Friday, June 14, 2024

जागतिक योग दिनी "सामूहिक योगाभ्यास" कार्यक्रमासाठी मनपा सज्ज- मनपात विविध सामाजिक संस्थांची बैठक ; आयुक्तांनी घेतला तयारींचा आढावा

नागपूर:जागतिक योग दिनाचे औचित्यसाधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने येत्या शुक्रवार 21 जून रोजी धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे सकाळी 6.00 वाजता सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेया कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनपाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असूनआयोजनासाठी मनपा पूर्णतः सज्ज आहेजागतिक योग दिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाची तयारीस्वरूप आणि विविध संस्थांच्या सूचना जाणून घेण्याच्या दृष्टीने शुक्रवार (ता.14) रोजी नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात आयोजित बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीअजय चारठाणकरउपायुक्त श्रीमिलिंद मेश्रामशिक्षणाधिकारी श्रीप्रफुल्ल कचवेक्रीडा अधिकारी डॉपियुष आंबुलकर यांच्यासह पी.टी.एस.चे प्रशांत कुलकर्णीश्रीजनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे श्रीअतुल मुजुमदारश्रीमती सोम 
किरश्रीप्रशांत राजूरकरश्रीसुनिल अग्रवालपतंजली योग समितीचे श्रीप्रदीप काटेकरश्रीदीपक येवलेशिवम भुनाटीतेजस्वीनी महिलामंचच्या किरण मुंदडाआदर्श विद्यामंदिरचे सचिन इटनकरसंदेश खरेअनिल मोहगावकरडॉमंजिरी भेंडे यांच्यासह कर्मचारी अधिकारी स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.बैठकीत सर्वप्रथम क्रीडा अधिकारी डॉपियुष आंबुलकर यांनी संपूर्ण आयोजनाची माहिती दिलीत्यानंतर आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाच्या तयारींचा आढावा घेतसर्व संस्थांच्या सूचना  नवकल्पना जाणून घेतल्यातसेच चर्चा करून त्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले


आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी आयोजनासाठी यंदाच्या "योग फॉर सेल्फ अँड सोसायटी" (Yoga for Self and Society)  या संकल्पनेवर  आधारित कार्यक्रमाची  रूपरेषा तयार करावी संपूर्ण  कार्यक्रम हा शून्य कचरा अर्थात "झीरो वेस्ट इव्हेंटवर आधारित असावापिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी योगाभ्यासाकां करीता  यशवंत  स्टेडियमवर पोहचण्यासाठी बसेसची सुविधा करावी निर्देश त्यांनी यावेळी दिलेतसेच अनेक संस्थांनी योग  दिनाला  आपल्या  तयारीची माहिती सादर केली.मार्गदर्शन करीत आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी सांगितले कीनागरिकांना योगाचे महत्व पटावे, त्यांनी योगासाठी पुढे यावे या हेतूने योग मंडळ  संस्थांच्या सहकार्याने दरवर्षी मनपातर्फे जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने आयोजन केले जातेनागरिकांमध्ये योगाप्रती जनजागृती व्हावी  ते योगाकडे वळावेत यासाठी योग दिनानिमित्तच्या आयोजनाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 66 प्रकरणांची नोंद- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेशुक्रवार (ता14रोजी उपद्रव शोध पथकाने 66 प्रकरणांची नोंद करून 35 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेसार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत प्रकरणांची नोंद करुन 800  रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवाले छोटे भाजी विक्रेते यांनी  लगतच्या  परिसरात अस्वच्छता (रु४००/- दंडया अंतर्गत 22 प्रकरणांची नोंद करून 8 हजार 800 रुपयांचा दंड वसुल  करण्यात आला.  
व्यक्तीने रस्ताफुटपाथ, मोकळी  जागा  अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांचा दंडवसुल करण्यात आलादुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करू 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.मॉलउपहारगृह,लॉजिंग,  बोर्डिंगचेहोर्डिंग, सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागा 
अशा ठिकाणी  कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपयांचा दंड वसुल  करण्यात आलावाहतुकीचा  रस्ता मंडपकमानस्टेज  इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 3 हजार 500 रुपयांचा दंड वसुल  करण्यात आला. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परीसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करुन 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.उपरोक्त यादीत   आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती असल्यास 20 प्रकरणांची  नोंद करून 4 हजाररुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 01 प्रकरणांची नोंद*मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शुक्रवार (ता14रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत चंद्रकात स्वीट्स पोथी गल्ली यांच्याकडुन हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत शेष सुमन अपार्टमेंट आरपीटीएस रोड सुरेंद्र नगर, धरमपेठ नगर झोन अंतर्गत रोकडे ज्वेलर्स राजा रानी चौक सीवील लाईन्स, नेहरुनगर झोन अंतर्गत गुरुलक्ष्मी प्लाझा विद्या नगर वाठोडा आणि सतरंजीपुरा झोन अंतर्गत बावनकुडे बिल्डर्स ताडांपेठ बांधकामाचा कचरा रस्त्‍यालगत टाकल्याबाबत या चार प्रतिष्ठानांकडुन 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत हर्षा वाघमारे बारसे नगर पाचपावली यांच्याकडुन रस्त्यालगत कचरा टाकणेबाबत हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत कृष्णा लॉन हिल व्वीह सोसायटी ढाबा आणि मंगळवारी झोन अंतर्गत लीटील मीलेनियम गोधनी रोड झिंगाबाई टाकळी परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.  असे एकूण  प्रकरणांची  नोंद करून  60 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Saturday, June 8, 2024

पोलिस तलाव आणि बिनाकी तलावाच्या कामाची आयुक्तांकडून पाहणी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे पोलिस लाईन टाकळी येथील तलाव आणि बिनाकी मंगळवारी येथील तलावाच्या पुनरुज्जीवनाचे कार्य सुरू असून या कामाची शनिवारी (ता.८) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी केली. दोन्ही तलावांच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित कामांना गती देउन पावसाळ्यात कुठलाही त्रास होणार नाही, यादृष्टीने कार्य करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.आयुक्तांच्या पाहणी दौ-यात अधीक्षक अभियंता डॉ.  श्वेता बॅनर्जी, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त श्री. अशोक घारोटे, झोनचे कार्यकारी अभियंता श्री. सुनील उईके, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त श्री. घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता श्री. अजय गेडाम
सार्वजनिक आरोग्य अभियंता श्री. संदीप लोखंडे आदी उपस्थित होते.मनपा आयुक्तांनी सर्वप्रथम पोलिस लाईन टाकळी तलावाच्या कामाची पाहणी केली. तलावाचे पुनरुज्जीवन कार्य तसेच तलावाची संरक्षण भिंत याबाबत माहिती जाणून घेतली. तलावाच्या बाजून वाहणा-या नाल्याची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली. सद्यस्थितीत तलावाची किनार भिंत तयार करण्यात आली असून तलावाचे खोलीकरण करण्यात येत आहे. याशिवाय मुख्य रस्त्यालगत नाल्याच्या काठावरील पडलेली सुरक्षा भिंतीचे कामही केले जात आहे. 
तलावाच्या आतील भागातील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी निर्देशित केले.बिनाकी मंगळवारी येथील तलावाच्या कामाचा देखील मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा घेतला. या तलावाशी संबंधित कामाचे त्यांनी निरीक्षण केले व आवश्यक माहिती जाणून घेतली. पावसाळ्यात कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होउ नये याकरिता आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.यावेळी दोन्ही प्रकल्पाचे सल्लागार सल्लागार श्री. निशिकांत भिवगडे यांच्यासह मंगळवारी आणि सतरंजीपुरा झोनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...