Tuesday, January 7, 2025

नबाबपुरा जुनी मंगळवारी येथील अरुंद रस्त्यांची आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर :- जुनी मंगळवारीनवाबपुरा भागातील अरुंद रस्त्यांची नागपूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता. ७) पाहणी केली. मध्य नागपूरचे आमदार श्री. प्रवीण दटके यांनी येथील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार आयुक्तांनी मनपा अधिकारीमाजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या समवेत परिसरातील रस्त्यांचे निरीक्षण केले.जुनी मंगळवारी, नवाबपुरा हा फार जुना व दाटीवाटीच्या क्षेत्रातील भाग असून या परिसरातील रस्ते अरुंद आहेतत्यामुळे या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असल्याने या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. या भागातील विद्यमान रस्ते ९ ते १२ मीटर रुंद करण्यासंबंधी शहराच्या सुधारित विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना 
अधिनियम १९६६ चे कलम ३७ प्रमाणे फेरबदल करण्याचे प्रस्तावित आहे. मनपा प्रशासनाने ८ रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये चंद्रशेखर आझाद चौक ते गंगाबाई घाटनबाबपुरा मस्जिद ते कमलाबाई वरगणे यांचे घराजवळ गंगाबाई घाट रोड पर्यंतमिशन स्कूल रोड गंगाबाई घाट रोड ते खोब्रागडे दवाखानागोंधळी वाडा रोड ते इटकेलवार वाड्याजवळपारशिवनीकर यांच्या घरापासून कोलबास्वामी चौकाकडे जाणारा रास्ताउमाठे यांचा घरापासून दक्षिणेकडे नागेश्वर प्राथमिक शाळेपर्यंत आणि गंगाबाई घाट छोटी मस्जिद झेंडा चौक पासून आयचीत मंदिर बस स्टॉपपर्यंत या रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. 
मनपा आयुक्तांनी नागरिकांसोबत या रस्त्यांची पाहणी केलीया रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी किती जागा लागणार आहे व किती मालमत्ता बाधित होत आहेत व किती निधी आवश्यक आहेया सर्व बाबींची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला दिले. यावेळी स्थानिक नागरिकांनी देखील रस्ते रुंदीकरणासाठी आयुक्तांना निवेदन केले.याप्रसंगी उपसंचालक नगर रचना विभाग श्री. किरण राऊतअधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारउपायुक्त श्री. गणेश राठोडश्री. प्रमोद गावंडेपुरषोत्तम फाळकेविद्युत ढेंगळेराजेश तेलरांधेमाजी नगरसेवक आणि क्षेत्रातील नागरिक श्रद्धा पाठकवंदना येंगटवारयोगेश गोन्नाडेमनोज चाफलेकृष्णा एनप्रेड्डीवारसुबोध आचार्यविनोद इंगोले व इतर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...