Monday, June 16, 2025

एनएमआरडीएने शहरालगतच्या नदी/नाल्यांची ३० जूनपूर्वी सफाई करावी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश,पावसाळापूर्वी कामांचा महानगरपालिकेत घेतला आढावा

 नागपूर:-मनपाद्वारे शहरातील नागनदीपिवळी नदी व पोहरा नदीच्या सफाईचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.परंतु शहरालगतच्या एनएमआरडीए क्षेत्रात या नदी/ नाल्याची साफसफाई हवी तशी झालेली नाही. ही कामे नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) येत्या ३० जूनपूर्वी पूर्ण करावी,असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी(ता.१६) दिले.नागपूर शहरातील पावसाळापूर्व कामांचा आढावा पालकमंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा मुख्यालयात घेतला. यावेळी आमदार डॉ. नितीन राऊतआमदार कृष्णा खोपडेआमदार विकास ठाकरेमनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत  चौधरीअतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंतअतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बीअतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकरमुख्य अभियंता मनोज तालेवार, राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. जनार्दन भानुसे, उपायुक्त श्री. गणेश राठोड, श्री. राजेश भगत यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.बैठकीत सर्वप्रथम मनपाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पावसाळापूर्व नाले व नदी सफाईच्या झालेल्या कामांची माहिती दिली. यात शहरातील नाग नदीपिवळी नदी व पोहरा नदीच्या सफाईचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी नालेसफाई नंतरचे छायाचित्रांसह माहिती देण्यात आली. परंतु, नागपूर शहरालगतच्या एनएमआरडीए क्षेत्रात नाग नदी व पोहरा नदीचे पात्र आहे. शहरालगतच्या या नद्यांच्या सफाईचे कामे एनएमआरडीएने तातडीने करण्याची  गरज असल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात एनएमआरडीएला सूचना देऊन ही कामे येत्या ३० जूनपूर्वी पूर्ण करण्यात यावीअसे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार डॉ.  नितीन राऊतआमदार कृष्णा खोपडे व आमदार विकास ठाकरे यांनी नद्यांच्या काठांवर अद्यापही गाळ साचलेला असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर पालकमंत्र्यांनी या सूचनेची दखल घेऊन तात्काळ हा मलबा उचलण्याच्या सूचना दिल्या. पावसाळापूर्व कामे करताना लोकप्रतिनिधींना माहिती द्यावी तसेच त्यांच्या सूचनांवर अंमलबजावणी करण्यासाठी सहायक आयुक्त व कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यानी आमदारांसोबत झोननिहाय बैठक घेण्याचे नियोजन येत्या १० दिवसात करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी आयुक्तांना यावेळी दिले.# रस्त्यांचे डांबरीकरण  करावे:-नागपूर शहरातील प्रमुख रस्त्यांचे रिकार्पेटिंग करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेने नासुप्रच्या अखत्यारितील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे सुद्धा करावी, याकरिता शासनाकडून मनपाला निधी उपलब्ध करून देता येईल, याकरिता आवश्यक डीपीआर तयार करावा असे निर्देश दिले. शहराची पालक संस्था म्हणून शहरातील संपूर्ण रस्त्यांचे रिकार्पेटिंग करण्याची सूचना पालकमंत्री यांनी दिली.# लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वय राखावा- बावनकुळे:-पावसाळापूर्व कामे व्यवस्थित करून यावर्षी पावसाळ्यात लोकांना त्रास होणार नाहीयाचीकाळजी घेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. यासाठी अधिकारीलोकप्रतिनिधींनी समन्वय राखून कामे केल्यास नागरिकांना या पावसाळ्यात अतिवृष्टीचा त्रास  होणार नाहीअसेही पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.# मानेवाडा-बेसा रस्त्यांची काम पूर्ण करा:-राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे शहरातील मानेवाडा- बेसा रस्त्यांच्या कामाचे सुरू असून हे काम पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.  

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...