Wednesday, May 8, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 65 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेबुधवारी (ता08रोजी उपद्रव शोध पथकाने 65 प्रकरणांची नोंद करून 45 हजार 400 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु४००/- दंडया अंतर्गत 23 प्रकरणांची नोंद करून 9 हजार 200 रुपयांची वसुली करण्यात आलीव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांचादंड वसुली करण्यात आलादुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. 
मॉलउपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचेहोर्डिंग, सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांची वसुली करण्यात आलीवाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 23 हजार रुपयांचादंड वसुल करण्यात आला.सार्वजनिक ठिकाणी रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ‍ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आलाचिकन सेंटरमटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 1 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत प्रकरणांची नोंद करुन 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त यादीत   आढळणारे इतर  उपद्रव (व्यक्तीअसल्यास 16 प्रकरणांची नोंद करून  3 हजार 200  रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 1 प्रकरणांची नोंद करून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवारी (ता08रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत प्रभु किराणा स्टोर्स सब्जीमंडी ईतवारी व हनुमान झोन अंतर्गत कार्तिक किराणा भंडार खामला नेहरु मार्केट सक्करदरा, पटेल किराणा भंडार बुधवार बाजार सक्करदरा आणि न्यु किराणा अनाज भंडार बुधवार बजार 




सक्करदरा  चार प्रतिष्ठांनाकडुन एकुण 20 हजार रुपयाचा दंड वसूल केलायाशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत राधे संदेश शिवाजी नगर बांधकाम साहित्याने भरलेल्या अवजड वाहनाने रस्त्याचे नुकसान केल्याबाबत 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत अचिवर लर्निंग सेंटर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत गीरीराज रेसिडेन्सी झिंगाबाई टाकळी कोराडी रोड यांना मोकळ्या जागेवर कचरा टाकल्याने हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 07 प्रकरणाची नोंद करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला


बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठी समन्वयाने कार्य करा- नियमित लसीकरण टास्क फोर्स समितीची बैठक

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरण संदर्भात बुधवार (ता.०८) रोजी टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली.मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये तसेच वंचित बालकांची यादी तयार करून पुढील महिन्यांत त्यांचे लसीकरण होईल याची दक्षता घेत बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठी समन्वयाने कार्य करा असे निर्देश मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी उपस्थितांना दिले.बैठकीत मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, आरसीएच अधिकारी डॉ. सरला लाडशहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, शिक्षणाधिकारी श्री. प्रफुल्ल कचवे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन महाराष्ट्राच्या सल्लागार डॉ. स्वर्णा रामटेके, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतीक खान, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुलभा शेंडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. गजानन पवाने, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. सुनील कांबळे, डॉ. विजय तिवारी, श्रीमती दीपाली नागरे यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, आशा सेविका व इतर प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच
'हाय रिस्क एरिया' मध्ये जाऊन लसीकरणाविषयी जनजागृती करावी, शहरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरु आहेत, तेथे देखील प्रत्यक्ष जाऊन लसीकरण मोहीम राबवावी. मोबाईल व्हॅनने लसीकरणात गती आणावी आणि बालकांचे वेळेत लसीकरण होईल याची काळजी घ्यावी. ज्या बालकांचे लसीकरण राहिले आहे त्यांची यादी तयार करावी व येणाऱ्या महिन्यात त्यांचे लसीकरण होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देश झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी व आशा सेविकांना दिले.जागतिक आरोग्य संघटनेच्या, महाराष्ट्राच्या सल्लागार डॉ स्वर्णा रामटेके यांनी १८ वर्षवरील व्यक्तींना बीसीजी लसीकरण कसे द्यावे, क्षयरोग होऊ नये त्याकरिता मनपाच्या सहकार्याने कसे कार्य करता येईल याचा आराखडा मांडला. क्षयरोगाकरिता प्रथमोपचार, रुग्ण निहाय निकष, वयस्कांमध्ये बीसीजी लसीकरणाचे फायदे, यासर्व बाबींवर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत आशा सेविका, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी, टीबी चॅम्पियन्स यांनी समन्वय साधून कार्य करावे असे देखील डॉ. दीपक सेलोकर यांनी निर्देश दिले.

Tuesday, May 7, 2024

मनपा आयुक्तांनी केली अंबाझरी तलाव येथील कामाची पाहणी

नागपूर:- अंबाझरी तलावावर सिंचन विभागाद्वारे सुरु असलेल्या कामाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता.७) पाहणी केली.या पाहणी दौऱ्यात सिंचन विभागाचे मुख्य अभियंता श्री. पवार, मनपाचे मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकर, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता श्री. विजय गुरूबक्षाणी, सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली 
चोपडे, कार्यकारी अभियंता प्रांजली ठोंबसे आदी उपस्थित होते.पावसाळ्यात कुठलिही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये तसेच अंबाझरी तलावातील ओव्हरफ्लो वरील पाण्याचा लवकर निचरा व्हावा याकरिता सिंचन विभागाद्वारे कार्य सुरु करण्यात आले आहे. याशिवाय तलावाच्या मातीच्या बंधाऱ्याचे बळकटीकरण सुरु असून या सर्व कामांची मनपा आयुक्तांनी आज पाहणी केली. मान्सूनपूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले.नाग नदीच्या पात्रावर अंबाझरी ते क्रेझी केसल मार्गावरील पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे काम केले 





जाणार आहे. या पुलाच्या कार्याचा देखील यावेळी डॉ. चौधरी यांनी आढावा घेतला. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यक सर्व काळजी घेऊन तलावाचे बळकटीकरण, मजबुतीकरण आणि ओव्हरफ्लो वरील पाण्याचा सुरळीत विसर्ग होण्याबाबत कार्य करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 58 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेमंगळवारी (ता07रोजी उपद्रव शोध पथकाने 58 प्रकरणांची नोंद करून 22 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता
 (रु४००/- दंडया अंतर्गत  19  प्रकरणांची  नोंद करून 7 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आलाव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा  अशा  ठिकाणी  कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांचा वसुल करण्यात आलादुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.वाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल  करण्यात आला.उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (व्यक्तीअसल्यास 25 प्रकरणांची नोंद करून 5 हजार  रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 03 प्रकरणांची नोंद करून 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवारी (ता07रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत शेंद्रे किराणा स्टोर्स टिमकी मोमीनपुरा आणि धंतोली झोन अंतर्गत हरे रामा 
किराणा स्टोर्स कॉटन मार्केट 02 प्रकराणांची नोंद करुन एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसूल केलानेहरुनगर झोन अंतर्गत निरमई हाईट्स वैभव नगर दिघोरी रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविणे 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत ऑर्चिड दि ईन्टरनेशनल स्कुल बोखरा कोराडी रोड आणि रोयल पब्लिक स्कुल राठोड लेआऊट जाफर नगर या दोन प्रतिष्ठान कडुन परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. सईद इल्यास सी.आय.डी आफीस चौक जाफर नगर अंतर्गत जवळपासच्या मोकळ्या जागेवर खुप कचरा टाकल्यास हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 06 प्रकरणाची नोंद करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...