Tuesday, May 28, 2024

सफाई कर्मचारी महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती जागतिक महिला आरोग्य दिनानिमित्त मनपाचा पुढाकार

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे महिलांच्या  आरोग्यासंबंधी जागृतीकरिता दहाही झोनस्तरावर  जागतिक  महिला  आरोग्य दिन साजरा करण्यात आलायावेळी सर्व झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारीमनपा आरोग्य चमू आणि स्वच्छता विभागाच्या अधिका-यांमार्फत आरोग्याप्रति जनजागृती करण्यात आली. दरवर्षी २८ मे रोजी महिलांच्या  आरोग्यकरिता  जागतिक महिला  आरोग्य दिवस साजरा केला जातो. ‘महिलांचे आरोग्य आणि अधिकार : एक सुरक्षित  आणि स्वस्थ  भविष्याकडे’ ही  यावर्षीची  
जागतिक महिला आरोग्य दिनाची थीम आहेया कार्यक्रमादरम्यान सर्व महिला सफाई कर्मचारीएसएचसी महिला आणि समाजसेवी संस्थांसह जनजागृती करण्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.महिलांना आरोग्य सेवांचे महत्व आणि त्यांचा लाभ घेण्याविषयी जागरूक करणेमहिलांच्या आरोग्य अधिकारांची सुरक्षा आणि त्याविषयी माहिती देणेशासन आणि आरोग्य संघटनांना महिलांच्या आरोग्य सेवेमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणेसमाजात महिलांच्या आरोग्यासंबंधी प्रश्नांवर मोकळेपणाने चर्चा करणे आणि त्याच्या समाधानाच्या दृष्टीने कार्य करणे या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमात स्वच्छतेविषयी महत्वाची माहिती देण्यात आली



महिलांना
 सॅनिटरी पॅडचा योग्य उपयोग करण्याविषयी माहिती देताना त्यांना कापडाचा उपयोग  करण्याबाबत जागरूक करण्यात आलेसंक्रमणापासून बचावासाठी सॅनिटरी पॅड आणि स्वच्ठछतेच्या मानकांचे पालन करण्याबाबत माहिती देण्यात आलीघरातून निघणारा ओला आणि सुखा कचरा वेगवेगळा संकलीत करून  कचरा पेट्यांच्या माध्यमातून कचरा गाडीमध्ये टाकण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ओल्या कच यापासून होम  कम्पोस्टिंगच्या माध्यमातून खत निर्मिती करून  त्याचा उपयोग घरातील बागेत  करण्याबाबत  देखील जागरूक करण्यात आलीसिंगल यूज प्लास्टिकचा उपयोग  करण्याबाबत सतर्क करण्यात आले.

No comments:

Post a Comment

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दान केल्या घरातील निरुपयोगी वस्तू -निरुपयोगी वस्तू संकलन/दान केंद्राचे आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते उद्घाटन

  नागपूर : - नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभ...