चौरपगार, कार्यकारी अभियंता श्री. विजय गुरूबक्षाणी आदी उपस्थित होते.नाग नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होउ नये व खूप जास्त पावसातही पाणी सुरळीत वाहून जावे यासाठी अंबाझरी दहन घाट ते व्हीएनआयटी पूलापर्यंतचे पात्र रुंद करण्याची सूचना सिंचन विभागाद्वारे करण्यात आली होती. या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विभागाद्वारे हे कार्य सुरू आहे. मनपा आयुक्तांनी अंबाझरी दहन घाट ते व्हीएनआयटी पुलापर्यंतचे पात्र तसेच एनआयटी स्केटिंग रिंक येथील पात्राची पाहणी करून या कामाबाबतची स्थिती जाणून घेतली.
अंबाझरी लेआयउट येथील नदी पात्राची पाहणी करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी क्रेझी केसलद्वारे पात्रावर निर्माण केलेले लोखंडी पूल त्वरीत काढण्याबाबत निर्देशही दिले.याशिवाय त्यांनी अशोक चौक येथे भेट देउन येथील नाग नदीच्या पात्राच्या स्वच्छता कार्याचा आढावा घेतला.पावसाळ्यात अतिरिक्त पाणी आल्यास पाण्याचा लगेच नाग नदीत निचरा व्हावा व नदीतील पाणी सुरळीत प्रवाहित व्हावे, त्याला कुठलाही अडथळा निर्माण होउ नये यादृष्टीने कटाकाक्षाने कार्य करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला दिले होते. तांत्रिक आणि शास्त्रशुद्ध दृष्ट्या कार्य व्यवस्थित व्हावे याकरिता या कामाबाबत सिंचन विभागाद्वारे अभिप्राय आणि सूचना मागविण्यात आलेल्या होत्या.
सिंचन विभागाद्वारे नदीच्या उगमापासून पाण्याचा प्रवाह अधिक सुरळीत व्हावा याकरिता पात्राचे रूंदीकरण करण्याबाबत सूचना केली होती त्यानुसार मनपाद्वारे रुंदीकरणाचे कार्य प्रगतीपथावर आहे.
No comments:
Post a Comment