नागपूर:- धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य
समारंभानिमित्त दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांची सुविधा आणि आरोग्य आणि
सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छता आणि प्रकाश
व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्या, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.धम्मचक्र
प्रवर्तन दिनासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची
सोमवारी (ता.७) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दीक्षाभूमी
येथे भेट देउन पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अधीक्षक अभियंता श्री. मनोज
तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक
सेलोकर, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.
बी.पी. चंदनखेडे, कार्यकारी अभियंता सर्वश्री राजेंद्र राठोड, रवींद्र बुंधाडे, श्रीकांत वाईकर, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, श्री. राजेश दुफारे, परमपूज्य डॉ. बाबासाहेब
आंबेडकर
स्मारक समितीचे सदस्य श्री. विलास गजघाटे, श्री. भैय्याजी खैरकर, समन्वयक शरद मेश्राम, श्री. अशोक कोल्हटकर, लक्ष्मीनगर झोनचे झोनल अधिकारी श्री. रामभाउ तिडके, उपअभियंता श्री. राजेंद्र राठोड, अग्निशमन केंद्र अधिकारी श्री.
तुषार बाराहाते आदी उपस्थित होते.१२ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त
लाखो बौद्ध अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
दीक्षाभूमीवर येणार आहेत. १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर
महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध
करून देण्यात येत आहेत. लाखोंच्या संख्येत येणा-या बौद्ध अनुयायांना आरोग्यपूर्ण
सुविधा मिळाव्यात यासाठी संपूर्ण दीक्षाभूमीपरिसरामध्ये स्वच्छतेला विशेष प्राधान्य
देण्याबाबत आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
यावेळी त्यांनी
दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर, मुख्य समारंभाचे ठिकाण, डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथील इमारतीच्या
मागील बाजूस असलेली तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, आरोग्य उपसंचालक कार्यालय (माता
कचेरी) परिसर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र
(आयटीआय) आणि जेल प्रशासनाच्या जागेतील तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था या सर्व
व्यवस्थेची पाहणी केली. दीक्षाभूमी स्तूप, तसेच सर्व मार्ग आणि शौचालयांच्या ठिकाणी वीज पुरवठा निरंतर
सुरू राहील याकडे कटाक्षाने लक्ष देणे तसेच प्रसाधनगृहांमध्ये वीज पुरवठ्यासोबतच
निरंतर पाणी पुरवठा देखील ठेवणे आणि सर्व शौचालयांच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी मुबलक
प्रमाणात हँडवॉशची व्यवस्थाकरण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.संपूर्ण परिसरात
कुठेही ‘डार्क स्पॉट’ राहता कामा नये याची विशेष काळजी
घेउन मुबलक प्रमाणात विद्युत दिव्यांची व्यवस्था करणे, वेळोवेळी परिसराची स्वच्छता
करण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये स्वच्छता कर्मचा-यांची नेमणूक करणे याबाबत देखील मनपा
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले.
No comments:
Post a Comment