नागपूर ता १: स्वच्छ, सुंदर, स्वस्थ शहरासह हरित
नागपूर साकारण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या स्वच्छता दूतांनी एखाद्या
रॉकस्टार प्रमाणे सुमधुर संगीताची मेजवानी सादर केली.एकापेक्षा एक सरस व सुमधुर
गाण्यांची प्रस्तुती करीत स्वच्छता देताना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी
मनपाद्वारे आयोजित “मन की सफाई: स्वच्छता संग मन का उत्सव2024" कार्यक्रमाला उपस्थितांनी
उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता या संकल्पनेस
अनुसरून केंद्र सरकारच्यास्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या
वतीने मंगळवारी (ता: १) मानकापूर स्थितविभागीय क्रीडा संकुल येथे "मन की
सफाई: स्वच्छता संग मन का उत्सव 2024"चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात मनपा
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल,नागपूर स्मार्ट
सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा चांडक, मनपाचे
अतिरिक्त आयुक्त
श्री. अजय चारठाणकर यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ.
गजेंद्र महल्ले,उपायुक्त श्री. प्रकाश
वराडे, सहायक आयुक्त
सर्वश्री.गणेश राठोड, प्रमोद वानखेडे, अशोक घरोटे, स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर
श्रीमती किरण मुंदडा, श्रीमती आंचल वर्मा, मनपाच्या दहाही झोनचे
झोनल अधिकारी व सफाई कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन
करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, शहारला स्वच्छ
साकारण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या स्वच्छता दूत यांना कामासाठी नवीन ऊर्जा
मिळावी याकरिता मनपाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयुक्त डॉ. अभिजीत
चौधरी पुढे सांगितले की, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी
मनावर घेतलं तरशहरात कुठेही कचरा दिसणार नाही, आपल्या आचरणातून स्वच्छतेची कृती दिसल्यास त्याचा
परिणाम आपल्या कामाच्या माध्यमातुन संपूर्ण शहराच्या राहणीमानावर
होईल. स्वच्छता कर्मचारीयांनी प्रामाणिकपणे कार्य केल्यास संपूर्ण शहरात एक चांगला
संदेश जाईल असेहीआयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले. यावेळी बोलताना
अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले की, स्वच्छता कर्मचारी
यांचे इतरांप्रमाणेराष्ट्र निर्मितीत मोठे योगदान आहे. त्यांनी वेळेवर कर्तव्यावर
येतं आपले काम योग्यरितीने करावे मनपाचे सर्व स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतेबाबत
जनजागृतीसाठी मनपाचे संदेशवाहक आहेत.
असेही श्रीमती गोयल यांनी सांगितले. अतिरिक्त
आयुक्त श्री, अजय चारठाणकर यांनी
आपल्या मार्गदर्शनात स्वच्छतेचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत घनकचरा व्यवस्थापन
विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी घंटागाडी ते गाडीवाला आया
पर्यतचा संपूर्ण घटनाक्रम सांगत, सर्व सफाई
कर्मचाऱ्यांच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी आणखी जोमाने काम करण्याची ग्वाही दिली. मन की सफाई: स्वच्छता
संग मन का उत्सव 2024 कार्यक्रमात सफाई
कर्मचाऱ्यांसाठीसंगीतमय कार्यक्रम, नृथ्यव नाट्य सादरीकरणासह सफाई कर्मचाऱ्यांना
तणावमुक्त कसे राहावे याचे मार्गदर्शनकरण्यात आले.विशेष म्हणजे हा संपूर्ण
कार्यक्रम झीरो वेस्ट संकल्पनेवर आयोजितकरण्यात आला. यात कचरा होणार नाही याची
दक्षता घेण्यात आली. कार्यक्रमात प्रसिद्ध योग गुरु नकुल अग्रवाल यांनी तणावाच्या
कामातही तणावमुक्त कसे राहावेयांचे धडे दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क
अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले. सुमधुर संगीताने
प्रेक्षक मंत्रमुग्ध सफाई मित्र चमूद्वारे
संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. यात गायक सर्वश्री.प्रकाश कलसिया, अजय मलिक,गौरव हजारे, जितेंद्र मून, श्याम समुद्रे, श्यामराव वामन, अमित हाडोती,गणेश समुद्रे, दिनेशजाधव, योगेश पळसेरकर, धीरज शुक्ला,जितेंद्र मोरे, आशिष उसर्बरासे, सुभाष मार्कंडे
यांच्याद्वारे सुमधुर गीत सादर करण्यात आले. गायक श्री.अजय मलिक यांनी “जिंदगी की यही रीत है” हे गीत सादर करताच उपस्थितांनी ठेका धरला, नंतर गायक श्री. गौरव
हजारे यांनी “ऐसा देश है मेरा” गीत सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर “जिंदगीमौत ना बन जाये” गीताचे गायक श्री. प्रकाश
कलासिया आणि श्री जितेंद्र मून यांनी उत्तम सादरीकरणकेले. “संदेसे आते है” हे गीत श्री. गौरव
हजारे यांनी तर“लागा चुनरी मे दाग”, “जहा डाल डाल पे”,“ चले चलो” हे गीत गायक श्री. गौरव
हजारे यांनी सादर केले. गायक श्री. सुभाष मार्कंडे आणि श्री. आशिष उसर्बरासे यांनी
सुनो गौर से दुनिया वालो हे यांच्यासह इतर गीत सादर केले.त्यांना संगीतकार सर्व
श्री.राजेश दामणकर, कृष्ण जानवरे,दिलीप तांबे, अमिततांबे, राजा राठोड, नितीन अहिरे, शिव सरोदे यांनी उत्तम
साथ दिली. तसेच “यह देश है वीर जवनो का” वर समूह गीत सादरकरण्यात आले. तर अमर मोरकर गणेश तोमस्कर ऐश्वर्या यांच्या चमूने “मायभवानी”, नटरंग उभा या गीतावर
सुंदर नृत्य सादर करीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध
केले.सर्व कलाकारांचे सन्मान चिन्ह देवुन
मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले.
No comments:
Post a Comment