.jpg)
कर्मचा-यांची नियुक्ती केली जाणार आहे. नियुक्त सर्व कर्मचायांना योजनेचे अर्ज भरण्यासंदर्भात प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत सर्व झोनमधील प्रभागनिहाय अर्जस्वीकृती केंद्र कार्यान्वित करण्याचे देखील निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.याशिवाय मनपाच्या दहाही झोन कार्यालयामध्ये तसेच आंगणवाडी केंद्रामध्ये देखील अर्ज स्वीकृती केंद्र सुरू आहेत. महिला स्वतः ‘नारीशक्ती दूत’ अॅप द्वारे देखील अर्ज करू शकतात. ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यास असमर्थ असल्यास आपल्या प्रभागातील केंद्रावर किंवा झोन कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मन
पातर्फे करण्यात येत आहे.योजना कुणासाठी?महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित स्त्री, विधवा, घटस्फोटीत महिला, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक 21 ते 65 वर्षापर्यंत अविवाहित महिला, 2.5 लाखापर्यत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. याकरिता किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाचे 65 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.ही कागदपत्रे आवश्यक:- योजनेसाठी आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile
Certificate) ते नसल्यास महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (Leaving Certificate) किंवा जन्म दाखला (Birth certificate) किंवा मतदार ओळखपत्र (Voter ID Card), परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर पतीचा जन्म दाखला किंवा पतीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र (Domicile
Certificate) यापैकी कुठलेही एक कागदपत्र सादर करावे. याशिवाय उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत) नसल्यास पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. (आधारकार्ड सोबत लिंक असावे.) हमीपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ असून मोठ्या संख्येत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment