Monday, July 28, 2025

मलेरियाची लक्षणे असलेल्या ठिकाणी आरआरचमू करणार तपासणी,मनपा आयुक्तांनी घेतला कीटकजन्य आजारांच्या सद्यस्थितीचा आढावा

 
नागपूर-पावसळ्यात अनेक कीटकजन्य आजार डोकेवर काढतात, अशात ज्या परिसरात मलेरियाची लक्षणे आढळली आहेत. अशा ठिकाणी रॅपिड रिस्पॉन्स टीम अर्थात आरआरचमू पाठवून जास्तीत जास्त ठिकाणी तपासणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी मलेरिया, फायलेरिया, डेंग्यू,  चिकनगुनिया सारख्या कीटकजन्य आजारांबाबतच्या सद्यस्थितीचा आणि उपाय योजनाबाबतचा आढावा घेतला. बैठकीत मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंतवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजूषा मठपती,  मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते.बैठकीत मनपाच्या हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजूषा मठपती यांनी मलेरियाफायलेरियाडेंग्यूचिकनगुनिया बाबतची सद्यस्थिती आणि उपाययोजनाबाबत तसेच ब्रिडींग चेकर्सच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यास येत असल्याची माहिती दिली.यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सध्याच्या स्थितीत हिवतापहत्तीरोगडेंग्यूचिकनगुनिया बाबत झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक जास्त गांभीर्याने स्थितीकडे लक्ष द्यावेसतत पाहणी 
करावी. ज्या ठिकाणी या रोगाचे जास्त लक्षणे आढळले आहेतत्या ठिकाणी तपासणी अधिक वाढविण्यात यावी. सर्वेक्षण करणाऱ्या ब्रीडींग चेकर्सची जबाबदारी ठरविण्यात यावीशिवाय कोणत्या भागात ब्रिडींग चेकर्स नेमके काय करणार आहेत याची निश्चित करण्यात यावीत्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. नागरिकांसहमाजी नगरसेवकांच्या भेटी घ्याव्या. त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात यावी. वस्तीगृहआश्रमशाळा ठिकाणी नियमित तपासणी करावी त्या ठिकाणाचा भेटीचा अहवाल नियमित सादर करण्यात यावे असे निर्देश मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले.अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी अधिक धोका असलेल्या ठिकाणांवर अधिक निगराणी व तसेच पाहणी करावे. या रोगाच्या पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्यास मनपा मुख्यालयाला कळविण्यात यावे असे निर्देश दिले. याशिवाय गेल्या वर्षीची स्थिती जाणून घेतली. नागरीकांमध्ये साथीचे आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी जनजागृती करण्यात यावे. अशा  सूचना  श्रीमती वसुमना पंत यांनी दिल्या.  तसचे सर्व खाजगी वैद्यक व्यवसायीय व खाजगी प्रयोगशाळा यांनी डेंग्यूचिकनगुनिया संशयित रुग्णांची माहिती रुग्णांचे रक्तजल नमुने मलेरीयाहत्तीरोग मुख्य कार्यालय चौकोनी मैदान हनुमाननगर येथे कार्यालयीन वेळेत पाठविण्यात यावे असे आवाहनही श्रीमती वसुमना पंत यांनी केले.यावेळी झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडेडॉ. सुनील कांबळेडॉ.ख्वाजा मोईनुद्दीनडॉ. गजानन पवानेडॉ. विजय तिवारीडॉ. अतिक खानडॉ. सुलभा शेंडेडॉ. जयश्री चन्ने,  डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. शीतल वांदिले  आदी उपस्थित होते.
 

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...