Wednesday, January 29, 2025

मनपाच्या ‘पुष्पोत्सव २०२५’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे शहरातील विविध उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुष्पोत्सव २०२५ ’ प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृवात उद्यान विभागाद्वारे शहरातील प्रमुख १५ उद्यानामध्ये 'पुष्पोत्सव २०२५'चे २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.शहरातील १५ उद्यानांमध्ये आलेल्या नागरिकांनी ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाला भेट देत निरनिराळ्या वनस्पतीची माहिती जाणून घेतली. नागरिकांनी मध्य भारतात आढळणाऱ्या देशी झाडांचे विविध उपयोग जाणून घेतले. रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी झाडेआर्टिफिशियल फुले आदीसह निरनिराळ्या प्रकारचे शोभिवंत फुलेआकर्षक 
पुष्परचनाआकर्षक रोषणाईची सुविधा महानगरपालिका उद्यानात उपलब्ध करुन दिल्याने मनमोहक ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाला बघून नागरिकांनी आनंद व्यक्त केला.१५ विविध उद्यानांमधील पुष्प प्रदर्शनातील आकर्षक व मोहक फुले पाहण्यात लहान-थोर मंडळी गढून गेल्याचे दिसून येत होते. मनमोहक फुलांची छबी आपल्या मोबाईलमध्ये लहानवृद्धयुवक युवती टिपताना दिसत होतेचत्यासोबत आकर्षक वेगवेगळ्या फुल्यांच्या सानिध्यात आणि सेल्फी पॉइंटवर सेल्फी घेण्याचा मोह सगळ्यांनाच अनावर होताना दिसत होते. सेल्फीसाठी पुष्प प्रदर्शनातील प्रत्येक ठिकाणी लाईन लागली होती . 



तर फुलांनी सजलेल्या लव आर्च वर नागरिकांनी छायाचित्र काढले.  राजीव गांधी उद्यानत्रिमूर्ती नगरमेजर  सुरेंद्र देव पार्क धंतोलीलता मंगेशकर उद्यानदेशपांडे लेआऊट येथील स्वातंत्र सुवर्ण जयंती उद्यानशंकर नगर उद्यानभारतमाता उद्यानत्रिशताब्दी उद्याननंदनवनमहात्मा फुले उद्यानसुयोग नगरमहात्मा गांधी उद्यान हनुमान नगरतुलसी नगर उद्यानशांतीनगरपाटणकर चौक उद्यानॲड. सखारामपंत मेश्राम उद्यानात पुष्पोत्सव प्रदर्शनामध्ये १०० हून अधिक सीजनल व पेरॅनियल फुलांचे प्रकार व विभिन्न प्रजातींची फुलेऔषधी वनस्पतीची झाडे विविध ठिकाणी प्रत्यक्ष पहायला मिळतं आहेत. नागरिकांनी 'पुष्पोत्सव २०२५’ ला भेट द्यावीअसे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.पुष्पोत्सव २५ जानेवारी पासून ते २ फेब्रुवारीपर्यंत सर्व




नागरीकांसाठी सकाळी ५.००ते १०.०० तर सायंकाळी ४ ते  रात्री ९ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. "पुष्पोत्सवाचे आयोजन करून नागपूर 
महानगरपालिकेतर्फेखूप छान असा पुढाकार घेण्यात आला आहे. जे कुठल्याही उद्यानात दिसत नाही. अशाप्रकारे उद्यानाचा विकास केला तर नागरिकांना त्याचा लाभ अधिक घेता येऊ शकतो."राहुल सावदे:- "नागपूर महानगरपालिकेतर्फे' 'पुष्पोत्सवाचे आयोजन केल्याने नागरिकांना लाभ मिळेल. तरी उद्यानामधील फुलांचे सातत्याने देखभाल करणे आवश्यक आहे."डॉ. माधुरी ठाकरे:- "पुष्पोत्सव खूप छान असे उपक्रम मनपातर्फे राबविण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक उद्यानात असे उपक्रम राबविले  तर मुलांना पर्यावरणाशी जोडता येईल आणि लहान मुलांना अशा पुष्पोत्सवामध्ये आणून त्यांना अधिक माहिती देता येईल. प्रत्येकाने एक तरी झाड लावावे हा संदेश देता येईल.’’मानसी बोदेले:- "लोकांना निसर्गाच्या सानिध्यात आणण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचा पुष्पोत्सव चांगला उपक्रम आहे. अशामुळे मनप्रसन्न होते. महापालिकेने योग्य लक्ष देण्याबरोबर नागरिकांनी उद्यान स्वच्छ ठेवण्यास मदत करायला हवे.
 

मेयो रुग्णायालयातील पुरातन वृक्षांचे जतन आणि संवर्धन करा : आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

नागपूर :- नागपूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो हॉस्पिटल) येथे प्रस्तावित अंतर्गत रस्त्याचे बांधकाम आणि क्रीडा मैदानाच्या विकासादरम्यान प्रस्तावित वृक्ष तोडण्याबाबत परवानगी प्रस्तावाच्या अनुषंगाने बुधवारी (ता. २९) पाहणी केली. यावेळी त्यांनी मेयो हॉस्पिटल  परिसरातील पुरातन वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याचे निर्देश दिले.याप्रसंगी मेयो हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, मनपा उपायुक्त (उद्यान) श्री. गणेश राठोड, वृक्ष संवर्धक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता श्रीसचिन रक्षमवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती 
वर्षा घुसे उपस्थित होते.मेयो हॉस्पिटल यांचेकडून सादर करण्यात आलेल्या वृक्ष तोडीच्या प्रस्तावामध्ये समाविष्ट झाडांची मनपा आयुक्तांनी पाहणी केली. रुग्णालय प्रशासनाकडून २ पुरातन आणि १०३ नॉन हेरिटेज झाडे तोडण्याचे प्रस्ताव नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे. पाहणीदरम्यान मनपा आयुक्तांनी उंबर, बकुळ वृक्षांचे पुनर्रोपण (ट्रान्सप्लांट) करण्याचे निर्देश दिले. तसेच अंतर्गत रस्ते आणि क्रीडा मैदानांमध्ये येणाऱ्या पुरातन वृक्षाचे संरक्षण आणि जतन करण्याबद्दलही निर्देशित केले.मेयो हॉस्पिटल येथे नर्सिंग महाविद्यालय, मुलींसाठी वसतिगृह, बहू मजली वाहनतळ, क्रीडा संकुल, अंतर्गत रस्ते आणि मैदानाचा विकास करण्याचे काम राज्य शासनाच्या निधीतून सुरु आहे. आयुक्तांनी वृक्ष तोडीचे नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 56 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (29) रोजी शोध पथकाने 56 प्रकरणांची नोंद करून 39,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 100 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. 
वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 16,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे या अंतर्गत्त 1 प्रकरणांची नोंद करून 5,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून 1,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. नीशीगंधा अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोन निखील मानेवार यांनी मनपा विरूध्द विनापरवानगी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. तसेच मे.विशेष हॉस्पीटल यांनी मेडीकल वेस्ट कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. 
गांधीबाग झोन अंतर्गत मे. चेतन किराणा शॉप यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. शेखर कपडा कारखाना यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. खेमानी इन्फ्रा यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.

Tuesday, January 28, 2025

सामान्यांना वेळेत न्याय देणारे विद्यार्थी घडावेत,डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारंभाचे उद्घाटन

नागपूर:-आपले महाविद्यालय मोठे होत असताना विधी प्रक्रियेमध्ये देखील परिवर्तन आले पाहिजे. त्यात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कसा होईल, याचा विचार झाला पाहिजे. यामध्ये वेळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामान्य माणसाचा जो न्याय अपेक्षित होता, त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सामान्यांना वेळेत न्याय देणारे विद्यार्थी या महाविद्यालयातून घडावेत, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) येथे व्यक्त केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारंभाचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविशंकर मोर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य समय बन्सोड व वामन तुरके, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.ना. श्री.गडकरी म्हणाले, ‘शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होत असताना गुणवत्ताही राखण्याचे मोठे आव्हान प्रत्येक शिक्षण संस्थेपुढे आहे. विधी
महाविद्यालयाची गुणवत्ता आपल्या न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे. या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी उपराष्ट्रपती मो. हिदायतुल्ला, न्यायाधीश मंडळींनी ही गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यादृष्टीने काम करणारी पिढी या महाविद्यालयातून तयार होईल याचा मला विश्वास आहे.लोकशाही मूल्यांमध्ये बाबासाहेबांनी जे संविधान दिले आहे, त्यातील मूलभूत तत्त्वे खूप महत्त्वाची आहेत. ही मूल्ये कधीच बदलू शकत नाहीत. संविधानाच्या आधारावरच आपली लोकशाही टिकलेली आहे. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. वेळेत न्याय मिळाला पाहिजे, असे मला कायम वाटत असते. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून कसे परिवर्तन करता येईल, याचा विचार करावा, असे आवाहनही ना. श्री. गडकरी यांनी केले.माजी विद्यार्थी म्हणून या सोहळ्यात सहभागी होताना आनंद आणि अभिमानही वाटतोय. अगदी आपल्या घरी आल्यासारखे वाटत आहे. या महाविद्यालयाला शंभर वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. मी या महाविद्यालयात होतो तेव्हा महाल आणि बर्डी अशा दोन शाखा होत्या. महाल शाखेतून मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आलो होतो. इथूनच माझ्या विद्यार्थी जीवनाला सुरुवात झाली. आमच्यावेळी दिनकरराव मेघे प्राचार्य होते. याठिकाणी जे विद्यार्थी शिकले आणि ज्यांनी महाविद्यालयाचे नाव मोठे केले, त्यांचे कर्तृत्व जगापुढे गेले,’ अशी भावना ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवीन इमारत बांधण्यासाठी सगळी मदत सरकारच्या वतीने करू. तीन वर्षांतच ही इमारत बांधून पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करा. निधीची कमतरता पडू देणार नाही. शताब्दी वर्षातच याचे भूमिपूजन करून काम सुरू झाले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. पण त्याचवेळी जुन्या इमारतीच्या दुरुस्तीची योजना तयार करा. जुनी वास्तू जतन झाली पाहिजे. कारण या वास्तूशी आमच्या भावना जुळल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठी भाषेच्या समृद्धीसाठी व्यापक दृष्टीकोनाची गरज : डॉ. शैलेंद्र लेंडे

नागपूर:-  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही गौरवाची बाब आहे. मात्र या आधारे आपली वाचन संस्कृती समृद्ध करुन भाषेचा विकास करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचा अभिजातपणा मिरवताना भाषेच्या समृद्धीसाठी व्यापक वैश्विक दृष्टीकोन ठेवून पुढे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले.नागपूर महानगरपालिकेद्वारे १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात आला. मंगळवारी २८ जानेवारी रोजी या कार्यक्रमाच्या समारोपनिमित्ताने मनपा मुख्यालयात डॉ. शैलेंद्र लेंडे यांचे अभिजात मराठी भाषाविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर होते. याप्रसंगी उपायुक्त डॉ. विजया बनकर, सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, श्री. नरेंद्र 
बावनकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, सहायक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, संजय दिघारे, नागरी सुविधा केंद्रचे श्री. कमलेश झंझाड, जनसंपर्क विभागाचे श्री. अमोल तपासे आदी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी शाल, पुष्पगुच्छ, मनपाचा मानाचा दुपट्टा आणि सन्मानचिन्ह देऊन डॉ. शैलेंद्र लेंडे यांचा सत्कार केला.अभिजात मराठी भाषाविषयावर बोलताना डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी मराठी भाषेला लाभलेली संत परंपरा, नाथ पंथ, दास पंथाची परंपरा यांचा उहापोह केला. त्यांनी भाषेला अभिजातपणा लाभल्यामुळे मराठी भाषेला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाल्याचे प्रतिपादन केले. मराठी भाषा ही महाराष्ट्रातील चवथ्या आणि जगात सातव्या क्रमांकाची भाषा आहे. भाषेमुळे संस्कृतीचे वहन आणि जतन होत असते मराठीच्या अभिजात दर्जामुळे ही परंपरा आता पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हावी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भाषांतरातून इंग्रजी भाषा समृद्ध झाली. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करताना इतर भाषा आणि संस्कृती स्वीकारुन त्यातून आपल्या भाषेला समृद्ध करण्याची गरज देखील डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी व्यक्त केली. मुंबई, पुणे, नागपूर या महानगरपालिका मराठी विचारांच्या आधारे आधुनिक 
झालेल्या आहेत. १९व्या शतकात झालेल्या आधुनिकीकरणामध्ये महानगरपालिकांची परंपरा मोठी राहिलेली आहे. यात भाषीक परंपरेचे योगदान उल्लेखनीय आहे, असेही त्यांनी सांगितले. अभिजातवाद, स्वच्छंदवाद आणि वास्तववाद या तीन घटकांच्या आधारे जीवन समृद्ध होत असते. स्थानिक भाषा, आपली बोलीभाषा रोजगाद देऊ शकत नाही, असा समज समाजात दृढ होत चालला आहे. यासाठी मराठी भाषेला तेवढे समृद्ध आणि विकसीत करुन मराठी ही पुढे रोजगाराची भाषा व्हावी, यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचेही डॉ. लेंडे म्हणाले. १९व्या शतकात अनुवादातून पहिल्यांदा इंग्रजी ज्ञान मराठीमध्ये आणले गेले. त्याआधारे आपले ज्ञानभांडार समृद्ध झाले. अनुवादातूनच आता पुढे भाषेला पुढे न्यावे लागेल त्यासाठी वैश्विक दृष्टीकोन जोपासण्याची आवश्यक आहे. मराठीला घर मानताना त्यातील खिडक्या, झरोके इतर भाषांचे असावेत हा दृष्टीकोन भाषेला समृद्ध करेल, असा विश्वासही डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी व्यक्त केला. अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी आपल्या भाषणात अभिजात मराठी भाषेची संकल्पना विषद केली. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले व त्यांनी शेवटी आभारही मानले.

शिक्षणोत्सव’मुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत : आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी

नागपूर:-  शाळा ही केवळ शैक्षणिक ज्ञान देण्यासाठी नसते तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करत असते. ‘शिक्षणोत्सव मुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते. शिक्षणोत्सव सारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत मिळतेअसे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दोन दिवसीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन मंगळवार व बुधवार (ता २८ व २९ जानेवारी ) रोजी अध्यापक भवननागपूर येथे करण्यात आले 
आहे. मंगळवारी (ता.२८) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.या प्रसंगी शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामसहायक शिक्षण अधिकारी श्री. संजय दिघोरेशाळा निरीक्षक श्रीमती अश्विनी फेद्देवार , श्रीमती सीमा खोब्रागडेश्री. जयवंत पिस्तुलेश्री विजय वालदेशिक्षक संघाचे सचिव श्री. देवराव मांडवकरशाळा निरीक्षक श्री प्रशांत टेंभुर्णेमनपा शाळेतील सर्व शिक्षक गण उपस्थित होते. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात मनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी समूह गायनपथनाट्यनाटक अशा विविध  स्पर्धांमध्ये भाग घेत उत्साहाने सादरीकरण केले. शिक्षणोत्सव हा नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 
तसेच त्यांच्या बौद्धिकशारीरिकआणि सांस्कृतिक विकासासाठी आयोजित केला आहे. सांस्कृतिक स्पर्धेमध्ये मनपाच्या ११४ शाळांमधील ९०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. समूहगीतकव्वालीपथनाट्यलोकनृत्य आणि एककला प्रदर्शन अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपले उपजत कलागुण सादर करत उत्तम प्रदर्शन केले.उद्घाटन प्रसंगी मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मनपा शाळांद्वारे सतत प्रयत्न सुरु आहेत. यासाठी महानगरपालिका शाळांमध्ये क्रीडा व संगीत शिक्षकांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहेअसेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना ते म्हणालेस्पर्धेमध्ये जय-पराजय महत्त्वाचा नाहीतर विद्यार्थ्यांनी आपले १०० टक्के योगदान देणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळतो. तसेच त्यांनी शिक्षण विभागाच्या उपक्रमांचे नियमितपणे आयोजन करण्यावर भर देत या कार्यक्रमाला संस्थात्मक स्वरूप देण्याची गरज व्यक्त केलीज्यामुळे भविष्यातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ होईल. आयुक्त व प्रशासक मनपा नागपूर डॉ. अभिजीत चौधरी यांनी शिक्षणोत्सवाच्या यशस्वी 
आयोजनासाठी मा. अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांचे अभिनंदन केले. स्पर्धेत इयत्ता १ ते ५इयत्ता ६ ते ८इयत्ता ९ ते ११ असे वर्गाप्रमाणे तीन गट करण्यात आले होते. 'इन्साफ की डगर पे','हम हिंदुस्थानी','जयोस्तुते','वतन मेरे आझाद रहे तू', अशा विविध गाण्याचे विविध समूहाने गायन केले. झाडे लावा झाडे जगवापर्यावरण संवर्धनरस्ते अपघातजुन्या रूढी परंपरा निषेधशेतकरी बांधवांची व्यथा अशा अनेक विषयांवर संदेश देत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या सांस्कृतिक स्पर्धांचे परीक्षक स्नेहल संगीत विद्यालयसंगीत संयोजक श्री मनोहर ढोबळेसारस्वत संगीत विद्यालय संचालिका श्रीमती सोनाली बोहरपीसंगीत विशारद श्रीमती निलिमा शहाकार होते. यातील निवडक कार्यक्रम शिक्षणोत्सव कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी १० फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट्ट सभागृहामध्ये विध्यार्थी सादर करणार आहेत.
 

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...