Wednesday, March 12, 2025

मनपातर्फे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

नागपूर:- माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण  यांना जयंतीनिमित्त बुधवारी (ता.१२) नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण  यांच्या प्रतिमेला मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन  केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. श्याम कापसेअधीक्षक श्री.राजकुमार मेश्रामजनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनीश्री. प्रमोद हिवसेश्री. सुधीर कोठेश्री. अमोल तपासे, श्री. राजेश लोहितकर, श्री. मुकेश 
मोरेसौ. किर्ती खापेकर, सौ. रेवती गभणेश्री. विनोद डोंगरेश्री. शैलेश जांभुळकर यांच्यासह इतर उपस्थित होते. मनपाच्या वतीने अजनी चौक येथील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयावर माल्यार्पण करण्यात आले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 46 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  बुधवार (12 रोजी शोध पथकाने  46  प्रकरणांची नोंद करून  रु. 26,400/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून  रु.6,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी 
कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु.100/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली.  वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रु.7,500/- रुपयांची वसुली करण्यात आली.  चिकन सेंटर,

मटन विक्रेता, यांनी त्यांचा कचर रस्ता, फुटपाथ मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत  1  प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 27 प्रकरणांची नोंद करून रु.5,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून रु.6,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी झोन अंतर्गत मे. साई प्रईड अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला व मे. आर्या एमीनेन्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला असे एकुण रू. 20,000/- दंड वसुल करण्यात आला.  धंतोली झोन अतंर्गत संजय केडिया यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अतंर्गत उमेश स्वीट्स भंडार यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अतंर्गत ईश्वर डेरी  यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 05 प्रकरणांची नोंद करून रू. 35,000/- दंड वसूल केला. 

Tuesday, March 4, 2025

पुलिस आयुक्त रवींद्र सिंघल को [आलाधिकारियों] गलत जानकारी देते पोलिस निरीक्षक संदिप बुआ,न्याय के लिए भटक रही जनता

नागपूर:- नागपुर शहर के पुलिस थाना तहसिल गांधीबाग नागपूर के पी आई संदिप बुआ के मनमानी के चलते सरकारी नियमों का उल्लंघन किया  हैं! पुलिस थाना मे 2022से शिकायते है उनका निराकरण आज तक नहीं हुआ और इसलिऐ पिडीत न्याय से वंचित हैं। गुंडागर्दी असामाजिक तत्व को बढावा दिया है! इस संदर्भ में एक प्रेस कॉन्फ्रेंस सामाजिक कार्यकर्ता  सुषमा डबराल ने जानकारी देते हुए पुलिस आयुक्त से मांग की है कि वे संदिप बुआ मनमानी पुलिस बंदोबस्त दिया है उसकी जाच हो दोषी अधिकारियों के विरूद्ध कड़ी 
कार्रवाई करें। सुषमा डबराल ने बताया कि तहसील पुलिस थाना मे एक शिकायत कर्ता 21शिकायतें दो साल से पुलिस में लंबित हैं,लेकिन उनका निराकरण नहीं किया है,लेकीन बर्थ डे पार्टी के लिये पोलीस ठाणे सजाया जाता है! सरकारी आदेश (क्रमांक MIS2016/प्र.क्र.97/पोल1/निनं 17/06/2016) के अनुसार, शिकायतों की जांच तीन सप्ताह के भीतर पूरी होनी चाहिए,लेकिन 19 जनवरी 2024 को दर्ज शिकायत की जांच अभी तक पूरी नहीं हुई, लिखित मे पुलिस द्वारा पत्र मिला है! जिससे संबंधित अधिकारियों की 
लापरवाही उजागर होती है। गुंडागिरी को बढावा दिऐ है! इसी तरह प्रलंबित शिकायतो के चलते नागपूर सीपी शिकायत कर्ता और डिसीपी, एसीपी संदिप बुआ रेकॉर्ड के साथ बुलाकर मिटिग लिया जांच के संबंध में सवाल पुणे तो कहा राज भोसले ने जमीन दान दिऐ है। दानपत्र कि माग किया तो उपलब्ध नही है लिखित मे पत्र दिया है! इस तरह झुठी जानकारी पेश कर सीपीआर अन्य वरीष्ठ अधिकारी को पुलिस अधिकारी संदिप बुआ ने गुमराह किया! पिडीत को न्याय से वंचित रखा! एक शिकायतों के मे संयुक्त उत्तर देते समय नियमों का उल्लंघन का भी आरोप लगाया गया है। 




उन्होंने बताया कि इस शिकायत के बारे में 01 फरवरी 2025 का लिखा पत्र 11जनवरी को प्राप्त "संयुक्त उत्तर" की बारीकी से निरीक्षण करने पर इसमें गंभीर गलतियाँ पाई गईं।  शिकायत आनेके संदर्भ किस कार्यालय से मिली कब मिली उसका नंबर जरूरी है,पत्राचार के समय पुलिस स्टेशन शिल और जावक नंबर के बिना पत्राचार किया नहीं जा सकता,पडयंत्र के चलते ऐसा किया है! कामठी निवासी व्यक्ती को फर्जी लेटरहेड पर कार्यक्रम परवानगी धारा 168 नोटीस जारी किया!और कानून का उल्लंघन करके पोलीस अधिकारी संदिप बुआ‌ द्वारा ने उस कार्यक्रम में बढा पोलीस‌ बंदोबस्त तैनात किये ऐसा आरोप है।




पोलिस बंदोबस्त कि जानकारी मागने पर व्हीआयपी बंदोबस्त दिया लिखित मे जबाब दिया लेकीन कार्यक्रम में कोई भी वीआईपी मौजूद नहीं था, फिर भी पुलिस ने वहां वीआईपी सुरक्षा मुहैया कराई,जो कि सरकारी नियमों का खुला उल्लंघन है। समाजसेवी सुषमा डबराल का आरोप है कि तहसील पुलिस द्वारा अवैध कार्यों को संरक्षण और पुलिस की निष्क्रियता बनी हुई है। तहसील थाना क्षेत्र में कई अवैध गतिविधियाँ जारी हैं,जो मदरशा रेकार्ड है नहीं मदरशा के नाम पर लाखो रुपये हेराफेरी हो रही गुंडा तत्वों ने गोरगरीब अशिक्षित का निजि घर , फर्जि मदरशा कमेटी  के नाम पर  तोड़फोड़ किया। शिकायत आज तक जाच प्रलंबित है! पुलिस थाने ने जांच किए बिना केवल संयुक्तिक उत्तर भेज दिया है। 


शिकायतकर्ता ने 04 दिसंबर 2023 को पुलिस सुरक्षा के लिए आवेदन किया था, लेकिन आज तक जांच प्रलंबित है पुलिस आयुक्त तक गइ नहीं अंतिम प्रक्रिया कैसे होगी। इसी तरह, निजी अतिक्रमण के तहत एक भूमि को "सार्वजनिक मुस्लिम क्षेत्र" के रूप में दिखाकर पुलिस तहसील क्षेत्र में गैरकानूनी व्यवसाय पुलिस निगराणी मे संचालित हो है। इस घोटाले में लाखों रुपये की हेराफेरी हो रही है। इस मामले मे गैरकानूनी तरीके से नामांतरण प्रक्रिया पूरी करने के लिए नगर निगम के नियमों का उल्लंघन किया गया। मनपा ज़ोन क्र. 7, सतरंजीपुरा के अधिकारी ने पुलिस थाने में बयान दिया है। इसतरह अवैध गतिविधियों के कई सबूत पुलिस थाने में मौजूद होने के बावजूद,अब तक पुलिस निरीक्षक संदीप बुआ ने किसी भी आरोपी के खिलाफ मामला दर्ज नहीं किया। पुलिस अधिकारी संदीप बुआ अपराधियों का सहयोग किया है और उन्हें पुलिस होने का फायदा उठाते हुऐ संरक्षण दिया है, जिससे भूमाफिया और अपराधियों का मनोबल बढ़ा है। पिडित को न्याय नही मिलतासुषमा डबराल ने मांग की है कि पुलिस निरीक्षक संदीप बुआ के खिलाफ अनुशासनात्मक कार्रवाई की जाए, क्योंकि उन्होंने कानून का उल्लंघन कर अवैध रूप से पुलिस बंदोबस्त देकर भ्रष्टाचार किया है। पद का दुरुउपयोग किया है! दि.18/12/2024को फर्जि तरिकेसे पुलिस सुरक्षा लगाई गई उस पर पुलिस विभाग मे आम नागरिक को जितनी राशी भरने का आदेश होता इसकी जाँच की जाए और संबंधित राशि संदिप बुआ से पुलिस विभाग मे वापस की जाए और बंदोबस्त मे तैनात पुलिस कर्मचारी के सामने पुलिस कायदे का अपमान हो रहा था फिर भी जिम्मेदारी नहीं निभाई उस पर जांच करे और कर्तव्य में लापरवाही बरतने वाले पुलिस अधिकारियों पर सख्त कार्रवाई की जाए। शिकायतो का कायदेशीर निपटारा जल्दी किया जाना आवश्यकता है!गुंडागर्दी अवैध काम कि शिकायते किऐ है इसलिए जानहानी होने का डर है!

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 57 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  मंगळवार (4 रोजी शोध पथकाने  57  प्रकरणांची नोंद करून  रु. 40,500/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून  रु.8,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु.300/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली.  दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु.1,200/- रुपयांची वसुली 
करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून रु.14,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून रु.3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून रु.10,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. महाविला अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड व भाऊसाहेब शेठे यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मयुर तिरपुडे यांनी ट्रकने वाहतूक करताना रस्त्यावर माती आणि चिखल टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले व कल्पत्रू कोचिंग क्लासेस यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत पिनॅकल कनस्ट्रकश्न्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले व जगदंबा फुल भंडार यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अतंर्गत  शक्ती होलसेल  किराणा स्टोअर्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अतंर्गत लाडे किराणा स्टोअर्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 08 प्रकरणांची नोंद करून रू. 55,000/- दंड वसूल केला.

Thursday, February 27, 2025

मनपाच्या दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन 610 दिव्यांग खेळाडूंचा सहभाग

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून व त्यांच्या प्रतिभेला वाव मिळण्यासाठी दिव्यांग व्यक्तींकरिता पहिल्यांदाच क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे गुरुवारी (ता.27) दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून दक्षिण नागपूरचे आमदार श्री. मोहन मतेमनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरीअतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलउपायुक्त श्रीमती डॉ. रंजना लाडेवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरपरिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधवक्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकरहनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त श्री नरेंद्र बावनकरजिल्हापरिषदेचे समाज कल्याण 
अधिकारी किशोर भोयरसमग्र शिक्षण विभगाचे जिल्हा समन्वयक अभिजित राऊतक्रीडा तज्ज्ञ श्री. उमेश वाझुरकरअर्जून व द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित श्री विजय मुनिश्वरश्री संजय लुंगेश्री चंद्रशेखर पाचोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. त्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे ध्वजारोहण झाले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांकडून पथसंचलन व सलामी देण्यात आली. यावेळी मातृसेवा संघाच्या स्नेहांगण शाळातर्फे स्वागत गीत सादर करण्यात आले.

आमदार श्री मोहन मते यांनी मनपातर्फे दिव्यांग क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल महानगरपालिकेचे कौतुक केले. ते म्हणाले कीमनपातर्फे विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. परंतु मनपातर्फे पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने दिव्यांगाकरिता क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मनपाने पुढे मतीमंद मुलांकरिताही अशा क्रीडा स्पर्धाचे आयोजन करावेयामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अशा स्पर्धांकरीता  आमदार निधी मधून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अनेक दिव्यांगांनी पॅरालिम्पिक मध्ये पदक जिंकले आहेत. दिव्यांग क्रीडा स्पर्धेमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना पॅरालिंपिक स्पर्धेत भाग घेण्याची प्रेरणा मिळेल असेही आमदार श्री. मते म्हणाले. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सुद्धा मुलांना शुभेच्छा दिल्यात. महानगरपालिकातर्फे खेळाडूंसाठी दरवर्षी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींकरीता स्पर्धा आयोजित करण्याचे मनपाने ठरविले. ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये टॅलेन्ट आणि स्पार्क आहेत्यांना समोर जाण्याकरिता अशा क्रीडा स्पर्धा महत्वपूर्ण ठरणार आहेत. नागपूर शहरातील 1210 शाळांमधील 22 क्रीडा प्रकारात 610 दिव्यांग खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धेत सहभाग नोंदविणे ही कोणतीही स्पर्धा जिंकण्या इतकेच महत्वाचे आहे. स्पर्धेत सहभागी असणारे सर्वच विजेते आहात. जिंकण्याबरोबर 
खेळाडू वृत्तीने या स्पर्धेत भाग घेण्यात यावे असेही ते म्हणाले. शिक्षक आणि पालकांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतल्याने त्यांचे अभिनंदनही आयुक्त यांनी केले.अशाप्रकारच्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील स्पार्क आणि टॅलेन्ट बाहेर येऊ शकते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल असेही ते म्हणाले. दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे अभिप्राय सुद्धा पालकांनी नोंदवावे असे आवाहन आयुक्त यांनी यावेळी केले. दरवर्षी अशा दिव्यांग क्रीडा स्पर्धा आयोजित केले जातील असेही त्यांनी सांगितले. पॅरालिम्पिक मध्ये भारताचा चढता आलेख आहे. ज्या खेळाडूंमध्ये चमक (स्पार्क) आणि प्रतिभा आहे. ज्यांना वेगवेगळ्या खेळामध्ये पुढे जायचेराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळायचे आहेत्यांच्याकरीता अशा क्रीडा स्पर्धामुळे व्यासपीठ मिळेल. पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये असलेले चमक(स्पार्क) आणि प्रतिभेला मदत करावे असेही ते म्हणाले. दिव्यांग
खेळाडूकरीता शिष्यवृत्ती योजना सुद्धा सुरु आहे. इतर योजना सुद्धा सुरु आहेत अशी माहिती  डॉ. चौधरी यांनी दिली. नागपूर महानगरपालिकेद्वारे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात दोन दिवसीय ‘दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी क्रीडा ज्योत प्रज्वल्लाने स्पर्धेची सुरुवात झाली. यानंतर खेळाडूंना शपथ श्री. संजय लुंगे यांनी दिली. यावेळी तिरंगा रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले. संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले. तर आभार क्रीडा अधिकारी श्री पियुष आंबुलकर यांनी मानले.



# 610 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग:- दोन दिवसीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत 22 क्रीडा प्रकारात शहरी भागातील सर्वसामान्य शाळांमधील तसेच विशेष शाळेतील अशा एकूण 1210 शाळांमधील 610 दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये प्रथमत: प्रकारच्या क्रीडा प्रकारात सहभागी होऊन आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे.  गुरुवारी बौद्धिक दिव्यांगकर्णबधिर दिव्यांग अस्थिव्यंग दिव्यांग अंध व अल्पदृष्टी दिव्यांग व्यक्तीच्या विविध क्रीडा स्पर्धेत अॅथलेटीक्स
 , दौड (रनिंग)शॉर्ट जम्पलाँग जम्प , सॉफ्टबॉल थ्रोलांब उडी,  जलतरणसायकलिंगरस्सीखेचक्रिकेटगोळाफेककॅरम,  फ्री स्टाईलसिटींग व्हॉलीबॉलव्हिल चेअर रनिंगबुद्धीबळपासिंग द बॉलस्पॉट जम्प यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शुक्रवारी विविध दिव्यांग क्रीडा स्पर्धांसह स्पर्धेचा समारोप  होणार आहे.

मनपातर्फे राबविण्यात आलेल्या नदी जनजागृती अभियानाला नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद

नागपूर:-नागरीकांमध्ये नद्यांविषयी जनजागृती वाढावी याकरिता गुरुवारी (ता.२७) रोजी नागपूर महानगरपालिकातर्फे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत योगाभ्यास विविध सांस्कृतिक कार्यक्रम व यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले. या अभियानाला उत्फुर्त प्रतिसाद देत गांधीसागर तलावाजवळ नागरिकांनी सूर्यनमस्कार सह विविध योग प्रात्यक्षिके सादर केले.जलशक्ती मंत्रालय जल संसाधन नदी विकास व गंगा संरक्षण विभागभारत सरकार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय कार्यक्रमाअंतर्गत नद्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिने हे अभियान राबविण्यात आले. नागपूर महानगरपालिका तर्फे 
नद्यांबाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत नागरीकांमध्ये नदीबाबत जनजागृती वाढविण्याकरिता पुढाकार घेण्यात आला. या अभियानाला उत्फुर्त प्रतिसाद देत गांधीसागर तलावाजवळ नागरिकांनी सूर्यनमस्कार सह विविध योग प्रात्यक्षिके सादर केले. या कार्यक्रमाद्वारे शहरात असणाऱ्या नद्यांचे महत्व व निसर्ग जपण्याचा संदेश देण्यात आला. मनपा उद्यान विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांनी चित्र काढून अभियानाला प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाने निसर्ग संवर्धन व जबाबदारी आणि एकतेची जाणीव वाढवली. यामुळे शाश्वत संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे एक अर्थपूर्ण पाऊल उचलले गेले. कार्यक्रमात नदी संवर्धन व पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांमध्ये समुदायाच्या सहभागाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यात आली.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...