Tuesday, May 7, 2024

मनपा आयुक्तांनी केली अंबाझरी तलाव येथील कामाची पाहणी

नागपूर:- अंबाझरी तलावावर सिंचन विभागाद्वारे सुरु असलेल्या कामाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता.७) पाहणी केली.या पाहणी दौऱ्यात सिंचन विभागाचे मुख्य अभियंता श्री. पवार, मनपाचे मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकर, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता श्री. विजय गुरूबक्षाणी, सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली 
चोपडे, कार्यकारी अभियंता प्रांजली ठोंबसे आदी उपस्थित होते.पावसाळ्यात कुठलिही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये तसेच अंबाझरी तलावातील ओव्हरफ्लो वरील पाण्याचा लवकर निचरा व्हावा याकरिता सिंचन विभागाद्वारे कार्य सुरु करण्यात आले आहे. याशिवाय तलावाच्या मातीच्या बंधाऱ्याचे बळकटीकरण सुरु असून या सर्व कामांची मनपा आयुक्तांनी आज पाहणी केली. मान्सूनपूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले.नाग नदीच्या पात्रावर अंबाझरी ते क्रेझी केसल मार्गावरील पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे काम केले 





जाणार आहे. या पुलाच्या कार्याचा देखील यावेळी डॉ. चौधरी यांनी आढावा घेतला. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यक सर्व काळजी घेऊन तलावाचे बळकटीकरण, मजबुतीकरण आणि ओव्हरफ्लो वरील पाण्याचा सुरळीत विसर्ग होण्याबाबत कार्य करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

No comments:

Post a Comment

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दान केल्या घरातील निरुपयोगी वस्तू -निरुपयोगी वस्तू संकलन/दान केंद्राचे आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते उद्घाटन

  नागपूर : - नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभ...