नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवारी (ता. 08) रोजी उपद्रव शोध पथकाने 65 प्रकरणांची नोंद करून 45 हजार 400 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 23 प्रकरणांची नोंद करून 9 हजार 200 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांचादंड वसुली करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचेहोर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 23 हजार रुपयांचादंड वसुल करण्यात आला.सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे
बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 1 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने
रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन 2 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ,
मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करुन 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 1 प्रकरणांची नोंद करून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवारी (ता. 08) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत प्रभु किराणा
स्टोर्स सब्जीमंडी ईतवारी व हनुमान झोन अंतर्गत कार्तिक किराणा भंडार खामला नेहरु
मार्केट सक्करदरा, पटेल किराणा भंडार बुधवार बाजार सक्करदरा आणि न्यु किराणा अनाज भंडार
बुधवार बजार
सक्करदरा चार प्रतिष्ठांनाकडुन एकुण 20 हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत राधे संदेश शिवाजी नगर बांधकाम साहित्याने भरलेल्या अवजड वाहनाने रस्त्याचे नुकसान केल्याबाबत 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत अचिवर लर्निंग सेंटर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत गीरीराज रेसिडेन्सी झिंगाबाई टाकळी कोराडी रोड यांना मोकळ्या जागेवर कचरा टाकल्याने 5 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 07 प्रकरणाची नोंद करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
No comments:
Post a Comment