Wednesday, July 10, 2024

मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र अर्ज भरण्यात सुलभता येण्यासाठी मनपाचा पुढाकार

नागपूरमहाराष्ट्र राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे प्रभागनिहाय अर्जस्वीकृती केंद्र सुरू करण्यात येणार आहेतयासंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी सर्व सहायक आयुक्तांची बैठक बोलावून निर्देश दिले. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात बुधवारी (ता.१०आयोजित बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलउपायुक्त डॉरंजना लाडेउपायुक्त प्रकाश वराडेसहायकआयुक्त गणेश राठोडहरीश राउतविजय थुलघनश्याम पंधरेअशोक घारोटेनरेंद्र बावनकरप्रमोद वानखेडे आदी उपस्थित होते.महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठीत्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्याकरिता आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्रीमाझी लाडकी बहीण योजना” सुरु करण्यात आली आहेया योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेतमहिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने राज्य सरकारची ही महत्वांकाक्षी योजना असून कुणीही महिला या योजनेपासून वंचित राहू नयेयासाठी प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी दिलेअर्ज स्वीकृती केंद्रांवर प्रत्येकी तीन 

र्मचा-यांची नियुक्ती केली  जाणार आहे नियुक्त सर्व कर्मचायांना योजनेचे अर्ज भरण्यासंदर्भात प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहेयेत्या दोन दिवसांत सर्व झोनमधील प्रभागनिहाय अर्जस्वीकृती केंद्र कार्यान्वित करण्याचे देखील निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.याशिवाय मनपाच्या दहाही झोन कार्यालयामध्ये तसेच आंगणवाडी केंद्रामध्ये देखील अर्ज स्वीकृती केंद्र सुरू आहेतमहिला स्वतः ‘नारीशक्ती दूत’ अॅप द्वारे देखील अर्ज करू शकतातऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यास असमर्थ असल्यास आपल्या प्रभागातील केंद्रावर किंवा झोन कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मन
पातर्फे करण्यात येत आहे.योजना कुणासाठी?महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित स्त्री,  विधवाघटस्फोटीत महिलापरित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक 21 ते 65 वर्षापर्यंत अविवाहित महिला, 2.5 लाखापर्यत उत्पन्न असलेलेबाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारीस्वयंसेवी कामगारकंत्राटी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतीलयाकरिता  किमान वयाची 21 वर्ष पूर्ण  कमाल वयाचे 65 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.ही कागदपत्रे आवश्यक:- योजनेसाठी आधार कार्डमहाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) ते नसल्यास महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (Leaving Certificate) किंवा जन्म दाखला (Birth certificate) किंवा मतदार ओळखपत्र (Voter ID Card), परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर पतीचा जन्म दाखला किंवा पतीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) यापैकी कुठलेही एक कागदपत्र सादर करावेयाशिवाय उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंतनसल्यास पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्डबँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. (आधारकार्ड सोबत लिंक असावे.) हमीपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेतयोजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ असून मोठ्या संख्येत योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

ट्राफिक चिल्ड्रन पार्कमध्ये दिले जाणार वाहतुकीचे नि:शुल्क प्रशिक्षण मनपा आयुक्तांनी केली पाहणी : जनआक्रोशचा पुढाकार

नागपूर : धरमपेठ येथील प्रसिध्द ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ट्राफिक चिल्ड्रन पार्क येथे नामांकित सामाजिक संस्था जनआक्रोश यांच्या सहकार्याने मिनी बसव्हॅन व शाळामहाविद्यालयाच्या बस चालक यांना वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालविण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे. याकरीता नागपूर महानगरपालिकेतर्फे जनआक्रोश संस्थेला ट्राफिक चिल्ड्रन पार्कमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (10 जुलै) ट्राफिक चिल्ड्रन पार्कची पाहणी केली. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीयुवकमहिलांना वाहतुकीच्या नियमांचे पालन 
करण्याचे प्रशिक्षण देण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.याप्रसंगी उपायुक्त डॉ. रंजना लाडेउपायुक्त प्रकाश वराडेउघान अधीक्षक अमोल चौरपगारकार्यकारी अभियंता (विघुत) राजेंद्र राठोडविजय गुरूबक्षानीउपअभियंता नवघरेमाकोडे व जनआक्रोश संस्थेचे संस्थापक सचिव रविंद्र कासखेडीकर उपस्थित होते.श्री. कासखेडीकर यांनी सांगितले कीरविवार 14 जुलै पासून वाहन चालकांना प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. हे प्रशिक्षण नि:शुल्क दिले जाणार आहे. यासाठी ट्राफिक चिल्ड्रन पार्कमध्ये जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मनपा आयुक्तांचे आभार मानले. विविध शासकीय विभागातून सेवानिवृत्त अधिकारी येथे प्रशिक्षण देणार आहेत.या प्रसंगी मनपा आयुक्तांनी सांगितले कीजनआक्रोश संस्थेला नि:शुल्क प्रशिक्षण देण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 



त्यांनी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ट्राफिक चिल्ड्रन पार्क येथे विविध शाळांच्या मुलांना वाहतूक नियमांबद्दल माहिती देण्याकरीता सहल आयोजित करण्याचे आवाहन केले. तसेच विविध महाविद्यालयातील युवकांना सुध्दा येथे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की
रस्त्यावर वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पालन करणे गरजेचे आहे. यासाठी ट्राफिक चिल्ड्रन पार्क योग्य दिशा देऊ शकेल. त्यांनी मनपा अधिका-यांना वाहतुकी नियमाबद्दलचे सायनेज लावण्याचे निर्देश दिले. ट्राफिक पार्कमधील ट्राफिक सिग्नलझेब्रा क्रॉसिंग व्यवस्थीत करण्याचे निर्देश दिले. पार्कमध्ये मुलांसाठी खेळणी सुव्यवस्थित ठेवणेप्रसाधनगृहांची स्वच्छता राखणेकच-याची वेळोवेळी विल्हेवाट लावण्याचे सुध्दा निर्देश दिले.




तसेच बंद पडलेल्या कारंजा पुन्हा सुरू करण्याचेही निर्देश दिले.या प्रसंगी जनआक्रोश संस्थेचे अनिल जोशीविश्वनाथ पांडेसंजय डबलीशाम पोहाणेरमेश लोखंडेगिरीश देशपांडेविवेक अमीनआर.बी. पाहुणेसाधना पत्कीप्रशांत धर्माधिकारीराजा अग्रवाल उपस्थित होते. 
 

Monday, July 8, 2024

गरीब विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरावे ‘विज्ञान केंद्र’ केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर:- नागपूर शहरातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांकरिता विज्ञानाचे भांडार खुले करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधायुक्त असे विज्ञान केंद्र लवकरात लवकर निर्माण करावे, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली. हे विज्ञान केंद्र गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. श्री. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रभाषा परिवारचे सुरेश अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, एनआयटी सभापती संजय मीणा, शिक्षणाधिकारी आदींची उपस्थिती होती. राष्ट्रभाषा परिवारच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळ्याचे नियमित आयोजन केले जात आहे. या मेळ्यात बहुतांश प्रमाणात महानगरपालिकेच्या शाळांचे विद्यार्थी सहभागी होऊन प्रयोग सादर करतात. ना. श्री. गडकरी यांनी या संकल्पनेचे कौतुक करून शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र मूलभूत विज्ञान केंद्र असावे, अशी संकल्पना मांडली. याच संकल्पनेवर आधारित हे केंद्र उभे होणार असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे, असा आग्रह ना. श्री. गडकरी यांनी केला. गरोबा मैदान येथील पूर्वीच्या मनपा शाळेच्या एक एकर जागेवर नागपूर सुधार प्रन्यास हे मूलभूत विज्ञान केंद्र उभारणार आहे. याठिकाणी भारतासह जगभरातील विज्ञानाच्या संदर्भातील प्रयोगांचे प्रदर्शन असावे, चांद्रयान, मंगलयानची प्रतिकृती असावी, जेणेकरून या विद्यार्थ्यांना चित्ररुपात ज्ञान मिळेल आणि त्यांच्यामध्ये विज्ञानाबद्दल गोडी निर्माण होईल. एका छोट्या हॉलमध्ये बसून विद्यार्थी विज्ञानाचे प्रयोग करू शकतील, अशी सोय देखील करावी, असेही ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. विज्ञान केंद्रासोबत ई-लायब्ररी व मिनी थिएटरचा समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शंभर ते दोनशे आसन क्षमतेच्या मिनी थिएटरमध्ये महापुरुषांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्याची सोय करता येईल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. संपूर्ण इमारत सौर ऊर्जेवर संचालित असावी, एक उपहारगृह असावे, अशाही सूचना त्यांनी केल्या. मूलभूत विज्ञान केंद्रासाठी जागा निश्चित करावी आणि चांगल्या आर्किटेक्चरच्या सल्ल्याने डिझाईन तयार करावे व लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश ना. श्री. गडकरी यांनी दिले. यावेळी शहरातील विविध विकासकामांवरही चर्चा झाली.
 

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...