Wednesday, August 7, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 75 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई


नागपूर
:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर,  कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (07) रोजी शोध  पथकाने  75  प्रकरणांची नोंद करून 47800 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेलेफेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 23 प्रकरणांची नोंद करून 9200 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. 
दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 12000 रुपयांची वसुली करण्यात आली.  सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून 18000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. कैफे द ओला यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. हैलो वर्ल्ड प्रि स्कुल यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. नेहरु नगर अंतर्गत अब्दुल नजिम यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. रुपशे किराणा स्टोर यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. कुडेजा क्लॉथ व मे. पराथे किराणा शॉप यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. हयात मेडीकॉस यांच्या विरुध्द  वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यात टाकल्याबद्दल रु. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला. 

Saturday, August 3, 2024

गरिबांना उपचारासाठी ‘वेटिंग लिस्ट’मध्ये ठेवू नका! केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या एम्सच्या अधिकाऱ्यांना सूचना

नागपूर- विदर्भासह आसपासच्या प्रदेशातील गरीब रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मिळावेत, त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून आपण नागपूरमध्ये एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) आणले आहे. त्यामुळे कुठलाही गरीब रुग्ण उपचारासाठी वेटिंग लिस्टमध्ये राहणार नाही, याची पूर्ण काळजी घ्या, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) एम्सच्या अधिकाऱ्यांना दिल्या.ना. श्री. नितीन गडकरी यांनी एम्स येथील कामाचा आणि यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. यावेळी एम्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विकास महात्मे, संचालक डॉ. प्रशांत जोशी व डॉक्टरांची उपस्थिती होती. कोणत्या उपचारांसाठी आणि 
शस्त्रक्रियांसाठी तसेच तपासण्यांसाठी वेटिंग लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्टचे कारण काय आहे, याचा शोध घ्या. अशी परिस्थिती एम्ससारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कधीच उद्भवणार नाही, याची विशेष काळजी घ्या. गरिबांना उपचारासाठी वाट बघायला लावू नका. गरज पडल्यास नागपुरातील ज्येष्ठ डॉक्टरांची सेवा घेता येईल का, हे तपासून बघा,’ अशी सूचना ना. श्री. गडकरी यांनी दिल्या. यासोबतच एम्समधील परिचारिकांची संख्या वाढवून कामाचा ताण कमी करता येईल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. मुबलक औषध साठा आहे की नाही, तपासण्या करणारी यंत्रणा सुसज्ज आहे की नाही, याचीही पूर्ण काळजी घ्या. एम्समधील पूर्ण
 व्यवस्थेचा लाभ गरिबांना होईल यादृष्टीने काम करावे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. यावेळी ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट युनिट, सिकल सेल युनिट, न्युक्लियर मेडिसिन आणि आय बँक या विभागांचेही उद्घाटन झाले.सिकलसेलच्या रुग्णांचा उपचार झालाच पाहिजे ज्या भागात आपण एम्स उभे केले आहे, तेथील सर्वांत मोठी समस्या सिकलसेल आणि थॅलेसिमियाची आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे एम्समध्ये त्यांचा उपचार झालाच पाहिजे, असा आग्रह ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. ज्यांना गरज आहे अशा जास्तीत जास्त रुग्णांचे बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट एम्समध्ये जास्तीत जास्त प्रमाणात व्हावे, असेही ते म्हणाले.

गेल्या १० वर्षांत काँक्रीटीकरण, डांबरीकरण आणि दुरुस्ती केलेल्या रस्त्यांचे ऑडिट करावे: आमदार विकास ठाकरे

नागपूर: डांबरीकरण, काँक्रीटीकरण आणि खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती केलेले रस्ते काही महिन्यांतच खराब होताना दिसतात. खरे तर हे रस्ते 3-5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ टिकले पाहिजेत. यामुळे सार्वजनिक पैशांचा मोठा अपव्यय होत आहे आणि नागरिकांना गंभीर गैरसोय होत आहे. म्हणूनच, नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, PWD, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि MahaMetro यांनी गेल्या दशकात काँक्रीटीकरण, डांबरीकरण आणि दुरुस्ती केलेल्या सर्व रस्त्यांचे ऑडिट करावे, अशी मागणी पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर जिल्हा (शहर) काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरेंनी केली. पश्चिम नागपूर विधानसभेत शंकर नगर 
चौक ते रामनगर चौक हा रस्ता ताजे उदाहरण आहे. नागपूर महानगरपालिकेने या रस्त्याचा डांबरीकरण करण्यासाठी, पादचारी मार्गाचे पुनर्निर्माण इत्यादींसाठी सुमारे २ कोटी रुपयांचे कामाचे कार्यदेश एका ठेकेदाराला दिले होते. रस्ता मार्चमध्ये डांबरीकरण करण्यात आला होता आणि उर्वरित कामे सुरू आहेत. पाच महिन्यांत रस्त्यावर खड्डे पडले आहेत आणि रस्ता खडीने भरलेला आहे. डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची DLP (defect liability period) सुमारे तीन वर्षांची असते. रस्ता डीएलपीच्या 3 वर्षांहून अधिक काळ टिकून राहायचा होता, ठाकरे म्हणाले.सिमेंट काँक्रीट रस्त्यांचीही तीच अवस्था आहे. DLP कालावधी पाच वर्षांहून अधिक असूनही काँक्रीटीकरणानंतर काही महिन्यांतच भेगा, खड्डे, तडकलेली पृष्ठभागाची थर, पेव्हर ब्लॉकचे बसणे वगैरे सामान्य दृश्य आहे,” असे ठाकरे म्हणाले.ठाकरे पुढे म्हणाले, "खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती केलेल्या रस्त्यांची स्थिती खूपच खराब आहे आणि त्यामुळे अपघात होत आहेत. हे सर्व अभियंते आणि कंत्राटदारांमधील साटेलोटे आहे. गेल्या १० वर्षांत या सरकारी यंत्रणांनी एकही कंत्राटदार काळ्या यादीत टाकलेला नाही. नागपूरभरातील रस्त्यांची स्थिती चालू पावसाळ्यात खूपच खराब आहे. त्यामुळे, विभागीय आयुक्तांनी नागपूरमध्ये गेल्या १० वर्षांत केलेल्या सर्व रस्त्यांच्या कामांचे, DLP कालावधीतील रस्त्यांची स्थिती, संबंधित सरकारी यंत्रणेने केलेली कारवाई, संबंधित सरकारी यंत्रणेने केलेली दुरुस्ती आणि इतर बाबींसह ऑडिट करावे. यामुळे निश्चितच मोठा घोटाळा उघड होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे सार्वजनिक पैशांच्या नुकसानीची आणि नागरिकांच्या गैरसोयीची टाळणी करण्यात मदत करेल,” असे ठाकरे म्हणाले.
 

कार्यकर्ताच लोकांना जोडण्याचे काम करू शकत केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

नागपूर- शहराचा विकास करण्यासाठी नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री प्रयत्न करतील. त्यांना हे काम करायचेच आहे. पण लोकांना जोडण्याचे काम कार्यकर्ताच करू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भाजप महानगर कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, माजी 

खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी महापौर माया इवनाते व दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता यांची उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी सुरुवातीला लोकसभेत विजय मिळवून दिल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘लालकृष्ण अडवाणीजी यांनी पार्टी विथ डिफरन्सअसा आपल्या पक्षाचा उल्लेख केला होता. कारण इतर पक्षांमध्ये नेते तयार होतात आपल्या पक्षात कार्यकर्ते तयार होतात. 

अनेक वर्षे कार्यकर्त्यांच्याच शक्तीवर पक्ष उभा आहे आणि आज पक्षाला जे काही चांगले दिवस आलेय ते सुद्धा कार्यकर्त्यांमुळेच.१९८० साली आपल्या पक्षाची स्थापना झाली. मी त्याच वेळी पक्षाचे काम सुरू केले. न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला राम जेठमलानी आले होते. नंतर आपल्या पक्षाला मोठे स्वरुप आले. पुढे अटलजींच्या नेतृत्वात सरकार आले आणि आता २०१४ मध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सरकार आले. विरोधी पक्षात असताना जनतेचा आवाज बुलंद करण्याची आणि जनतेवर होणाऱ्या अन्यायासाठी संघर्ष करण्याची शपथ आपण घेतली. त्या दृष्टीने काम केले. आणि त्याचवेळी सत्ता येईल तेव्हा समाजातील शेवटच्या माणसाचे कल्याण करायचे आहे, असेही म्हटले. आज आपली सत्ता आहे आणि आपल्याला शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा विचार करायचा आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

Friday, August 2, 2024

कृषि अर्थशास्त्रियों के 22वें अंतर्राष्ट्रीय सम्मेलन का उद्घाटन 3 अगस्त को प्रधान मंत्री द्वारा किया जाएगा करीब 75 देशों के प्रतिनिधि हिस्सा लेंगे

नई दिल्ली :- प्रधान मंत्री नरेंद्र मोदी 3 अगस्त 2024 को राष्ट्रीय कृषि विज्ञान केंद्र ( एनएएससी) परिसर , नई दिल्ली में कृषि अर्थशास्त्रियों के 32वें अंतर्राष्ट्रीय सम्मेलन ( आईसीएई) का उद्घाटन करेंगे   इस मौके पर प्रधानमंत्री दर्शकों को संबोधित करेंगेइंटरनेशनल एसोसिएशन ऑफ  एग्रीकल्चरल  इकोनॉमिस्ट्स  (आईसीएई) द्वारा आयोजित  यह त्रिवार्षिक सम्मेलन 02 से 07 अगस्त 2024 तक भारत में आयोजित किया जा रहा है  ICAE, सम्मेलन , 65 वर्षों के बाद भारत में आयोजित किया जा रहा है  स्थायी कृषि-खाद्य  सिस्टम की ओर परिवर्तन इस वर्ष के सम्मेलन का विषय है। इसका उद्देश्य जलवायु 
परिवर्तन , प्राकृतिक संसाधनों की कमी, बढ़ती उत्पादन लागत और युद्ध जैसी स्थितियों जैसी वैश्विक चुनौतियों के सामने टिकाऊ कृषि की आवश्यकता को संबोधित करना है यह वैश्विक कृषि चुनौतियों से निपटने और कृषि अनुसंधान और नीति में देश की प्रगति को प्रदर्शित करेगा। ICAE-2024 सम्मेलन युवा शोधकर्ताओं और अग्रणी पेशेवरों के लिए वैश्विक साथियों के साथ अपने काम और नेटवर्क को प्रदर्शित करने के लिए एक मंच के रूप में काम करेगा। इसका मुख्य उद्देश्य अनुसंधान संस्थानों और विश्वविद्यालयों के बीच सहयोग को मजबूत करना , राष्ट्रीय और वैश्विक नीति-निर्माण को प्रभावित करना और डिजिटल कृषि और टिकाऊ कृषि-खाद्य प्रणालियों में प्रगति सहित भारत की कृषि प्रगति को प्रदर्शित करना है। इस सम्मेलन में लगभग 75 देशों के  लगभग  1,000  प्रतिनिधि भाग लेंगे 

मनपातील पहिल्या प्रशिक्षणार्थीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नियुक्ती

 
नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देउन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध ४०४ पदांवर प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेत नियुक्त पहिल्या प्रशिक्षणार्थी नेहा मंडारीला शुक्रवारी (ता.२) उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले.सिव्हिल लाईन्स येथे निर्मित नवीन जिल्हा नियोजन भवनचे आज शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून मनपामध्ये सामान्य प्रशासन विभागात नियुक्त लाभार्थी नेहा मंडारी यांना उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्तीपत्र दिले. मनपा तर्फे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी 9, कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदासाठी 3,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठी 4, विद्युत अभियांत्रिकी सहायक पदासाठी 1, अग्निशामक विमोचक पदासाठी 7, कनिष्ठ लिपीक पदासाठी 6 व वायरमॅन पदासाठी दोन प्रशिक्षणार्थीची निवड शुक्रवार(2) पर्यंत करण्यात आली आहे. याप्रसंगी खासदार श्री. श्यामकुमार बर्वेजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती मुक्ता कोकड्डेआमदार सर्वश्री प्रवीण दटकेडॉ. परिणय फुकेमोहन मतेविकास कुंभारेअनिल देशमुखडॉ. नितीन राउतकृष्णा खोपडेअभिजीत वंजारीसुधाकर अडबालेपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरनागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. संजय मीना, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये ४०४ पदांवर अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी पात्र युवकांकडून  rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अर्ज आमंत्रित करण्यात आले. प्राप्त अर्जांमधून आता प्रशिक्षणार्थींची निवड केली जात आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)कनिष्ठ अभियंता (विद्युत)स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकविद्युत अभियांत्रिकी सहाय्यकअग्निशामक विमोचककनिष्ठ लिपीकस्वच्छता निरीक्षकसहायक शिक्षक (यु.डी.टी. माध्यमिक)सहायक शिक्षक (एल.डी.टी. माध्यमिक)वृक्ष अधिकारीवायरमन या पदांवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत प्रशिक्षणार्थींची निवड केली जात आहे. या अंतर्गत १२वी उत्तीर्ण उमेदवाराला प्रतिमहा ६ हजार रुपयेआयटीआय अथवा पदवी असलेल्यांना ८ हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना १० हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहे.

गड्डीगोदाम येथील समस्यांची आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झोन अंतर्गत गड्डीगोदाम येथील नागरिकांच्या विविध समस्यांसंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता.१) पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलउपायुक्त डॉ. गजेंद्र महल्लेअधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारमंगळवारी झोनचे सहायक आयुक्त श्री. अशोक घरोटेकार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणेकार्यकारी अभियंता श्री. सुनील उईकेकनिष्ठ अभियंता श्री. देवचंद काकडे यांच्यासह व्यावसायिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गड्डीगोदाम येथील मटन मार्केटला भेट देउन येथील समस्या जाणून घेतल्या. मटन मार्केटमधील घाण पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याची तक्रार विक्रेत्यांद्वारे करण्यात 
आली. परिसरात मनपाद्वारे नवीन कत्तलखाना चे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीचे देखील त्यांनी निरीक्षण केले. मटन मार्केटच्या पाण्याची लाईन जोडलेल्या नाल्याची आयुक्तांनी सविस्तररित्या पाहणी केली. गड्डीगोदाम मटन मार्केट ते कामठी रोड पर्यंत नाल्याचे त्यांनी निरीक्षण केले. नाल्याच्या स्वच्छतेसंदर्भात योग्य कार्यवाही करण्याअनुषंगाने त्यांनी विभागाला निर्देश दिले.याशिवाय मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांशी संवाद साधून परिसरातील विविध समस्या जाणून घेतल्या.
गड्डीगोदाम येथील वस्त्यांमध्ये मनपाद्वारे निर्मिती सार्वजनिक शौचालयाची इमारत बंदावस्थेत आहे. ही इमारत पाडून येथे मुलांना खेळण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात आयुक्तांनी निर्देश दिले. पावसाळी पाणी आणि सिवर लाईनचे पाईपची सफाई करण्यात अडचण येत असल्यामुळे वस्तीमध्ये पाणी जमा होत असते. 






यासंदर्भात पूर्ण समाधानाच्या दृष्टीने उपाय शोधण्याचे निर्देश आयुक्तांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले. परदेशीपुरा आणि मोठा पुरा भागात रेल्वे लाईनच्या लगत नाला वाहत असून नाल्या अत्यंत अरुंद  आहे. त्यामुळे नाल्याच्या सफाई मध्ये देखील अडचण निर्माण होते. नाल्याची रुंदी वाढविण्यासंदर्भात बाबी तपासून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. चौधरी यांनी नागरिकांना सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 63 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (02) रोजी शोध पथकाने 63 प्रकरणांची नोंद करून 40500 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक            ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली 
करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 24 प्रकरणांची नोंद करून 9600 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 100 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल,  उपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 10600 रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 6000 रुपयांची वसुली करण्यात आली. 






उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून 1800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून 4000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका, कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आले. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने हनुमान नगर झोन अंतर्गत युरो किड्स प्रि-प्राइमरी स्कुल यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत उमेश देशपांडे यांच्या विरुध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. ईश्वर डेव्हलपर्स यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपूरा झोन अंतर्गत संजय गुजरकर यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. आशीनगर झोन अंतर्गत मे. स्टडी सर्कल यांच्यावर अनधिकृत वाहन पार्किंग लावण्या प्रकरणी रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 30,000/- दंड वसूल केला.
 

Tuesday, July 30, 2024

सूफी संतों ने मानव कल्याण की तालीम दी बाबा ताजुद्दीन के सालाना उर्स पर मौलाना हाश्मी मियां ने दिया संदेश

नागपुर:- हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट के तत्वावधान में ताजबाग में बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह के १०२वें सालाना उर्स के अवसर पर विश्व प्रसिद्ध इस्लामी धर्मगुरु मौलाना सैयद हाश्मी मियां की तक़रीर का आयोजन किया गया। इससे पूर्व दरगाह में मिलाद शरीफ हुआ। तक़रीर कार्यक्रम में प्रमुख रूप से मदरसा जामिया अरबिया इस्लामिया के मुफ़्ती अब्दुल कदीर खान, मौलाना समदानी मियां, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट के चेकरमैन प्यारे खान, उपाध्यक्ष डॉ सुरेंद्र जिचकार, सचिव ताज अहमद राजा, ट्रस्टी हाजी 
फरूखभाई बावला, गजेंद्रपाल सिंह लोहिया, इमरान खान ताज़ी, मुस्तफाभाई टोपीवाला आदि उपस्थित थे। मंच संचालन गयासुद्दीन अशरफी ने किया। कार्यक्रम में संबोधित करते हुए धर्मगुरु मौलाना सैयद हाश्मी मियां ने कहा की हिन्दुस्तान एक ऐसा मुल्क है जो पूरी दुनिया की विशेषताओं को समेटे हुए है। यहां अलग अलग मौसम, वातावरण वाले इलाके है, इसी तरह यहाँ कई धर्मों और विचारों के लोग है, लेकिन सब बड़े प्यार से मिलकर रहते है, क्यूंकि यहीं इस देश की सबसे खूबसूरत संस्कृति है और यह तालीम हमें सूफी संतों से 
मिली है। सूफी संतों ने देश को सर्वधर्म समभाव की शिक्षा दी है। मानव कल्याण की तालीम दी है। मौलाना हाश्मी मियां ने कहा की बाबा ताजुद्दीन ने भी सभी को मानवता की तालीम दी।  आज उनके दरगाह पर पूरी दुनिया से लोग आते है। इनमे हिन्दू-मुस्लिम सभी शामिल होते है। हम सब को सूफी संतों द्वारा गताये गए मार्ग पर चलकर प्रेम से मिलकर रहना चाहिए, इससे देश की उन्नति होगी।

प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करायला हवा- डॉ. दीपक सेलोकर यांचे आवाहन

नागपूर:तुम्ही दिलेला अवयव एका व्यक्तीचे नाही तरअनेक व्यक्तींचे जीवन बदलू शकतो. त्यांच्या जीवनात आनंद आणू शकतोप्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करायला हवा आणि अवयवदानाची सुरुवात स्वतःपासून करायला हवीअसे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले.नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि विवेका हॉस्पिटलविवेका मेडिकल रिसर्च फाउंडेशन यांच्न्या संयुक्त विद्यमान सोमवारी (ता:२९)  मनपात अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारडॉ. विजय जोशीसाथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरेविवेका हॉस्पिटलचे डॉ. प्रणवकुमार झानागपूर स्मार्ट सिटी पर्यावरण विभागाच्या महा व्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकरमनपाचे नगर रचनाकार श्री. ऋतुराज जाधवझोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळेडॉ. ख्वाजा मोईनुद्दीनवाहतूक 
उप अभियंता श्री. राहुल देशमुख विवेका हॉस्पिटलचे श्री. वैभव ठाकरेश्री. प्रणव झोल्ले यांच्यासह शिक्षणविभाग अग्निशमन विभागाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमात सर्वप्रथम  विवेका हॉस्पिटलचे डॉ. प्रणवकुमार झा  यांनी संगकीयसादरीकरण करीत अवयवदानाविषयी माहिती दिली. डॉ. प्रणवकुमार झा यांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये अवयवदाना विषयी असणारे गैरसमज आणि चुकीच्या धरणांवर प्रकाश टाकतअवयवदाना संदर्भात अधिक जनजागृती व्हावी अशी मनीषा व्यक्त केली. तसेच कुणी अवयवदान करण्याचा संकल्प घेतला असेल तर त्यांनी ही बाब आपल्या कुटुंबातील सदस्यांना जरूर सांगावी असे आवाहनही डॉ. झा यांनी केले. यावेळी सर्वांनी अवयवदानाची शपथही घेतली.तर मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी प्रत्येक नागरिकाने अवयवदानाचा संकल्पकरून राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संघटनेच्या” (NOTTO)  अधिकृत संकेतस्थळावर जाऊन  अवयवदानाची प्रतिज्ञा घ्यावीअवयवदानाची सुरुवात स्वतःपासून करावीइतरांना देखील अवयवदानासाठी प्रेरित करावे असे आवाहन केले. अवयवदानाची प्रतिज्ञा घेत कार्यक्रमाची सांगता झाली. 

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...