Wednesday, March 12, 2025

मनपा करणार शहरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण सर्वेक्षणाकरिता आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण : नागरिकांना सहकार्य करण्याचे आयुक्तांनी केले आवाहन

नागपूर:- केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागपूर महानरगपालिकेद्वारे दिव्यांगांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. मात्र दिव्यांगांची एकत्रिट डाटा उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यंत योजना पोहोचविण्यात अडचण निर्माण होते. शहरातील कुणीही दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित राहू नये याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे लवकरच शहरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मनपाच्या आशा सेविका हे सर्वेक्षण करणार असून यासंदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये बुधवारी (ता.१२) हे प्रशिक्षण कार्य पार पडले. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. मंचावर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, समाज विकास विभागाच्या 
उपायुक्त डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, महात्मा गांधी सेवा संघाचे प्रकल्प संचालक श्री. विजय कान्हेकर, नीलेश छडवेलकर आदींची उपस्थिती होती. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य आणि समाज विकास विभागाद्वारे बुधवारी (ता.१२) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये महात्मा गांधी सेवा संघ यांच्या माध्यमातून दिव्यांग सर्वेक्षणाबाबत आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त बोलत होते.यावेळी बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिव्यांगांच्या सर्वेक्षणामुळे पुढील काळात दिव्यांगांच्या
उत्थानासाठी कृती आराखडा निश्चित होईल व यात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. केंद्र, राज्य आणि मनपाच्या सर्व योजनांचा प्रत्येक दिव्यांगाला लाभ पोहोचून त्याच्या जीवनात सुलभता निर्माण करणे हा मनपाचा मानस आहे. मात्र अनेक दिव्यांग माहितीअभावी व कागदपत्रांच्या अभावी योजनांपासून वंचित राहतात. या सर्व कल्याणकारी योजनांचा दिव्यांगांना लाभ पोहोचविण्यासाठी सर्वेक्षण महत्वाचे पाऊल ठरणार आहे. दिव्यांगांचे सर्वेक्षण करताना दिव्यांगत्वाचे प्रकार, त्यांचे यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड तसेच इतर माहिती देखील घेतली जाणार आहे. ज्यामुळे पुढील काळात त्याची पूर्तता करुन त्यांना योजनांपासून लाभान्वित करण्यात येईल. यासाठी सर्वेक्षण करण्यात येत असून यात आशा सेविकांची भूमिका महत्वाची आहे. 


आरोग्य विभागाशी संबंधित विविध कार्य करताना आशा स्वयंसेविकांचा थेट संपर्क नागरिकांशी येतो. नेहमी त्यांच्या संपर्कात येत असल्यामुळे नागरिकांकडून योग्य माहिती मिळविण्यात आशा सेविकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. योग्य आणि बिनचूक माहितीमुळे पुढील काळात मोठा ‘डाटाबेस’ मनपाकडे तयार होईल, असाही विश्वास डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी नागरिकांना सुध्दा या सर्वेक्षणाच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक करताना अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सर्वेक्षणाची संकल्पना विषद केली. जागतिक बँकेच्या अहवालानुसार कोणत्याही देशात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ५ ते ८ टक्के एवढे दिव्यांगांचे प्रमाण असते. कुटूंबातील एक व्यक्ती दिव्यांग असल्यास संपूर्ण कुटूंबाची दिनचर्या त्या व्यक्तीच्या अनुरूप सुरु असते. अशा स्थितीत दिव्यांगांना आधार देण्यासाठी अनेक योजना कार्यरत आहेत. 
या योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आधी दिव्यांगांची ओळख निश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वेक्षण महत्वाचे ठरणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहरातील दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवन सुकर करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने दिव्यांगांच्या सर्वेक्षणाचे महत्वाचे पाऊल उचलले आहे, असेही त्या म्हणाल्या.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी प्रशिक्षणादरम्यान आशा सेविकांद्वारे उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे निराकरण केले. प्रशासकीय पातळीवरील महत्वाच्या प्रश्नांचे देखील त्यांनी उत्तरे दिली. आशा स्वयंसेविकांनी अनेक सर्वेक्षण यशस्वीपणे पार पाडून शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका निभावली आहे. डेंग्यू, चिकुन गुनिया आदींच्या सर्वेक्षणामुळे रुग्णसंख्येत यावर्षी मोठी घट झाली. 



गरोदर माता, बालकांचे आरोग्य व लसीकरण याबाबत नियमित सुरु असलेल्या सर्वेक्षणाची देखील त्यांनी दखल घेऊन कौतुक केले. मोबाईल ॲपवरुन ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरुपात हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये वैद्यकीय आरोग्य विभाग
, समाज विकास विभाग, महात्मा गांधी सेवा संघ यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे सहकार्य असणार आहे, असेही डॉ. सेलोकर यांनी सांगितले.प्रशिक्षणामध्ये महात्मा गांधी सेवा संघाचे प्रकल्प संचालक श्री. विजय कान्हेकर यांनी संपूर्ण सर्वेक्षणाची पार्श्वभूमी विषद केली. नीलेश छडवेलकर यांनी सर्वेक्षणासाठी वापरले जाणारे ॲप, त्याची कार्यशैली आणि प्रश्नावली याचे विस्तृत विवेचन केले. संजय पुसाम यांनी दिव्यांगत्वाची ओळख आणि प्रकार या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमात माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय तिवारी, डॉ. अतिक खान, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. दीपंकर भिवगडे, डॉ. सुनील कांबळे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम, आरोग्य व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान समन्वयक दीपाली नागरे, आशा योजना सुपरवायजर रेखा निखाडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सिल्विया मोरडे यांनी केले व आभार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी मानले.

झिरो माईल स्टोनचे पर्यटनाच्या दृष्टीने मनपा करणार सौंदर्यीकरण आणि विकास हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत निर्णय

नागपूर:-भारताच्या केंद्रस्थानी असलेले ग्रेड -१ हेरिटेज झिरो माईल स्टोनचा पर्यटनाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका सौंदर्यीकरण आणि विकास करणार, असा महत्वपूर्ण निर्णय हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री. अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (ता.१२) मनपामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, समितीच्या सदस्य सचिव श्रीमती लीना उपाध्ये आणि तज्ञ सदस्य उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री यांचे सल्लागार श्री. आनंद बंग आभासी पद्धतीने बैठकीमध्ये सहभागी झाले. या प्रकल्पासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन सीएसआर निधीतून अर्थसहाय्य करणार आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे वास्तू शिल्पकार श्री. परमजीत सिंग आहुजा यांनी झिरो माईलच्या विकासा संदर्भातील प्राथमिक स्वरूपाचा आराखडा तयार केला असून त्यांनी या प्रारूपाची मांडणी सभेत केली. त्यांनी 
सांगितले की, झिरो माईल लगतच्या जागेवर भूमिगत ग्रेट ट्रिग्नॉमेट्रीकल सर्वे चे संग्रहालय स्थापित केले जाईल. तसेच मनपाच्या जागेवर पार्कींग आणि पर्यटकांसाठी इतर व्यवस्था केली जाईल. येथे भेट देणाऱ्या नागरिकांसाठी ॲम्पिथिएटर तसेच फूड कोर्टचा सुद्धा प्रस्ताव त्यांनी दिला त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येतील, हेरिटेज संवर्धन समितीचे कार्यालय सुद्धा तिथे राहणार आहे. असेही त्यांनी सांगितले.बैठकीतील चर्चेनुसार या प्रकल्पाला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सीएसआर निधीतून विकास कामात सहकार्य करणार आहे. नागपूरसाठी हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असून, महानगरपालिका तर्फे सदर झिरो माईल पर्यटनक्षेत्राचा विकास होईल असे मनपा आयुक्तांनी आश्वस्त केले.
सध्या झिरो माईलच्या संवर्धनाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. सभेत संवर्धन समितीच्या सदस्यांनी सुद्धा आपले मत मांडले. त्यांच्या सल्लानुसार झिरो माईलच्या विकास आरखड्यात बदल करून मा. मुख्यमंत्री यांचे समोर सादरीकरण करण्यात येईल, असे मनपा आयुक्तांनी सांगीतले.बैठकीत नगर रचना विभागाचे  सहसंचालक श्री. विजय शेंडे, केंद्रीय पुरातन सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक श्री. सतीश मल्लिक, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक श्री. मयुरेश खंडागळे, डॉ. मधुरा राठोड, डॉ. शुभा जोहरी, सर्वे ऑफ इंडियाचे भूपेन्द्र परमार, मनपा अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, मनपा नगर रचना विभागाचे उपसंचालक श्री. किरण राऊत, सहायक संचालक नगर रचना श्री. ऋतुराज जाधव उपस्थित होते.

मनपातर्फे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

नागपूर:- माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण  यांना जयंतीनिमित्त बुधवारी (ता.१२) नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण  यांच्या प्रतिमेला मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन  केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, अधीक्षक श्री.राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. प्रमोद हिवसे, श्री. सुधीर कोठे, श्री. अमोल तपासे, श्री. राजेश लोहितकर, श्री. मुकेश 
मोरे, सौ. किर्ती खापेकर, सौ. रेवती गभणे, श्री. विनोद डोंगरे, श्री. शैलेश जांभुळकर यांच्यासह इतर उपस्थित होते. मनपाच्या वतीने अजनी चौक येथील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयावर माल्यार्पण करण्यात आले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 46 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  बुधवार (12)  रोजी शोध पथकाने  46  प्रकरणांची नोंद करून  रु. 26,400/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून  रु.6,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी 
कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु.100/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली.  वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रु.7,500/- रुपयांची वसुली करण्यात आली.  चिकन सेंटर,

मटन विक्रेता, यांनी त्यांचा कचर रस्ता, फुटपाथ मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत  1  प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 27 प्रकरणांची नोंद करून रु.5,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून रु.6,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी झोन अंतर्गत मे. साई प्रईड अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला व मे. आर्या एमीनेन्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला असे एकुण रू. 20,000/- दंड वसुल करण्यात आला.  धंतोली झोन अतंर्गत संजय केडिया यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अतंर्गत उमेश स्वीट्स भंडार यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अतंर्गत ईश्वर डेरी  यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 05 प्रकरणांची नोंद करून रू. 35,000/- दंड वसूल केला. 

Tuesday, March 4, 2025

पुलिस आयुक्त रवींद्र सिंघल को [आलाधिकारियों] गलत जानकारी देते पोलिस निरीक्षक संदिप बुआ,न्याय के लिए भटक रही जनता

नागपूर:- नागपुर शहर के पुलिस थाना तहसिल गांधीबाग नागपूर के पी आई संदिप बुआ के मनमानी के चलते सरकारी नियमों का उल्लंघन किया  हैं! पुलिस थाना मे 2022से शिकायते है उनका निराकरण आज तक नहीं हुआ और इसलिऐ पिडीत न्याय से वंचित हैं। गुंडागर्दी असामाजिक तत्व को बढावा दिया है! इस संदर्भ में एक प्रेस कॉन्फ्रेंस सामाजिक कार्यकर्ता  सुषमा डबराल ने जानकारी देते हुए पुलिस आयुक्त से मांग की है कि वे संदिप बुआ मनमानी पुलिस बंदोबस्त दिया है उसकी जाच हो दोषी अधिकारियों के विरूद्ध कड़ी 
कार्रवाई करें। सुषमा डबराल ने बताया कि तहसील पुलिस थाना मे एक शिकायत कर्ता 21शिकायतें दो साल से पुलिस में लंबित हैं,लेकिन उनका निराकरण नहीं किया है,लेकीन बर्थ डे पार्टी के लिये पोलीस ठाणे सजाया जाता है! सरकारी आदेश (क्रमांक MIS2016/प्र.क्र.97/पोल1/निनं 17/06/2016) के अनुसार, शिकायतों की जांच तीन सप्ताह के भीतर पूरी होनी चाहिए,लेकिन 19 जनवरी 2024 को दर्ज शिकायत की जांच अभी तक पूरी नहीं हुई, लिखित मे पुलिस द्वारा पत्र मिला है! जिससे संबंधित अधिकारियों की 
लापरवाही उजागर होती है। गुंडागिरी को बढावा दिऐ है! इसी तरह प्रलंबित शिकायतो के चलते नागपूर सीपी शिकायत कर्ता और डिसीपी, एसीपी संदिप बुआ रेकॉर्ड के साथ बुलाकर मिटिग लिया जांच के संबंध में सवाल पुणे तो कहा राज भोसले ने जमीन दान दिऐ है। दानपत्र कि माग किया तो उपलब्ध नही है लिखित मे पत्र दिया है! इस तरह झुठी जानकारी पेश कर सीपीआर अन्य वरीष्ठ अधिकारी को पुलिस अधिकारी संदिप बुआ ने गुमराह किया! पिडीत को न्याय से वंचित रखा! एक शिकायतों के मे संयुक्त उत्तर देते समय नियमों का उल्लंघन का भी आरोप लगाया गया है। 




उन्होंने बताया कि इस शिकायत के बारे में 01 फरवरी 2025 का लिखा पत्र 11जनवरी को प्राप्त "संयुक्त उत्तर" की बारीकी से निरीक्षण करने पर इसमें गंभीर गलतियाँ पाई गईं।  शिकायत आनेके संदर्भ किस कार्यालय से मिली कब मिली उसका नंबर जरूरी है,पत्राचार के समय पुलिस स्टेशन शिल और जावक नंबर के बिना पत्राचार किया नहीं जा सकता,पडयंत्र के चलते ऐसा किया है! कामठी निवासी व्यक्ती को फर्जी लेटरहेड पर कार्यक्रम परवानगी धारा 168 नोटीस जारी किया!और कानून का उल्लंघन करके पोलीस अधिकारी संदिप बुआ‌ द्वारा ने उस कार्यक्रम में बढा पोलीस‌ बंदोबस्त तैनात किये ऐसा आरोप है।




पोलिस बंदोबस्त कि जानकारी मागने पर व्हीआयपी बंदोबस्त दिया लिखित मे जबाब दिया लेकीन कार्यक्रम में कोई भी वीआईपी मौजूद नहीं था, फिर भी पुलिस ने वहां वीआईपी सुरक्षा मुहैया कराई,जो कि सरकारी नियमों का खुला उल्लंघन है। समाजसेवी सुषमा डबराल का आरोप है कि तहसील पुलिस द्वारा अवैध कार्यों को संरक्षण और पुलिस की निष्क्रियता बनी हुई है। तहसील थाना क्षेत्र में कई अवैध गतिविधियाँ जारी हैं,जो मदरशा रेकार्ड है नहीं मदरशा के नाम पर लाखो रुपये हेराफेरी हो रही गुंडा तत्वों ने गोरगरीब अशिक्षित का निजि घर , फर्जि मदरशा कमेटी  के नाम पर  तोड़फोड़ किया। शिकायत आज तक जाच प्रलंबित है! पुलिस थाने ने जांच किए बिना केवल संयुक्तिक उत्तर भेज दिया है। 


शिकायतकर्ता ने 04 दिसंबर 2023 को पुलिस सुरक्षा के लिए आवेदन किया था, लेकिन आज तक जांच प्रलंबित है पुलिस आयुक्त तक गइ नहीं अंतिम प्रक्रिया कैसे होगी। इसी तरह, निजी अतिक्रमण के तहत एक भूमि को "सार्वजनिक मुस्लिम क्षेत्र" के रूप में दिखाकर पुलिस तहसील क्षेत्र में गैरकानूनी व्यवसाय पुलिस निगराणी मे संचालित हो है। इस घोटाले में लाखों रुपये की हेराफेरी हो रही है। इस मामले मे गैरकानूनी तरीके से नामांतरण प्रक्रिया पूरी करने के लिए नगर निगम के नियमों का उल्लंघन किया गया। मनपा ज़ोन क्र. 7, सतरंजीपुरा के अधिकारी ने पुलिस थाने में बयान दिया है। इसतरह अवैध गतिविधियों के कई सबूत पुलिस थाने में मौजूद होने के बावजूद,अब तक पुलिस निरीक्षक संदीप बुआ ने किसी भी आरोपी के खिलाफ मामला दर्ज नहीं किया। पुलिस अधिकारी संदीप बुआ अपराधियों का सहयोग किया है और उन्हें पुलिस होने का फायदा उठाते हुऐ संरक्षण दिया है, जिससे भूमाफिया और अपराधियों का मनोबल बढ़ा है। पिडित को न्याय नही मिलता। सुषमा डबराल ने मांग की है कि पुलिस निरीक्षक संदीप बुआ के खिलाफ अनुशासनात्मक कार्रवाई की जाए, क्योंकि उन्होंने कानून का उल्लंघन कर अवैध रूप से पुलिस बंदोबस्त देकर भ्रष्टाचार किया है। पद का दुरुउपयोग किया है! दि.18/12/2024को फर्जि तरिकेसे पुलिस सुरक्षा लगाई गई उस पर पुलिस विभाग मे आम नागरिक को जितनी राशी भरने का आदेश होता इसकी जाँच की जाए और संबंधित राशि संदिप बुआ से पुलिस विभाग मे वापस की जाए और बंदोबस्त मे तैनात पुलिस कर्मचारी के सामने पुलिस कायदे का अपमान हो रहा था फिर भी जिम्मेदारी नहीं निभाई उस पर जांच करे और कर्तव्य में लापरवाही बरतने वाले पुलिस अधिकारियों पर सख्त कार्रवाई की जाए। शिकायतो का कायदेशीर निपटारा जल्दी किया जाना आवश्यकता है!गुंडागर्दी अवैध काम कि शिकायते किऐ है इसलिए जानहानी होने का डर है!

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 57 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  मंगळवार (4)  रोजी शोध पथकाने  57  प्रकरणांची नोंद करून  रु. 40,500/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून  रु.8,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु.300/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली.  दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु.1,200/- रुपयांची वसुली 
करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून रु.14,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून रु.3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून रु.10,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. महाविला अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड व भाऊसाहेब शेठे यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मयुर तिरपुडे यांनी ट्रकने वाहतूक करताना रस्त्यावर माती आणि चिखल टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले व कल्पत्रू कोचिंग क्लासेस यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत पिनॅकल कनस्ट्रकश्न्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले व जगदंबा फुल भंडार यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अतंर्गत  शक्ती होलसेल  किराणा स्टोअर्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अतंर्गत लाडे किराणा स्टोअर्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 08 प्रकरणांची नोंद करून रू. 55,000/- दंड वसूल केला.

शालार्थ आईडी घोटाला:प्रधानाचार्य तो केवल नाममात्र के हस्ताक्षरकर्ता हैं; असली साजिशकर्ता तो संस्था के निदेशक हैं? विदर्भ शिक्षक संघ का प्रश्न

[Demo Pick]  नागपुर: - विदर्भ शिक्षक संघ ने इस बात पर कड़ी नाराजगी जताई है कि राज्य में चल रहे शलार्थ आईडी घोटाले की जांच में केवल उन्हीं प्...