Thursday, December 25, 2025

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वाहन तपासणी सुरू,एसएसटी पथकाची वाहनांवर करडी नजर

नागपूर:  नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. येत्या १५ जानेवारी रोजी होत होणाऱ्या मतदानासाठी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी स्थिर निगराणी ठेवणारी पथके तैनात करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या दिशा निर्देशानुसार, पथकांद्वारे मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रोकडमद्यतसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घातला जाणार आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. आणि उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांनी गुरूवारी(ता. २५)  एसएसटी पथकाच्या कार्याची पाहणी केली. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रभावित करणारे प्रलोभन व विविध गैरप्रकाराना आळा घालण्याकरिता मनपातर्फे स्थिर निगराणी ठेवणारे पथक शरातील विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.स्थिर 
निगराणी ठेवणारी पथकाद्वारे संशयित चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करणार आहे. तसेच तपासणीच्या वेळी चित्रफित सुद्धा काढणार आहे. या तपासणीत निवडणुकीसाठी दिलेल्या परवानगी पेक्षा वाहनात जास्त रोकड तर नाहीतसेच वाहनातून  मद्यचा अवैध साठा घेऊन जात तर नाही नायावर हे निगराणी पथक देखरेख करणार आहे. याशिवाय एखाद्या राजकीय पक्षाच्या वाहनात मर्यादेपेक्षा जास्त रोकड आढळल्यास त्यांना रक्कमेचे स्त्रोत स्थिर निगराणी ठेवणाऱ्या पथकाला कळवणे आवश्यक असणार आहे.निवडणूक यंत्रणातर्फे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत हिंगणा रोड, वर्धा रोड, शिवणगाव, एअरपोर्ट रोड, जयताळा रोड आदी ठिकाणी स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या काटोल नाकासीताबर्डी पोलिस स्टेशनमानस चौकअमरावती रोड नाका या ठिकाणी ही पथके तैनात करण्यात आली आहे. याशिवाय हनुमान नगर झोन मध्ये हुडकेश्वर नाकाबेसा रोड नाका येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे.धंतोली झोनमध्ये अंतर्गत येणाऱ्या बेलतरोडी रोड नाकाएस.टी. बस स्टॅन्ड गणेशपेठ येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे.
याचबरोबर नेहरूनगर झोनमध्ये दिघोरी रोड नाका स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. गांधीबाग झोनमध्ये सीताबर्डी रेल्वे स्टेशनपूर्व दिडोदिया द्वार येथे स्थिर निगराणी ठेवणारी पथके तैनात करण्यात आली आहे. सतरंजीपुरा झोनमध्ये मारवाडी चौकइतवारी रेल्वे स्टेशन येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. त्याशिवाय आशीनगर झोनमध्ये छावणी रोड आणि उप्पलवाडी चौकी येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. मंगळवारी झोनमध्ये छिंदवाडा रोड नाका येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे.
 

No comments:

Post a Comment

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...