Wednesday, July 10, 2024

उपमुख्यमंत्री कार्यालयात प्राप्त तक्रारींवर आयुक्तांशी चर्चा तक्रारींचे वेळेत निराकरण करून अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नागपूर:महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात प्राप्त विविध तक्रारींवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्याशी उपमुख्यमंत्री  यांचे मानद  सचिव, माजी  महापौर श्री संदीप  जोशी  यांनी चर्चा केली. बुधवारी १० जुलै रोजी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात  आयोजित  बैठकीत  अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलश्रीअजय चारठाणकरमुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्येअधीक्षक अभियंता श्रीमनोज तालेवारडॉश्वेता बॅनर्जीउपायुक्त श्रीप्रकाश वराडेडॉरंजना लाडेपरिवहन व्यवस्थापक श्रीगणेश राठोडवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉदीपक सेलोकरउद्यान अधीक्षक श्रीअमोल चौरपगारसहायक आयुक्त श्रीअशोक घारोटेप्रमोद वानखेडेकार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडेविजय गुरूबक्षाणीकमलेश चव्हाणराजेंद्र राठोडसमाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती सुकेशनी तेलगोटे आदी उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव माजी महापौर श्रीसंदीप जोशी यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयात प्राप्त तक्रारींची माहिती आयुक्तांपुढे ठेवलीमनपा आयुक्तांनी तक्रारकर्ते आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत  संवाद  साधून 
आवश्यक ते निर्देश दिले. दीनदयालनगर फ्रेन्डस सोसायटी लेआउट येथील ३०  वर्षापासूनचा  वाहतुकीचा  रस्ता  अनधिकृतरित्या बंद केल्याबाबत तसेच सांडपाणी  पावसाच्या पाण्याच्या जोडण्या तोडल्याबाबतच्या तक्रारीवर आयुक्तांनी सांडपाणी  पावसाच्या पाण्याच्या तुटलेल्या जोडण्या तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिलेरहाटे नगर टोली रामटेकेनगर येथील रमाई घरकुल योजनेचा आयुक्तांनी आढावा घेतलासदर वस्तीकरीता  जुलै रोजी उपमुख्यमंत्री श्रीदेवेंद्र फडणवीस यांनी विशेष शासन निर्णय निर्गमित केल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव माजी महापौर श्रीसंदीप जोशी यांनी यावेळी दिलीसदर वस्तीमधील रमाई घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मनपा  आयुक्तांनी नंदनवन सेवा समितीद्वारे  यावेळी  परिसरातील  अनेक  समस्यामांडण्यात आल्यानंदनवन कॉलनी उद्यानाच्या बाजुला ऐतिहासीक भोसलेकालीन बाहुली 
विहीर आहेया ठिकाणी सभोवताल सौंदर्यीकरण करण्याची मागणी करण्यात आलीया ठिकाणी 

रिष्ठ अधिका-यांनी भेट देउन  पाहणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिलेनंदनवन कॉलनी गार्डन मधील ग्रीन जीमचे व्यवस्थापन तसेच लहान मुलांची तुटलेली खेळणी याबाबत आवश्यक ती खेळणी तातडीने दुरूस्त करणे  अन्य बदलवून घेण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी दिलेजगनाडे चौक ते केडीके कॉलेज रोड ते संत गोरा कुंभार चौकापर्यंत तसेच राजेंद्रनगर चौक मार्गावर अपघाताच्या घडणा-या घटनांबाबत वाहतूक विभागाद्वारे  तांत्रिक बाबींची  पाहणी करून अहवाल सादर  करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले नंदनवन कॉलनी डॉदलाल  दवाखान्यामागची  लाईन येथे वेस्ट वाटर लाईन तुटलेली आहेत्याची स्वच्छता आणि दुरूस्ती करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेकेडीके कॉलेज रोड राजेंद्रनगर येथील (निलम पान पॅलेस समोरीलते कुंभारटोली येथील रस्ता खराब झालेला असून येथे डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आलीसंबंधित झोनद्वारे तातडीने रस्ता दुरूस्त करण्याचे निर्देश आयुक्त डॉचौधरी यांनी दिलेराजेंद्रनगर चौक ते हसनबाग सिमेंट रोड विषयी देखील कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.


नाईक लेआउटसुभाषनगर येथील सिवर लाईनच्या समस्येबाबत नागरिकांशी आयुक्तांनी संवाद साधलानागरिेकांना वारंवार होत असलेला त्रास लक्षात घेता समस्येचे पूर्णपणे निराकरण करण्यासंदर्भात तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिलेरजत हिल सोसायटीकाचीमेटअमरावती रोड येथे मीनी  एसटीपी  बसवून ते कार्यान्वित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेमाटे चौक (बोधीसत्व चौकयेथील डोमिनोज पिज्झा समोरील रोड डिव्हायडर हटवून सदर चौक वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने सुधारणा करण्याची
 मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलीया ठिकाणी भेट देउन तांत्रिक अडचणी जाणून घेण्याचे निर्देश मनपा आयुक्त यांनी दिलेगड्डीगोदाम येथील विविध समस्यांबाबत स्थानिक नागरिकांशी आयुक्तांनी संवाद साधलायेथील सार्वजनिक प्रसाधनगृहाबाबत झोनच्या अधिका-यांनी भेट देण्याचे त्यांनी निर्देश दिले.संत गजानन गृहनिर्माण सहकारी संस्थेला रस्ता  उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होतीयावर आयुक्तांनी संस्थे लगतच्या मनपाच्या मोकळ्या जागेवर फलक लावणे आणि रस्त्याचे खडीकरण करण्याचे निर्देश दिले.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...