Friday, May 10, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ६९ प्रकरणांची नोंद- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता. १०) रोजी उपद्रव शोध पथकाने ६९ प्रकरणांची नोंद करून ३३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी 
थुंकणे (रु. २००/- दंड) या अंतर्गत  प्रकरणांची नोंद करून ४०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत १५ प्रकरणांची नोंद करून ६ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणा-या एका व्यक्तीवर कारवाई करून १०० रुपये दंड ठोठावण्यात आला. दुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा
अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ११ प्रकरणांची नोंद करून ४ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.वाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ५ प्रकरणांची नोंद करून ३५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. चिकन सेंटरमटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत  विक्रेत्यांवरील कारवाईत २ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रवांमध्ये (व्यक्ती) २० प्रकरणांची नोंद करून ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास १३ प्रकरणांची नोंद करून १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शुक्रवारी (ता.१०) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ७ प्रकरणांमध्ये ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनमधील गोकुलपेठ येथील आझाद किराणागांधीबाग झोन अंतर्गत सारीका किराणा स्टोर्ससतरंजीपुरा झोन अंतर्गत जगनाद स्वीट्स तीन  प्रतिष्ठांनाकडुन एकुण १५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत काटोल रोड गंगानगर येथील नेताजी सोसायटी येथील रहिवाश्याने घातक वैद्यकीय कचरा सामान्य कच-यात टाकल्याबद्दल ५ हजार हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत नंदनवन येथील रिॲलिटी बिल्डर्सद्वारे रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल ५ हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. 





धंतोली झोन अंतर्गत मनीष नगर येथील द अचिव्हर्स स्कूल द्वारे विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी ५ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोनमधील गोधनी रोड वरील बाबी प्लँट ॲकेडमीद्वारे देखील अनधिकृतपणे जाहिरात लावल्या प्रकरणी ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. असे एकूण ७ प्रकरणाची नोंद करून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात
 आला.

No comments:

Post a Comment

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दान केल्या घरातील निरुपयोगी वस्तू -निरुपयोगी वस्तू संकलन/दान केंद्राचे आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते उद्घाटन

  नागपूर : - नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभ...