Monday, March 24, 2025

क्षयरोग रुग्णाविषयी डॉक्टरांनी संवेदनशील असणेची गरज डॉ.दिपक सेलोकर यांचे प्रतिपादन

नागपूर:- रुग्णालयात येणाऱ्या क्षयरोग रुग्णाविषयी डॉक्टरांनी संवेदनशील असण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी केले.मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सोमवारी (ता.24) केंद्र शासनाच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत 100 दिवसीय क्षयरोग दुरीकरण मोहिम तसेच 24 मार्च रोजीच्या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी  प्रमुख अतिथी म्हणून इंदिरा गांधी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) क्षयरोग विभाग प्रमुख प्रा. डॉ राधा मुंजे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार,  सहयोगी प्राध्यापक डॉ. ग्यानशंकर मिश्रा(मेयो)डॉ. अर्चना खाडे व सर्व झोनल वैद्यकिय अधिकारी,  टी.बी. समन्वयक यावेळी उपस्थित होते. डॉ.दिपक सेलोकर म्हणाले कीराष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण 
कार्यक्रमाविषयी गंभीरता असणे आवश्यक आहे. क्षयरोगाचे रुग्ण शोधणेत्यांच्यावर उपचार करणेया आजाराचा प्रसार होणार नाही याकरीता आवश्यक ती खबरदारी घेणेत्याकरिता गंभीररित्या देखरेख ठेवणे गरजचे आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांप्रती संवेदनशील असण्याची गरज आहे. क्षयरोगाचा आजार कमी करणे आपले उदिदष्ट असले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी इंदिरा गांधी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) क्षयरोग विभाग प्रमुख प्रा. डॉ राधा मुंजे यांनी सांगितले कीक्षयरोग या आजाराप्रती  लोकांच्या मनात चुकीची संकल्पना आहे, टीबी  हा एक जुना आजार आहे. यामुळे लोकांच्या मनात पूर्वीपासूनच टीबी बद्दल  शंका आणि भीती आहे. पूर्वीपासून टीबी  या रोगाशी सामाजिक नकारात्मकता जोडली गेली आहे. एकप्रकारे टीबी या नावाला स्टिग्मा जुडलेले आहे. यामुळे ते दूर करण्याची गरज आहे.  स्टीग्माला योग्यप्रकारे समोर गेले तर अनेक आजार कमी होऊ शकतो असे डॉ. मुंजे यांनी सांगितले. यावेळी श्रीमती सीमा पाटीलविजय डोमकावळेतुषार कावळे यावेळी उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 67 प्रकरणांची नोंद,उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  शुक्रवार (24)  रोजी शोध पथकाने  67  प्रकरणांची नोंद करून  रु.63,200/-  रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत  22  प्रकरणांची नोंद करून  रु.9,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु.300/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत  09 प्रकरणांची नोंद करून रु.3,600/- रुपयांची 
वसुली करण्यात आली.  मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 08 प्रकरणांची नोंद करून रु.17,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्यांचा कचर रस्ता, फुटपाथ मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1  प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 31 प्रकरणांची नोंद करून रु.6,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून रु.13,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.  हरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 10,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत मे. गायत्री अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  
धरमपेठ झोन अंतर्गत मे. ओ. नो. होस्टेल यांनी वसतिगृहांमध्ये अन्नपदार्थ टाकून चेंबर लाईनमध्ये अडथळा आणणे आणि हरित न्यायाधिकरण कायद्या अंतर्गत रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. माय मोमो फाक्ट्री यांनी चेंबरमध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला  प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत सरस्वती शीशू मंदीर ॲन्ड प्ले स्कूल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला.   नेहरू नगर झोन अंतर्गत मे. पाटील क्लासेस यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला व मे. कीट्स मेंटोर ग्लोबल सकुल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.  

गांधी बाग झोन अंतर्गत मे. तकदीर आईस गोला यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल
 रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला व मे. जैन स्वीट्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  आशी नगर झोन अंतर्गत श्रीमती. सोनाली तांबे यांनी अंडरग्राउंड कनेक्शनसाठी पाईपलाईन बसवण्यासाठी खोदकाम केल्याने सर्व्हिस रॉडचे नुकसान केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. मलिक फॅशन ॲन्ड लाइफ स्टाईल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 11 प्रकरणांची नोंद करून रू. 70,000/- दंड वसूल केला.

Tuesday, March 18, 2025

नगर निगम कर्मचारियों की कर्तव्यपरायणता तनावग्रस्त क्षेत्रों में तत्काल सफाई की गई

 नागपुर:- सोमवार रात मध्य नागपुर क्षेत्र में कुछ उपद्रवियों द्वारा आगजनी और तोड़फोड़ करने के बाद, नागपुर नगर निगम के ठोस अपशिष्ट प्रबंधन विभाग के कर्मचारियों ने उस रात क्षेत्र की सफाई करके कर्तव्य का उदाहरण पेश किया। नागपुर के हंसपुरी , चिटणीस पार्क , अग्रसेन चौक , शिर्के गली , भालदारपुरा , सेंट्रल एवेन्यू , मोमिनपुरा और शिवाजी पुतला इलाकों में सोमवार रात दो समूहों के बीच अचानक तनाव पैदा हो गया कई वाहन जलकर राख हो गए और कई सार्वजनिक संपत्तियों को भी नुकसान पहुंचा। सड़क पर टूटी हुई गाड़ियों की खिड़कियों के मलबे से ढकी हुई थी। वाहनों के टायरों के टुकड़े सड़क पर बिखर गए। इस सामाजिक बुराई के कारण क्षेत्र में सड़कों पर कांच, पत्थर और अन्य वस्तुएं बिखर गईं। इससे यातायात जाम हो गया। इस तनावपूर्ण स्थिति में नगर निगम के ठोस कचरा प्रबंधन विभाग के कर्मचारी रात में ड्यूटी पर नजर आए और इन असामाजिक तत्वों की हरकतों के कारण क्षेत्र की सभी सड़कों पर कचरे के ढेर जमा हो गए  इन सड़कों को यातायात के लिए उपयुक्त बनाना आवश्यक था।

नगर निगम के ठोस अपशिष्ट प्रबंधन विभाग के मुख्य सफाई अधिकारी डॉ. गजेन्द्र महल्ले ने तुरंत इस घटना पर ध्यान दिया। नगर आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी से चर्चा के बाद इस क्षेत्र में ठोस अपशिष्ट विभाग के कर्मचारियों को तुरंत तैनात करने का निर्णय लिया गया। कर्मचारियों ने इस आपातकाल के दौरान अपने कर्तव्यों का पालन किया  इस अभियान में नगर निगम के ठोस अपशिष्ट प्रबंधन विभाग के लगभग 50 कर्मचारियों ने भाग लिया। इसके कारण मंगलवार सुबह क्षेत्र में यातायात से नागरिकों को किसी प्रकार की असुविधा नहीं हुई। नगर आयुक्त एवं प्रशासक डॉ. चौधरी ने ठोस अपशिष्ट प्रबंधन विभाग के इन कर्मचारियों को बधाई दी।

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 45 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  मंगळवार (18)  रोजी शोध पथकाने  45  प्रकरणांची नोंद करून  रु. 31,300/- रुपयाचा दंड  वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 17  प्रकरणांची नोंद करून  रु.6,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु.200/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु.1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या 
अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून रु.15,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून रु.3,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून रु.4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने धरपेठ नगर झोन अंतर्गत मे.श्री. सतगुरु डेव्लपर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. नेहरू नगर झोन अतंर्गत श्री. हरी अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु.10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला व मे. मॉ वैष्णवी डेव्लपर्स यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  उपद्रव शोध पथकाने 03 प्रकरणांची नोंद करून रू. 25,000/- दंड वसूल केला. 
 

Monday, March 17, 2025

शहर के 3100 पेड़ खुल कर सांस ले सकेंगे नगर निगम शुरू करेगा विशेष अभियान

नागपुर:-  नागपुर शहर की सड़कों और फुटपाथों पर लगे पेड़  नागपुर महानगर पालिका द्वारा जीवन रक्षक प्रणाली उपलब्ध कराने के लिए महत्वपूर्ण कदम उठाए गए हैं  नगर आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी के निर्देशानुसार नगर निगम शहर में सड़कों व फुटपाथों के किनारे सीमेंट कंक्रीट से पेड़ों को हटाने के लिए विशेष अभियान चलाएगा। नगर निगम के इस अभियान से शहर के करीब 3100 पेड़ खुलकर सांस ले सकेंगे।नगर निगम मुख्यालय में डा. सोमवार (17) को पंजाबराव देशमुख स्मारक स्थायी समिति हॉल, नगर निगम में  आयुक्त डॉ. अध्यक्षता अभिजीत चौधरी ने की  बैठक आयोजित की गई। इस बैठक में अपर आयुक्त श्री. अजय चर्थनकर , मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्याय, उपायुक्त श्रीमती विजया बनकर , डॉ. रंजना लाडे , श्री. विजय देशमुख , श्री. मिलिंद मेश्राम , श्री. प्रकाश वराडे , श्री. विनोद जाधव , उपायुक्त पार्क ) श्री. 

गणेश राठौड़ , अधीक्षण अभियंता श्री. मनोज तालेवार और वृक्ष प्रजनक श्री. अमोल चौरापगर उपस्थित थे। सभी दस जोनों के अधिशासी अभियंता भी उपस्थित थे। नगर निगम के उद्यान विभाग ने शहर की सड़कों और फुटपाथों के किनारे लगे पेड़ों की गणना कराई है।  यह हो गया है । इसमें शहर की 229 सड़कों पर लगे 3,100 पेड़ शामिल हैं। सबसे अधिक पेड़ नेहरू नगर क्षेत्र में हैं, जहां 21 सड़कों पर 629 पेड़ हैं। इसके बाद मंगलवार को जोन में 40 सड़कों पर 581 पेड़ हैं। इसके अलावा, धंतोली क्षेत्र में 21 सड़कों के किनारे या फुटपाथ पर 513 पेड़ स्थित हैं। 

ये पेड़ फुटपाथ पर हैं।  सीमेंट टूटने के कारण  इसमें ख़तरा है. यह सुनिश्चित करने के प्रयास किए जाएंगे कि इन पेड़ों को पर्याप्त पानी मिले और उनकी जड़ों तक अच्छी हवा पहुंचती रहे  सीमेंट कंक्रीट और सीमेंट ब्लॉकों से घिरे पेड़ों को मुक्त किया जाएगा। इससे इन पेड़ों को पानी और हवा मिलने का रास्ता साफ हो जाएगा। इस संबंध में बॉम्बे उच्च न्यायालय की नागपुर पीठ में एक जनहित याचिका दायर की गई है। शहर के वृक्षों को जीवन देने की योजना पर जोर दिया जाएगा  पेड़ों की सुरक्षा के लिए सड़क के किनारे कुछ दूरी पर सीमेंट ब्लॉक की बाड़ लगाई जाएगी। यह सुनिश्चित करने के लिए ध्यान रखा जाएगा कि पेड़ों की जड़ों को पर्याप्त मात्रा में पानी और हवा मिले  इससे पेड़ों को कोई खतरा नहीं होगा। इससे शहर के 3100 पेड़ों को जीवन मिलेगा  


इसके अलावा बैठक में वृक्षों की सुरक्षा के लिए उठाए जाने वाले कदमों पर भी चर्चा की गई । इस दौरान वृक्षों की देखभाल के विभिन्न उपायों पर चर्चा की गई। नगर निगम आयुक्त डॉ. ने शहर में अन्य संस्थाओं के अधिकार क्षेत्र में आने वाले सड़कों पर लगे पेड़ों की जानकारी भी एकत्र करने के निर्देश दिए अभिजीत चौधरी द्वारा दिया गया। इसके लिए लोक निर्माण विभाग द्वारा विशेष डिजाइन तैयार किया जाएगा। इसमें नागपुर सुधार ट्रस्ट और लोक निर्माण विभाग की सड़कें शामिल हैं।

फार्मा उद्योगात रोजगाराच्या भरपूर संधी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसीचा पदवीदान सोहळा

नागपूर:- फार्मा उद्योगात अनेक नवे संशोधन होत आहेत. या क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील नवीन प्रयोगांवर आणि संशोधनांवर भर देण्याची गरज आहे. नागपुरात मोठ्या प्रमाणात फार्मा उद्योग येत आहेत. अनेक कंपन्यांचे काम सुरू झाले असून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार, दि. १५ मार्च) केले. नागपूरच्या लोणारा स्थित सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या औषध निर्माण शास्त्रच्या अंतिम 
बॅचचा पदवीदान सोहळा वनामतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला यावेळी हिमाचल प्रदेशचे तंत्र शिक्षण मंत्री राजेश धर्माणी, मुंबईतील अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. झहीर काझी, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी, माजी मंत्री अनिस अहमद आदींची प्रमुख उपस्थिती होती.नागपुरात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज (औषध निर्माण उद्योग) वाढत आहे.




 यामध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. या विद्यार्थ्यांनी विद्वत्ता आत्मसात करण्यासोबतच उद्यमशीलतेची कास धरून नोकरी देणारे तसेच रोजगार निर्माते बनावे. विदर्भाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे,’असे 
आवाहन श्री. नितीन गडकरी यांनी केले.ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणाले होते. शिक्षणामुळे केवळ एका विद्यार्थ्याचा विकास घडून येत नाही तर त्यामागे संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा देखील विकास होतो. एवढे सामर्थ्य ज्ञानामध्ये आहे.कोणतीही व्यक्ती तिच्या जाती-धर्माच्या आधारावर मोठी होत नाही. तर गुणांच्या आधारावर मोठी होते. त्यामुळे मुस्लिम समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाची सेवा करावी, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले.

विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्याची सुवर्णसंधी,केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर:- कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे या एकेका जिल्ह्यांत ७० ते ८० लाख लिटर्स दूध उत्पादन होते. विदर्भातील भंडारा व गोंदिया हे दोन जिल्हा सोडले तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये दूधाचे उत्पादन फार कमी होते. पण आता मदर डेअरी प्रकल्पाच्या निमित्ताने विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार, दि. १६ मार्च) केले.मराठवऱ्हाड दुग्ध उत्पादक संघटनेचा शुभारंभ तसेच धारा खाद्य तेल पॅकिंग केंद्राचे भूमिपूजन तसेच मदर डेअरीच्या बुटीबोरी स्थित मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टच्या 
कामाचा शुभारंभ ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. तेलंगखेडी मार्गावरील मदर डेअरी प्लान्ट येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी  एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, मदर डेअरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचे मनीष बंदलिश, नॅशनल डेअरी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सी.पी. देवानंद, मराठवऱ्हाड दूग्ध उत्पादक कंपनीच्या चेअरमन वर्षा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. ना.श्री. गडकरी म्हणाले,




 ‘मराठवाडा आणि विदर्भासाठी सुवर्णाक्षराने लिहिला जावा असा आजचा दिवस आहे. २०१६ पासून मदर डेअरीसोबत मिळून राज्य सरकार धवल क्रांती आणण्याचे आणि दूध उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे. कारण विदर्भातील मुख्य पिकांची अवस्था वाईट आहे. वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यांना शेतकरी आत्महत्यांनी ग्रासले. दुसरीकडे गडचिरोलीला नक्षल चळवळीने ग्रासल्यामुळे तेथील विकासाला खीळ बसली होती. मात्र, मदर डेअरीसोबत राज्य सरकारने सामंजस्य करार केला आणि योजना तयार केली. त्यानंतर मदर डेअरीने सुरू केलेले काम दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.मराठवऱ्हाड दूग्ध उत्पादक संघटनेमुळे विदर्भातील महिला शेतकरी देखील आत्मनिर्भर होतील, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी विदर्भातील दूध उत्पादन वाढण्याची गरज असल्याचे म्हटले. विदर्भात हरियाणा, पंजाब, गुजरात, राजस्थानातून गायी आणल्या जात आहेत. अशाने स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. मदर डेअरीशी जुळलेल्या ३५ हजार शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. यांच्यापैकी प्रत्येकाने पाच चांगल्या गायी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केल्या तर दूध उत्पादन वाढेल. स्थानिक लोकांनी जास्त दूध देणाऱ्या गायी तयार केल्या तर त्याचा विदर्भातील शेतकऱ्यांनाच फायदा होईल,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. मदर डेअरीने आता पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने येथील स्थानिक गो-पालकांच्या गायींच्या चांगल्या वाणांसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मदर डेअरी मार्फत पशुवैद्यकीय तज्ज्ञ एम्ब्रिओ ट्रान्सफर तसेच इन विट्रो फर्टीलायझेशन (आयव्हीएफ) सारखे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत तसेच दुग्ध उत्पादकांपर्यंत पोहोचतील अशा रीतीने प्रयत्न करावे. यामधून जवळपास प्रतिदिन 12 ते 15 लिटर दूध देणाऱ्या गाई तयार केल्या तर महाराष्ट्राला परराज्यातील गायी येथे आणण्याची गरजपडणार नाही,’ असे ना. श्री. गडकरी यांनी यावेळी नमूद केले.शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे पशुखाद्य मिळावे यासाठी मदर डेअरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले. विदर्भात कापसाची सरकी, तुर चुरी, तसेच मका मुबलक प्रमाणात आहे. यातून जिल्हानिहाय पशुधन विकसित करून ते किफायतशीर किमतीमध्ये दूध उत्पादकांना उपलब्ध करून देण्याची सूचना ना. श्री. गडकरी यांनी मदर डेअरीला केली. नेपियर ग्रासच्या माध्यमातून वर्षभर हिरवा चारा या पशुधनाला उपलब्ध करून दिल्यास दूध उत्पादनात सुद्धा वाढ होईल, असेही ते म्हणाले. मदर डेअरीच्या मार्फत नागपूर येथील सुप्रसिद्ध अशा संत्रा बर्फीचे देखील मार्केटिंग होणे आवश्यक आहे. ही बर्फी शुद्ध संत्र्याचा पल्पपासूनच तयार केली जाईल. त्यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा होईल, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.ना.श्री.गडकरी यांनी गडचिरोली आणि वाशिम या आकांक्षी जिल्ह्यांमध्ये देखील विशेष लक्ष देण्याचे आवाहन मदर डेअरीला केले.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...