Friday, July 19, 2024

मोरभवन बस स्थानकावर प्रवाश्यांना आवश्यक सुविधाउपलब्ध करावे : आयुक्त

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या मोरभवन बस स्थानकावर प्रवाश्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिवहन विभागाला दिले. मोरभवन येथून मनपातर्फे संचालित आपली बस मधून दररोज हजारो प्रवासी कामठी-टेकाडी, मिहान, बुटीबोरी, कळमेश्वर, बहादुरा-फाटा आणि इतर ठिकाणी प्रवास करतात. आयुक्तांनी शुक्रवारी (19 ता.) मोरभवन बस स्थानकांची पाहणी केली.आयुक्तांनी प्रवाश्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, त्यांच्यासाठी शेड उभारणे व 
पावसाचे पाणी साचू नये म्हणून व्यवस्था करण्याचे निर्देशही दिले. मनपा तर्फे मुरुम टाकून मोरभवन बस स्थानकाचे सर्व खड्डे बुजविण्याचे व जागा समतल करण्याचे ही आदेश दिले. पावसाळयात मोरभवन बस स्थानकाच्या एक्सटेंशन भागात प्रवाश्यांना कोणत्याही परिस्थितीत चिखलामध्ये जावे लागणार नाही याची पूर्ण दखल घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.याप्रसंगी अधिक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता श्री. विजय गुरुबक्षानी, अजय डहाके, उप अभियंता लुंगे, परिवहन विभागाचे श्री. घाटोळे, श्री. जोशी, श्री. रविंन्द्र पागे उपस्थित होते.

नाग नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षाकडे लक्ष द्या : आयुक्त कॉर्पोरेशन कॉलनीची केली पाहणी

नागपूर:- नागपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे कॉर्पोरेशन कॉलनी येथे नागनदीच्या काठावर सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेली तात्पुरती टिनाची संरक्षण भिंत बुधवारी रात्री पडली होती. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत  चौधरी यांनी शुक्रवारी (ता. 19) या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.कॉर्पोरेशन कॉलनी येथे प्रकाश सोळंके यांच्या घरालगत असलेली संरक्षण भिंत मागील वर्षी पूरामध्ये कोसळली होती. यावर्षी नागनदीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरु नये म्हणून मनपा प्रशासनातर्फे सँड बॅग्स आणि तात्पुरती टिनाची भिंत 
उभी करण्यात आली होती. पावसाळयानंतर येथे पक्की संरक्षण भिंत बांधण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मनपाला निधीही प्राप्त झाला आहे.आयुक्तांनी नागरिकांना धोका होऊ नये यासाठी सँड बॅग्स लावणे व यासाठी चैन लिंक Protection तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच टिनाचे तात्पुरते कुंपण पुन्हा लावण्याचे निर्देश दिले. तसेच इतर ठिकाणी सुध्दा तपासणी करुन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांनी सूचना केली. यावेळी अधिक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारउपायुक्त श्री. प्रकाश वराडेकार्यकारी अभियंता श्री. विजय गुरुबक्षाणी उपस्थित होते.

Friday, July 12, 2024

बूटी कन्या शाळा बेघर निवारा केंद्रात महिला निवाऱ्याची क्षमता वाढणार मनपा आयुक्तांनी केली पाहणी : बेघरांशी साधला संवाद

नागपूर:- नागपूर महानगरपालिका समाज विकास विभागसमाजोपयोगी उपक्रम अंतर्गत सीताबर्डी येथे बूटी कन्या शाळेमध्ये आधार शहरी बेघर निवारा केंद्र संचालित करण्यात येत आहे. या निवारा केंद्रामध्ये जास्तीत जास्त बेघर महिलांना निवारा मिळावा यासाठी महिला निवाऱ्याची क्षमता वाढविण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.शुक्रवारी (ता.१२) मनपा आयुक्तांनी सीताबर्डी मार्केट लगतच्या आधार शहरी बेघर निवारा केंद्राची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचंल गोयलउपायुक्त डॉ. रंजना लाडे उपस्थित होत्या. दीनदयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नागपूर मनपा समाज विकास विभागातर्फे बेघर नागरिकांसाठी पाच निवारा केंद्र संचालित करण्यात येत आहेत. यामध्ये आधार शहरी बेघर निवारा केंद्र सीताबर्डीसावली शहरी बेघर निवारा केंद्र भानखेडाहंसापुरीआपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र समाज भवननवीन 
बिल्डींगइंदोरा मठ मोहल्लाजरीपटकाबोधित्सव शहरी बेघर निवारा केंद्रइंदोरा मठ मोहल्लाजरीपटका व आधार शहरी बेघर निवारा जुने सतरंजीपुरामारवाडी चौक यांचा समावेश आहे.सीताबर्डी येथील बुटी कन्या शाळा येथील निवारा केंद्रात सध्या २५ महिला व २५ पुरुषांची सोय करण्यात आली आहे. तळमजल्यावर पुरुष तथा पहिल्या माळ्यावर महिलांसाठी सोय करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी महिलांच्या निवाऱ्याची क्षमता वाढवून ती ५० पर्यंत करण्याचे निर्देश विभागाला दिले.यावेळी पाहणी करताना आयुक्तांनी बेघर पुरुष आणि महिलांशी संवाद साधला. महिलांनी त्यांना सांगितले कीत्यांचाकडे राहण्याची कोणतीही सोय नाही म्हणून ते इथे राहत आहेत. कोणीही नातेवाईक ठेवायला तयार नसल्यामुळे निवारा केंद्रात आसरा घेतल्याचेही काही महिलांनी सांगितले. बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून बेघर व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यांना काही त्रास असल्यास रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात 
येत असल्याची माहिती निवारा केंद्राचे श्री. देवेंद्र क्षीरसागर यांनी दिली.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नवलाई शहरस्तर संस्था सोनचिरिया उपजीविका केंद्राची सुध्दा पाहणी केली. पं. रविशंकर शुक्ला हायस्कूलटेम्पल बाजार रोड येथे संस्थेच्या माध्यमातून बचत गटामार्फत तयार करण्यात येणारे पदार्थ व वस्तुंची विक्री केली जात आहे. आयुक्तांनी उपजीविका केंद्र संचालित करणाऱ्या महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले.याप्रसंगी शहर व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडेविनय त्रिकोलवार व नूतन मोरे यांच्यासह अन्य उपस्थित होते. 

"आपदा मित्र” नियुक्तीसाठी विविध संस्थांसोबत बैठक

 
नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपात्कालीन विभागाद्वारे  शहरी भागतील आपत्ती व अतिवृष्टि कालावधीत सहकार्य करण्यासाठी आपदा मित्रांची नियुक्ती करण्यासाठी विविध संस्थेच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करण्यात आली.अतिरिक्त आयुक्त श्री अजय चारठाणकर यांच्या अध्यक्षतेमध्ये व मुख्य अग्निशमन अधिकारी श्री बी.पी. चंदनखेडे यांच्या उपस्थितीत सभा डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये घेण्यात आली.उपरोक्त सभेमध्ये उपस्थित शहरी भागातील आपत्ती समयी व अतिवृष्टी कालावधीत सहकार्य करण्यास शैक्षणिक संस्था/ सामाजिक संस्था व इतर कार्यालयीन  प्रतिनिधी  यांना ज्या व्यक्तीस किंवा स्वयंसेवक यास आपत्ती समयी सहकार्य करावयाचे आहे. अश्या व्यक्तीकडुन संपर्क साधुन आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत वेबसाईटवर व्यक्तीगत माहिती  प्राप्त् करुन घेण्यात येईल. त्या माहितीच्या आधारे त्यांना आपदा मित्र म्हणुन ओळखपत्र देण्यात येईल. तसेच या दरम्यान नियुक्त आपदा मित्राला अग्निशमन बचाव साहित्यासंबधी माहिती व प्रशिक्षण तसेच कार्डीओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR), प्राथमिक आरोग्य् सेवेबाबत प्रशिक्षण देण्यात येईल असे श्री. अजय चारठाणकर, अति आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांनी  निर्देश दिले.यावेळी 1) मा. सहा. संचालक, राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय, राजनगर नागपूर येथील श्री. गगन  उपाध्याय  व श्री. राजेश सबनीस 2) मे. ऑल इंडिया इंस्टीटयुट ऑफ 
लोकल सेल्फ गव्हर्नमेंट गोकुल पेठ नागपूर येथील श्री. सुशिल यादव 3) मे. नागपूर शहर ग्रामीण क्षेत्र, सर्पमित्र संघ, नागपूर येथील श्री. शुभम पराळे 4) मे. मातृभुमी फाऊंडेशन, सहकार नगर, नागपूर येथील श्री. वेदांत जोशी 5) मे. जेडी स्पोर्टस फाऊंडेशन नागपूर येथील श्री. जयंत दुबळे व नॅशनल इंस्टीटयुट ऑफ स्विमींग नागपूर तर्फे डॉ. जयप्रकाश दुबळे 6) मे. रेव्हान रेस्क्यु व्हालेन्टीअर असोशिएशन , नागपूर तर्फे श्री. पृथ्वी रामटेके  7) मे. नागपूर जिल्हा हौशी जलतरण संघटना, नागपूर तर्फे श्री. जिनीत भीमटे 8) मे. इंडीयन इंस्टीटयुट ऑफ इंजीनियरींग कॉलेज, मकरधोकडा नागपूर तर्फे श्री. मनिष बोधनकर 9) मे. नॅशनल इंस्टीटयुट ऑफ फायर ॲन्ड सेफ्टी इंजीनियरींग, कस्तुरबानगर नागपूर तर्फे श्री. तरुण मंडपे 10) प्रहार समाज जागृती संस्था नागपूर तर्फे श्री नागेश्वर पोडली 11) जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय कॉग्रेसनगर  नागपूर तर्फे श्री. देवीदास भलमे याप्रमाणे  शैक्षणिक संस्था/सामाजिक संस्था तसेच राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय व जिल्हा समादेशक, होमगार्ड येथील कार्यालयातील अधिकारी  उपस्थित होते. त्याचप्रमाणे अग्निशमन व आपात्कालीन सेवा विभागातील श्री. तुषार बाराहाते, सहा विभागीय अग्निशमन अधिकारी , श्री. सतीश राहाटे, उप अग्निशमन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सौ. आरुषा आनंद, शहर प्रकल्प समन्वयक अधिकारी,  श्री. अकलीम शेख, अग्निशमन अधिकारी  प्रादेशिक प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, कळमना, श्री. प्रकाश कावडकर उप अग्निशमन अधिकारी , सक्करदरा अग्निशमन केंद्र व  इतर अधिकारी  तसेच कर्मचारी उपस्थित होते. मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडे यांनी उपस्थित सर्व संघटनेचे प्रतिनिधी यांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाचे समापन केले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 85 प्रकरणांची नोंद- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेशुक्रवारी (ता12रोजी उपद्रव शोध पथकाने 85 प्रकरणांची नोंद करून 97 हजार 300 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करुन  200  रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे  भाजी विक्रेते यांनी  लगतच्या  
परिसरात अस्वच्छता (रु४००/- दंडया अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 800 रुपयांचा दंड वसुल  करण्यात आलाव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 700 रुपयांचा दंड वसुल करण्यात आलादुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा  टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता  मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 09 प्रकरणांची नोंद करून 12 हजार रुपयांचा 
दंड वसुल करण्यात आला. वैद्यकीय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 60 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त यादीत   आढळणारे  इतर उपद्रव (व्यक्तीअसल्यास 37 प्रकरणांची नोंद करून हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 01 प्रकरणांची नोंद*मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शुक्रवारी (ता12रोजी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या सतरंजीपूरा झोन अंतर्गत योगेश किरणा शॉप अनाज बाजार ईतवारी यांच्याकडून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलायाशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत स्वरनिमा खरे काच्चीपूरा रामदासपेठ आणि धंतोली झोन अंतर्गत आर्या साई बिल्डकॉन नवीन जानकी नगर बालाजी नगर रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत या दोन प्रतिष्ठानांकडुन एकुण 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत ओरल मॅक्सी फोरल डेन्टील क्लिनिक बेसा पावर हाऊस माहाकाली हुडकेश्वर आणि गांधीबाग झोन अंतर्गत मेट्रोपोलिक हेल्थ केयर संदेश देवा बाजार सीए रोड वैद्यकीय कचरा रस्त्याच्या कडेला




टाकणेबाबत या दोन प्रतिष्ठानांकडुन एकुण 60 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत फेजल खान संत्रा मार्केट कचरा रस्त्यालगत टाकणेबाबत यांच्याकडून हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण 06 प्रकरणांची नोंद करून 90 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. 
 

Wednesday, July 10, 2024

आयकर अधिकाऱ्यांनी डिजीटली सक्षम राहणे आवश्यक-नागपूरच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त रीना त्रिपाठी यांचे प्रतिपादन

नागपूर:- आयकर विभागात काम करत असताना आयकर अधिकाऱ्यांनी  डिजीटली सक्षम राहणे आवश्यक असून आयकर विभागाच्या फेसलेस असेसमेंट, सायबर फॉरेंसिक्स तसेच डिजिटल सबमिशन यासारख्या उपक्रमांमध्ये कौशल्य संपादन करून ते करदात्यांना उत्तम सेवा उपलब्ध करून देवू शकतात असे प्रतिपादन नागपूरच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त श्रीमती रीना त्रिपाठी यांनी आज केले. आयकर अधिकाऱ्यांमधून पदोन्नती मिळालेल्या आयकर सहायक आयुक्त यांच्या उत्तरायणया प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी नागपूरच्या छिंदवाडा रोड स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅडमी एनएडीटी येथे त्या बोलत होत्या. याप्रसंगी  एनएडीटीचे प्रशिक्षण 
महासंचालक आनंद बैवार,अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) मनीष कुमार तसेच उत्तरायणया प्रशिक्षणाचे प्रशिक्षण संचालक आणि अतिरिक्त महासंचालक आकाश देवांगण हे प्रामुख्याने उपस्थित होते.आपण आयकर सहाय्यक आयुक्त म्हणून जेव्हा आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा प्रत्यक्ष फिल्ड वरील ट्रेनिंग हे  विभागातील आयकर इन्स्पेक्टर यांच्याकडूनच मिळाले असे सांगतानाच रीना त्रिपाठी यांनी नव्याने पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक आयुक्तांना आपल्या नियंत्रणाखालील परीक्षावधीन अधिकाऱ्यांना या खात्यामध्ये काम करण्याच्या संदर्भातील त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचे आदान प्रदान करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत पर

भाषण एनएडीटीचे  प्रशिक्षण महासंचालक आनंद बैवार यांनी केले .अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) मनीष कुमार यांनी याप्रसंगी नवपदोन्नत अधिकाऱ्यांना कर प्रशासकाची शपथ दिली.या प्रशिक्षणाचे प्रशिक्षण संचालक आकाश देवांगन यांनी सांगितले की सात आठवड्यापेक्षा जास्त चालणाऱ्या या उत्तरायणप्रशिक्षणामध्ये नवपदोन्नत   सहाय्यक आयुक्तांना आयकर प्रशासनाच्या सर्व बाबींवर प्रशिक्षण दिले जाते .त्यांचे ज्ञान आणि कौशल्य वृद्‌धीकरीता तसेच कर संकलनात आणि कर चुकवेगिरीचा सामना करण्याचे प्रशिक्षण, मनी लॉन्ड्रींग  या  आर्थिक घोटाळ्यांसारख्या आर्थिक गुन्ह्याचा सामना करण्यासाठी तज्ञातर्फे सात महिने प्रशिक्षण दिले जाते.यामध्ये एक आठवड्याच्या भारत दर्शन कार्यक्रमाचादेखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रसंगी सहाय्यक प्रशिक्षण संचालक अरविंद कुमार वर्मा यांनी या तुकडीची माहिती दिली. या तुकडीमध्ये 131 अधिकारी प्रशिक्षणार्थी असून त्यापैकी 38 या महिला प्रशिक्षणार्थी आहेत. या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या  महाराष्ट्र राज्यातल्या अधिकाऱ्यांची  आहे.


या तुकडीचे सरासरी वय 54 वर्ष असून या तुकडीतील  अधिका-यांनी  सुमारे 20 ते 25 वर्ष सेवा आपल्या विभागात दिल्यानंतर त्यांना ही पदोन्नती मिळाली आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक प्रशिक्षण संचालक अभिनव मिश्रा यांनी केले.याप्रसंगी श्रीमती रीना त्रिपाठी यांनी एनएडीटी परिसरात वृक्षारोपण देखील केले.या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी अधिकारी , एनएडीटी मधील अधिकारी तसेच आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...