Friday, June 14, 2024

जागतिक योग दिनी "सामूहिक योगाभ्यास" कार्यक्रमासाठी मनपा सज्ज- मनपात विविध सामाजिक संस्थांची बैठक ; आयुक्तांनी घेतला तयारींचा आढावा

नागपूर:जागतिक योग दिनाचे औचित्यसाधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने येत्या शुक्रवार 21 जून रोजी धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे सकाळी 6.00 वाजता सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेया कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनपाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असूनआयोजनासाठी मनपा पूर्णतः सज्ज आहेजागतिक योग दिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाची तयारीस्वरूप आणि विविध संस्थांच्या सूचना जाणून घेण्याच्या दृष्टीने शुक्रवार (ता.14) रोजी नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात आयोजित बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीअजय चारठाणकरउपायुक्त श्रीमिलिंद मेश्रामशिक्षणाधिकारी श्रीप्रफुल्ल कचवेक्रीडा अधिकारी डॉपियुष आंबुलकर यांच्यासह पी.टी.एस.चे प्रशांत कुलकर्णीश्रीजनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे श्रीअतुल मुजुमदारश्रीमती सोम 
किरश्रीप्रशांत राजूरकरश्रीसुनिल अग्रवालपतंजली योग समितीचे श्रीप्रदीप काटेकरश्रीदीपक येवलेशिवम भुनाटीतेजस्वीनी महिलामंचच्या किरण मुंदडाआदर्श विद्यामंदिरचे सचिन इटनकरसंदेश खरेअनिल मोहगावकरडॉमंजिरी भेंडे यांच्यासह कर्मचारी अधिकारी स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.बैठकीत सर्वप्रथम क्रीडा अधिकारी डॉपियुष आंबुलकर यांनी संपूर्ण आयोजनाची माहिती दिलीत्यानंतर आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाच्या तयारींचा आढावा घेतसर्व संस्थांच्या सूचना  नवकल्पना जाणून घेतल्यातसेच चर्चा करून त्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले


आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी आयोजनासाठी यंदाच्या "योग फॉर सेल्फ अँड सोसायटी" (Yoga for Self and Society)  या संकल्पनेवर  आधारित कार्यक्रमाची  रूपरेषा तयार करावी संपूर्ण  कार्यक्रम हा शून्य कचरा अर्थात "झीरो वेस्ट इव्हेंटवर आधारित असावापिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी योगाभ्यासाकां करीता  यशवंत  स्टेडियमवर पोहचण्यासाठी बसेसची सुविधा करावी निर्देश त्यांनी यावेळी दिलेतसेच अनेक संस्थांनी योग  दिनाला  आपल्या  तयारीची माहिती सादर केली.मार्गदर्शन करीत आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी सांगितले कीनागरिकांना योगाचे महत्व पटावे, त्यांनी योगासाठी पुढे यावे या हेतूने योग मंडळ  संस्थांच्या सहकार्याने दरवर्षी मनपातर्फे जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने आयोजन केले जातेनागरिकांमध्ये योगाप्रती जनजागृती व्हावी  ते योगाकडे वळावेत यासाठी योग दिनानिमित्तच्या आयोजनाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...