Thursday, February 6, 2025

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 113 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (06) रोजी शोध पथकाने 113 प्रकरणांची नोंद करून 57,700/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 32 प्रकरणांची नोंद करून 12,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 3,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 
प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 17,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 44 प्रकरणांची नोंद करून 8,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 12,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. कॅरियर पॉईंट यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. तसेच मे. राजेश रोकडे यांनी बांधकामाचे साहित्य फुटपाथवर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मे. सादवाणी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. किशोर किराणा स्टोर यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. विजय किराणा स्टोर यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 30,000/- दंड वसूल केला.

Monday, February 3, 2025

गुरुमाऊली भजनी मंडळ खासदार भजन स्पर्धेचे महाविजेते केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

नागपूर:- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात आली. या स्पर्धेत जुने कैलाश नगर येथील गुरुमाऊली भजन मंडळ महाविजेते ठरले. या मंडळाला २१ हजार रुपये रोख व गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते सर्व पुरस्कार विजेत्या मंडळांना गौरविण्यात आले.रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहाल महाअंतिम फेरी आयोजित करण्यात आली. सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीतून सर्वोत्तम २० भजनी मंडळांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.पुरस्कार वितरण 
सोहळ्याला आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी महापौर अर्चना डेहनकर, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे जयप्रकाशजी गुप्ता, महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रगती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. ७ ते १२ जानेवारी दरम्यान घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरी स्पर्धेत नागपुरातील ६ विभागांतील ५८३ भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सर्व भजनी मंडळींद्वारे श्रीकृष्ण भक्तीचा जागर करण्यात आला. खासदार भजन स्पर्धेत नागपुरातील सहभागी ५८३ भजनी मंडळांना प्रत्येकी १५००/- रुपये मानधन आणि प्रमाणपत्र देण्यात आले .भजन स्पर्धेचे संयोजन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले.
खासदार भजन स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अमोल ठाकरे, विश्वनाथ कुंभलकर, माया हाडे, सपना सागुळले, श्वेता निकम, श्रधा पाठक, रेखा निमजे, विजय येरणे, दर्शना नखाते, सुजाता कथोटे, अभिजित कठाले, श्री. ढबले, अतुल सगुळले आदींनी परीश्रम घेतले. स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक - गुरुमाउली भजन मंडळ, जुने कैलास नगर (२१ हजार रुपये रोख) द्वितीय क्रमांक - सुरस्वरांगिणी भजन मंडळ, मानकापूर (१५ हजार रुपये रोख) तृतीय क्रमांक - रत्नक्षी भजन मंडळ (११ हजार रुपये रोख) चतुर्थ क्रमांक - स्वामी समर्थ भजन मंडळ रेशिमबाग (७ हजार रुपये रोख) पाचवा क्रमांक - स्वामी सुमीरन भजन मंडळ, वासुदेव नगर (५ हजार रुपये रोख) युवा गट:- प्रथम क्रमांक - सारस्वत भजन मंडळ (१५ हजार रुपये रोख) द्वितीय क्रमांक - स्वरा भजन मंडळ, महाल (११ हजार रुपये रोख)

मनपाच्या शालेय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन आमदार प्रवीण दटके, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, आंतरराष्ट्रीय खेळाडू राजू गायकवाड, शुभम पालकर यांची उपस्थिती

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेतील शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा विषयक जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्यामध्ये खेळाडू भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने मनपाच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षणोत्सव अंतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे  उद्घाटन सोमवारी (ता.३) मध्य नागपूरचे आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या हस्ते चिटणीस पार्क येथे झाले. याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलआंतराष्ट्रीय खेळाडू श्री राजू गायकवाड आणि श्री शुभम पालकरउपायुक्त श्री. गणेश राठोडशिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना आमदार श्री. दटके यांनी, मनपा शिक्षण विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याकरिता शिक्षण 
विभागाचे कौतुक केले. ते म्हणाले कीएकेकाळी मनपाच्या क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी गर्दी होत होती. ही परंपरा परत सुरु होत असल्याने आनंद होत आहे. त्यांनी मध्य नागपुरातील बंद पडलेल्या शाळांना सुरु करण्यासाठी आमदारनिधी मधून निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी उपस्थित फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीराजू गायकवाड आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सुद्धा मुलांना शुभेच्छा दिल्यात. 

यावेळी क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकरआकांक्षा संस्थेचे संचालक श्री सोमसूर्व चॅटर्जीसहायक शिक्षणाधिकारी श्री सुभाष उपासेश्री संजय दिघोरेश्री विनय बगलेश्रीमती अर्चना भोतमांगे उपस्थित होते. सर्वप्रथम हॉकीचे जादूगर स्व.ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तिरंगा रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आले.




कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका श्रीमती मधू पराड यांनी केले.नागपूर महानगरपालिकेद्वारे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात शिक्षणोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  सोमवार आणि ४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाल येथील चिटणीस पार्क येथे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता तर ५ ते ७ फेब्रुवारी २०२५ रोजी धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे

इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.चिटणीस पार्क नागपूर येथे सकाळी मशाल दौडने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मनपा आकांक्षा इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थांनी मुख्य अतिथींना एस्कॉर्ट करून व्यासपीठावर आणले. यानंतर सर्वांनी क्रीडा प्रतिज्ञा (sports pledge) घेतली. क्रीडा स्पर्धांमध्ये मनपा शाळेतील इयत्ता १ ते ५चे जवळपास ७९५ विद्यार्थांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. सोमवारी ५० मी दौडमध्ये ८० शाळेचे विद्यार्थी भाग घेतला तसेच बुक बॅलेन्समध्ये ५८ शाळेचे विध्यार्थ्यानी भाग घेतला. ऑब्स्टॅकल दौडमध्ये ५४ शाळेचे विद्यार्थी
तीन पायाची दौडमध्ये २९ शाळेचे विद्यार्थीस्टिक बॅलेन्समध्ये २५ शाळासॅक रेसमध्ये ५६ शाळारोलर टॅंकमध्ये ४८  शाळांनी भाग घेतला.  ४ फेब्रुवारी रोजी मुलांची कबड्डी व मुलींची लंगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.५ ते ७ फेब्रुवारी रोजी यशवंत स्टेडियमला इयत्ता ६ ते ८ आणि ९ ते  ११ वी च्या विद्यार्थ्यांच्या  क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील. यावेळी रस्सी खेच (१० ते १५ टीम मेंबर)१०० मी दौडशॉट पुटडिस्क थ्रोखो-खो  हे खेळ ५  फेब्रुवारी रोजी घेण्यात  येतील. कबड्डीव्हॅलीबॉललंगडीक्रिकेट हे खेळ ६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येतील तर फुटबाँलकॅरम आणि चेस हे खेळ ७ फेब्रुवारीला घेण्यात येतील. शिक्षणोत्सव कार्यक्रमाचा समारोप १० फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट्ट सभागृहामध्ये होणार आहे.

Sunday, February 2, 2025

एम्स’ येथे आंतरराष्ट्रीय ‘फिस्ट २०२५’ आंतराष्ट्रीय परिषद,आदिवासी जिल्ह्यांचे मागासलेपण दूर होणे गरजेचे …केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

 
नागपूर:- आदिवासी भागांमधील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणे हे आपल्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यादृष्टीने सरकार सातत्याने काम करत आहे. आदिवासीबहुल जिल्ह्यांच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. परंतु, सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एम्सनागपूर येथे आंतरराष्ट्रीय फिस्ट-२०२५या आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. 
यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त),  ‘एम्सनागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आदिवासी भागांमधील परिस्थिती गंभीर आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अनेक अडचणी आहेत. त्यामुळेच सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाने या जिल्ह्यांना ग्रासले आहे. आज देशाच्या जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचे ५२ ते ५६ टक्के, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे २२ ते २४ टक्के आणि ग्रामीण क्षेत्राचे १२ ते १३ टक्के योगदान आहे. हे योगदान वाढविण्यासाठी सरकारने दुर्गम भागांमधील विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यादृष्टीने ५०० ब्लॉक्स निश्चित केले 
आहेत.ते म्हणाले, ‘आदिवासी भाग बहुतांशी वनांनी व्यापलेला आहे. त्यामुळे रस्ते, सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात अडचणी येतात. आदिवासी भागांचा सर्वसमावेशक विकास आवश्यक आहे. त्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील. गेल्या २५ वर्षांपासून स्व. लक्ष्मणराव ट्रस्टच्या माध्यमातून गडचिरोलीमध्ये आम्ही १६०० एकल विद्यालये चालवत आहोत. याठिकाणी १८०० शिक्षक आहेत. 
चांगले शिक्षण मोठे परिवर्तन घडवू शकते याचा आम्ही अनुभव घेत आहोत.सूरजागडमध्ये चांगल्या दर्जाचे लोहखनिज आहे. तिथे पोलाद 
प्रकल्प सुरू झाला आहे. दहा हजार लोकांच्या रोजगाराचा मार्ग मोकळा झाला. पूर्वी हा परिसर नक्षलवाद्यांचा गड समजला जायचा. आता ५०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आणि त्यांना रोजगारही देण्यात आला आहे. भविष्यात इंजिनियरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, ड्रायव्हिंग स्कूल होतील. आदिवासी क्षेत्रातील विकासाचा प्रश्न अशाच प्रयत्नांमधून सुटणार आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.
 

अजीत बेकरी के नए शोरूम और फूड जंक्शन का उद्घाटन केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा

 
नागपुर:- बीते  सात दशकों से गुणवत्ता और स्वाद का प्रतीक "अजीत" ब्रांड ने , नागपुर के वर्धा रोड के अजनी चौक पर अपने नए, अत्याधुनिक शोरूम और मल्टीकुजीन रेस्टोरेंट फूड जंक्शन का उद्घाटन केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री माननीय श्री नितिन गडकरी की विशेष उपस्थिति ने इसे अवसर को विशेष और यादगार बना दिया। अजीत बेकरी की स्थापना 1955 में एक पारिवारिक स्वामित्ववाले व्यवसाय के रूप में की गई थी। गुणवत्तापूर्ण और अभिनव बेकरी उत्पाद उपलब्ध कराने के मिशन के साथ शुरू की गई अजीत बेकरी ने जल्द ही अपने स्वाद और गुणवत्ता के साथ शहर में अपनी पहचान बना ली। 1987 में बढ़ती मांग को पूरा करने के लिए एक नई विनिर्माण सुविधा स्थापित की गई, जिससे अजीत बेकरी की प्रतिष्ठा और मजबूत हुई। अजीत ब्रांड उच्च गुणवत्ता वाली सामग्री, नवीन व्यंजनों और ग्राहक संतुष्टि के प्रति प्रतिबद्धता के साथ अपने अनुभव को समृद्ध करना जारी रखता है। अजीत ब्रांड बेकरी क्षेत्र में 
नवीन विचार लाकर खाद्य प्रेमियों पर अपनी छाप छोड़ रहा है। उद्घाटन समारोह में अजीत के निदेशक विक्रम दिवाडकर, मीरा दिवाडकर, अवंती देशमुख, महेंद्र पेंढारकर के साथ-साथ खाद्यप्रेमी, 'अजीत' के वफादार ग्राहक और विभिन्न गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। 
उपस्थित लोग अजीत की गुणवत्ता और रुचि को समकालीन परिष्कार के साथ संयोजित करने वाले नवाचारों और आकर्षक डिजाइनों से मंत्रमुग्ध हो गए। उपस्थित लोगों ने फूड जंक्शन के बेकरी उत्पादों और व्यंजनों का आनंद लिया। अजीत चार प्रमुख क्षेत्रों में काम करता है: मिठाई, बेकरी, स्नैक्स और नमकीन। नये शोरूम में अजीत के प्रसिद्ध उत्पादों की विस्तृत श्रृंखला उपलब्ध है। इसमें विभिन्न प्रकार की मिठाइयाँ और स्नैक्स शामिल हैं जैसे पाव, डोनट्स, रस्क, खारी, कुकीज, मफिन, क्रीम रोल, सेलिब्रेशन केक, बार केक, नमकीन, फ्राइज़, चिप्स, वऱ्हाडी चिवड़ा, सावजी चिवड़ा। इस कार्यक्रम को संबोधित करते हुए श्री नितिन गडकरी ने अजीत ब्रांड के स्वाद और गुणवत्ता की प्रशंसा की। उन्होंने नए फूड जंक्शन की भी प्रशंसा की, जिसे नवीन विचारों के आधार पर बनाया गया है। विक्रम दिवाडकर ने आभार व्यक्त करते हुए कहा, "हमने अपने ग्राहकों के लिए अजीत के बेकरी उत्पादों में उत्कृष्टता के लिए एक मानक स्थापित किया है और हम भविष्य में और अधिक नवीन और गुणवत्तापूर्ण उत्पाद लाने के लिए प्रतिबद्ध हैं।" उन्होंने विदर्भ और मध्य भारत में लाखों लोगों के बीच अजीत को एक विश्वसनीय ब्रांड बनाने में उनके अटूट समर्पण के लिए स्वर्गीय अजीत दिवाडकर को श्रद्धांजलि अर्पित की। अजीत के विशाल ग्राहक आधार के लिए धन्यवाद देते हुए उन्होंने इस आकर्षक नए आउटलेट के माध्यम से और अधिक नए ग्राहकों को आकर्षित करने के बारे में आशा व्यक्त की।

Saturday, February 1, 2025

नागपुर के पालक मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुले ने किया नगर निगम की 'मैकेनाइज्ड रोड स्वीपिंग मशीनो का लोकार्पण

 नागपुर:- नागपुर शहर में सड़कों और फ्लाईओवरों की यांत्रिक सफाई के लिए नगर निगम द्वारा चार 'मैकेनाइज्ड रोड स्वीपिंग मशीनें' खरीदी गई हैं। इन सभी चार मशीनों का उद्घाटन शनिवार (1) को महाराष्ट्र राज्य के राजस्व मंत्री और नागपुर के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने इसका उद्घाटन किया। पालकमंत्री श्री. ने सिविल लाइन्स स्थित जिला योजना भवन परिसर में फीता काटकर उद्घाटन किया। इस अवसर पर राज्य मंत्री श्री. आशीष जायसवाल, सांसद श्री. श्यामकुमार बर्वे, विधायक श्री प्रवीण दटके , परिणय फुके , कृष्णा खोपड़े , विकास ठाकरे , समीर मेघे , चरणसिंह ठाकुर , मनपा आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिला कलेक्टर डॉ. विपिन इटनकर , नागपुर सुधार ट्रस्ट के अध्यक्ष श्री. संजय कुमार मीना , जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनि, नगर निगम अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त श्री. विजय देशमुख, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेन्द्र महल्ले, कार्यपालन यंत्री श्री. राजेश गुरमुले, उप अभियंता श्री. उज्ज्वल लांजेवार और अन्य उपस्थित थे। नागपुर शहर में वर्तमान में बड़े पैमाने पर विकास कार्य चल रहे हैं। इसी प्रकार, चार लेन वाली सड़कों और फ्लाईओवरों का नेटवर्क भी बढ़ रहा है। इससे शहर में वायु प्रदूषण बढ़ने की संभावना भी बढ़ रही है  इसके अतिरिक्त, चूंकि सड़कों की सफाई के लिए आवश्यक जनशक्ति अपर्याप्त है, इसलिए मुख्य सड़कों और फ्लाईओवरों की सफाई यांत्रिक तरीकों से करना आवश्यक है। चूंकि नई प्रौद्योगिकियों का उपयोग समय की मांग हैइसलिए 15वें वित्त आयोग के अनुदान से नागपुर नगर निगम द्वारा चार 'मैकेनाइज्ड रोड स्वीपिंग मशीनें' खरीदी गई हैं इससे 
पहले 2022 में , राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम ( एनसीएपी) के तहत प्राप्त धन से टीएमसी द्वारा दो 'मैकेनाइज्ड रोड स्वीपिंग मशीनें' खरीदी गई थीं   एंथनी वेस्ट हैंडलिंग सेल , ठाणे द्वारा किराए पर एक ' मैकेनाइज्ड रोड स्वीपिंग मशीन' का उपयोग किया जा रहा है। जिसका उपयोग वर्तमान में शहर की फोरलेन सड़कों और फ्लाईओवरों की सफाई के लिए किया जा रहा है। इस प्रकार, पुरानी तीन और नई चार सहित कुल 7 'मैकेनाइज्ड रोड स्वीपिंग मशीनें' होंगी नगर निगम से उपलब्ध है  इसके अलावा, नागपुर नगर निगम ने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड को छह 'मैकेनाइज्ड रोड स्वीपिंग मशीनें' दान की हैं  एक अनुरोध भी किया गया है। 'मैकेनाइज्ड रोड स्वीपिंग मशीनों' से किए गए सफाई कार्य से सफाई की गुणवत्ता में सुधार होता है। चूंकि इस मशीन में पानी का छिड़काव होता है, इसलिए सड़क की सफाई के दौरान धूल के कणों को हवा में उड़ने से रोककर वायु प्रदूषण को कम किया जाता है। शहर में संकीर्ण फ्लाईओवरों की सफाई मानव संसाधनों द्वारा करने से दुर्घटनाओं की संख्या में कमी लाने में मदद मिलेगी। इस मशीन में दिए गए 'हाई सक्शन होज पाइप' की सहायता से सड़कों की सफाई करते समय सड़कों के किनारे एकत्र कूड़े के ढेरों को आसानी से उठाना संभव हो सकेगा , साथ ही नागरिकों द्वारा फेंके गए कूड़े के ढेर को भी बिना किसी परेशानी के उठाया जा सकेगा। मानव संसाधनों का उपयोग और प्रबंधन . इसी तरह, कम समय में अधिक सड़कों की सफाई संभव हो सकेगी उद्घाटन के अवसर पर श्री. लोकेश बसनवार, श्री. रोहिदास राठौड़ सहित सभी जोनल अधिकारी उपस्थित थे।'मशीनीकृत सड़क सफाई मशीन' की विशेषताएं:- चेसिस प्रकार: 16 टन.चेसिस इंजन पावर बीएचपी: 160 एचपी.सहायक डीजल इंजन की शक्ति: 155 अश्वशक्ति.सहायक डीजल इंजन में सिलेंडरों की संख्या: 6.ब्लोअर स्पीड ( आरपीएम): न्यूनतम 3136 आरपीएम.ब्लोअर रेटिंग ( एम³/ मिनट): 320 एम³/ मिनट.सक्शन नली न्यूनतम 6 मीटर: पहियों पर ट्रॉली के साथ 4.2 मीटर।

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...