Tuesday, July 30, 2024

प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करायला हवा- डॉ. दीपक सेलोकर यांचे आवाहन

नागपूर:तुम्ही दिलेला अवयव एका व्यक्तीचे नाही तरअनेक व्यक्तींचे जीवन बदलू शकतो. त्यांच्या जीवनात आनंद आणू शकतोप्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करायला हवा आणि अवयवदानाची सुरुवात स्वतःपासून करायला हवीअसे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले.नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि विवेका हॉस्पिटलविवेका मेडिकल रिसर्च फाउंडेशन यांच्न्या संयुक्त विद्यमान सोमवारी (ता:२९)  मनपात अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारडॉ. विजय जोशीसाथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरेविवेका हॉस्पिटलचे डॉ. प्रणवकुमार झानागपूर स्मार्ट सिटी पर्यावरण विभागाच्या महा व्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकरमनपाचे नगर रचनाकार श्री. ऋतुराज जाधवझोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळेडॉ. ख्वाजा मोईनुद्दीनवाहतूक 
उप अभियंता श्री. राहुल देशमुख विवेका हॉस्पिटलचे श्री. वैभव ठाकरेश्री. प्रणव झोल्ले यांच्यासह शिक्षणविभाग अग्निशमन विभागाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमात सर्वप्रथम  विवेका हॉस्पिटलचे डॉ. प्रणवकुमार झा  यांनी संगकीयसादरीकरण करीत अवयवदानाविषयी माहिती दिली. डॉ. प्रणवकुमार झा यांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये अवयवदाना विषयी असणारे गैरसमज आणि चुकीच्या धरणांवर प्रकाश टाकतअवयवदाना संदर्भात अधिक जनजागृती व्हावी अशी मनीषा व्यक्त केली. तसेच कुणी अवयवदान करण्याचा संकल्प घेतला असेल तर त्यांनी ही बाब आपल्या कुटुंबातील सदस्यांना जरूर सांगावी असे आवाहनही डॉ. झा यांनी केले. यावेळी सर्वांनी अवयवदानाची शपथही घेतली.तर मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी प्रत्येक नागरिकाने अवयवदानाचा संकल्पकरून राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संघटनेच्या” (NOTTO)  अधिकृत संकेतस्थळावर जाऊन  अवयवदानाची प्रतिज्ञा घ्यावीअवयवदानाची सुरुवात स्वतःपासून करावीइतरांना देखील अवयवदानासाठी प्रेरित करावे असे आवाहन केले. अवयवदानाची प्रतिज्ञा घेत कार्यक्रमाची सांगता झाली. 

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...