Monday, January 13, 2025

मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा डॉ. अभिजीत चौधरी

नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित करुन दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी व नियोजनाच्या संदर्भात आयुक्तांनी सोमवारी (ता.१३) सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनपा मुख्यालतील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात बैठक पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलअतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकरउपायुक्त श्रीमती विजया बनकरउपायुक्त सर्वश्री विजय देशमुखमिलींद मेश्रामप्रकाश वराडेगणेश राठोडअशोक गराटेपरिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधवउपायुक्त उपायुक्त डॉ. रंजना लाडेअधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारडॉ. श्वेता बॅनर्जीउद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगारसहायक आयुक्त सर्वश्री श्याम कापसेहरीश राऊतघनश्याम पंधरेनरेंद्र बावनकरविजय थुलमुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी निश्चित केलेल्या प्रत्येक बाबींवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मनपा आयुक्तांनी नागपूर महानगरपालिकेचे संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करणे तसेच संकेतस्थळ ‘यूजर 


फ्रेंडली’ करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. मनपाने सुरु केलेल्या सर्व सेवांचा संकेतस्थळामध्ये अंतर्भाव करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मनपा आणि झोन कार्यालयांच्या सखोल स्वच्छतेचे देखील आयुक्तांनी निर्देश दिले. मनपाच्या दहाही झोनमध्ये स्वच्छता स्पर्धा घेण्याची देखील त्यांनी सूचना केली. झोन कार्यालय तसेच परिसरात देखील स्वच्छता राखली जावीकार्यवाहीमध्ये जप्त साहित्यवाहन आदी पडून असल्यास ते अन्य ठिकाणी जमा करुन त्यांच्या निर्लेखनाची कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागामध्ये लावलेल्या विभागांच्या माहिती फलकावरील माहिती अद्ययावत करणे तसेच मुख्यालय झोनमध्ये पिण्याचे पाणीअभ्यागत कक्ष यांची व्यवस्था देखील अद्ययावत करण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले.तक्रार निवारण पोर्टलवरील तक्रारी निकालात काढण्याची गती वाढविण्याबाबत सुद्धा आयुक्तांनी निर्देशित केले. पोर्टलसोबतच मनपा मुख्यालय तसेच झोनमध्ये नागरिकांकडून देण्यात येणाऱ्या तक्रारी व त्यावरील प्रतिसाद याचे रेकॉर्ड ठेवून प्रलंबित सर्व निकाली काढणे व तक्रारींच्या निराकरणासंदर्भात झोनस्तरावर चमू तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आयुक्तांनी नोडल विभाग म्हणून जबाबदारी निश्चित केली.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 94 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  सोमवार (13) रोजी शोध पथकाने 94 प्रकरणांची नोंद करून 58,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया,  स्टॉल्स,  पानठेले, फेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून  10,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी 
कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 3,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 23 प्रकरणांची नोंद करून 25,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 20 प्रकरणांची नोंद करून 4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. 
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास  10 प्रकरणांची नोंद करून 10,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत श्रीमती. राजश्री रायबोले यांनी चेंबर तोडल्यामुळे त्यातिल सांडपाणी रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. धंतोली झोन अंतर्गत मे. श्री निवास रेसेडेन्सी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अभिषेक किराणा यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 3 प्रकरणांची नोंद करून रू. 20,000/- दंड वसूल केला.

शहर स्वच्छतेत सर्वांचे सहकार्य आवश्यक,स्वच्छ सर्वेक्षणासाठी झोननिहाय तयारी सुरु करा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश

नागपूर:स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या पूर्व तयारी बाबत आढावा बैठक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत सोमवारी (ता. १३) मनपा मुख्यालयातील आयुक्तांच्या सभाकक्षात घेण्यात आली. या बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या तयारी बाबत सादरीकरण करण्यात आले व संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतेसंबंधी कार्याचे निर्देश देण्यात आले. नागपूर शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणची चमूद्वारे पाहणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने दहाही झोनमध्ये सुरू असलेले स्वच्छतेचे कार्य आणि आवश्यक कामाचा यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्तांच्या सभाकक्षात आयोजित आढावा बैठकीमध्ये उपायुक्त सर्वश्री विजय देशमुखमिलींद मेश्रामप्रकाश वराडेगणेश राठोडअशोक गराटेउपायुक्त डॉ. रंजना लाडेपरिवहन व्यवस्थापक श्री विनोद जाधवअधीक्षक 

अभियंता श्री मनोज तालेवारअधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जीमुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्लेसहायक आयुक्त सर्वश्री. हरीश राऊतघनश्याम पंधरेनरेंद्र बावनकरप्रमोद वानखेडेविजय थुलवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरउद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगारकार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारेकार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडेसुनील उईकेराजेंद्र राठोडनरेश शिंगनजुडेश्रीकांत वाईकरअजय पाझारेकमलेश चव्हाणअजय गेडाममनोज सिंगउपद्रव शोध पथक प्रमुख श्री. वीरसेन तांबेसर्व झोनल अधिकारीकेपीएमजीह्युमन मॅट्रिक्स या एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.स्वच्छ भारत अभियान २.० च्या अंतर्गत केपीएमजी एजन्सीद्वारे सादरीकरण देण्यात
आले. त्यांनी यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्यक बाबींची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शहरातील दहाही झोनमध्ये ह्युमन मॅट्रिक्स या एजन्सीच्या प्रतिनिधींद्वारे कचरा संकलन आणि स्वच्छतेबाबत नियमित जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीद्वारे झोनमध्ये आवश्यक कार्यांची देखील माहिती यावेळी सादर करण्यात आली. यामध्ये स्वच्छतेसंबंधी सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहराला स्वच्छ ठेवण्यात सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे तसेच त्याकरिता सर्व कार्यकारी अधिकारीझोनल अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावेअसे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. यावेळी घनकचरा व्यवस्थापनरस्त्याच्या कडेवरील स्वच्छताफुटपाथवरील स्वच्छतासार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व सुव्यस्थाघरोघरील कचरा व्यवस्थापनशाळेतील स्वच्छतावैद्यकीय कचरा व्यवस्थापननदी व नाला स्वच्छताकचऱ्यावर होणारी प्रक्रियाहोम कम्पोस्टिंगबांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन या सर्व ठळक बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. शहर स्वच्छतेचा मुख्य उद्देश अनेकांपर्यंत पोहोविण्याकरिता युवकांच्या व नागरिकांच्या सहकार्याने नवनवीन उपक्रम राबवून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात यावी. स्वच्छ सर्वेक्षणात आपले नागपूर शहर अधिक समोर गेले पाहिजे आणि उच्चांक गाठला पाहिजे याकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मनपा आयुक्त म्हणाले. प्रत्येक झोननुसार तेथील सकारात्मक आणि नकारात्मक बाबी समजून त्यावर कार्य करणे गरजेचे आहे. याविषयी प्रत्येक झोनल अधिकाऱ्याने आराखडा तयार करून कार्य करावे. शहरात ठिकठिकाणी बांधकाम आणि पाडकाम कचरा (C AND D WASTE) बांधकामाच्या ठिकाणी आढळून येत असूनतेथील झोनल अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे कडक निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. शहरातील शौचालयात स्वच्छता असावीआवश्यक त्या सुविधांसह ते युक्त असावेनसल्यास त्याठिकाणी त्वरित काम करण्यात यावे असेही आयुक्त यावेळी म्हणाले. बैठकीमध्ये नदी व नाला स्वच्छतेवर भर देण्यात आला. नाल्यातील झाडीझुडपे तसेच कचरा स्वच्छ करण्यात यावा.शहरातील वायू गुण निर्देशांक सुधारण्यावर काम करा असे आयुक्त म्हणाले. शहरातील सौंदर्यीकरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच जीव्हीपी पॉईंट्स स्वच्छ करण्यात यावेत. झोनल अधिकाऱ्यांनी स्वच्छतेच्या या संपूर्ण कार्याचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

Tuesday, January 7, 2025

नबाबपुरा जुनी मंगळवारी येथील अरुंद रस्त्यांची आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर :- जुनी मंगळवारीनवाबपुरा भागातील अरुंद रस्त्यांची नागपूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता. ७) पाहणी केली. मध्य नागपूरचे आमदार श्री. प्रवीण दटके यांनी येथील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार आयुक्तांनी मनपा अधिकारीमाजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या समवेत परिसरातील रस्त्यांचे निरीक्षण केले.जुनी मंगळवारी, नवाबपुरा हा फार जुना व दाटीवाटीच्या क्षेत्रातील भाग असून या परिसरातील रस्ते अरुंद आहेतत्यामुळे या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असल्याने या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. या भागातील विद्यमान रस्ते ९ ते १२ मीटर रुंद करण्यासंबंधी शहराच्या सुधारित विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना 
अधिनियम १९६६ चे कलम ३७ प्रमाणे फेरबदल करण्याचे प्रस्तावित आहे. मनपा प्रशासनाने ८ रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये चंद्रशेखर आझाद चौक ते गंगाबाई घाटनबाबपुरा मस्जिद ते कमलाबाई वरगणे यांचे घराजवळ गंगाबाई घाट रोड पर्यंतमिशन स्कूल रोड गंगाबाई घाट रोड ते खोब्रागडे दवाखानागोंधळी वाडा रोड ते इटकेलवार वाड्याजवळपारशिवनीकर यांच्या घरापासून कोलबास्वामी चौकाकडे जाणारा रास्ताउमाठे यांचा घरापासून दक्षिणेकडे नागेश्वर प्राथमिक शाळेपर्यंत आणि गंगाबाई घाट छोटी मस्जिद झेंडा चौक पासून आयचीत मंदिर बस स्टॉपपर्यंत या रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. 
मनपा आयुक्तांनी नागरिकांसोबत या रस्त्यांची पाहणी केलीया रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी किती जागा लागणार आहे व किती मालमत्ता बाधित होत आहेत व किती निधी आवश्यक आहेया सर्व बाबींची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला दिले. यावेळी स्थानिक नागरिकांनी देखील रस्ते रुंदीकरणासाठी आयुक्तांना निवेदन केले.याप्रसंगी उपसंचालक नगर रचना विभाग श्री. किरण राऊतअधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारउपायुक्त श्री. गणेश राठोडश्री. प्रमोद गावंडेपुरषोत्तम फाळकेविद्युत ढेंगळेराजेश तेलरांधेमाजी नगरसेवक आणि क्षेत्रातील नागरिक श्रद्धा पाठकवंदना येंगटवारयोगेश गोन्नाडेमनोज चाफलेकृष्णा एनप्रेड्डीवारसुबोध आचार्यविनोद इंगोले व इतर उपस्थित होते.

सीताबर्डी येथे मनपाची अवैध पथविक्रेत्याच्या विरोधात धडक कारवाई

नागपूर:- सीताबर्डी येथे मनपाच्या प्रवर्तन विभागातर्फे अवैध पथविक्रेत्याच्या विरोधात मंगळवार (ता. ७) रोजी सकाळपासून धडक कारवाई करण्यात आली.आज मंगळवार रोजी सकाळपासून मनपाच्या प्रवर्तन विभागातर्फे सीताबर्डीत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईला  सुरूवात करण्यात आली. यावेळी पोलिस उपायुक्त श्री अर्चित चांडकमनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री अजय चारठाणकरसीताबर्डी पोलिस विभाग प्रमुख एएसआई  प्रेम वाघमारेमनपाच्या अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त हरीश रात उपस्थित होते. सहायक आयुक्त हरीश राउत यांच्या मार्गदशनाखालीअतिक्रम पथक प्रमुख श्री भास्कर माळवेश्री शहदाब खानश्री संजय कांबळेउपद्रव्य शोध पथकाचे सुधीर सुडकेश्री विजय पिल्लेश्री मंजल पटले यांच्या पथकाने सकाळी ११ वाजेपासून  टेम्पल 
रोडवरील महाजन मार्केट येथे महानगरपालिकेच्या निवारा केंद्राजवळील हातठेलेपानटपरीचे दुकाने यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर पथकातर्फेमानस चौकमोदी नंबर १,२ आणि ३ आणि व्हेरायटी चौकपंचशील चौक येथे कारवाई केली. यावेळी एकून ७ ट्रक माल जप्त करण्यात आले. यात हातठेलेकपड्याचे स्टॅन्डकाउंटरस्टॅचू  दुकानाचे साईन बोर्ड यांचा समावेश होता. ही कारवाई मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. महाल नंगा पुतला, इतवारी, टी.व्ही. टावर सेमिनरी हिल्स येथे ही प्रवर्तन पथकाने कारवाई केली.

महापालिका आयुक्तांच्या पाहणीनंतर पोलिस आयुक्तालयात आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील अतिक्रमण निर्मूलनासंदर्भात आवश्यक उपाययोजनांबाबत बैठक झाली. यामध्ये अतिक्रमण कारवाईची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १०० पोलिसांचा विशेष ताफा गठित करण्याचा निर्णय झाला आहे. हा ताफा महापालिकेकडून शहरात ज्याठिकाणी कारवाई होईल तिथे सहकार्य करेलअसा निर्णय घेतला. अतिक्रमण काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष ताफ्याच्या सहकार्याने महापालिकेतर्फे शहरातील रस्त्यांना मोकळे करण्याची कारवाई सुरू झाली आहे. 







अनेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला खाद्यपदार्थ विक्रेत्यांची वाहनेठेलेइतर विक्रेत्यांचे हातठेले सर्रासपणे उभे राहत असल्याने वाहतुकीला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. काही रस्त्यांवर तर यामुळे वाहतूक कोडींची समस्याही निर्माण  होत असते.  यासाठी पोलिसांचे विशेष पथक उपलब्ध झाल्याने या कारवाई अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. कारवाई करताना नागरिकांची गैरसोय होणार नाहीयाची काळजी घेण्यात आली आहे.
 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 55 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

 नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  मंगळवार (7) रोजी शोध पथकाने 55 प्रकरणांची नोंद करून 29,100/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून  8,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 
प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 9,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशापगॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ताफुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/ रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास  1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत श्री. प्रविण उके यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत श्री. वैभव राठी (बिल्डर्स) यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 10,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत मे. कॅलिनरी गार्डन अँड रेस्टॉरेन्ट यांनी मनपा यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.


नेहरूनगर झोन अंतर्गत मे. साई लिला अर्पांटमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. नॉव्हेल्टि स्कॅप मट्रेरियल यांनी भंगार साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे.  अप्सरा क्लिीनर यांनी मनपा यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. लक्ष्मी स्वीटस यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अंतर्गत श्री. अतुल साहू यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू. 50,000/- दंड वसूल केला.
 

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...