Wednesday, July 10, 2024

ट्राफिक चिल्ड्रन पार्कमध्ये दिले जाणार वाहतुकीचे नि:शुल्क प्रशिक्षण मनपा आयुक्तांनी केली पाहणी : जनआक्रोशचा पुढाकार

नागपूर : धरमपेठ येथील प्रसिध्द ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ट्राफिक चिल्ड्रन पार्क येथे नामांकित सामाजिक संस्था जनआक्रोश यांच्या सहकार्याने मिनी बसव्हॅन व शाळामहाविद्यालयाच्या बस चालक यांना वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालविण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे. याकरीता नागपूर महानगरपालिकेतर्फे जनआक्रोश संस्थेला ट्राफिक चिल्ड्रन पार्कमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (10 जुलै) ट्राफिक चिल्ड्रन पार्कची पाहणी केली. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीयुवकमहिलांना वाहतुकीच्या नियमांचे पालन 
करण्याचे प्रशिक्षण देण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.याप्रसंगी उपायुक्त डॉ. रंजना लाडेउपायुक्त प्रकाश वराडेउघान अधीक्षक अमोल चौरपगारकार्यकारी अभियंता (विघुत) राजेंद्र राठोडविजय गुरूबक्षानीउपअभियंता नवघरेमाकोडे व जनआक्रोश संस्थेचे संस्थापक सचिव रविंद्र कासखेडीकर उपस्थित होते.श्री. कासखेडीकर यांनी सांगितले कीरविवार 14 जुलै पासून वाहन चालकांना प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. हे प्रशिक्षण नि:शुल्क दिले जाणार आहे. यासाठी ट्राफिक चिल्ड्रन पार्कमध्ये जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मनपा आयुक्तांचे आभार मानले. विविध शासकीय विभागातून सेवानिवृत्त अधिकारी येथे प्रशिक्षण देणार आहेत.या प्रसंगी मनपा आयुक्तांनी सांगितले कीजनआक्रोश संस्थेला नि:शुल्क प्रशिक्षण देण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 



त्यांनी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ट्राफिक चिल्ड्रन पार्क येथे विविध शाळांच्या मुलांना वाहतूक नियमांबद्दल माहिती देण्याकरीता सहल आयोजित करण्याचे आवाहन केले. तसेच विविध महाविद्यालयातील युवकांना सुध्दा येथे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की
रस्त्यावर वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पालन करणे गरजेचे आहे. यासाठी ट्राफिक चिल्ड्रन पार्क योग्य दिशा देऊ शकेल. त्यांनी मनपा अधिका-यांना वाहतुकी नियमाबद्दलचे सायनेज लावण्याचे निर्देश दिले. ट्राफिक पार्कमधील ट्राफिक सिग्नलझेब्रा क्रॉसिंग व्यवस्थीत करण्याचे निर्देश दिले. पार्कमध्ये मुलांसाठी खेळणी सुव्यवस्थित ठेवणेप्रसाधनगृहांची स्वच्छता राखणेकच-याची वेळोवेळी विल्हेवाट लावण्याचे सुध्दा निर्देश दिले.




तसेच बंद पडलेल्या कारंजा पुन्हा सुरू करण्याचेही निर्देश दिले.या प्रसंगी जनआक्रोश संस्थेचे अनिल जोशीविश्वनाथ पांडेसंजय डबलीशाम पोहाणेरमेश लोखंडेगिरीश देशपांडेविवेक अमीनआर.बी. पाहुणेसाधना पत्कीप्रशांत धर्माधिकारीराजा अग्रवाल उपस्थित होते. 
 

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...