नागपूर:- नागपूर शहरातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास
कुटुंबांमधील विद्यार्थ्यांकरिता विज्ञानाचे भांडार खुले करणारे आंतरराष्ट्रीय
दर्जाच्या सोयीसुविधायुक्त असे विज्ञान केंद्र लवकरात लवकर निर्माण करावे, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी
यांनी अधिकाऱ्यांना दिली. हे विज्ञान केंद्र गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी
वरदान ठरेल, असा विश्वासही त्यांनी
यावेळी व्यक्त केला. श्री. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक
आयोजित करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रभाषा परिवारचे सुरेश अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महामेट्रोचे
व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.
अभिजित चौधरी, एनआयटी सभापती संजय मीणा, शिक्षणाधिकारी आदींची उपस्थिती होती. राष्ट्रभाषा परिवारच्या वतीने गेल्या
अनेक वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळ्याचे नियमित आयोजन केले जात आहे. या मेळ्यात
बहुतांश प्रमाणात महानगरपालिकेच्या शाळांचे विद्यार्थी सहभागी होऊन प्रयोग सादर
करतात. ना. श्री. गडकरी यांनी या संकल्पनेचे कौतुक करून शहरातील गरीब कुटुंबातील
विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र मूलभूत विज्ञान केंद्र असावे, अशी संकल्पना मांडली. याच संकल्पनेवर आधारित हे केंद्र उभे होणार असून ते
आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे, असा आग्रह ना. श्री.
गडकरी यांनी केला. गरोबा मैदान येथील पूर्वीच्या मनपा शाळेच्या एक एकर जागेवर
नागपूर सुधार प्रन्यास हे मूलभूत विज्ञान केंद्र उभारणार आहे. याठिकाणी भारतासह
जगभरातील विज्ञानाच्या संदर्भातील प्रयोगांचे प्रदर्शन असावे, चांद्रयान, मंगलयानची प्रतिकृती
असावी, जेणेकरून या
विद्यार्थ्यांना चित्ररुपात ज्ञान मिळेल आणि त्यांच्यामध्ये विज्ञानाबद्दल गोडी
निर्माण होईल. एका छोट्या हॉलमध्ये बसून विद्यार्थी विज्ञानाचे प्रयोग करू शकतील, अशी सोय देखील करावी, असेही ना. श्री. गडकरी
यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. विज्ञान केंद्रासोबत ई-लायब्ररी व मिनी थिएटरचा
समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शंभर ते दोनशे आसन क्षमतेच्या मिनी
थिएटरमध्ये महापुरुषांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्याची सोय करता येईल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. संपूर्ण इमारत सौर ऊर्जेवर संचालित असावी, एक उपहारगृह असावे, अशाही सूचना त्यांनी
केल्या. मूलभूत विज्ञान केंद्रासाठी जागा निश्चित करावी आणि चांगल्या
आर्किटेक्चरच्या सल्ल्याने डिझाईन तयार करावे व लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश ना. श्री. गडकरी यांनी दिले. यावेळी शहरातील विविध
विकासकामांवरही चर्चा झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे
नागपूर - शहरातील अंबाझरी , फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...

-
नागपुर:- केंद्र सरकार ने जमीन-जायदाद खरीदी-बिक्री से जुड़े किसी भी गति विधी के लिए महारेरा एक्ट के साथ बार कोड की भी अनिवार्यता लागू की,लेकि...
-
आकाशवाणी नागपुर केन्द्र में संविधान निर्माता विश्वभूषण डा. बाबासाहेब अम्बेडकर की जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई। पिछले वर्ष से ही आकाशवाणी...
No comments:
Post a Comment