Monday, July 28, 2025

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर- शहरातील अंबाझरीफुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात  घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या तिन्ही ठिकाणी सुरक्षेचे कठडे लावले आहेत. तसेच नागरिकांसाठी सावधानतेच्या सूचना फलक लावण्यात आले आहेत.गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात सातत्याने पाऊस सुरू असल्याने शहरतील या तिन्ही तलावातील पाण्याची पातळी वाढली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अग्निशमन विभागाने या तिन्ही ठिकाणी सुरक्षा 
कठडे लावले आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.तुषार बाराहाते यांच्या मार्गदर्शनात तलावांवर आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या तलावांवर जाणाऱ्या तसेच निसर्गाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांनी सावधानतेच्या सूचनांचे पालन करावे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी या स्थळांवर जातांना सुरक्षेला प्राधान्य द्यावे, तसेच अतिधाडसाचे स्टंट करू नये. अग्निशमन दलाच्या जवानांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावेअसे आवाहन नागपूर महानगरपालिकाद्वारा करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...