Thursday, May 16, 2024

अभिप्राय नोंदविण्यासाठी मनपाच्या २६ उद्यानात QR कोड आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली नव्या “क्यू आर कोड” प्रणालीची पाहणी

 नागपूर:- शहरातील उद्यानांची माहिती मिळावी व उद्यानासंदर्भात तक्रार थेट मनपाच्या उद्यान विभागाकडे पोहोचविता यावीया उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. नागपूर महानगरपालिका तर्फे शहरातील २६ मोठ्या उद्यानात क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीमलावण्यात आले आहे. मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (१६) रोजी पूर्व नागपुरातील भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे याची पाहणी केली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल सुद्धा उपस्थित होत्या. आता नागपूरकर उद्यानात बसून त्याच उद्यानाची माहिती आणि उद्यान विकास संदर्भात आपला अभिप्राय एक एक क्यू आर कोड स्कॅन करून थेट महानगरपालिकेच्या उद्यान विभागात नोंदवू शकतात. मनपा आयुक्त डॉ चौधरी यांचा मार्गदर्शनात उद्यान विभागातर्फे शहरातील मेजर सुरेंद्र देव पार्क (धंतोली)सुर्वेनगर उद्यानराजीव गांधी उद्यानत्रिमूर्तीनगरसावरकर नगरज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार ट्रॅफिकपार्क उद्यानशिवाजीनगर उद्यानदगडी पार्कजागृत कॉलोनी खेळाचे मैदानके टी नगर 
नक्षत्र नगर उद्यानमहात्मा गांधी उद्यान हनुमान नगरबालभवन उद्यानगांधीसागर तलावसुभाष रोड,महात्मा फुले उद्यानसुयोग्य नगरत्रिशताब्दी उद्यानजुना नंदनवनसंत ज्ञानेश्वर संजीवन समाधी उद्यानदत्तात्रयनगरसंत तुकाराम उद्यान सक्करदरामहावीर उद्यान अजामशाह लेआऊटजुना बगडगंज उद्यानगांधीबाग उद्यानतुलसीनगर उद्यान
भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानलता मंगेशकर उद्यानसूर्यनगरस्वतंत्र स्वराज जयंती उद्यान देशपांडे लेआऊटडॉ बाबासाहेब उद्यान वैशाली नगरॲड. सखारामपंत मेश्राम उद्यान (मंगळवारी) दयानंद पार्क जरीपटका येथे क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम” लावण्यात आली आहे.




आयुक्त श्री चौधरी यांनी नागरिकांना या सिस्टीमचा वापर करून आपले अभिप्राय नोंद करण्याचे आवाहन केले आहे.आयटी विभागाचे श्री. स्वप्निल लोखंडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना संपूर्ण प्रणालीचे कार्य प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. या अभिनव उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या २६ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रवेश द्वारउद्यानातील बसण्याचे ठिकाणमुलांचे क्रीडांगणबाहेर जाण्याचा मार्ग अशा जवळपास चार ते पाच दर्शनीय 
जागेवर क्यू आर कोड” लावण्यात येणार आहेत. हा कोड मोबाईलवर स्कॅनकरून नागरिक उद्यानाची माहितीत्यासंदर्भाती तक्रारीविकासासाठीचे अभिप्राय थेट मनपाच्या उद्यान विभागआयटी विभागउद्यानातील संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यंत पोहोचवू शकतो. 


मनपा आयुक्तांनी भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मनपा तर्फे
फार वर्षापूर्वी बांधण्यात आलेली वास्तूचे सुद्धा निरीक्षण केले. सध्याच्या या वस्तूचा उपयोग होत नाही. या वास्तूच्या दुरुस्ती आणि रंग रंगोटी करून त्याला नवीनरूप देण्याचा निर्देश आयुक्तांनी दिले. त्यांनी उद्यानाचे मेन्टेनन्स बद्दल प्रशंसा केली आणि नागरिकांसाठी कचरा पेटी लावणे
फार वर्षापूर्वी बांधण्यात आलेली वास्तूचे सुद्धा निरीक्षण केले. सध्याच्या या वस्तूचा उपयोग होत नाही. या वास्तूच्या दुरुस्ती आणि रंग रंगोटी करून त्याला नवीनरूप देण्याचा निर्देश आयुक्तांनी दिले. त्यांनी उद्यानाचे मेन्टेनन्स बद्दल प्रशंसा केली आणि नागरिकांसाठी कचरा पेटी लावणेखेळण्याचे उपकरणची दुरुस्ती करणे इत्यादी निर्देश दिले. या प्रसंगी उपायुक्त डॉ रंजना लाडेआई टी विभागाचे संचालक श्री महेश धामेचासहायक आयुक्त श्री गणेश राठोडउद्यान अधीक्षक श्री अमोल चोरपगारकार्यकारी अभियंता श्री संजय माटेआणि माजी नगरसेवक श्री बाल्या बोरकर उपस्थित होते.मनापाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर मनपा क्षेत्रातील २६ उद्यानात लावण्यात आली आहे. याद्वारे नागरिक मोबाईलवर क्यू आर कोड स्कॅन करून उद्यानाचे परिसरउद्यानात असणारे विविध वृक्षफूल
द्यानात दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधाप्रसाधनगृह आदी विषयी माहिती मिळवू शकताततसेच उद्यानासंदर्भातील तक्रार देखील करू शकतात.  नागरिकांनी केलेली तक्रार एसएमएसद्वारे तक्रारकर्ताउद्यान विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यत पोहोचेल व समस्याचे निराकरण त्वरित करता येईल.

No comments:

Post a Comment

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दान केल्या घरातील निरुपयोगी वस्तू -निरुपयोगी वस्तू संकलन/दान केंद्राचे आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते उद्घाटन

  नागपूर : - नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभ...