नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. सोमवारी (ता. 13) रोजी उपद्रव शोध पथकाने 133 प्रकरणांची नोंद करून 58 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 31 प्रकरणांची नोंद करून 12 हजार 400 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांचादंड वसुली करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 1 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 1 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या
अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन 2 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक
ठिकाणी,रस्ता,
फुटपाथ, मोकळी जागा, अशा
ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करुन 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 61 प्रकरणांची नोंद करून 12 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 19 प्रकरणांची नोंद करून 19 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोमवारी (ता. 13) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या धंतोली अंतर्गत जया सेल्स कॉटन मार्केट, गांधीबाग झोन अंतर्गत पवन स्वीट्स
गरोबा मैदान, सतरंजीपुरा झोन अंतर्गत बीरहा किराणा भारत माता
चौक ईतवारी व आशी नगर झोन अंतर्गत रवी पॅकींग मटेरीयल शॉप चैतन्य नगर या चार
प्रतिष्ठानांकडुन एकुण 20 हजार रुपयाचा दंड वसूल केला.
याशिवाय धरमपेठ झोन
अंतर्गत गाईडंस पाईंट अमरावती रोड नाका, धंताली
झोन अंतर्गत टोट्स डिस्कवरी लेंड नरेन्द्र नगर व आशी नगर झोन अंतर्गत तिरपुडे
सेंट्रल स्कुल चौक्स कॉलोनी कामठी रोड या तीन प्रतिष्ठानांवर परवानगी न घेता बॅनर
आणि होर्डिग लावल्यास एकुण 16 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन
येथील यश सिद्धी बिल्डर्स एनआयटी गार्डन जवळ आर्य नगर रस्त्यालगत बांधकाम साहीत्य पसरविणे अंतर्गत 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण 08 प्रकरणाची नोंद करून 46 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
No comments:
Post a Comment