नागपूर:- नागपूर
महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय,
शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरण संदर्भात
बुधवार (ता.०८) रोजी टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली.मनपा मुख्यालयातील डॉ.
पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत कोणतेही बालक
लसीकरणापासून वंचित राहू नये तसेच वंचित बालकांची यादी तयार करून पुढील महिन्यांत
त्यांचे लसीकरण होईल याची दक्षता घेत बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठी समन्वयाने
कार्य करा असे निर्देश मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी
उपस्थितांना दिले.बैठकीत मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र
बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी,
आरसीएच अधिकारी डॉ. सरला लाड, शहर
क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, साथरोग अधिकारी डॉ.
गोवर्धन नवखरे, शिक्षणाधिकारी श्री. प्रफुल्ल कचवे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन महाराष्ट्राच्या सल्लागार डॉ. स्वर्णा रामटेके,
झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतीक खान, डॉ.
दीपांकर भिवगडे, डॉ. सुलभा शेंडे, डॉ.
जयश्री चन्ने, डॉ. गजानन पवाने, डॉ.
ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. सुनील कांबळे, डॉ.
विजय तिवारी, श्रीमती दीपाली नागरे यांच्यासह लसीकरण क्षेत्र
सनियंत्रक, आशा सेविका व इतर प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित
होते.तसेच 'हाय रिस्क एरिया' मध्ये
जाऊन लसीकरणाविषयी जनजागृती करावी, शहरात अनेक ठिकाणी
बांधकाम सुरु आहेत, तेथे देखील प्रत्यक्ष जाऊन लसीकरण मोहीम
राबवावी. मोबाईल व्हॅनने लसीकरणात गती आणावी आणि बालकांचे वेळेत लसीकरण होईल याची
काळजी घ्यावी. ज्या बालकांचे लसीकरण राहिले आहे त्यांची यादी तयार करावी व
येणाऱ्या महिन्यात त्यांचे लसीकरण होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देश झोनल
वैद्यकीय आरोग्य अधिकारी व आशा सेविकांना दिले.जागतिक आरोग्य संघटनेच्या, महाराष्ट्राच्या सल्लागार डॉ स्वर्णा रामटेके यांनी १८ वर्षवरील
व्यक्तींना बीसीजी लसीकरण कसे द्यावे, क्षयरोग होऊ नये
त्याकरिता मनपाच्या सहकार्याने कसे कार्य करता येईल याचा आराखडा मांडला.
क्षयरोगाकरिता प्रथमोपचार, रुग्ण निहाय निकष, वयस्कांमध्ये बीसीजी लसीकरणाचे फायदे, यासर्व
बाबींवर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत आशा सेविका, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी, टीबी चॅम्पियन्स
यांनी समन्वय साधून कार्य करावे असे देखील डॉ. दीपक सेलोकर यांनी निर्देश दिले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दान केल्या घरातील निरुपयोगी वस्तू -निरुपयोगी वस्तू संकलन/दान केंद्राचे आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते उद्घाटन
नागपूर : - नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभ...
-
नागपुर:- केंद्र सरकार ने जमीन-जायदाद खरीदी-बिक्री से जुड़े किसी भी गति विधी के लिए महारेरा एक्ट के साथ बार कोड की भी अनिवार्यता लागू की,लेकि...
-
नागपूर: - नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर , कचरा फेकणाऱ्यांवर , थुंकणाऱ्यांवर , ५० मायक्रॉ...
No comments:
Post a Comment