Tuesday, October 8, 2024

किटकजन्य आजारांबाबत नियमित जनजागृती करावी: डॉ. प्रदीप आवटे

 नागपूर:-हत्तीरोग, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या किटकजन्य आजारांपासून सतर्कतेसाठी उपाय-योजना जितकी आवश्यक आहेत, तितकीच यासारख्या किटकनाशक आजारांबाबत नियमित जनजागृती आवश्यक असून, त्यानुसार कार्य करावे असे आवाहन माजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.०७ ) बैठक पार पडली.  बैठकीत माजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, स्वास्थ्य व परिवार कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूरचे प्राचार्य डॉ. श्रीराम  गोगुलवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती यांच्या सह झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.बैठकीत किटकजन्य आजारांबाबत माहिती देत माजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, किटकनाशक आजारांबाबत नियमित जनजागृती करणे  आवश्यक आहे. याकरिता लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक यांच्या मार्फत जनजागृती करायला हवी. असे सांगत डॉ. प्रदीप आवटे यांनी, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या किटकजन्य हे डासांमुळे होतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. डेंग्यू, मलेरिया, झिका,  चिकनगुनिया च्या रुग्णाची नियमित तपासणी व त्यांची नोंद वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी आहे.  असे करतांना मात्र, कुठेही भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची देखील दक्षता घ्यावी. बांधकाम क्षेत्र काम करणाऱ्या मजूर, कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी, बांधकाम सुरु असलेल्या परिसरात कुठेही डासांची उत्पत्ती  होणार नाही, याची दक्षता विकासकाद्वारे घेण्यात यावी अशा सूचनाही दिल्या.बैठकीत मलेरिया फायलेरिया अधिकारी डॉ. मंजुषा मठपती यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे 'किटकजन्य आजार' संदर्भात माहिती दिली. त्यांनी धरमपेठ झोन व मंगळवारी झोन अंतर्गत चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे सांगितले. तसेच नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नियमित तपासणी करण्यात यावे अशा सूचना दिल्या. 
 

No comments:

Post a Comment

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दान केल्या घरातील निरुपयोगी वस्तू -निरुपयोगी वस्तू संकलन/दान केंद्राचे आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते उद्घाटन

  नागपूर : - नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभ...