नागपूर:- नागपूर
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक
पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (18) रोजी शोध पथकाने 45 प्रकरणांची नोंद करून रु. 31,300/- रुपयाचा दंड वसूल केला.
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या
परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद
करून रु.6,800/- रुपयांची वसुली करण्यात आली.
व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु.200/- रुपयांची वसुली करण्यात आली.
दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु.1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा
वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या
अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून रु.15,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर
उपद्रव व्यक्ती असल्यास 18 प्रकरणांची नोंद
करून रु.3,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून रु.4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही
कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध
पथकाने धरमपेठ नगर झोन अंतर्गत मे.श्री.
सतगुरु डेव्लपर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला.
नेहरू नगर झोन अतंर्गत श्री. हरी अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर
टाकल्याबद्दल रु.10,000/- हजार रुपयांचा दंड
वसुल केला व मे. मॉ वैष्णवी डेव्लपर्स यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा
टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 03 प्रकरणांची नोंद करून रू. 25,000/- दंड वसूल केला.
No comments:
Post a Comment