नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे
सार्वजनिक ठिकाणी
लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा
फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक
पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. (ता.25) बुधवार रोजी
शोध पथकाने 64 प्रकरणांची
नोंद करून 43,100/- रुपयाचा
दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या
परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड)
या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 10,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने
रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे
(रु. 400/- दंड)
या अंतर्गत 6 प्रकरणांची
नोंद करून 2,400/-
रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर
इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 6,000/-रुपयांची
वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद
करणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 2,500/-
रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा
रस्ता, फुटपाथ, मोकळी
जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची
नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 36 प्रकरणांची नोंद करून 7,200/-
दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 14 प्रकरणांची
नोंद करून रु. 14,000/-
चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे
यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध
पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. श्री
गणेश महालक्ष्मी रेसिडेन्सी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु.
10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. बंसाल क्लासे्स यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर
लावल्याप्रकरणी रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले.
हनुमान नगर झोन अंतर्गत मे. लाँचपाँड कोचिंग सेंटर यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर
लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.
गांधीबाग झोन अंतर्गत मे. महालक्ष्मी किराणा स्टोअर्स व मे. शोभा स्वीट्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रु. 5,000/- प्रमाणे असे एकुण रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.
के.जी.एन. स्वीट्स यांनी प्रतिबंधात्मक
प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे.
आरव प्रोव्हिजन यांनी प्रतिबंधात्मक
प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद
करून रू. 45,000/- दंड वसूल केला.
Wednesday, June 25, 2025
Monday, June 16, 2025
एनएमआरडीएने शहरालगतच्या नदी/नाल्यांची ३० जूनपूर्वी सफाई करावी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश,पावसाळापूर्वी कामांचा महानगरपालिकेत घेतला आढावा
नागपूर:-मनपाद्वारे
शहरातील नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या सफाईचे
काम जवळपास पूर्ण झाले आहे.परंतु शहरालगतच्या एनएमआरडीए क्षेत्रात या नदी/
नाल्याची साफसफाई हवी तशी झालेली नाही. ही कामे नागपूर महानगर प्रादेशिक विकास
प्राधिकरणाने (एनएमआरडीए) येत्या ३० जूनपूर्वी पूर्ण करावी,असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री
श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी(ता.१६) दिले.नागपूर शहरातील पावसाळापूर्व
कामांचा आढावा पालकमंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा मुख्यालयात घेतला. यावेळी आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार
विकास ठाकरे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.
अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, मुख्य अभियंता मनोज तालेवार, राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. जनार्दन भानुसे, उपायुक्त श्री. गणेश राठोड, श्री.
राजेश भगत यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, सर्व
कार्यकारी अभियंता उपस्थित होते.बैठकीत सर्वप्रथम मनपाचे मुख्य अभियंता मनोज
तालेवार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पावसाळापूर्व नाले व नदी सफाईच्या झालेल्या
कामांची माहिती दिली. यात शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या सफाईचे काम जवळपास पूर्ण
झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी नालेसफाई नंतरचे छायाचित्रांसह
माहिती देण्यात आली. परंतु, नागपूर
शहरालगतच्या एनएमआरडीए क्षेत्रात नाग नदी व पोहरा नदीचे पात्र आहे. शहरालगतच्या या
नद्यांच्या सफाईचे कामे एनएमआरडीएने तातडीने
करण्याची गरज असल्याचे
पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात एनएमआरडीएला सूचना देऊन ही कामे येत्या ३० जूनपूर्वी पूर्ण
करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे
यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार डॉ. नितीन
राऊत, आमदार कृष्णा खोपडे व आमदार विकास
ठाकरे यांनी नद्यांच्या काठांवर अद्यापही
गाळ साचलेला असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर पालकमंत्र्यांनी
या सूचनेची दखल घेऊन तात्काळ हा मलबा उचलण्याच्या सूचना दिल्या. पावसाळापूर्व कामे करताना लोकप्रतिनिधींना
माहिती द्यावी तसेच त्यांच्या सूचनांवर अंमलबजावणी करण्यासाठी सहायक आयुक्त व
कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यानी आमदारांसोबत झोननिहाय बैठक घेण्याचे
नियोजन येत्या १० दिवसात करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी आयुक्तांना
यावेळी दिले.# रस्त्यांचे डांबरीकरण करावे:-नागपूर
शहरातील प्रमुख रस्त्यांचे रिकार्पेटिंग करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे
यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेने नासुप्रच्या अखत्यारितील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे सुद्धा करावी, याकरिता शासनाकडून मनपाला निधी उपलब्ध करून देता येईल, याकरिता आवश्यक डीपीआर तयार करावा असे निर्देश दिले. शहराची पालक संस्था
म्हणून शहरातील संपूर्ण रस्त्यांचे रिकार्पेटिंग
करण्याची सूचना पालकमंत्री यांनी दिली.# लोकप्रतिनिधी
व प्रशासनाने समन्वय राखावा- बावनकुळे:-पावसाळापूर्व
कामे व्यवस्थित करून यावर्षी पावसाळ्यात लोकांना त्रास होणार नाही, याचीकाळजी घेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. यासाठी
अधिकारी, लोकप्रतिनिधींनी समन्वय राखून कामे
केल्यास नागरिकांना या पावसाळ्यात अतिवृष्टीचा त्रास होणार नाही, असेही
पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.# मानेवाडा-बेसा रस्त्यांची काम पूर्ण करा:-राज्य
सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे शहरातील मानेवाडा- बेसा रस्त्यांच्या कामाचे सुरू
असून हे काम पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
गैरहजर असलेल्या ४२ सफाई कामगारांवर दंडात्मक कारवाई,प्रभाग १६ मधील हजेरी स्टँडची अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्याकडून आकस्मिक पाहणी
नागपूर:-
लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक १६ मधील हजेरी स्टँडला अतिरिक्त आयुक्त श्रीमती
वसुमना पंत यांनी आकस्मिक भेट दिल्यानंतर ४२ कामगार कोणतीही सूचना न देताना गैरहजर
असल्याचे आढळून आले. या कामगारांवर १ हजार रुपयांचा ठोठावला असून यापुढे विनासूचना गैरहजर राहणार नसल्याची ताकीद देण्यात आली. अतिरिक्त आयुक्तांनी ४ हजेरी
रजिस्टर देखील जप्त केले.अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी लक्ष्मीनगर झोन
अंतर्गत प्रभाग क्र. १६ येथील हजेरी स्टँडला भेट दिली व हजेरी रजिस्टरची तपासणी
केली. यावेळी स्वच्छता निरीक्षक
श्री. राजपाल खोब्रागडे हजेरी स्टँडवर हजर होते व श्री. राहुल गजभिये, सुरेश राउत, विनय देशपांडे, परसराम
उईके व राकेश गोधारीया यांच्या हजेरी रजिस्टरची तपासणी करतांना हजेरी रजिस्टरप्रमाणे एकूण १२८ कर्मचारी स्वच्छतेच्या
कामावर कार्यरत असून कामावर प्रत्यक्ष हजर कर्मचाऱ्यांची
संख्या
८४ होती. परंतु, कोणीतीही सूचना न देता कामावर
गैरहजर असलेले ४२ कामगार आढळून आले. गैरहजर
राहिलेल्या कामगारांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर एक हजार
रुपयांचा दंड ठोठावण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्तांना दिले. यापुढे कोणतीही सूचना
न देताना गैरहजार राहणार नसल्याची ताकीद देण्यात यावी,असे निर्देश श्रीमती वसुमना पंत यांनी झोनमधील अधिकाऱ्यांना दिले.या आकस्मिक
पाहणीत २ कर्मचारी रजेवर असल्याचे आढळून आले. हे कर्मचार्यांनी रजा घेण्याची
कार्यवाही पूर्ण केली होती काय, याची
तपासणी संबंधित अधिकार्यांनी करावी, असेही
निर्देश श्रीमती पंत यांनी दिले. यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित
अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती उपायुक्त श्री. राजेश भगत यांनी दिली.उपरोक्त
प्रमाणे नमुद बाबींची तपासणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी केलेल्या
कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा.
मनपातर्फे ‘स्टॉप डायरिया कॅम्पेन’ ला सुरुवात,टास्क फोर्स समितीच्या बैठकीत अति.आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश
नागपूर:-
नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्तांच्या सभा कक्षामध्ये सोमवारी (ता. १६) टास्क
फोर्सची बैठक मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेत पार
पडली. यावेळी शहरातील आरोग्य आणि लसीकरणविषयी व ‘स्टॉप
डायरिया कॅम्पेन’ विषयी
माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी त्यांनी बालकांच्या लसीकरणावर भर देत व
दूषित पाणी असलेल्या भागांमध्ये लक्ष देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.बैठकीत
मनपाच्या प्रजानन व बालकल्याण
अधिकारी डॉ. सरला लाड, मुख्य
स्वच्छता अधिकारी श्री. गजेंद्र महल्ले, झोनल
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शीतल वंदिले, डॉ.
सुलभा शेंडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ.
ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ.
सुनील कांबळे, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ.
गजानन पवाने, डॉ. अतीक खान, पीएचएन अर्चना खाडे, लायन्स
क्लबचे श्री. बलबीर सिंग विज यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक व प्रतिनिधी
प्रामुख्याने उपस्थित होते.बैठकीत सर्वप्रथम प्रजानन
व बालकल्याण अधिकारी डॉ सरला लाड यांनी संगणकीय
सादरीकरणाद्वारे झोननिहाय करण्यात आलेल्या नियमित लसीकरणाची स्थिती मांडली. नवजात
बालकांपासून ते गरोदर मातांना विविध प्रकारचे लसीकरण केले जात
असल्याचे सांगत या
लसींपासून कुणीही माता आणि बालक वंचित राहू नये यावर भर देण्यात आला. जास्तीत
जास्त ठिकाणी जाऊन वंचित बालकांचे लसीकरण करण्याची गती वाढविणे असे निर्देश
श्रीमती वसुमना पंत यांनी यावेळी दिले.यानंतर ‘स्टॉप
डायरिया कॅम्पेन’ विषयी
चर्चा करण्यात आली. ही मोहीम ०२ जून २०२५ ते ३१ जुलै २०२५ या दरम्यान राबविण्यात
येत आहे. त्यानुसार १६ जून पासून हा कार्यक्रम लागू करण्यात आला आहे. अतिसारामुळे
होणारे बालमृत्यू शून्यावर आणणे हे या मोहिमेचे ध्येय आहे. ‘अतिसारावर करा मात, स्वच्छता
आणि ओआरएसची घेऊनी साथ’ हे
या मोहिमेचे घोषवाक्य आहे. या मोहिमेदरम्यान मनपाच्या आरोग्य विभागातर्फे झोननिहाय
ठिकठिकाणी जाऊन ओआरएस आणि झिंक चे वाटप करण्यात येत आहे. तसेच झोपडपट्ट्या,वीटभट्टी व पूरग्रस्त भागात जाऊन दुर्बल घटकांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यस्थापनेसाठी पालकांचे समुपदेशन
करण्यात येत आहे. मनपातर्फे सर्वत्र निर्जंतुकीकरण व स्वच्छतेचे महत्व सांगण्यात
येत आहे.मनपाच्या आरोग्य विभागातर्फे शाळा- शाळांमध्ये जाऊन हात धुण्याचे
प्रात्यक्षिके, स्वच्छतेचे महत्व, ओआरएस ची माहिती देण्यात येणार आहे. याच्या
उपाययोजनेअंतर्गत सर्वत्र स्वच्छता ठेवावी, दूषित
पाणी असलेल्या भागांमध्ये लक्ष द्यावे, पिण्याच्या
पाण्याची तपासणी करून त्याचे रिपोर्ट द्यावे असे निर्देश यावेळी श्रीमती पंत यांनी
अधिकाऱ्यांना दिले.
अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांनी महिला शिलाई क्लस्टर विकास प्रकल्पाला भेट
नागपूर:-
सीताबर्डी महिला शिलाई क्लस्टर विकास प्रकल्पाने महिला सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण
प्रगती केली आहे. कौशल्य विकास आणि आर्थिक संधींद्वारे महिलांना आत्मनिर्भर
बनवण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाला मनपाच्या
अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांनी सोमवारी (ता.१६) भेट दिली. यावेळी
मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.अतिरिक्त
आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांनी महिला शिलाई क्लस्टर विकास प्रकल्पात काम
करणाऱ्या महिला कारागिरांचे अनुभव जाणून घेतले आणि प्रकल्पाच्या प्रगतीचे कौतुक
केले. त्यांच्या भेटीमुळे महिला प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहन मिळाले आणि
प्रकल्पाच्या यशस्वीतेबद्दल आत्मविश्वास वाढला. या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन
मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले होते.# प्रशिक्षण आणि कौशल्य विकास:- युनिफॉर्म
शिलाई प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला मौल्यवान कौशल्ये आत्मसात करत
आहेत. अभ्यासक्रमानुसार त्यांना मूलभूत शिलाई पद्धती शिकवण्यात आल्या, ज्यामुळे त्यांना शिवणकामाच्या मशीनचा वेग आणि
कार्यपद्धतीची सवय झाली. नऊ आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर, प्रशिक्षणार्थींनी शर्ट, पॅन्ट आणि सलवार कुर्ती बनवण्याचे कौशल्य
यशस्वीरित्या आत्मसात केले आहे. शिलाई व्यतिरिक्त, या
कार्यक्रमात संवाद कौशल्ये, नेतृत्व
आणि व्यवसाय प्रक्रिया यावरही प्रशिक्षण दिले जात आहे,# बॅच १ आणि बॅच २ ची प्रगती:- बॅच १ मध्ये ३० प्रशिक्षणार्थी होते, ज्यांचे प्रशिक्षण २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू झाले
आणि २४ मे २०२५ रोजी पूर्ण झाले. सध्या बॅच २ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, ज्यात २३ प्रवेश पूर्ण झाले आहेत. प्रत्येक बॅचमध्ये
एकूण ३० लाभार्थी असण्याचे उद्दिष्ट असून, उर्वरित
प्रवेश २० जून २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.# वाढत्या ऑर्डर्स आणि प्रेरणा:- या
प्रकल्पाला अनेक ऑर्डर्स मिळाल्या आहेत, ज्यामुळे
सहभागींची प्रेरणा वाढली आहे आणि क्लस्टरमध्ये त्यांचे टिकून राहणे सुनिश्चित झाले
आहे. सकर फेअर इनकॉर्पोरेटेडकडून पहिली ऑर्डर मिळाली आहे, तर नेताजी मार्केट एनएमसी शाळा आणि शिवशक्ती
एंटरप्रायझेस कडून युनिफॉर्मच्या लागोपाठ ऑर्डर्स मिळाल्या आहेत. एनएमसी शाळेसाठी
३८ रेग्युलर युनिफॉर्म आणि स्काउट गाईड युनिफॉर्मचे सेट्स तयार झाले असून, ते १६ जून २०२५ रोजी वितरित येत आहे. तसेच, शिवशक्ती एंटरप्रायझेससाठी शाळेच्या युनिफॉर्मच्या
उप-ऑर्डर्सवर सध्या प्रक्रिया सुरू आहे.व्यापक सहाय्य आणि भविष्यातील योजना:- व्यावसायिक प्रशिक्षणाव्यतिरिक्त, हा प्रकल्प लाभार्थ्यांना समुपदेशन सेवांद्वारे
वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत करतो. सामान्य जागरूकता
सत्रांद्वारे लाभार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना उपलब्ध सरकारी कल्याणकारी
योजनांबद्दल माहिती दिली जाते आणि त्यांना या योजनांशी जोडण्याचे प्रयत्न केले
जातात. शिलाई क्लस्टरसाठी नवीन ऑर्डर्स मिळवण्यासाठी बाजार संशोधन समांतरपणे सुरू
आहे, ज्यामुळे त्याची सतत वाढ आणि स्थिरता
सुनिश्चित होईल.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ४७ प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर:-नागपूर
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ७९ मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर
करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. सोमवार (ता.१६) रोजी शोध पथकाने ४७
प्रकरणांची नोंद करून ३८,२००/-
रुपयाचा दंड वसूल केला.हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता
(रु. ४०० /- दंड) या अंतर्गत १२ प्रकरणांची नोंद करून ४८००/- रुपयांची वसुली
करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे(रू.१००/-दंड)या
अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १००/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने
रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. ४००/- दंड) या
अंतर्गत ०८ प्रकरणांची नोंद करून ३२००/- रुपयांची वसुली करण्यात आली.
मॉल,उपहारगृहे,लॉजिंग, बोर्डिंगचे हॉटेल सिनेमाहॉल,मंगल कार्यालये, कॅटरर्स
सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्त्यावर कचरा टाकणे (रू.२,०००/-) या अंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ६,०००/-
रूपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद
करणे या अंतर्गत ०८ प्रकरणांची नोंद करून ७५००/- रुपयांची वसुली करण्यात आली.
वर्कशॉप, गराज, व इतर दुरुस्तीचे व्यावसायीकांने रस्ता, फुटपाथ, मोकळी
जागा, अशा ठिकाणी कचरा
टाकणे(रू.१०००/-दंड) या अंतर्गत ०१ प्रकरणाची नोंद करून १०००/- रुपयांचा दंड वसूल
करण्यात आला. चिकन सेंटर, मटन
विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी अशा कचरा टाकणे(रू.१०००/-दंड)
या
अंतर्गत ०१ प्रकरणाची नोंद करून १०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त
यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १३ प्रकरणांची नोंद करून २६००/-दंड
वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास १२
प्रकरणांची नोंद करून १२,०००/-
दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे
यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत
येणाऱ्या मे. शिवपुत्र अपार्टमेन्ट आणि मे. आर्क हेरिटेज अपार्टमेन्ट यांच्याकडून
रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकल्या प्रकरणी प्रत्येकी १०,००० असे एकूण रु.२०,०००/-
रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या मे. बालाजी होम
मेकर्स बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स यांच्याकडून रस्त्यालगत बांधकाम साहित्य
टाकल्याप्रकरणी रू. १०,०००
चा दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत येणाऱ्या मे.रिषभ बिल्डर्स
यांच्याकडून रस्त्यालगत बांधकाम साहित्य टाकल्या प्रकरणी रू. १०,००० चा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत पुरूषोत्तम ढवळे यांच्याकडून
प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याप्रकरणी रू.५,००० चा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. डिव्हाईन होम्ज डॉट कॉम यांनी
विनापरवानगी विदयुत खांबावर फलक लावल्याबददल रू.५,०००/-
ची वसुली करण्यात आली. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. क्रिष्णा स्वीटस यांच्याकडून
प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याप्रकरणी रू.५,००० दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत मे. शाहु किराणा यांच्याकडू
यांच्याकडून प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याप्रकरणी रू.५,००० दंड वसूल करण्यात आला. भुपेंद्र कुकरेजा यांच्याकडून रस्त्यालगत कचरा
बांधून ठेवल्याप्रकरणी रू.५०००/- दंड वसूल करण्यात आला. असे एकूण ९ प्रकरणात रू.६५,००० हजार दंड वसूल करण्यात आला.
Friday, June 6, 2025
सौरऊर्जेवरील उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास
नागपूर-
शेतकऱ्यांसाठी पाणी हा कळीचा मुद्दा आहे. त्यांना नियमीत पाणी मिळाले तर केवळ
शेतीचाच प्रश्न सुटणार नाही, तर गावातील एकूणच समस्या
मार्गी लागतील. मुरादपूर उपसा सिंचन योजना आजपासून लोकांच्या सेवेत अर्पण करण्यात
आली आहे. सौरऊर्जेवरील ही उपसा सिंचन योजना या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार
आहे, असा विश्वास केंद्रीय
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.उमरेड
तालुक्यातील वडगाव जलाशयावर (वेणा नदीवरील) सौर ऊर्जेवर संचालित मुरादपूर उपसा
सिंचन योजनेचे ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी खासदार
श्यामकुमार बर्वे, आमदार संजय मेश्राम, माजी आमदार सुधीर पारवे, सरपंच दुर्गा आलाम, उपसरपंच गजानन गाडगे, आदिवासी विभागाचे
उपसंचालक श्री. चव्हाण, मानस उद्योग समूहाचे
उपाध्यक्ष जयकुमार वर्मा, उपाध्यक्ष आनंदराव राऊत
आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.ना. श्री. गडकरी म्हणाले,
'बऱ्याच दिवसांपासून या भागात अश्या प्रकल्पासाठी
आम्ही प्रयत्नरत होतो. या विभागातील निवृत्त मुख्य अभियंता श्री. जनबंधू या
प्रकल्पाचा प्रस्ताव घेऊन माझ्याकडे आले. त्यानंतर याचे काम सुरू झाले.
सौरऊर्जेमुळे जे पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार आहे, त्यातून शेतकऱ्यांना दोन ते तीन पिके घेता येणार आहेत. यातून शेतकऱ्यांचे
उत्पन्न वाढणार आहे.या भागात ५३ टक्के आदिवासी लोक राहतात. हा परिसर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास
आहे. त्यामुळे या समाजासह येथील एकूणच सर्वसामान्य लोकांचे जगणे सुसह्य करणे
गरजेचे आहे.
त्यादृष्टीने पं. दिनदयाल उपाध्याय यांनी दिलेला अंत्योदयचा संदेश
घेऊन आम्ही काम करतोय. समाजातील उपेक्षित वर्गाला परमेश्वर मानून त्याची निरंतर
सेवा केली पाहिजे, हे त्यांचे सामाजिक-आर्थिक
चिंतन आम्ही जोपासले आहे, याचाही ना. श्री. गडकरी
यांनी उल्लेख केला.या पाण्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होणार आहे. ऊस, मका, धानासारखे नगदी पिक
लावून नफा मिळविण्यासाठी जनकल्याण समितीने लक्ष घालण्याची गरज आहे. शेतकऱ्याला
उत्तम भाव मिळाला पाहिजे. त्याच्या उत्पादनांची गुणवत्ता चांगली असायला पाहिजे.
त्यातून त्याचा विकास साधता आला पाहिजे, हाच यामागचा उद्देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे, आता फार्मर प्रोड्युस कंपनी तयार करावी, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले. एक ट्रॅक्टर घेऊन संपूर्ण गावातील
वखरणी एकाच ट्रॅक्टरने करा.
द्रोणने स्प्रेयींग करा. यातून एकरी पाच ते सहा हजार
रुपयांची बचत होईल. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती केली तर उत्पादन वाढेल आणि
नफाही वाढेल, असेही ते म्हणाले.शंभर
कोटी रुपयांमध्ये दहा एकर जागेवर स्मार्ट व्हिलेज बांधायला घेतले आहे. लवकरच या
प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. ४०० लोकांनी घरांसाठी नोंदणीही केली आहे. यात एक
हजार लोकांना घरे देणार आहोत. ४५० चौरस फुटाचे घर, सिमेंटचे रस्ते, आयुष्यभर पाणी आणि वीज
मोफत देण्याचा प्रयत्न आहे. याठिकाणी खेळाचे मैदान आणि उद्यानही असेल, अशी माहिती ना. श्री. गडकरी यांनी दिली.रामा डॅमच्या जलाशयात तरंगते सोलर
पॅनल्स,प्रत्येकाच्या क्षेत्रात ठिबक सिंचनाची सोय,एका कंट्रोल रूममधून संपूर्ण
क्षेत्रात पाणीवाटप,संपूर्ण प्रकल्पावर पाणीवापर संस्थेचे नियंत्रण,सोलर पॅनलद्वारे वीज
निर्मिती होईल व ते एमएसईबीला जोडले जाणार असल्यामुळे योजनेवरील वीज बिलाचा भार
कमी राहणार,मुरादपूर प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करून शेतकऱ्यांना ठिबक
सिंचनाद्वारे शेतीकरिता पाणी वापरता येणार आहे.या प्रकल्पात वडगाव धरणाचे पाणी
जॅकवेलमधून पंपाद्वारे उचलून एम.एस. पाईपलाईन द्वारे डिलीव्हरी चेंबर -1 ला पोहोचवले जाणार आहे. त्यानंतर डिलीव्हरी चेंबर क्र.-1 ते डिलीव्हरी चेंबर क्र.-2 ला गुरुत्वाकर्षणाद्वारे
पाणी पोहोचवले जाईल.डिलीव्हरी चेंबर क्र.-1 व डिलीव्हरी चेंबर क्र.-2 ला पाणी पोहोचल्यानंतर
डिलीव्हरी चेंबर क्र.1 व क्र. 2 वर बसविण्यात आलेल्या 20 एच.पी.च्या पंपाद्वारे
शेतीला ठिबक सिंचन करण्यात येईल. यामुळे 465 एकर शेतजमीनीला बारमाही पाणी उपलब्ध होईल.गावातील 465 एकर शेतजमिनीसाठी बारमाही पाणी वडगाव जलाशयातून उचल
करता येणार आहे. या प्रकल्पात 270 केव्हीए क्षमतेचे तरंगते
सौर ऊर्जा पॅनल्स आहेत. या सौर पॅनलमुळे जवळपास प्रतिदिन 1080 युनिट उर्जा निर्माण होणार आहे. निर्माण झालेल्या
उर्जेमुळे प्रकल्पावरील सर्व पंप व विजेवरील सर्व उपकरणे विनाशुल्क चालविण्यात
येणार आहेत.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन
नागपूर:- हिंदवी
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमात सर्वप्रथम
मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी.
अतिरिक्त आयुक्त श्री.अजय चारठाणकर, उपायुक्त श्रीमती विजया
बनकर, परिवहन अधिकारी श्री. विनोद जाधव, सहायक आयुक्त. श्री.श्याम कापसे, श्रीमती सुर्वणा
दखने, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बाराहाते यांनी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण केले. तसेच महापौर कक्षातील
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्रास अभिवादन करीत पुष्प अर्पण केले.
याप्रसंगी साप्रविचे अधीक्षक श्री. राजकुमार मेश्राम, जनसंपर्क
अधिकारी श्री. मनिष सोनी, सर्वश्री अमोल
तपासे, प्रमोद हिवसे, प्रशांत भेंडे,
परिमल इनामदार, विनय बगले, शैलेश जांभूळकर, प्रमोद बारई, संध्या
डाखोरे, अनिता पाटील यांच्यासह मनपाचे कर्मचारी उपस्थित
होते.
पर्यावरण संरक्षण हेतु प्रभावी जन जागरूकता पहल
नागपुर:- विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर गुरूवार 5 जून को महाराजबाग चिड़ियाघर, नागपुर में एक विशेष जागरूकता कार्यक्रम
का आयोजन किया गया। यह कार्यक्रम नगर निगम और सेंटर फॉर सस्टेनेबल
डेवलपमेंट एनजीओ द्वारा संयुक्त रूप से आयोजित किया गया था।कार्यक्रम में वृक्षारोपण कार्यक्रम, नुक्कड़ नाटक
प्रस्तुति और पर्यावरण जागरूकता अभियान शामिल थे। नुक्कड़ नाटक के माध्यम से गीले और सूखे कचरे को अलग-अलग करने, प्लास्टिक के
सीमित उपयोग और वायु प्रदूषण को रोकने के उपायों पर
प्रभावी संदेश दिया गया।
नुक्कड़ नाटक के माध्यम से संदेश दिया गया कि 'अगर हमें
पर्यावरण को बचाना है, तो इसकी शुरुआत हमारे घर के दरवाजे से
होनी चाहिए। पेड़
लगाओ, पेड़ बचाओ का नारा दर्शकों पर खूब
छाया रहा। कार्यक्रम की अध्यक्षता डॉ. अभिजीत मोटघरे , पशु चिकित्सा अधिकारी , महाराजबाग चिड़ियाघर ,नागपुर ने की, जबकि मुख्य अतिथि डॉ. भावना
वानखेड़े , पशुपालन और डेयरी विभाग, कृषि महाविद्यालय , नागपुर थीं। कार्यक्रम में महाराजबाग प्राणी संग्रहालय , नागपुर के क्यूरेटर
श्री दरवड़े, कमला नेहरू कॉलेज, नागपुर की विज्ञान विभागाध्यक्ष श्रीमती नेहा ठाकुर ने भाग लिया ।
कार्यक्रम का संचालन प्राजक्ता
तांडले, शिक्षा
अधिकारी/जीवविज्ञानी , महाराजबाग चिड़ियाघर , नागपुर ने किया, जबकि पशुधन पर्यवेक्षक श्री महेश
पांडे ने सभी कलाकारों और दर्शकों का आभार व्यक्त किया। यह कार्यक्रम डॉ. एस.एस. बावस्कर , प्रभारी अधिकारी, महाराजबाग
चिड़ियाघर , नागपुर के मार्गदर्शन में आयोजित किया गया था । कार्यक्रम को
नागरिकों से भारी प्रतिक्रिया मिली और यह पर्यावरण जागरूकता बढ़ाने का एक प्रभावी
प्रयास था।
Subscribe to:
Comments (Atom)
भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन
मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...
-
नागपुर:- केंद्र सरकार ने जमीन-जायदाद खरीदी-बिक्री से जुड़े किसी भी गति विधी के लिए महारेरा एक्ट के साथ बार कोड की भी अनिवार्यता लागू की,लेकि...
-
आकाशवाणी नागपुर केन्द्र में संविधान निर्माता विश्वभूषण डा. बाबासाहेब अम्बेडकर की जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई। पिछले वर्ष से ही आकाशवाणी...


.jpeg)


.jpeg)


.jpeg)







.jpeg)

