याप्रसंगी यूएनडीपी च्या शहर समन्वयक श्रीमती. आरुषा आनंद, मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.बी. पी. चंदनखेडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, नागपूर स्मार्ट सिटी पर्यावरण विभागाच्या महा व्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर, मनपाचे नगररचनाकार श्री. ऋतुराज जाधव, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रातिनिधी श्री. अंकुश गावंडे, श्री. प्रमोद कडे, नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अभियंता श्री. पी.डी. अंभोरकर, श्री. धमेंद्र चुटे, श्री. संजय चिमूरकर, मनपाचे कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंदाडे, श्री. उप अभियंता श्री. आनंद मोखाडे, शिक्षण विभागाचे श्री. मनोज लोखंडे, श्री. राजेश बोरकर, श्रीमती श्वेता दांडेकर, श्री. आर. एन. जीवतोडे, उद्यान विभागाचे रोशन वाघमारे, श्री. संजय बिसने यांच्यासह अल्यूव्हियमचे श्री. पार्थ गोयल, श्री. आकाश मलिक, श्रीमती तरीया गुलाटी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यशाळेला मार्गदर्शन करीत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्वप्रथम नागपूर शहरातील नाग नदीच्या प्रवाहास अडथळा निर्माण करणारी व नदीस पूर येण्यास कारणीभूत असणारे विविध कारण तसेच वातावरण बदलामुळे वाढते तापमान यावर करण्यात आलेल्या विश्लेषण अध्ययनाची माहिती जाणून घेतली. तसेच नागपुरातील पुराचा धोका कमी करण्यासाठी आवशक ती माहिती संबंधित विभागाने द्यावी अशा सूचना देखील दिल्या. तर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी तापमानासह हिट इंडेक्स दोन्हीचे विश्लेषणात्मक माहितीच्या आधारे पुढील धोरण आखावे अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या.कार्यशाळेच्या प्रारंभी यूएनडीपी च्या शहर समन्वयक श्रीमती. आरुषा आनंद यांनी कार्यशाळे विषयी माहिती दिली, महाराष्ट्रासाठी आपत्ती जोखीम व्यवस्थापन प्रणाली मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासन व जीओएम यूएनडीपी कार्यक्रमांतर्गत शहरी घटकामधील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मॉडलिंग उपक्रम तयार करण्यात येणार आहे. याकरिता नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन शहरांसाठी जोखीम मूल्यांकन आणि भू-स्थानिक विश्लेषण” कार्य केले जाणार असल्याचे श्रीमती आरुषा आनंद यांनी सांगितले.
कार्यशाळेत अॅल्यूव्हियमचे श्री. पार्थ गोयल श्री. आकाश मलिक, श्रीमती तरीया गुलाटी यांनी संगणकीय सादरीकरण करीत नागपूर शहरातील पावसाळ्यात उत्पन्न होणारी परिस्थिती व उष्णतेच्या लाटेच्या धोक्याचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण कार्याच्या पद्धती विषयी माहिती दिली. तसेच विश्लेषणाची माहिती पुस्तिका, नकाशे व सर्व समावेश आपत्ती व्यवस्थापक नियोजन शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


.jpeg)

.jpeg)







.jpeg)
