Tuesday, May 28, 2024

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेची आदरांजली

 नागपूर :-अतुल्य साहस आणि असीम राष्ट्रभक्ती, मृत्यूलाही न जुमानणारी प्रचंड ध्येयाशक्ती, समुद्रालाही शरण आणणारी निर्भीडता, हजारो क्रांतिकारकांची प्रेरणा, स्वातंत्र्य क्षितिजावरील सूर्य, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेचे केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात वीर सावरकरांच्या तैलचित्राला मा. आयुक्त तथा 
प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
   याप्रसंगी मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, सहा. आयुक्त श्री. महेश धामेचा,अधिक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्री. सतीश गुरनुले, श्री. राजीव गौतम, निगम अधिक्षक श्री. श्याम कापसे, सहा. अधिक्षक श्री. राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी श्री. मनिष सोनी, सुधीर कोठे, अमोल तपासे, राजेश गजभिये, राजेश लोहीतकर, प्रकाश खानझोडे, रजत मुंडे, विनोद डोंगरे आदी मोठया संख्येनी कर्मचारी उपस्थित होते तसेच शंकर नगर चौक स्थित वीर सावरकर यांच्या पुतळयाला श्री. श्यामजी पत्तरकीने, किसन बारई यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात  आले.

सफाई कर्मचारी महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती जागतिक महिला आरोग्य दिनानिमित्त मनपाचा पुढाकार

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे महिलांच्या  आरोग्यासंबंधी जागृतीकरिता दहाही झोनस्तरावर  जागतिक  महिला  आरोग्य दिन साजरा करण्यात आलायावेळी सर्व झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारीमनपा आरोग्य चमू आणि स्वच्छता विभागाच्या अधिका-यांमार्फत आरोग्याप्रति जनजागृती करण्यात आली. दरवर्षी २८ मे रोजी महिलांच्या  आरोग्यकरिता  जागतिक महिला  आरोग्य दिवस साजरा केला जातो. ‘महिलांचे आरोग्य आणि अधिकार : एक सुरक्षित  आणि स्वस्थ  भविष्याकडे’ ही  यावर्षीची  
जागतिक महिला आरोग्य दिनाची थीम आहेया कार्यक्रमादरम्यान सर्व महिला सफाई कर्मचारीएसएचसी महिला आणि समाजसेवी संस्थांसह जनजागृती करण्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.महिलांना आरोग्य सेवांचे महत्व आणि त्यांचा लाभ घेण्याविषयी जागरूक करणेमहिलांच्या आरोग्य अधिकारांची सुरक्षा आणि त्याविषयी माहिती देणेशासन आणि आरोग्य संघटनांना महिलांच्या आरोग्य सेवेमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणेसमाजात महिलांच्या आरोग्यासंबंधी प्रश्नांवर मोकळेपणाने चर्चा करणे आणि त्याच्या समाधानाच्या दृष्टीने कार्य करणे या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमात स्वच्छतेविषयी महत्वाची माहिती देण्यात आली



महिलांना
 सॅनिटरी पॅडचा योग्य उपयोग करण्याविषयी माहिती देताना त्यांना कापडाचा उपयोग  करण्याबाबत जागरूक करण्यात आलेसंक्रमणापासून बचावासाठी सॅनिटरी पॅड आणि स्वच्ठछतेच्या मानकांचे पालन करण्याबाबत माहिती देण्यात आलीघरातून निघणारा ओला आणि सुखा कचरा वेगवेगळा संकलीत करून  कचरा पेट्यांच्या माध्यमातून कचरा गाडीमध्ये टाकण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ओल्या कच यापासून होम  कम्पोस्टिंगच्या माध्यमातून खत निर्मिती करून  त्याचा उपयोग घरातील बागेत  करण्याबाबत  देखील जागरूक करण्यात आलीसिंगल यूज प्लास्टिकचा उपयोग  करण्याबाबत सतर्क करण्यात आले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 59 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:-नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव  शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा  फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेमंगळवारी (ता28रोजी उपद्रव शोध पथकाने 59 प्रकरणांची नोंद करून 43 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेसार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत प्रकरणाची नोंद करुन  200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडया स्टॉल्स पानठेले फेरीवालेछोटे भाजी  विक्रेते  यांनी  लगतच्या  परिसरात  अस्वच्छता (रु४००/- दंडया अंतर्गत  14 प्रकरणांची नोंद करून  
5 हजार 600 रुपयांचा दंडवसुल करण्यात  आला व्यक्तीने  रस्ता, फुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.  दुकानदाराने रस्ता फुटपाथमोकळी जागा  अशा ठिकाणी  कचरा टाकणे या अंतर्गत 4  प्रकरणांची नोंद  करून हजार 600  रुपयांचा  दंड वसुल करण्यात आला. मॉलउपहारगृह,लॉजिंग,  बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुप

यांचादंड  वसुल करण्यात आलावाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वैद्यकीय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे प्रकरणाची नोंद करुन 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करुन हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करुन 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव  (व्यक्तीअसल्यास  13 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 600 रुपये  दंड वसूल करण्यात  आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 02 प्रकरणांची नोंद*मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवारी (ता28रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत भगवती किराणा स्टोर्स बुधवारी बाजार मस्कासाथ ईतवारी आणि नेहरुनगर झोन अंतर्गत बागडे दही भंडार मिर्ची बाजार रोड सक्करदरा या दोन प्रतिष्ठानांकडुन एकुण 10  हजार  रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत रीझ असोसिएट्स तात्या टोपे नगर व माऊली काम्पलेक्स बजाज नगर बांधकामाचा कचरा रस्त्यालगत पसरविलेल्याबाबत या दोन पतिष्ठानांकडुन एकुण 20 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. 
धरमपेठ झोन अंतर्गत लक्ष्मी हॅास्पिटल लक्ष्मी भुवन चौक बॉयो मेड कचरा रस्त्यालगत कचरा टाकलेबाबत यांच्याकडून 10 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग नगर झोन अंतर्गत जॉन सर क्लासेस मेयो समोर हास्पिटल बजेरिया परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास यांच्याकडुन 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत सिमरन मडके वैशाली नगर यांच्याकडुन रस्त्याच्या कडेला टिनशेडचे बांधकाम करणेबाबत हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत हेंमत केवलरामानी पुंशी हास्पिटल जवळ जरिपटका कन्सट्रशन्स साईटवर सीवर लाईनला नुकसान केल्याबाबत यांच्याकडुन
 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण 8 प्रकरणांची नोंद करून 55 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. 

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...