Friday, May 24, 2024

अंबाझरी तलाव आणि नाग नदीशी संबंधित आपत्ती निवारण कामाची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

 नागपूर:- नागपूर महानगरपालिकानागपूर सुधार प्रन्याससार्वजनिक बांधकाम विभागसिंचन विभाग आणि महा मेट्रो या विभागांद्वारे अंबाझरी तलाव आणि नाग नदीसंदर्भात सुरू असलेल्या विविध आपत्ती निवारण कामांची पाहणी आज शुक्रवार दि. २४ मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली.या वेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरीअतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलसिंचन विभागाचे मुख्य अभियंता श्री. पवारउपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव श्री. संदीप जोशीमाजी नगरसेविका श्रीमती वर्षा ठाकरे यांच्यासह आपत्ती निवारणाशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश्य स्थितीमुळे शहरातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यानंतर उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मनपासह नासुप्रसार्वजनिक बांधकाम विभागसिंचन विभाग आणि महा मेट्रो या विभागांची बैठक घेउन आपत्ती निवारण कामाची आखणी केली होती. त्यानुसार त्यांनी आज अंबाझरी तलावअंबाझरी ते क्रेझी केसल पूलनाग नदीचे क्रेझी केसलअंबाझरी दहन घाटनासुप्र स्केटिंग रिंकरामदासपेठ पूल येथील पात्राचे आपत्ती निवारणाच्या दृष्टीने रुंदीकरण व खोलीकरण कामाची पाहणी केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना श्री. फडणवीस म्हणालेसप्टेंबर महिन्यातील पुरानंतर विविध 
विभागांनी समन्वयाने काम केले. पुराची कारणेअडथळे यावर विचार करून कामे सुरू करण्यात आली आहेत. आपत्ती निवारणाच्या दृष्टीने अंबाझरी तलाव आणि नाग नदीशी संबंधित दीर्घकालीन आणि तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यात येत आहेत. तात्पुरत्या उपाययोजनांमध्ये या पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण होउ नयेनिवासी भागांमध्ये पाणी जाउ नये यादृष्टीने कार्य केले जात आहे. दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये तलावातील पाण्याची पातळी वाढू नये याकरिता तलावाच्या सांडव्यावरील भितींवर सिंचन विभागाद्वारे तीन दार लावले जाणार आहेत. अंबाझरी तलाव ते क्रेझी केसल यादरम्यानच्या पूलाचे काम सुरू असून एका बाजूचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. नासुप्र स्केटिंग रिंकवरील बांधकाम तोडून पात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरण देखील करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पाण्याला अडथळा निर्माण होतो तो देखील दूर करण्यात येत आहे. अंबाझरी दहन घाट परिसरातून नदीच्या पात्राची रुंदी वाढविण्यात येत आहे. एकूणच पावसाळ्यात नागरिकांना त्रास होउ नये यासाठी आवश्यक त्या सर्व आपत्ती निवारण उपाययोजनांवर काम सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मा. उपमुख्यमंत्री यांच्या पाहणी दौ-यामध्ये आपत्ती निवारणाशी संबंधित विभागांचे अधिकारी मनपाचे अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारडॉ. श्वेता बॅनर्जीकार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकरकार्यकारी अभियंता श्री. विजय गुरूबक्षाणीसिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चोपडेकार्यकारी अभियंता प्रांजली ठोंबसे आदी उपस्थित होते.

Thursday, May 16, 2024

अभिप्राय नोंदविण्यासाठी मनपाच्या २६ उद्यानात QR कोड आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली नव्या “क्यू आर कोड” प्रणालीची पाहणी

 नागपूर:- शहरातील उद्यानांची माहिती मिळावी व उद्यानासंदर्भात तक्रार थेट मनपाच्या उद्यान विभागाकडे पोहोचविता यावीया उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. नागपूर महानगरपालिका तर्फे शहरातील २६ मोठ्या उद्यानात क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीमलावण्यात आले आहे. मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (१६) रोजी पूर्व नागपुरातील भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे याची पाहणी केली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल सुद्धा उपस्थित होत्या. आता नागपूरकर उद्यानात बसून त्याच उद्यानाची माहिती आणि उद्यान विकास संदर्भात आपला अभिप्राय एक एक क्यू आर कोड स्कॅन करून थेट महानगरपालिकेच्या उद्यान विभागात नोंदवू शकतात. मनपा आयुक्त डॉ चौधरी यांचा मार्गदर्शनात उद्यान विभागातर्फे शहरातील मेजर सुरेंद्र देव पार्क (धंतोली)सुर्वेनगर उद्यानराजीव गांधी उद्यानत्रिमूर्तीनगरसावरकर नगरज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार ट्रॅफिकपार्क उद्यानशिवाजीनगर उद्यानदगडी पार्कजागृत कॉलोनी खेळाचे मैदानके टी नगर 
नक्षत्र नगर उद्यानमहात्मा गांधी उद्यान हनुमान नगरबालभवन उद्यानगांधीसागर तलावसुभाष रोड,महात्मा फुले उद्यानसुयोग्य नगरत्रिशताब्दी उद्यानजुना नंदनवनसंत ज्ञानेश्वर संजीवन समाधी उद्यानदत्तात्रयनगरसंत तुकाराम उद्यान सक्करदरामहावीर उद्यान अजामशाह लेआऊटजुना बगडगंज उद्यानगांधीबाग उद्यानतुलसीनगर उद्यान
भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानलता मंगेशकर उद्यानसूर्यनगरस्वतंत्र स्वराज जयंती उद्यान देशपांडे लेआऊटडॉ बाबासाहेब उद्यान वैशाली नगरॲड. सखारामपंत मेश्राम उद्यान (मंगळवारी) दयानंद पार्क जरीपटका येथे क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम” लावण्यात आली आहे.




आयुक्त श्री चौधरी यांनी नागरिकांना या सिस्टीमचा वापर करून आपले अभिप्राय नोंद करण्याचे आवाहन केले आहे.आयटी विभागाचे श्री. स्वप्निल लोखंडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना संपूर्ण प्रणालीचे कार्य प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. या अभिनव उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या २६ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रवेश द्वारउद्यानातील बसण्याचे ठिकाणमुलांचे क्रीडांगणबाहेर जाण्याचा मार्ग अशा जवळपास चार ते पाच दर्शनीय 
जागेवर क्यू आर कोड” लावण्यात येणार आहेत. हा कोड मोबाईलवर स्कॅनकरून नागरिक उद्यानाची माहितीत्यासंदर्भाती तक्रारीविकासासाठीचे अभिप्राय थेट मनपाच्या उद्यान विभागआयटी विभागउद्यानातील संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यंत पोहोचवू शकतो. 


मनपा आयुक्तांनी भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मनपा तर्फे
फार वर्षापूर्वी बांधण्यात आलेली वास्तूचे सुद्धा निरीक्षण केले. सध्याच्या या वस्तूचा उपयोग होत नाही. या वास्तूच्या दुरुस्ती आणि रंग रंगोटी करून त्याला नवीनरूप देण्याचा निर्देश आयुक्तांनी दिले. त्यांनी उद्यानाचे मेन्टेनन्स बद्दल प्रशंसा केली आणि नागरिकांसाठी कचरा पेटी लावणे
फार वर्षापूर्वी बांधण्यात आलेली वास्तूचे सुद्धा निरीक्षण केले. सध्याच्या या वस्तूचा उपयोग होत नाही. या वास्तूच्या दुरुस्ती आणि रंग रंगोटी करून त्याला नवीनरूप देण्याचा निर्देश आयुक्तांनी दिले. त्यांनी उद्यानाचे मेन्टेनन्स बद्दल प्रशंसा केली आणि नागरिकांसाठी कचरा पेटी लावणेखेळण्याचे उपकरणची दुरुस्ती करणे इत्यादी निर्देश दिले. या प्रसंगी उपायुक्त डॉ रंजना लाडेआई टी विभागाचे संचालक श्री महेश धामेचासहायक आयुक्त श्री गणेश राठोडउद्यान अधीक्षक श्री अमोल चोरपगारकार्यकारी अभियंता श्री संजय माटेआणि माजी नगरसेवक श्री बाल्या बोरकर उपस्थित होते.मनापाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी क्यू आर कोड बेस गार्डन फीडबॅक अँड कंप्लेंट रीड्रेसल सिस्टीम ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर मनपा क्षेत्रातील २६ उद्यानात लावण्यात आली आहे. याद्वारे नागरिक मोबाईलवर क्यू आर कोड स्कॅन करून उद्यानाचे परिसरउद्यानात असणारे विविध वृक्षफूल
द्यानात दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधाप्रसाधनगृह आदी विषयी माहिती मिळवू शकताततसेच उद्यानासंदर्भातील तक्रार देखील करू शकतात.  नागरिकांनी केलेली तक्रार एसएमएसद्वारे तक्रारकर्ताउद्यान विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांच्या पर्यत पोहोचेल व समस्याचे निराकरण त्वरित करता येईल.

उष्माघात संदर्भातील दीर्घकालीन उपाययोजना बाबत कार्यवाहीवर भर द्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांचे निर्देश

नागपूर:- उष्माघात प्रतिबंधासंदर्भात तात्पुरत्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन उपाययोजनांची देखील आवश्यकता आहे. वाढत्या तापमानाच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासंदर्भात कार्यवाहीवर भर द्याअसे निर्देश अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी दिले.मनपा मुख्यालयात गुरूवारी (ता.१६) अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारी समितीची बैठक पार पडली. आयुक्त सभाकक्षामध्ये झालेल्या बैठकीत मनपा उपायुक्त श्री. मिलींद मेश्रामउपायुक्त (समाज कल्याण) डॉ. रंजना लाडेसहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) श्री. जयेश भांडारकरसहायक पोलिस आयुक्त विशेष शाखा श्री. नितीन जगतापअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारडॉ. विजय जोशीसाथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरेशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहायक प्राध्यापक डॉ. प्रगती भोळेशासकीय आयुर्वेदिक रुग्णालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. आशिष राणाउद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगारसहायक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासेसहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडेनरेंद्र बावनकरघनश्याम पंधरेगणेश राठोडहरीश राउतव्हीएनआयटीच्या प्रा. राजश्री कोठाळकरअग्निशमन विभागाचे श्री. तुषार बाराहातेडागा रुग्णालयाचे डॉ. प्रवीण नवखरेईएसआयएस हॉस्पिटलचे डॉ. एच.डी. कांबळे आदी उपस्थित होते. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात उष्माघात प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु आहे.बैठकीत साथरोग 
अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली. १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये नागपूर शहरात १६ दिवस तापमान ४० अंश किंवा त्यापेक्षा जास्त राहिले. नागपूर महानगरपालिकेद्वारे उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला. शहरातील मेडिकलमेयो तसेच मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयआयसोलेशल हॉस्पिटल आणि पाचपावली रुग्णालयासह ईएसआयएस रुणालयआयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये कोल्ड वार्ड तयार करण्यात आले. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला. याशिवाय शहरातील सिग्नलवर ग्रीन नेट लावण्यात आल्या. समाजविकास विभागाद्वारे बेघर व्यक्तींची निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली. मनपाचे १६३ उद्याने दुपारच्या वेळेत सुरू ठेवण्यात आलीत. ३५०च्या वर ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली. वाहतूक पोलिस विभागाद्वारे दुपारच्या वेळी सिग्नल बंद ठेवण्यात आले. १०८ क्रमांकाच्या  ११ आणि मनपाच्या ७ रुग्णवाहिका २४ तास तत्पर ठेवण्यात आलेल्या आहेत.  आदी सर्व माहिती डॉ. नवखरे यांनी सादर केली.वाढत्या उन्हापासून मनपाद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजना या तात्पुरत्या स्वरूपात प्रभावीपणे कार्य करीत आहेत. मनपाच्या या उपाययोजनांमुळे अनेक नागरिकांना दिलासा देखील मिळतो आहे. मात्र झपाट्याने होत असलेले वातावरणातील बदल आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम लक्षात घेता उष्माघाताच्या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याचे मत यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी व्यक्त केले. यासाठी आराखडा तयार करण्याबाबत कार्यवाही करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. तेलंगणाच्या धर्तीवर नागपूरमध्येही ‘कूल रूफचे धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही श्रीमती गोयल म्हणाल्या. व्हीएनआयटीच्या प्रा. राजश्री कोठाळकर यांनी दीर्घकालीन उपाययोजनांबाबत अनेक सूचना मांडल्या.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 84 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेगुरुवारी (ता16रोजी उपद्रव शोध पथकाने 84 प्रकरणांची नोंद करून 35 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु४००/- दंडया  अंतर्गत  28 प्रकरणांची नोंद करून 11 हजार 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात  आलाव्यक्तीने  रस्ता फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांचा दंड वसुल  करण्यात  
आलादुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 10  प्रकरणांची नोंद  करून हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मॉलउपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग,सिनेमाहॉलमंगल  कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आलावाहतुकीचा रस्ता मंडपकमान स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव  

(व्यक्तीअसल्यास 32  प्रकरणांची  नोंद करून 6 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 03 प्रकरणांची नोंद करून 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलासार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत प्रकरणाची नोंद करुन 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. मनपाच्या  उपद्रव  शोध पथकाद्वारे गुरुवारी (ता16रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या धरमपेठ झोन अंतर्गत मेन्स क्लोथ मेन रोड सिताबर्डी, धंतोली झोन अंतर्गत सतीश ट्रेडिंग कंपनी कॉटन मार्केट व गांधीबाग झोन अंतर्गत राधीका स्वीट्स भाजीमंडी ईतावरी या तीन प्रतिष्ठानांकडुन एकुण  15 हजार  रुपयाचा दंड वसूल केला.  याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत एलायंस अकेडमी ऑफ साईंस वर्मा लेआऊट अंबाझरी व आशीनगर झोन अंतर्गत सनफ्लॉवर  परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास या दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10  हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 05 प्रकरणाची नोंद करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला
 

Tuesday, May 14, 2024

नदी, नाले सफाई, पूरबाधित रस्त्यांची कामे १५ जूनपूर्वी पूर्ण करा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांचे निर्देश

नागपूर:- शहरातील प्रमुख तिनही नद्या आणि नाले सफाई सोबतच पूरामुळे बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे येत्या १५ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.शहरात सुरू असलेल्या विविध कार्यांचा झोननिहाय आढावा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज मंगळवारी (ता.१४) घेतला. मनपा मुख्यालयातील सभाकक्षात आयोजित आढावा बैठकीत मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाडअधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारउपायुक्त डॉ. गजेंद्र महल्लेश्री. मिलींद मेश्रामश्री. प्रकाश वराडे उपस्थित होते. ‍बैठकीमध्ये मनपा आयुक्तांनी नदी आणि नाले सफाईपुरामुळे बाधित रस्त्यांची कामे आणि अतिक्रमण कारवाई संदर्भात आढावा घेतला. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक भागातील रस्ते खराब झाली. हे रस्ते दुरूस्त करण्यासंदर्भात झोनकडे आलेल्या प्रस्तावानुसार काम सुरू आहेत. पुरामुळे बाधित रस्त्यांच्या कामांच्या संदर्भात 
काही कार्यादेश बाकी असल्यास ते तातडीने निर्गमित करून कामाला गती देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले. याशिवाय त्यांनी झोननिहाय अतिक्रमण कारवाईचा देखील आढावा घेतला.नदी आणि नाले सफाईबाबत कार्य प्रगतीपथावर आहे. शहरातील नाग नदीपिवळी नदी आणि पोहरा या तिनही नद्यांच्या एकूण 51 टक्के पात्राची सफाई पूर्ण झालेली आहे. तिनही नद्यांची आतापर्यंत झालेल्या सफाईमधून ८१८४६ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. नदी स्वच्छतेच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी सफाई कार्याकरिता अतिरिक्त मशीन अथवा मनुष्यबळाची गरज असल्यास तशी मागणी करण्याबाबत सूचना यावेळी आयुक्तांनी सर्व झोनला केली. घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे शहरातील नाल्यांच्या सफाईबाबत माहिती देण्यात आली. नागपूर शहरात एकूण २२७ नाले असून यापैकी १५३ नाल्यांची सफाई मनुष्यबळाद्वारे तर ७४ नाल्यांची सफाई मशीनद्वारे केली जाते. आतापर्यंत एकूण १६४ नाल्यांची सफाई पूर्ण झालेली असून उर्वरित नाल्यांची सफाई लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. विहीत वेळेत कार्य पूर्ण होण्याच्या दृष्टीने नाले सफाईच्या कार्यामध्येही मनुष्यबळ अथवा मशीनची गरज असल्यास तशी मागणी करण्याची सूचना करून संबंधित विभागाद्वारे ते पुरविण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.या वेळी सहायक आयुक्त सर्वश्री हरीश राउतगणेश राठोडघनश्याम पंधरेनरेंद्र बावनकरप्रमोद वानखेडेअशोक घारोटेकार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडेविजय गुरूबक्षाणीसुनील उईकेअनील गेडाममनोज सिंगसचिन रक्षमवारअजय पाझारेउज्ज्वल लांजेवार, सतीश गुरनुले आदी उपस्थित होते.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...