Saturday, February 15, 2025

नागपूरच्या केंद्रीय एकीकृत व्यवस्थापन केंद्राद्वारे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी 5 दिवसीय मानव संसाधन विकास कार्यक्रमाचे आयोजन

 नागपूर:- केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वनस्पती संरक्षण संग्रहण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या नवीन सचिवालय सिविल लाईन स्थित केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील तसेच मध्य प्रदेशातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी  तसेच कृषी विस्तार अधिकाऱ्यांसाठी एकीकृत कीड व्यवस्थापनावर मानव संसाधन विकास कार्यक्रमांतर्गत 5 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन 14 फेब्रुवारी रोजी  नवीन सचिवालय भवन येथे करण्यात आले. याप्रसंगी फरीदाबाद येथील एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या संयुक्त संचालक स्मिता पांडे, केंद्रीय कापूस संशोधन संस्था - सीआयसीआर नागपूरच्या वनस्पती संरक्षण विभागाचे प्रमुख गणेश बेहरे, नागपूरच्या कृषी विभागाचे सहसंचालक यु. आर. घाटगे, लेखा आणि वेतन कार्यालय नागपूरचे प्रमुख लेखा 
अधिकारी मिलिंद रामटेके  उपस्थित होते याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या संयुक्त संचालक स्मिता पांडे त्यांनी 'नॅशनल पेस्ट सर्वेलन्स सिस्टीम-एनपीएसएस' विषयी माहिती दिली. या ॲपच्या आधारे आपल्या शेतातील पिकांचा फोटो अपलोड करून या पिकावर कोणती कीटकनाशके वापरली पाहिजे याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळतं. 
या ॲपचा  फायदा शेतक-यांना मिळण्याकरीता  प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन अधिकाऱ्यांनी  शेतकऱ्यांपुढे या ॲपचे सादरीकरण तसेच प्रात्यक्षिक करण्याचे आवाहन त्यांनी केले .नागपुरातील क्षेत्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्रांच्या अंतर्गत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश गोवा, गुजरात या पाच राज्यातील राज्यशासनातील कृषी अधिका-यांना  कीड व्यवस्थापनाबाबतचे दीर्घकालीन तसेच अल्पकालीन अवधीचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती डॉ.ए.के.बोहरिया यांनी दिली.नागपूरच्या कृषी विभागाचे सहसंचालक यु आर घाटगे यांनी   खताच्या तसेच कीटकनाशक आणि तणनाशकांच्या वापरासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे तंत्र समजावून घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे जैविक खतांचा देखील वापर करणे गरजेचे असल्याचे  अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले. पिकांच्या नुकसानीसाठी कारणीभूत असलेल्या किडीच्या वेळीच प्रतिबंधासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा देखील वापर केला जात असून किडीचे प्रमाण , त्यांची संख्या यांची तपशीलवार माहिती तंत्रज्ञानाद्वारे मिळते  असे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे वनस्पती  संरक्षण विभागाचे प्रमुख गणेश बेहरे यांनी यावेळी सांगितले. 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत  चालणाऱ्या या पाच दिवसाच्या  प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कृषी अधिकाऱ्यांना जैविक नियंत्रणाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचावे याचे प्रात्यक्षिक अभ्यास त्याचप्रमाणे व्याख्यानयांच्याद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूरद्वारे शेतकऱ्यांना कीड व्यवस्थापन करिता यांत्रिक पद्धतीमध्ये सापळ्यांची रचना,रासायनिक नियंत्रणासाठी निंबोळी अर्कासारख्या कीटनाशकाची निवडत्याचप्रमाणे जैविक नियंत्रणासाठी मित्र कीटकांच्या व्यवस्थापनात बाबत शास्त्रोक्त पद्धतीने माहिती दिली जात असून शेतकऱ्यांना कीटकनाशकांची निवड कशी करावी याबाबत देखील मार्गदर्शन केले जाते.

Tuesday, February 11, 2025

मनपाद्वारे सिवर लाईन स्वच्छतेसाठी शंभर टक्के यांत्रिकी पद्धतीचा उपयोग लवकरच आणखी सक्शन कम जेटिंग मशीनचा सेवेत समावेश

नागपूर:- नागपूर शहरातील सिवर लाईन तसेच गडर लाईनच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शंभर टक्के यांत्रिकी पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. गडर लाईन चोकेजच्या प्राप्त तक्रारींवर निराकरणासाठी मनपाद्वारे मनुष्यबळाचा वापर पूर्णत: बंद करण्यात आलेला आहे.  त्याऐवजी सक्शन कम जेटिंग मशीनद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार मनुष्यबळाच्या वापराद्वारे गडर लाईन स्वच्छता न करण्याच्या कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. नागपूर शहरातील मोठ्या प्रशस्त वस्त्यांसोबत छोट्या दाटीवाटीच्या वस्त्यांमध्येही यांत्रिकी पद्धतीद्वारेच सिवर लाईन स्वच्छतेचे कार्य केले जाते. यासाठी नागपूर महानगरपालिकेकडे स्वत:च्या मालकीच्या ११ सक्शन कम जेटिंग मशीन आहेत. याशिवाय भाडेतत्वावर ६ मोठ्या आणि ५ लहान अशा ११ मशीन देखील सेवेत दाखल आहेत. मोठे रस्ते तसेच मुबलक 
जागा असलेल्या ठिकाणी मोठ्या मशीनद्वारे आणि निमुळते रस्ते तसेच दाटीवाटीच्या वस्त्यांमधील स्वच्छतेसाठी छोट्या मशीनचा वापर करण्यात येतो. या मशीनद्वारे नागपूर महानगरपालिकेसोबतच नागपूर सुधार प्रन्यास आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेद्वारे विकसीत भागातही सेवा दिली जाते. नागपूर सुधार प्रन्यास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे विकसीत बहुतांश भागांमध्ये सेप्टिक टँकची संख्या जास्त आहे. अशा ठिकाणी नागपूर महानगरपालिकेच्या सक्शन कम जेटिंग मशीनद्वारे स्वच्छता केली जाते. ऑक्टोबर २०२४ पासून ७ फेब्रुवारीपर्यंत मनपाकडे सिवर लाईन चोकेजच्या एकूण ८९५७२ तक्रारी प्राप्त झाल्या

असून यापैकी ८८६१३ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. ९५१ तक्रारींवर सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागामार्फत सिवर लाईन चोकेज दुरुस्ती तसेच नवीन लाईन टाकण्याचे काम सुरु आहेअशी माहिती उपायुक्त श्री. विजय देशमुख यांनी दिली आहे.शहरात अनेक ठिकाणच्या सिवर लाईन अत्यंत जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे अशा भागांमध्ये सिवर लाईन चोकेजच्या तक्रारी वाढत आहेत. अशा ठिकाणी जलद गतीने सेवा देण्यात यावी याकरिता  सक्शन कम जेटिंग मशीनचा लवकरच सेवेमध्ये समावेश करण्याबाबत मनपा प्रयत्नशील आहेअसेही श्री. देशमुख यांनी सांगितले. जुन्या आणि जीर्ण झालेल्या सिवर लाईनची  क्षमता कमी असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा स्थितीत अमृत योजनेंतर्गत जुन्या लाईन बदलण्याचा महत्वाचा निर्णय नागपूर महानगरपालिकेद्वारे घेण्यात आला आहे. भविष्यातील सुविधेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. नवीन लाईनमुळे सिवेज क्षमता वाढेल व यासंदर्भातील तक्रारी देखील कमी होतीलअसा विश्वासही श्री. विजय देशमुख यांनी व्यक्त केला.नागपूर सुधार प्रन्यासद्वारे ज्या भागांमध्ये जुन्या सिवर लाईन टाकण्यात आलेल्या आहेत. त्या भागातील लाईन बदलून नवीन लाईन टाकण्याबाबत प्रन्यास सोबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना पुण्यतिथी निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन

 
नागपूर ता. ११ : 'एकात्म मानव दर्शनअंत्योदयचे प्रणेते पंडीत दीनदयाल यांच्या पुण्यतिथी निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील दालनात पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी उपायुक्त श्री. विजय देशमुखवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरमुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्लेजनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनीकार्यकारी अभियंता श्री. राजेश गुरमुळेश्री. अमोल तपासेप्रकाश खानझोडे आदी उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 58 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

 नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर,  थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (11) रोजी शोध पथकाने 58 प्रकरणांची नोंद करून 43,500/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया,  स्टॉल्स,  पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 5,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 5प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा 
हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 14,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकवू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 2,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 6,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. 
हरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 5,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. रेणुका बिल्डर्स नी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत संजय नेरकर यांनी अन्न साहित्याचा कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. श्रीराम मानव सेवा समाज यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. पंकज सेल्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. मलिका फॅशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 4 प्रकरणांची नोंद करून रू. 30,000/- दंड वसूल केला.

शिक्षणोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास -माननीय शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले

नागपूर:- विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात अशा सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या  शिक्षणोत्सवाचा पंधरवाडा हा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरला असल्याचे प्रतिपादन माननीय शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले यांनी केले.नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सोमवारी (ता. १० फेब्रुवारी) शिक्षणोत्सव २०२४-२५’ चा समारोपाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी होते. मंचावर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल,  शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामसहायक आयुक्त श्री नरेंद्र बावनकर, क्रीडा अधिकारी श्री पियूष आंबुलकर, क्रीडा नियंत्रण अधिकारी नियंत्रण अधिकारी श्री. नितीन भोळे, शिक्षक संघाचे सचिव श्री देवराव मांडवकर, सहायक 
शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, श्री. संजय दिघोरे, मुख्य समन्वयक विनय बगले, अनिता भोतमांगे, प्रशांत टेंभुर्णे व इतर उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणोत्सवामध्ये आयोजित विविध सांस्कृतिक क्रीडा आणि इतर स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित शिक्षणोत्सव २०२४-२५ अंतर्गत
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी 22 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.शिक्षणोत्सव २०२४-२५’ चा  समारोपाप्रसंगी मा. आमदार श्री सुधाकर अडबाले म्हणाले कीनवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा कला गुणांचा आणि त्यांच्या सुप्त गुणांचा अधिक विकास होणार आहे. विद्यार्थ्यांना मोठे व्हायचे असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर चांगले विद्यार्थी घडू शकतात. विद्यार्थ्यांचा विकास करायचा असेल तर चार भितींच्या बाहेर जाऊन विकास करायला हवा असेही ते म्हणाले. विद्यार्थी हा आपला केंद्र असून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणे महत्वाचे आहे असेही ते म्हणाले. महानगरपालिकेची शाळा उच्च दर्जाची होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त




केला. या महिन्यात परीक्षा सुरु होणार असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षेला समोरे जावे असे मार्गदर्शन सुद्धा केले.अध्यक्षीय भाषणात मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी म्हणाले की, शिक्षणोत्सव अंतर्गत चांगल्या दर्जाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आले. जिंकणे किंवा हरणे हा शिक्षणोत्सवाचा उद्देश नाही तर सर्वांचा अधिकाधिक सहभाग वाढला पाहिजे. दैनंदिन शैक्षणिक कार्यासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हा त्या मागचा उद्देश आहे. शिक्षणोत्सव अंतर्गत सहभागी असलेले सर्वजण विजेते आहेत, शिक्षणोत्सवक्रीडा महोत्सव सारखे उपक्रम राबवून सांघिक भावना निर्माण होते शिवाय अपयशातून बाहेर कसे यावेहेही विद्यार्थ्यांना अशा उपक्रमातून शिकता येते. 
सुदृढ आणि संतुलित व्यक्ती बनण्यासाठी असे उपक्रम हातभार लावत असतात. पुढील शिक्षणोत्सव अधिक चांगल्या रितीने करू असाही विश्वास आयुक्तांनी दाखविला. शाळा विकासासाठी शिक्षक हा महत्वाचा घटक आहे. याकरिता शाळांचे मुल्यमापन केले जाईल. ज्या शाळा उत्कृष्टरित्या कार्य करतील अशा शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा सत्कार महानगरपालिकातर्फे करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यातून हेल्थी स्पर्धा सुरु होईल असा विश्वासही आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला.यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल म्हणाल्या कीगेल्या दीड वर्षांपासून शाळा आणि विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. शाळा सर्वेपायाभूत विकासडिजिटल क्लासरुमनव्या क्रीडा आणि संगीत शिक्षकांची




नियुक्ती यामुळे शाळांमध्ये मोठे बदल होत आहेत. एक नवीन ऊर्जा तयार झाली आहे,. आम्ही एक नवीन चेतना निर्माण  करण्यात यशस्वी झालो आहोत. यामुळे शाळांच्या पटसंख्येत निश्चित वाढ होणार आहे. वर्गात शिस्त शिकता येते परंतू शिक्षणाशिवाय विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष फिल्डवर विद्यार्थी टीमवर्क
यशस्वी होण्याकरिता आणि चारित्र बांधणीकरीता आवश्यक असलेले गुण शिकू शकतात. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह महानगरपालिका शाळाचाही आत्मविश्वास वाढेल असेही श्रीमती आंचल गोयल यावेळी म्हणाल्या. परीक्षेची चांगली तयारी करा अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिल्यात.प्रास्ताविक शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी केलेसूत्रसंचालन मधु पराडशुभांगी पोहरेप्रतिभा लोखंडे यांनी केलेतर आभार शिक्षणोत्सवचे मुख्य समन्वयक श्री. विनय बगले यांनी मानले. सोमवारी (ता. १० फेब्रुवारी) रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शिक्षणोत्सवाचा समारोप झाला. कार्यक्रमात सुरुवातीला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरेश भट सभागृहात आर्ट गॅलरी येथे चित्रकलाहस्तकला स्पर्धेतील उत्क़ृष्ट चित्र मॉडेल आणि विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी  प्रदर्शनीचे पाहणी केलीविद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी स्वतः पेंटींग करत मुलांचा उत्साह वाढला. त्यानंतर सभागृहात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाले.  जयताळा मनपा शाळा विद्यार्थ्यांमार्फत स्वागत गीत सादर करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाई फुलेसरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी शिक्षणोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची व स्पर्धांची चित्रफित दाखविण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक स्पर्धेतील उत्कृष्ट समुहगान व नृत्याचे  सादरीकरण करण्यात आले.  समूहगीत एम.ए.के आझाद (9ते11) आणि पारडी मराठी उच्च प्राथमिक उच्च माध्यमिक शाळा (6ते8) यांनी सादर केले. लोकनृत्य पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळातर्फे सादर करण्यात आले.यावेळी मार्च २०२३ आणि २०२४ इयत्ता १०वी व १२वी मध्ये शाखानिहाय तसेच माध्यमनिहाय सर्व प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड कॉईन व २५००० चे धनादेश देऊन गुणगौरव करण्यात आला.  त्यानंतर बौध्दीक स्पर्धेतील ६ स्पर्धामधील निवडक ६ विजेत्यांना गोल्ड मेडल देण्यात आले. सांस्कृतिक स्पर्धेतील  इयत्ता ६ ते ८ वयोगटातील स्पर्धेचा प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याना गोल्ड मेडल  व शाळेला मोमेन्टो  (५मी) देण्यात आले.क्रीडा स्पर्धेतील खो-खो विजेते (मुले / मुली) संजयनगर माध्यमिक शाळेला गोल्ड मेडल आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.विभागस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा मनपा नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळा येथील कु.चंचल धापडे हिने उत्कृष्ट कामगीरी करुन कांस्य पदक पटकाविले. तिचा गुणगौरव यावेळी करण्यात आला.राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळात निवड झालयाबददल पारडी मराठी उच्च प्राथमिक शाळेची हिना कोलते हिचा गुणगौरव करण्यात आला.युनेस्को कडून जागतीक स्तरावर आयोजीत चित्रकला स्पर्धेत पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Thursday, February 6, 2025

बर्ड फ्ल्यू संदर्भात मनपाद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना

नागपूर:नागपूर शहरातील ताजबाग यासिन प्लॉट परिसरातील तीन पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यू मुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाद्वारे परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. बर्ड फ्ल्यू केवळ पक्ष्यांना होणारा आजार आहे मात्र त्यापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क राहून दिशानिर्देशांचे पालन करावेअसे आवाहन नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी शहरातील ताजबाग यासिन प्लॉट परिसरातील तीन पाळीव पक्ष्यांचा मृत्यू झाला. या पक्ष्यांचे नमूने प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले असता त्याचा अहवाल बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह प्राप्त झाला. यावर मनपा 
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. मृत पक्ष्यांच्या थेट संपर्कात असलेल्या कुटुंबातील सदस्यांची मनपाद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्व व्यक्तींचे आरोग्य उत्तम आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनपाद्वारे त्यांना औषधे सुरु करण्यात आली आहेत. मृत पक्ष्यांच्या संपर्कातील पक्ष्यांवर ‘कलिंग’ प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांवर देखील प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरु करण्यात आले आहेअशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी
दिली.शहरातील ताजबाग यासिन प्लॉट परिसरातील मृत पक्ष्यांच्या संपर्कातील ३०५४ पक्ष्यांवर ‘कलिंग’ प्रक्रिया राबविण्यात आली. याशिवाय १८० अंडी आणि १००० किलो खाद्य नष्ट करण्यात आले. बर्ड फ्ल्यू हा आजार केवळ पक्ष्यांमध्येच आढळून येत असतो. मात्र सर्तकता आणि सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे बाधित क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने इन्फ्ल्युएन्झा सदृश्य रुग्णांचा शोध घेऊन आवश्यकतेनुसार प्रयोगशाळा नमूने गोळा करण्यात येत आहेत. तसेच सर्व खाजगी रुग्णालय व वैद्यकीय व्यवसायिकांना त्यांच्या आरोग्य

संस्थेतील ‘आयएलआय’  ‘सारी’ रुग्णांची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला द्यावीअसे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.बर्ड फ्ल्यू हा आजार भारतात आजपर्यंत कोणत्याही मनुष्यामध्ये आढळून आलेला नाही. मात्र जागतिक स्तरावर तुरळक प्रकरणांची नोंद झालेली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी काळजी घ्यावीअसे आवाहन नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.  अशी घ्या काळजी हे करा:- १. पक्ष्यांमधील स्त्रावासोबत संपर्क टाळा. २. पक्षीकोंबड्या यांचे पिजंरे आणि ज्या भांड्यामध्ये त्यांना रोज अन्न दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जन्ट पावडर ने धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. ३. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्ष्यांना उघड्या हाताने स्पर्श करु नका.४. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने हात वारंवार धुवाव्यक्तीगत स्वच्छता राखापरिसर स्वच्छ ठेवा.५. कच्चे चिकन/चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करावा.६. पूर्ण शिजविलेल्या (१०० डिग्री सेल्सीअस) मांसाचाच
 अन्नात वापर करावा.७. आपल्या गल्लीत अथवा परिसरात तलाव असेल आणि त्या तलावात पक्षी येत असतील तर या ठिकाणी सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी वन विभाग/ पशुसंवर्धन विभागास कळविण्यात यावे. हे करु नका:- १. कच्चे चिकन / कच्ची अंडी खाऊ नका.२. अर्धवट शिजलेले चिकन/पक्षीअर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.३. आजारी दिसणाऱ्यासुस्त पडलेल्या पक्ष्याच्या संपर्कात येऊ नका.४. पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेऊ नका.  

अतिक्रमण निर्मूलन कारवाई,नागपूर महानगरपालिका नागपूर (प्रवर्तन विभाग)

म.न.पा प्रवर्तन विभाग मार्फत आज दिनांक 06.02.2025 रोजी लक्ष्मीनगर झोन क्र ०१ अंतर्गत पथक क्र.३, आणि पथक क्र.५ यांनी मिळुन संयुक्तरीत्या अतिक्रमण निर्मूलन कारवाई दुपारी 1:00 वाजेपासून ते सायंकाळी 9:00 वाजेपर्यंत कारवाई सुरू आहे .कारवाई मध्ये झोन कार्यालय ते रेडीसनब्लु हॉटेल चौक ते खामला रोडे ते जयताळा चौक ते त्रिमुर्ती नगर चौक ते प्रताप नगर चौक ते लक्ष्मीनगर चौक ते आठ रस्ता चौक ते माटे चौक ते VNIT IT पार्क चौक ते बजाज नगर चौक ते ईस्ट हायकोर्ट रोड ते लोकमत चौक पर्यंत 
अतिक्रमण निर्मूलन ची कारवाई करण्यात येत आहे ज्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात येत आहे. कारवाई मध्ये अतिक्रमण धारकांची संख्या 50 वर सुद्धा अतिक्रमण पथकाद्वारा कारवाई करण्यात येत आहे आणि कारवाई मध्ये आतापर्यंत 02 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे आणि कारवाई सुरू आहे. • धरमपेठ झोन क्र ०२ अंतर्गत पथक क्र.४ आणि पथक क्र ०२ यांनी संयुक्तरित्या अतिक्रमण निर्मूलन कारवाई दुपारी 12:00 वाजेपासून ते सायंकाळी 9:00 वाजेपर्यंत सुरू आहे 








अंतर्गत झोन कार्यालय ते सीताबर्डी परिसर ते झासीराणी चौक ते पंचशील चौक ते मेहाडीया चौक ते लोकमत चौक ते अंजनी रेल्वे स्टेशन पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात येत आहे. कारवाई मध्ये अनधिकृत बांधकामाची धारकांची संख्या अंदाजे 30 वर सुद्धा अतिक्रमण ची करवाई करण्यात येत आहे आणि कारवाई मध्ये 01 ट्रक साहित्य सामान जप्त करण्यात आले आणि कारवाई सुरू आहे. ही कारवाई .श्री. हरिष राऊत सहा. आयुक्त अतिक्रमण विभाग यांचे मार्गदर्शनात श्री भास्कर माळवे कनिष्ठ अभियंता आणि अतिक्रमण पथक द्वारे करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 113 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (06) रोजी शोध पथकाने 113 प्रकरणांची नोंद करून 57,700/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 32 प्रकरणांची नोंद करून 12,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 3,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 
प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 17,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 44 प्रकरणांची नोंद करून 8,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 12,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. कॅरियर पॉईंट यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. तसेच मे. राजेश रोकडे यांनी बांधकामाचे साहित्य फुटपाथवर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मे. सादवाणी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. किशोर किराणा स्टोर यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. विजय किराणा स्टोर यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 30,000/- दंड वसूल केला.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...