी नदी आणि नाले सफाई, पुरामुळे बाधित रस्त्यांची कामे आणि अतिक्रमण कारवाई संदर्भात आढावा घेतला. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक भागातील रस्ते खराब झाली. हे रस्ते दुरूस्त करण्यासंदर्भात झोनकडे आलेल्या प्रस्तावानुसार काम सुरू आहेत. पुरामुळे बाधित रस्त्यांच्या कामांच्या संदर्भात 
काही कार्यादेश बाकी असल्यास ते तातडीने निर्गमित करून कामाला गती देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले. याशिवाय त्यांनी झोननिहाय अतिक्रमण कारवाईचा देखील आढावा घेतला.नदी आणि नाले सफाईबाबत कार्य प्रगतीपथावर आहे. शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा या तिनही नद्यांच्या एकूण 51 टक्के पात्राची सफाई पूर्ण झालेली आहे. तिनही नद्यांची आतापर्यंत झालेल्या सफाईमधून ८१८४६ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. नदी स्वच्छतेच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी सफाई कार्याकरिता अतिरिक्त मशीन अथवा मनुष्यबळाची गरज असल्यास तशी मागणी करण्याबाबत सूचना यावेळी आयुक्तांनी सर्व झोनला केली. घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे शहरातील नाल्यांच्या सफाईबाबत माहिती देण्यात आली. नागपूर शहरात एकूण २२७ नाले असून यापैकी १५३ नाल्यांची सफाई मनुष्यबळाद्वारे तर ७४ नाल्यांची सफाई मशीनद्वारे केली जाते. आतापर्यंत एकूण १६४ नाल्यांची सफाई पूर्ण झालेली असून उर्वरित नाल्यांची सफाई लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. विहीत वेळेत कार्य पूर्ण होण्याच्या दृष्टीने नाले सफाईच्या कार्यामध्येही मनुष्यबळ अथवा मशीनची गरज असल्यास तशी मागणी करण्याची सूचना करून संबंधित विभागाद्वारे ते पुरविण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.या वेळी सहायक आयुक्त सर्वश्री हरीश राउत, गणेश राठोड, घनश्याम पंधरे, नरेंद्र बावनकर, प्रमोद वानखेडे, अशोक घारोटे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, विजय गुरूबक्षाणी, सुनील उईके, अनील गेडाम, मनोज सिंग, सचिन रक्षमवार, अजय पाझारे, उज्ज्वल लांजेवार, सतीश गुरनुले आदी उपस्थित होते.

शालार्थ आईडी घोटाला:प्रधानाचार्य तो केवल नाममात्र के हस्ताक्षरकर्ता हैं; असली साजिशकर्ता तो संस्था के निदेशक हैं? विदर्भ शिक्षक संघ का प्रश्न

[Demo Pick]  नागपुर: - विदर्भ शिक्षक संघ ने इस बात पर कड़ी नाराजगी जताई है कि राज्य में चल रहे शलार्थ आईडी घोटाले की जांच में केवल उन्हीं प्...