Tuesday, October 8, 2024

संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात स्वच्छता आणि प्रकाश व्यवस्थेकडे लक्ष द्या मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश

नागपूर:- धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभानिमित्त दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांची सुविधा आणि आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छता आणि प्रकाश व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्याअसे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची सोमवारी (ता.७) मनपा  आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दीक्षाभूमी येथे भेट देउन पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलअधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारडॉ. श्वेता बॅनर्जीउपायुक्त डॉ. गजेंद्र महल्लेउपायुक्त श्री. मिलींद मेश्रामवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरमुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडेकार्यकारी अभियंता सर्वश्री राजेंद्र राठोडरवींद्र बुंधाडेश्रीकांत वाईकरकार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणेश्री. राजेश दुफारे,  परमपूज्य डॉ. बाबासाहेब 
आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य श्री. विलास गजघाटेश्री. भैय्याजी खैरकरसमन्वयक शरद मेश्रामश्री. अशोक कोल्हटकरलक्ष्मीनगर झोनचे झोनल अधिकारी श्री. रामभाउ तिडकेउपअभियंता श्री. राजेंद्र राठोडअग्निशमन केंद्र अधिकारी श्री. तुषार बाराहाते आदी उपस्थित होते.१२ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो बौद्ध अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणार आहेत. १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लाखोंच्या संख्येत येणा-या बौद्ध अनुयायांना आरोग्यपूर्ण सुविधा मिळाव्यात यासाठी संपूर्ण दीक्षाभूमीपरिसरामध्ये स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याबाबत आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
यावेळी त्यांनी दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसरमुख्य समारंभाचे ठिकाणडॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथील इमारतीच्या मागील बाजूस असलेली तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्थाआरोग्य उपसंचालक कार्यालय (माता कचेरी) परिसरशासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) आणि जेल प्रशासनाच्या जागेतील तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था या सर्व व्यवस्थेची पाहणी केली. दीक्षाभूमी स्तूपतसेच सर्व मार्ग आणि शौचालयांच्या ठिकाणी वीज पुरवठा निरंतर सुरू राहील याकडे कटाक्षाने लक्ष देणे तसेच प्रसाधनगृहांमध्ये वीज पुरवठ्यासोबतच निरंतर पाणी पुरवठा देखील ठेवणे आणि सर्व शौचालयांच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी मुबलक प्रमाणात हँडवॉशची व्यवस्थाकरण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.संपूर्ण परिसरात कुठेही डार्क स्पॉट’ राहता कामा नये याची विशेष काळजी घेउन मुबलक प्रमाणात विद्युत दिव्यांची व्यवस्था करणेवेळोवेळी परिसराची स्वच्छता करण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये स्वच्छता कर्मचा-यांची नेमणूक करणे याबाबत देखील मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले.

किटकजन्य आजारांबाबत नियमित जनजागृती करावी: डॉ. प्रदीप आवटे

 नागपूर:-हत्तीरोग, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या किटकजन्य आजारांपासून सतर्कतेसाठी उपाय-योजना जितकी आवश्यक आहेत, तितकीच यासारख्या किटकनाशक आजारांबाबत नियमित जनजागृती आवश्यक असून, त्यानुसार कार्य करावे असे आवाहन माजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.०७ ) बैठक पार पडली.  बैठकीत माजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, स्वास्थ्य व परिवार कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूरचे प्राचार्य डॉ. श्रीराम  गोगुलवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती यांच्या सह झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.बैठकीत किटकजन्य आजारांबाबत माहिती देत माजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, किटकनाशक आजारांबाबत नियमित जनजागृती करणे  आवश्यक आहे. याकरिता लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक यांच्या मार्फत जनजागृती करायला हवी. असे सांगत डॉ. प्रदीप आवटे यांनी, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या किटकजन्य हे डासांमुळे होतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. डेंग्यू, मलेरिया, झिका,  चिकनगुनिया च्या रुग्णाची नियमित तपासणी व त्यांची नोंद वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी आहे.  असे करतांना मात्र, कुठेही भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची देखील दक्षता घ्यावी. बांधकाम क्षेत्र काम करणाऱ्या मजूर, कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी, बांधकाम सुरु असलेल्या परिसरात कुठेही डासांची उत्पत्ती  होणार नाही, याची दक्षता विकासकाद्वारे घेण्यात यावी अशा सूचनाही दिल्या.बैठकीत मलेरिया फायलेरिया अधिकारी डॉ. मंजुषा मठपती यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे 'किटकजन्य आजार' संदर्भात माहिती दिली. त्यांनी धरमपेठ झोन व मंगळवारी झोन अंतर्गत चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे सांगितले. तसेच नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नियमित तपासणी करण्यात यावे अशा सूचना दिल्या. 
 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 73 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

 
नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (08) रोजी शोध पथकाने 73 प्रकरणांची नोंद करून 43,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया,  स्टॉल्स, पानठेले,  फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 29 प्रकरणांची नोंद करून  11,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 5,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून १,००० रुपयांची वसुली करण्यात आली.  वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2,000/-  रुपयांची 
वसुली करण्यात आली.  उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून 3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून 8,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका, कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 5,000 रुपयांची वसुली करण्यात आले.  ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. जॅक प्रा.लि. यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मे. राजेश बद्रर्स रस्त्याच्या परिसरात दुकानातील कचरा जाळला जात असल्याने  रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला.  

तसेच धंतोली झोन अंतर्गत मोहीत मलानी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. नेहरु नगर झोन अंतर्गत रामपाल यादव यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. जयंत स्विट यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. गौरव स्विट्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अंतर्गत मे. जनाब लियाकत भाई यांनी रस्त्यालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात स्क्रॅब कचरा टाकल्याबद्दल रु. ५,०००/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. मंगलवारी झोन में युनीसॉफ्ट टेक्नोलॉजी यांनी विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने प्रकरणांची नोंद करून रू. 5,0000/- दंड वसूल केला.

Wednesday, October 2, 2024

स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा समारोप श्री. नितीन गडकरी :

नागपूर - कुठलाही कचरा टाकाऊ नसतो, असे माझे मत आहे. कचऱ्याचा वापर, त्याचे रिसायकलिंग करून आपण अनेक कामांमध्ये वापरू शकतो. दिल्लीतील २० लाख टन कचरा आम्ही रस्त्यांच्या निर्मितीसाठी वापरला. कचऱ्यामधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वेगळे काढता येते. त्याचा वापर रस्तेबांधणीत करता येतो. त्यामुळे टाकाऊ वस्तूंमधून अर्थाजन आणि त्यातून महिलांचे सक्षमीकरण ही महानगरपालिकेची संकल्पना आदर्श ठरेल. कारण कचऱ्याचा योग्य वापर केल्यास त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते, असे मत केंद्रीय 

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) व्यक्त केले.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नागपूर शहरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवाअभियानाचा केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. स्वच्छता ही सेवाअभियानाच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त बुधवारी २ ऑक्टोबर रोजी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध वारसास्थळांची सफाई अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत कस्तुरचंद पार्क येथील स्वच्छता अभियान कार्यक्रमात आयोजित श्रमदान कार्यक्रमात ना. श्री. गडकरी बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे डीआयजी प्रशांत जांभुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कचऱ्याच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी आता कचऱ्यातून इंधन निर्मितीच्या दिशेने काम सुरू आहे. प्लास्टिकपासून टाईल्सची निर्मिती करून नागपूर महानगरपालिकेने त्याचा वापर सुरू करावा,’ अशी सूचनाही ना. श्री. गडकरी यांनी केली. स्वच्छता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अस्वच्छतेमुळे प्रदूषण वाढते आणि प्रदूषणामुळे माणसाचे आयुष्यमान कमी होते. त्यामुळे जीवनात सदैव स्वच्छतेचे अनुकरण करण्याची प्रतिज्ञा घेऊया, असे आवाहनही त्यांनी केले. ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते मनपाच्या नवनिर्मित तीन स्मार्ट पब्लिक टॉयलेट आणि आरआरआर सेंटरचे लोकार्पण झाले. मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन मनीष सोनी यांनी केले.

 

मनपाच्या “मन की सफाई” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद... स्वच्छतादूतांच्या सुमधुर संगीत प्रस्तुतीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

नागपूर ता १: स्वच्छसुंदरस्वस्थ शहरासह हरित नागपूर साकारण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या स्वच्छता दूतांनी एखाद्या रॉकस्टार प्रमाणे सुमधुर संगीताची मेजवानी सादर केली.एकापेक्षा एक सरस व सुमधुर गाण्यांची प्रस्तुती करीत स्वच्छता देताना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. स्वच्छता  कर्मचाऱ्यांसाठी मनपाद्वारे आयोजित मन की सफाई: स्वच्छता संग मन का उत्सव2024" कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्यास्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी (ता: १) मानकापूर स्थितविभागीय क्रीडा संकुल येथे "मन की सफाई: स्वच्छता संग मन का उत्सव 2024"चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरीअतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल,नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा चांडकमनपाचे 
अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले,उपायुक्त श्री. प्रकाश वराडेसहायक आयुक्त सर्वश्री.गणेश राठोड, प्रमोद वानखेडेअशोक घरोटेस्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर श्रीमती किरण मुंदडाश्रीमती आंचल वर्मामनपाच्या दहाही झोनचे झोनल अधिकारी  व सफाई कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले कीशहारला स्वच्छ साकारण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या स्वच्छता दूत यांना कामासाठी नवीन ऊर्जा मिळावी याकरिता मनपाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी पुढे सांगितले कीस्वच्छता कर्मचाऱ्यांनी मनावर घेतलं तरशहरात कुठेही कचरा दिसणार नाहीआपल्या आचरणातून स्वच्छतेची कृती दिसल्यास त्याचा परिणाम आपल्या कामाच्या माध्यमातुन संपूर्ण शहराच्या राहणीमानावर होईल. स्वच्छता कर्मचारीयांनी प्रामाणिकपणे कार्य केल्यास संपूर्ण शहरात एक चांगला संदेश जाईल असेहीआयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले. यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले कीस्वच्छता कर्मचारी यांचे इतरांप्रमाणेराष्ट्र निर्मितीत मोठे योगदान आहे. त्यांनी वेळेवर कर्तव्यावर येतं आपले काम योग्यरितीने करावे मनपाचे सर्व स्वच्छता कर्मचारी हे  स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी मनपाचे संदेशवाहक आहेत. 




असेही श्रीमती गोयल यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त श्रीअजय चारठाणकर यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वच्छतेचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत  घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी घंटागाडी ते गाडीवाला आया पर्यतचा संपूर्ण घटनाक्रम सांगतसर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी आणखी जोमाने काम करण्याची ग्वाही दिली. मन की सफाई: स्वच्छता संग मन का उत्सव 2024 कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांसाठीसंगीतमय कार्यक्रमनृथ्यव नाट्य सादरीकरणासह सफाई कर्मचाऱ्यांना तणावमुक्त कसे राहावे याचे मार्गदर्शनकरण्यात आले.विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम झीरो वेस्ट संकल्पनेवर आयोजितकरण्यात आला. यात कचरा होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. कार्यक्रमात प्रसिद्ध योग गुरु नकुल अग्रवाल यांनी तणावाच्या कामातही तणावमुक्त कसे राहावेयांचे धडे दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले.  सुमधुर संगीताने प्रेक्षक मंत्रमुग्ध  सफाई मित्र चमूद्वारे संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. यात गायक सर्वश्री.प्रकाश कलसियाअजय मलिक,गौरव हजारेजितेंद्र मूनश्याम समुद्रेश्यामराव वामनअमित हाडोती,गणेश समुद्रेदिनेशजाधवयोगेश पळसेरकरधीरज शुक्ला,जितेंद्र मोरेआशिष उसर्बरासेसुभाष मार्कंडे यांच्याद्वारे सुमधुर गीत सादर करण्यात आले. गायक श्री.अजय मलिक यांनी जिंदगी की यही रीत है हे गीत सादर करताच उपस्थितांनी ठेका धरलानंतर गायक श्री. गौरव हजारे यांनी ऐसा देश है मेरा गीत सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर जिंदगीमौत ना बन जाये गीताचे  गायक श्री. प्रकाश कलासिया आणि श्री जितेंद्र मून यांनी उत्तम सादरीकरणकेले. संदेसे आते है  हे गीत श्री. गौरव हजारे यांनी तरलागा चुनरी मे दागजहा डाल डाल पे, चले चलो हे गीत गायक श्री. गौरव हजारे यांनी सादर केले. गायक श्री. सुभाष मार्कंडे आणि श्री. आशिष उसर्बरासे यांनी सुनो गौर से दुनिया वालो हे यांच्यासह इतर गीत सादर केले.त्यांना संगीतकार सर्व श्री.राजेश दामणकर कृष्ण जानवरे,दिलीप तांबेअमिततांबेराजा राठोडनितीन अहिरेशिव सरोदे यांनी उत्तम साथ दिली.  तसेच यह देश है वीर जवनो का वर समूह गीत सादरकरण्यात आले. तर अमर मोरकर  गणेश तोमस्कर ऐश्वर्या यांच्या चमूने मायभवानीनटरंग उभा या गीतावर सुंदर नृत्य सादर करीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध 
केले.सर्व कलाकारांचे सन्मान चिन्ह देवुन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले.

Thursday, September 19, 2024

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील. या योजनेअंतर्गत कारागीरांना दिलेल्या प्रत्यक्ष पाठिंब्याचे प्रतीक म्हणून, ते 18 प्रकारच्या व्यापारातील 18 लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा अंतर्गत पतपुरवठा देखील वितरित करतील. या कारागिरांनी जपलेला वारसा आणि समाजाला दिलेल्या निरंतर योगदानाबद्दल, पंतप्रधानांच्या हस्ते पी एम विश्वकर्मा योजनेच्या 
यशोगाथेला समर्पित एका स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण देखील होणार आहे.या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील अमरावती येथे  प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपारेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणीही  होणार आहे. महाराष्ट्र् औद्योगिक विकास मंडळातर्फे राज्य अंमलबजावणी संस्था म्हणून हे पार्क 1000 एकरात उभारण्यात येत आहे. सरकारने  वस्त्रोद्योग उद्योगासाठी सात पीएम मित्र पार्क उभारण्याला मंजुरी दिली आहे. भारताला वस्त्रोद्योग आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या पार्कमुळे थेट परदेशी गुंतवणुकीसह इतर प्रकारची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होईल आणि या क्षेत्रातील नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल.पंतप्रधान महाराष्ट्र सरकारच्या "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" योजनेचा शुभारंभ करतील. राज्यातील 15 ते 45 वयोगटातील युवक युवतींना

कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने आणि विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यातील 1,50,000  युवक युवतींना दरवर्षी नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण मिळू शकेल.पंतप्रधानांच्या हस्ते  "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा" शुभारंभ होणार आहे. या योजनेंतर्गत, महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील नवउद्यमी स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मदत दिली जाईल, 25 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. योजनेतील एकूण तरतुदीच्या 25 टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरीता राखीव ठेवण्यात येईल. या योजनेमुळे महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना स्वावलंबी होऊन स्वतंत्र पणे कार्य करता येईल.

मनपातर्फे २२ सप्टेंबर रोजी "स्वच्छता दौड"

 नागपूर:-'स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता' या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्या  स्वच्छता ही सेवा २०२४' अभियांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथे रविवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता “स्वच्छता दौड चे आयोजन करण्यात येत आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते स्वच्छता दौड च्या टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभा कक्षात आयोजित छोटेखानी समारंभात घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्लेक्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी युवा पिढीला भुरळ घालणाऱ्या इन्स्टाग्राम, रिल्स, फेसबुक पेज, रेडिओ जॉकिज असे सोशल मीडियावर प्रभुत्व असलेल्या इन्फ्लुएंसर यांची बैठक घेतआपल्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना 
स्वच्छतेचा संदेश जावा असे आवाहन केले. यावेळी शहरातील जवळपास ३५ इन्फ्लुएंसर उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल म्हणाल्या कीकचरामुक्त शहर या संकल्पनेला व्यापक रूप देण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि स्वच्छतेसाठी युवकांसह नागरिकांनी पुढाकार घ्यावा, या हेतूने केंद्रीय गृह निर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा 2024' अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत नानाविध उपक्रम राबविण्यात येणार असूनयाद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. तरी या शहर स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवीत आपल्या नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी केले. 

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...