Wednesday, July 10, 2024

उपमुख्यमंत्री कार्यालयात प्राप्त तक्रारींवर आयुक्तांशी चर्चा तक्रारींचे वेळेत निराकरण करून अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नागपूर:महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात प्राप्त विविध तक्रारींवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्याशी उपमुख्यमंत्री  यांचे मानद  सचिव, माजी  महापौर श्री.  संदीप  जोशी  यांनी चर्चा केली. बुधवारी १० जुलै रोजी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात  आयोजित  बैठकीत  अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, श्री. अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक श्री. गणेश राठोड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, सहायक आयुक्त श्री. अशोक घारोटे, प्रमोद वानखेडे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, विजय गुरूबक्षाणी, कमलेश चव्हाण, राजेंद्र राठोड, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती सुकेशनी तेलगोटे आदी उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयात प्राप्त तक्रारींची माहिती आयुक्तांपुढे ठेवली. मनपा आयुक्तांनी तक्रारकर्ते आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत  संवाद  साधून 
आवश्यक ते निर्देश दिले. दीनदयालनगर फ्रेन्डस सोसायटी लेआउट येथील ३०  वर्षापासूनचा  वाहतुकीचा  रस्ता  अनधिकृतरित्या बंद केल्याबाबत तसेच सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या जोडण्या तोडल्याबाबतच्या तक्रारीवर आयुक्तांनी सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या तुटलेल्या जोडण्या तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. रहाटे नगर टोली रामटेकेनगर येथील रमाई घरकुल योजनेचा आयुक्तांनी आढावा घेतला. सदर वस्तीकरीता ५ जुलै रोजी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विशेष शासन निर्णय निर्गमित केल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी यावेळी दिली. सदर वस्तीमधील रमाई घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मनपा  आयुक्तांनी नंदनवन सेवा समितीद्वारे  यावेळी  परिसरातील  अनेक  समस्यामांडण्यात आल्या. नंदनवन कॉलनी उद्यानाच्या बाजुला ऐतिहासीक भोसलेकालीन बाहुली 
विहीर आहे. या ठिकाणी सभोवताल सौंदर्यीकरण करण्याची मागणी करण्यात आली. या ठिकाणी 

वरिष्ठ अधिका-यांनी भेट देउन  पाहणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. नंदनवन कॉलनी गार्डन मधील ग्रीन जीमचे व्यवस्थापन तसेच लहान मुलांची तुटलेली खेळणी याबाबत आवश्यक ती खेळणी तातडीने दुरूस्त करणे व अन्य बदलवून घेण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जगनाडे चौक ते केडीके कॉलेज रोड ते संत गोरा कुंभार चौकापर्यंत तसेच राजेंद्रनगर चौक मार्गावर अपघाताच्या घडणा-या घटनांबाबत वाहतूक विभागाद्वारे  तांत्रिक बाबींची  पाहणी करून अहवाल सादर  करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.  नंदनवन कॉलनी डॉ. दलाल  दवाखान्यामागची  लाईन येथे वेस्ट वाटर लाईन तुटलेली आहे. त्याची स्वच्छता आणि दुरूस्ती करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. केडीके कॉलेज रोड राजेंद्रनगर येथील (निलम पान पॅलेस समोरील) ते कुंभारटोली येथील रस्ता खराब झालेला असून येथे डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संबंधित झोनद्वारे तातडीने रस्ता दुरूस्त करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले. राजेंद्रनगर चौक ते हसनबाग सिमेंट रोड विषयी देखील कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.


नाईक लेआउट, सुभाषनगर येथील सिवर लाईनच्या समस्येबाबत नागरिकांशी आयुक्तांनी संवाद साधला. नागरिेकांना वारंवार होत असलेला त्रास लक्षात घेता समस्येचे पूर्णपणे निराकरण करण्यासंदर्भात तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रजत हिल सोसायटी, काचीमेट, अमरावती रोड येथे मीनी  एसटीपी  बसवून ते कार्यान्वित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. माटे चौक (बोधीसत्व चौक) येथील डोमिनोज पिज्झा समोरील रोड डिव्हायडर हटवून सदर चौक वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने सुधारणा करण्याची
 मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली. या ठिकाणी भेट देउन तांत्रिक अडचणी जाणून घेण्याचे निर्देश मनपा आयुक्त यांनी दिले. गड्डीगोदाम येथील विविध समस्यांबाबत स्थानिक नागरिकांशी आयुक्तांनी संवाद साधला. येथील सार्वजनिक प्रसाधनगृहाबाबत झोनच्या अधिका-यांनी भेट देण्याचे त्यांनी निर्देश दिले.संत गजानन गृहनिर्माण सहकारी संस्थेला रस्ता  उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. यावर आयुक्तांनी संस्थे लगतच्या मनपाच्या मोकळ्या जागेवर फलक लावणे आणि रस्त्याचे खडीकरण करण्याचे निर्देश दिले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 95 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवारी (ता. 10) रोजी उपद्रव शोध पथकाने 95 प्रकरणांची नोंद करून 56 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 24  प्रकरणांची नोंद करून 9 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता,फुटपाथ, मोकळी  जागा  अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.  दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 09 प्रकरणांची नोंद  करून  
3 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.मॉल, उपहारगृह, लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी  रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 19 प्रकरणांची नोंद करून 22 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 27 प्रकरणांची नोंद करून 5 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.हनुमाननगर झोन अंतर्गत अष्टविनायक बिल्डर एकमत नगर मानेवाडा आणि मंगळवारी झोन अंतर्गत खेमानी इन्फ्रा कस्तुरबा नगर जरिपटका रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत या दोन प्रतिष्ठानांकडुन एकुण 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण 02 प्रकरणांची नोंद करून 20 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

शालार्थ आईडी घोटाला:प्रधानाचार्य तो केवल नाममात्र के हस्ताक्षरकर्ता हैं; असली साजिशकर्ता तो संस्था के निदेशक हैं? विदर्भ शिक्षक संघ का प्रश्न

[Demo Pick]  नागपुर: - विदर्भ शिक्षक संघ ने इस बात पर कड़ी नाराजगी जताई है कि राज्य में चल रहे शलार्थ आईडी घोटाले की जांच में केवल उन्हीं प्...