Thursday, February 27, 2025

मनपातर्फे राबविण्यात आलेल्या नदी जनजागृती अभियानाला नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद

नागपूर:-नागरीकांमध्ये नद्यांविषयी जनजागृती वाढावी याकरिता गुरुवारी (ता.२७) रोजी नागपूर महानगरपालिकातर्फे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत योगाभ्यास विविध सांस्कृतिक कार्यक्रम व यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले. या अभियानाला उत्फुर्त प्रतिसाद देत गांधीसागर तलावाजवळ नागरिकांनी सूर्यनमस्कार सह विविध योग प्रात्यक्षिके सादर केले.जलशक्ती मंत्रालय जल संसाधन नदी विकास व गंगा संरक्षण विभागभारत सरकार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय कार्यक्रमाअंतर्गत नद्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिने हे अभियान राबविण्यात आले. नागपूर महानगरपालिका तर्फे 
नद्यांबाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत नागरीकांमध्ये नदीबाबत जनजागृती वाढविण्याकरिता पुढाकार घेण्यात आला. या अभियानाला उत्फुर्त प्रतिसाद देत गांधीसागर तलावाजवळ नागरिकांनी सूर्यनमस्कार सह विविध योग प्रात्यक्षिके सादर केले. या कार्यक्रमाद्वारे शहरात असणाऱ्या नद्यांचे महत्व व निसर्ग जपण्याचा संदेश देण्यात आला. मनपा उद्यान विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांनी चित्र काढून अभियानाला प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाने निसर्ग संवर्धन व जबाबदारी आणि एकतेची जाणीव वाढवली. यामुळे शाश्वत संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे एक अर्थपूर्ण पाऊल उचलले गेले. कार्यक्रमात नदी संवर्धन व पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांमध्ये समुदायाच्या सहभागाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यात आली.

No comments:

Post a Comment

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...